मुंबई: मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी पुण्यात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर ‘नटसम्राट’मधील एक सीन सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नाना आणि विक्रम या दोन्ही कलाकारांमधील हा सीन अभिनयाचा एखादा धडा गिरवल्यासारखे आहे.

२०१६ मध्ये आलेला सिनेमा ‘नटसम्राट’ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले होते, शिवाय सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर ‘गणपतराव बेलवकर’ या मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील आणखी एका भूमिकेने लक्ष वेधून घेतले, ही भूमिका म्हणजे अभिनेते विक्रम गोखलेंची रामभाऊ ही भूमिका. या सिनेमातील गणपत आण रामा यांच्यातील विविध संवाद आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.

नाना पाटेकर- विक्रम गोखले

तर सीन असा आहे की दोन मित्र गणपत आणि राम दोघेजण एकत्र मद्य प्राशन करत असतात. यावेळी दोघेही त्यांच्या रंगभूमीवरील दिवसांमध्ये रमतात, त्यांच्या आयुष्यात काय काय चालले आहे याविषयीही चर्चा होते. यावेळी विक्रम गोखलेंच्या तोंडी एक संवाद आहे. ते म्हणतात की, ‘नटाच्या कोणत्याही इमोशनला कुणीही कधीही सीरियसली घेत नाही’. त्यांचा अजून एक संवाद या सीनमध्ये आहे. विक्रम गोखले अगदी या संवादाप्रमाणेच आयुष्य जगल्यासारखे आहे.

या संवादात विक्रम गोखले म्हणतात की, ‘अभिनेत्याने अभिनेता म्हणूनच मरावे. हे नटपण आहे ना हे असं पेशीत जाऊन घुसतं, साचतं. नट जातो विस्मरणामध्ये पण त्याने केलेल्या भूमिका चिरंतन राहतात.’ हा सीन खरंतर नाना पाटेकर साकारत असलेल्या गणपतरावांना भास होत असतो. सीनच्या शेवटी विक्रम गोखले साकारत अ नाना आणि गोखले यांचे या सिनेमातील विविध सीन प्रेक्षकांना आवडले, त्यापैकीच हा एक. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर हे दृश्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अभिनेते विक्रम गोखले यांनी आजवर मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, बॉलिवूड सिनेसृष्टी, मराठी मालिका या सर्वच पातळीवर उत्तमोत्तम कामे केली आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरल्या. त्यांच्या नटसम्राट सिनेमातील डायलॉगप्रमाणेच या सर्व भूमिका चिरंतन राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here