बिजनौर: उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एका निष्पाप जीवाची हत्या करण्यात आली आहे. पतीसोबतच्या वादातून एका महिलेनं पोटच्या मुलाची हत्या केली. तिनं अवघ्या दीड वर्षाच्या लेकीला संपवलं. महिलेच्या पतीनं तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

महिलेचा पती अंकित कुमार सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेले अंकित कुमार सुट्टी असल्यानं घरी आले होते. पत्नी शिवानीनं दीड वर्षांच्या दृष्टीची गळा दाबून हत्या केल्याची माहिती अंकित यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी महिलेला ताब्यात घेतलं.
हॉटेलमध्ये ‘ती’ तुझी वाट बघतेय! पोहोचलास की फोटो पाठव! मुंबईत ३५० जणांना मेसेज गेला अन्…
पतीशी वाद सुरू असल्याचं महिलेनं पोलीस चौकशीत सांगितलं. पतीला मला घराबाहेर काढायचं होतं आणि मुलीला स्वत:जवळ ठेवायचं होतं. यावरून आमच्यात वाद झाला. ना ती तुझ्याजवळ राहील ना माझ्याजवळ असं म्हणत मी माझ्याच मुलीचा गळा दाबल्याची कबुली आरोपी महिलेनं दिली.

आरोपी शिवानीचे अन्य व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळेच तिनं हे कृत्य केल्याचा आरोप सासरच्यांनी केला. शिवानी आणि अंकित यांचं हे दुसरं लग्न होतं. शिवानीनं आधीच्या लग्नातही अशाच प्रकारचं कृत्य केल्याचा दावा तिच्या सासरच्या लोकांनी केला. शिवानीनं याआधीही तिच्या ५ महिन्यांच्या मुलीला अशाच प्रकारे मारल्याचं तिचे सासरे बेगराज सिंह यांनी सांगितलं.
टायर फुटले, नियंत्रण सुटले; VIP नंबरप्लेट असलेल्या BMWच्या धडकेत सायकलस्वाराचा अंत
औरंगपूर भिक्का गावात वास्तव्यास असलेल्या अंकित कुमार यांनी दीड वर्षांच्या मुलीच्या हत्येची माहिती दिल्याचं बिजनौर शहराचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण रंजन सिंह यांनी सांगितलं. अंकित कुमार यांच्या फोननंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचं शवविच्छेदन करण्यात आलं. श्वास कोंडल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं अहवालातून स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here