नाशिक: भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी एका वडापाव विक्रेत्यावर हल्ला झाल्याने शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाशिक शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नाशिकरोड परिसरात एका वडापाव विक्रेत्यावर टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील आता समोर आला आहे.

कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला करत भररस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये दुचाकी वाहनांवरून चार ते पाच हल्लेखोर अचानक येऊन वडापाव विक्रेत्यावर कोयता आणि इतर धारधार हत्यारांनी हल्ला करताना दिसून येत आहे. त्यासोबतच हल्लेखोरांनी वडापावच्या गाडीवरील साहित्यदेखील रस्त्यावर फेकून दिल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
धाकट्या बहिणीची निधनवार्ता समजली; पाणी भरणारी थोरली बहिण जागीच कोसळली; करुण अंत
हल्ला होताच वडापावच्या गाडीजवळील नागरिक भयभीत झाले. त्यांनी तिथून पळ काढला. दरम्यान हल्लेखोर त्याठिकाणी उपस्थित अजून एका व्यक्तीवरही हल्ला करताना या सीसीटीव्हीत व्हिडिओत दिसत आहेत. या घटनेनंतर हल्लेखोर दुचाकींवर बसून त्या ठिकाणाहून पळ काढतात. या घटनेने परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुन्या वादातून वडापाव विक्रेत्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. विशाल गोसावी असे हल्ला झालेल्या वडापाव विक्रेत्याचे नाव असून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस हल्लेखोरांचा तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.
कीर्तन करता करता मटकन खाली बसले; जमिनीवर कोसळले; पुजाऱ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू
शहरात दरोडा आणि हत्येच्या एका घटनेनंतर या हल्ल्याची घटना घडल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच सशस्त्र टोळक्यांचा हैदोस नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल्याने आता नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बिनधास्तपणे शहरात हत्यार घेऊन दहशत निर्माण करण्याचे काम काही गुन्हेगार करत आहे. तर कधी चोरी, लुटमार, दरोडा हत्या अशा घटनांमुळे धार्मिक नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकची प्रतिमा मलीन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here