लोणावळा : खंडाळ्यातील प्रिछलीहिल परिसरातील कार्निवल विला बंगल्याच्या टेरेसवर असलेल्या जलतरण तलावाच्या (स्विमिंग पूल) पाण्यात बुडून दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. मागील सहा महिन्यांत लोणावळ्यात बंगल्यांच्या स्विमिंग पुलातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोणावळ्यातील अनधिकृत स्विमिंग पुलांचा मुद्दा व पालकांचा निष्काळजीपणा ऐरणीवर आला आहे.

हानियाझैरा मोहम्मद नदिम सैयद ( वय- एक वर्षे, ११ महिने) असं स्विमिंग पुलातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी बालिकेचे वडील मोहम्मद नदिम कैसरहुसेन सय्यद ( वय-३१, रा. डोंबिवली) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

देवदर्शनासाठी तुळजापूरकडे येताना दुचाकीला एसटी बसची धडक; महिला आणि युवकाचा जागीच मृत्यू

लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद नदिम सय्यद हे त्यांच्या पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, मुलगी हानियाझैरा आणि त्यांची बहीण व बहिणीच्या पतीसह शनिवारी सकाळी लोणावळ्यात फिरायला आले होते. प्रिछलीहिल परिसरात असलेल्या कार्निवल विला बंगल्यातील रूम भाड्याने घेऊन ते सर्वजण राहिले होते. रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास रुममध्ये नाष्टा करत असताना हानियाझैरा ही खेळता खेळता बंगल्यातील पायऱ्या चढून तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर असलेल्या जलतरण तलावाकडे गेली व तलावाचा जिना चढून ती तलावाच्या पाण्यात पडली.

क्षुल्लक कारणावरुन सरकारी कर्मचाऱ्याला घरात कोंडून बेदम मारहाण; संतापजनक घटनेचा Video समोर

यावेळी पाण्यात पडल्यानंतर हानियाझैरा हिने आरडाओरडा केला. अचानक बाहेरून ओरडण्याचा आवाज आल्याने बालिकेच्या वडील व नातेवाईकांनी त्या दिशेने धाव घेतली असता, त्यांना त्यांची मुलगी हानियाझैरा ही पाण्यात पडल्याचं आढळलं. त्यांनी तिला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी तत्काळ लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले‌. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here