वारंगळ :तेलंगण राज्यातील वारंगळ शहरातील एक अतिशय हृदयद्रावक वृत्त हाती आले आहे. या शहरात एका आठ वर्षीय मुलाचा चॉकलेट खात असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे चॉकलेट या मुलाच्या वडिलांनी परदेशातून आणलेले होते असे सांगितले जात आहे. या दुर्दैवी घटनेची केवळ तेलंगणमध्येच नाही, तर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.

संदीप सिंह असे या ८ वर्षीय मुलाचे नाव आहे. संदीप हा आपल्या वडिलांनी आणलेले चॉकलेट खात होता. मात्र चॉकलेटचा एक तुकडा त्याच्या गळ्यात अडकला. संदीपला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. श्वास घेण्यासाठी मग संदीप तडफडू लागला.

संदीप तडफडू लागल्यानंतर तो तुकडा काढण्याचा त्याच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले. खूप प्रयत्न केल्यानंतर संदीपच्या गळ्यात अडकलेला चॉकलेटचा तुकडा गळ्याच्या खालीही सरकला नाही आणि तो तोंडातून बाहेरही आला नाही. संदीपची बिघडत चाललेली स्थिती पाहून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले.

धक्कादायक! मुंबईत काही हॉटेलांमध्ये विकले जाते कबुतरांचे मांस, निवृत्त आर्मी कॅप्टनने काढले फोटो
मुलाच्या अन्ननलिकेत अडकला ५ रुपयांचा शिक्का

तेलंगणात घडलेल्या अशाच घटनेसारखी घटना याच वर्षी जूनमध्ये उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे घडली होती. तेथील कर्वी येथील आनंद किशोर चौधरी यांच्या ४ वर्षीय चिमुकल्याच्या अन्ननलिकेत ५ रुपयांचा शिक्का अडकला होता.

या ४ वर्षीय मुलाला घेऊन त्याचे आईवडील सतत तीन दिवस डॉक्टरांकडे जात होते. तरीही डॉक्टर मुलाच्या अन्ननलिकेत अडकलेला ५ रुपयांचा शिक्का बाहेर काढू शकले नाहीत. त्यानंतर या मुलाला मध्य प्रदेशातील सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे बालरोग तज्ज्ञांनी या मुलाच्या अन्ननलिकेत अडकेला ५ रुपयांचा शिक्का बाहेर काढून कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला.

गुजरातमध्ये निवडणूक ड्यूटीवर असलेल्या CRPF जवानाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार, २ जवान शहीद, दोन जखमी
जिल्ह्यातील डॉक्टरांनी वर केले होते हात

या मुलाने खेळता खेळता ५ रुपयांचा शिक्काच गिळून टाकला होता. यानंतर मुलाचा गळा दुखू लागला. त्याला जेवताही येत नव्हते. मुलाला आणि कुटुंबीयांना मोठा त्रास होत होता. कर्वी आणि बांदा येथील डॉक्टरांनी हात वर केले होते. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाला सतना जिल्हा रुग्णालयात नेले.

तुम्हाला गोळ्या घालीन…; सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांचा सिद्धेश्वरच्या संचालकांवर गंभीर आरोप
एक्स रेमध्ये दिसला शिक्का

सतना जिल्हा रुग्णालयात या मुलाला आणल्यानंतर तिथे त्याच्या संपूर्ण शरीराचा एक्स रे काढण्यात आला. या एक्स रेमध्ये मुलाच्या अन्ननलिकेत ५ रुपयांचा शिक्का अडकला असल्याचे स्पष्ट झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here