कोल्हापूर: बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदगड तालुक्यातील किटवाड येथील लघुपाटबंधारे धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एका तरुणीला वाचवण्यात किटवाड येथील तरुणांना यश आले असून सदर घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे.

मृत विद्यार्थ्यांची नावे :-

१. असिया मुजावर (वय १७)

२. कुदासिया पटेल (वय २०)

३. रुक्षार बिस्ती (वय २०)

४. तस्मिया (वय २०)

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खिंडीत गाठलं; भर सभेत ऑडिओ क्लिप ऐकवत केली कोंडी
किटवाड येथे लघुपाटबंधारे विभागाची दोन धरणे आहेत. एक क्रमाकांच्या धरणावर ही घटना घडली. या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली. त्यानंतर तिसरी वाचवण्यासाठी गेली, त्यानंतर चौथी असे करत एका पाठोपाठ पाच तरूणी त्या पाण्याच्या खड्ड्यात पडल्या आणि पाचही बुडाल्या. यामधील चार जणींचा जागीच मृत्यू झाला, तर एकीच प्रकृती गंभीर आहे.

ताईंनी मोदींसोबतचा तो फोटो छापून आणला, ईडी सीबीआय कारवाईचं धाडस करेल का? ठाकरेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here