दिल्लीतील वसंत कुंज परिसरात दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला. बीएमडल्ब्यू कारनं दिलेल्या धडकेत सायकलस्वार जखमी झाला. त्याला उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

दिल्लीतील विमानतळ परिसरात एका वळणावर कार आणि सायकलचा अपघात झाला. विमानतळाजवळ कारनं सायकलला मागून धडक दिली. अपघातात सायकल आणि कारचं नुकसान झालं. धडक देणाऱ्या कारची नोंदणी हरियाणात झालेली आहे. तिला व्हिआयपी नंबर प्लेट आहे. HR 26 DK 0001 असा कारचा क्रमांक आहे.
कारचे टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचं नैऋत्य दिल्लीचे डीसीपी मनोज सी. यांनी सांगितलं. वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्याकडून अपघाताची चौकशी सुरू आहे. चॅटर्जी सायकलनं गुरुग्रामवरून धौला कुआला जात असताना अपघात झाला. ते गुरुग्रामच्या सेक्टर-४९ मध्ये वास्तव्यास होते. प्रॉपर्टी डीलर म्हणून ते काम करायचे. दिल्लीत त्यांचा कपड्यांचा व्यवसायदेखील होता.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.