परभणी : अभ्यासाच्या तणावातून एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परभणी तालुक्यातील जांब येथे घडली आहे. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मदन रामा जमरे (वय १९ वर्ष) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. या घटनेमुळे जमरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जांब गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी तालुक्यातील जांब येथील मदन जमरे हा बी. ए. प्रथम वर्षात परभणीतील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मागील चार ते पाच दिवसांपासून तो तणावात होता. शनिवारी दुपारी १२ ते २ वाजताच्या दरम्यान मदनने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना उघडकीस आल्यानंतर याबाबत कुटुंबियांकडून दैठणा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

स्‍टेटसवर स्वतःलाच श्रध्दांजली‌ वाहिली, नंतर घराबाहेर जाऊन तरुणाने संपवले जीवन

अभ्यास होत नसल्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन मदनने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात युवकांच्या स्वतःविषयीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यश न मिळाल्यास जीवन संपवण्यासारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत.

दरम्यान, या प्रकरणी दैठणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here