दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन गट हत्यार घेऊन एकमेकांच्या मागे धावत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात टोळीयुद्धात राहुल मिंड या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. राहुलवर चार गोळ्या फायर करण्यात आल्या असून धारधार शास्त्रांनी देखील वार करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. आपल्या काही साथीदारांसोबत स्वतःच्या हॉटेलमध्ये राहुल बसला होता. त्या वेळी जुना वाद असलेली टोळी चाल करून आली आणि राहुल त्याच्या तावडीत सापडला या जीवघेण्या हल्ल्यात राहुलचा जीव गेला. उपचारासाठी त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत याबाबत कारवाई सुरू होती.
जमावाच्या मारहाणीत दरोडेखोर ठार
नांदुरी-नाशिक रस्त्यावरील ओम साई पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून २ लाखांचा ऐवज चोरून नेला. मालकाने आरडाओरडा केल्याने जमावाने दोन दरोडेखोरांना पकडून बेदम मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण पळून गेले. दरम्यान कळवण पोलिसांनी दरोड्याचा व जमावाविरोधात खुनाचा असे परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.
आठ दिवसांपूर्वीच धुळ्यात झाली होती तरुणाची हत्या
धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी कालिकादेवी मंदिराशेजारी जितेंद्र शिवाजी मोरे (वय ३४, रा. फुले कॉलनी, मोगलाई साक्रीरोड) या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. आठ दिवसांपूर्वीच ही घटना घडली होती. जितेंद्र मोरे शहरातील खासगी कुरिअर कंपनीत येथे कुरिअर वाटपाचे काम करायचा. घटनास्थळाच्या काही अंतरावर तरुणाची मोटरसायकल आढळून आली. याबाबत पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times