महाराजगंज: उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती महिलेला अतिशय निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला मारहाण करणारा हा तिचाच मुलगा आहे. मुलानं आईचे केस धरून तिला रस्त्यावर ओढत आणलं. आसपासचे लोक महिलेच्या बचावासाठी पुढे आले. मुलानं त्यांनाही मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आईला मारहाण करणाऱ्या मुलाचं नाव रितेश वर्मा आहे. महाराजगंजमधील नौतनवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी पीडिता कमला देवी यांच्या तक्रारीवरून रितेश वर्माच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३, ५०४ आणि ५०६ च्या अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. रितेश वर्मा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मारहाणीची घटना २३ नोव्हेंबरला घडली. कमला देवीनं मुलाकडे पैशांचा हिशोब मागितला. कमला देवी यांनी त्यांची शेती कसायला दिली आहे. शेती कसणारी व्यक्ती पैसे देण्यासाठी घरी आली, त्यावेळी कमला देवी घरी नव्हत्या. त्यामुळे त्यानं रितेशकडे पैसे दिले. कमला देवी यांनी मुलाकडे हेच पैसे मागितले. त्यावरून रितेश संतापला आणि मारहाण करू लागला.
दर तिसऱ्या दिवशी जातेय एका रेल्वे कर्मचाऱ्याची नोकरी; कारण वाचून म्हणाल लय भारी
आसपास राहणाऱ्यांनी कमला देवी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र रितेश शेजाऱ्यांवरही चालून गेला. कमला देवी त्यांचा घर खर्च शेतीतून मिळणाऱ्या पैशांतूव चालवतात. तर आरोपी मुलगा रितेशचं दागिन्यांचं दुकान आहे. मात्र तरीही आईच्या पैशांवरून त्यानं मारहाण केली. रितेशला आईला घरात ठेवायचं नसल्यानं तो सातत्यानं आईला मारहाण करत असतो, असं शेजाऱ्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here