काही दिवसांपूर्वी, साताराहून पुण्याच्या दिशेने येणारा ट्रक कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने येत असताना या ट्रकवरचे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना उडवत पुढे गेला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतुक बराच वेळ थांबवावी लागली. पुण्यातील नवले पुल हा अपघातांचं केंद्र बनला असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. कारण आहे या ठिकाणी चुकलेली रस्त्याची रचना. तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पुलाचा भागा अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे.
प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीकडून नऱ्हे सेल्फी पॉइंट येथे “सावधान, पुढे नवले पूल आहे” अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहे. या फ्लेक्सवर तीव्र स्वरूपाचा उतार आणि त्याबरोबरीने कावळ्याचा देखील फोटो दाखवण्यात आला आहे. यावर ‘सावधान… पुढे नवले ब्रीज आहे’ अशी रचना केली असून जांभुळवाडी तलावापासून ते नऱ्हे येथील सेल्फी पॉईंट पर्यंत हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. सोशल मीडियावर या बॅनरची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
लवकरच ठाकरेंचे बाकीचे आमदारही आमच्यात येऊ शकतात, रावसाहेब दानवेंचा दावा