Authored by रोहित दीक्षित | Edited by सुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Nov 2022, 5:12 pm

A Girl push into Well : धारूर तालुक्यातील कासारी येथील साक्षी ज्ञानोबा कदम या मुलीला विहिरीत ढकलून दिले. यात या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या सोबत असलेल्या दुसर्‍या मुलीस इंडिका गाडीद्वारे पळवून नेण्यात आले. या घटनेने धारूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतला.

 

a girl was pushed into a well and another girl was abducted
अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून दुसऱ्या मुलीस पळवले

हायलाइट्स:

  • धारूर तालुक्यात घडली खळबळजनक घटना.
  • अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलले.
  • दुसऱ्या मुलीला नेले पळवून.
बीड: धारूर/दिंद्रुड भागातील एका १५ वर्षीय मुलीस विहिरीत ढकलून दिल्याची घटना घडल्याने धारूर भागात खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर या मुलीच्या सोबत असलेल्या दुसर्‍या मुलीस पळवून नेल्याची घटना काल दुपारी धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली. मृत मुलीच्या प्रेताचे अंबाजोगाईच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मुलीच्या नातेवाईकांनी घेतला. दुपारी दीड वाजेपर्यंत या प्रकरणाचा तिडा सुटलेला नव्हता. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

धारूर तालुक्यातील कासारी येथील साक्षी ज्ञानोबा कदम या मुलीला विहिरीत ढकलून दिले. यात या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या सोबत असलेल्या दुसर्‍या मुलीस इंडिका गाडीद्वारे पळवून नेण्यात आले. या घटनेने धारूर तालुक्यात एकच खळबळ उडाली.

क्लिक करा आणि वाचा- आम्ही त्यांना ३० जूनलाच चांगला हात दाखवला आहे, ज्योतिष प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पवार, विरोधकांना प्रत्युत्तर

मयत मुलीच्या मृतदेहाचे अंबाजोगाई रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह आज दुपारी कासारी येथे आणण्यात आला. नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतला. दुपारी दीड वाजेपर्यंत तिडा सुटलेला नव्हता. सदरील हा प्रकार नेमका काय आहे, याची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

क्लिक करा आणि वाचा- खाण्याची ट्रेनिंग घेण्यासाठी तेजस्वी यादवला भेटलात काय?; आमदार शेलारांनी लगावला टोला

क्लिक करा आणि वाचा- मराठी माणसाचा अभिमन्यू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न दिसतो : नीलम गोऱ्हे यांचा आरोप

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here