नवी दिल्ली: जर तुम्ही ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा १० वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी भविष्यातील नियोजन करा, अन्यथा तुम्हाला पुढे जाऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला नोकरीतून मुदतपूर्व निवृत्ती व्हायचे असेल, तर स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत (व्हीआरएस) सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळते. त्याच वेळी, विशेष परिस्थितीत कंपनी स्वतः व्हीआरएस योजना लागू करून कर्मचार्‍याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती देऊ शकते.

जर कर्मचाऱ्याने स्वतः व्हीआरएस घेण्याचे ठरवले, तर त्यांनी नियुक्ती करणार्‍या अधिकार्‍यांना ३ महिने अगोदर याची सूचना द्यावी आणि त्यांनी पात्रता सेवा पूर्ण केली आहे, हे स्पष्ट करावे लागेल. तसेच जर तुम्ही व्हीआरएस घेण्याची योजना बनवली असेल, तर निर्णय घेण्यापूर्वी एकदा भविष्याचे नियोजन नक्की करून घ्या जेणेकरून नंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाचा नंतर कोणताही पश्चाताप होणार नाही.

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; सेवानिवृत्तीचे वय वाढण्याची शक्यता, कसा होईल याचा तुम्हाला फायदा
नोकरदरांनी समजून घ्या की जेव्हा तुम्ही व्हीआरएस घेता, तेव्हा तुम्हाला गेल्या १८ महिन्यांत जो काही पगार मिळाला आहे, त्याचा ५० टक्के तुम्हाला नोकरीच्या उर्वरित कालावधीसाठी दिला जातो. समजा तुम्हाला दरमहा एक लाख रुपये पगार मिळत असेल, तर उर्वरित पाच वर्षांच्या सेवेसाठी तुम्हाला ३० लाख रुपये दिले जातील. यासोबतच ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी सारखे फायदेही दिले जातील. याशिवाय, सर्व कंपन्यांमध्ये सेवानिवृत्तीनंतरचे वैद्यकीय कव्हर उपलब्ध आहे, जर ते तुमच्या कंपनीत असेल, तर व्हीआरएसनंतर तुम्ही त्यासाठी पात्र आहेत.

आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे, अगदी सोपे आहे; जाणून घ्या हे महत्त्वाचे मुद्दे
पहिले परिस्थितीचे मूल्यांकन करा

व्हीआरएसचा निर्णय घेण्यापूर्वी निवृत्तीच्या वेळी आणि व्हीआरएसच्या वेळी तुम्हाला कोणते फायदे मिळतील याचे मूल्यमापन केले पाहिजे. जर तुम्ही व्हीआरएस घेतला नाही तर तुम्हाला किती बोनस, इन्क्रीमेंट वगैरे मिळेल हे समजून घ्या. यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही व्हीआरएस घ्यायचे की नाही. तुमच्या नोकरीच्या कालावधीत फक्त ५ किंवा 3 वर्षे उरली असतील, तर तुम्ही ती पूर्ण करून योग्य रिटायरमेंट घेणे एक चांगला पर्याय आहे.

नोकरीला वैतागलाय? चाळीशीत निवृत्त व्हा आणि निवांत आयुष्य जगा; हा आहे फॉर्म्यूला
भविष्याचे नियोजन करा
लक्षात घ्या की व्हीआरएस घेतल्यानंतर तुमचे उत्पन्न थांबू शकते. व्हीआरएस दरम्यान तुम्हाला, जे पैसे मिळाले आहेत, त्यानेच तुम्हाला तुमचे काम चालवावे लागेल. आपण या परिस्थितीचा ॲडव्हान्स विचार देखील केला पाहिजे. म्हणून, आर्थिक समस्येला तोंड देण्यासाठी, एकतर आधीच दुसरी नोकरी शोधा किंवा व्यवसाय सुरू करा, जेणेकरून तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.

गुंतवणुकीसाठी योजना
व्हीआरएस घेण्यापूर्वी तुम्ही इमर्जन्सी फंड बनवला पाहिजे कारण उत्पन्नाचा नवीन स्रोत शोधण्यासाठी खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे किमान १२ महिन्यासाठी पुरेसा निधी असायला हवा जेणेकरून ईएमआय, प्रीमियम इत्यादी तुमचे आवश्यक खर्च भरून निघेल. व्हीआरएस दरम्यान तुम्हाला मिळणारी एकरकमी रक्कम तुम्ही गुंतवू शकता, जेणेकरून तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. यासाठी तुम्ही एसआयपी, राष्ट्रीय पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिस टाइम ठेव, बँक एफडी इत्यादीसारख्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here