धुळे : धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील दंडेवाले बाबा नगरात चाकूने भोसकून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची धक्क्दायक घटना घडली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून ही हत्या झाली आहे. यावेळी मयत तरुणाच्या आई, भावासह तीन जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल विश्वास मरसाळे (वय २५ रा. दंडेवाले बाबा नगर, मोहाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. काल रात्रीच्या सुमारास धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील दंडेवाला बाबा नगर परिसरात रोकडोबा हनुमान मंदीरासमोर ही घटना घडली. मागील भांडणाची कुरापत काढून सुनिल नंदु आव्हाळे, बबलू नंदू आव्हाळे, दिनेश सुभाष धनगर व सागर नंदु आव्हाळे सर्व (रा. दंडेवाले बाबा नगर, मोहाडी) यांनी अजय विश्वास मरसाळे याला “तुम्ही जातीवाचक बोलून काल तू व जाकीर मंदीरावर असताना माझ्या भावाशी वाद घातला होता. यापुढे जर तुम्ही नीट वागले नाहीत तर तुम्हाला इथे राहणं मुश्कील करुन टाकू”, असं बोलून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

FIFA वर्ल्डकपमधील सर्वात धक्कादायक बातमी, सामना पाहण्यासाठी गेलेल्या चाहत्याचा मृत्यू
यादरम्यान, सागर आव्हाळे याने चाकूने अजय याची आई शोभाबाई तसेच मित्र जाकीर पिंजारी यांच्या डोक्यावर तर भाऊ अमोल विश्वास मरसाळे याच्या डाव्या कानाजवळ वार केला. तसेच त्याच्या डाव्या पायाच्या मांडीवर भोसकून त्याची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात अजय मरसाळे, शोभाबाई मरसाळे, साक्षीदार जाकीर पिंजारी हे तिघे जखमी झाले. मात्र, त्यात अजय मरसाळे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजय मरसाळे याच्या फिर्यादीवरून वरील चौघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे करत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कोते, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान, चौघांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कणकवलीत घेतलेला होमवर्क राणे कुटुंबाच्या जिव्हारी लागला, त्यांची कानशिलं लाल झाली, अंधारेंची फटकेबाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here