रविवार असल्यामुळे कामाला सुट्टी असल्याने घरी असलेल्या एका बावीस वर्षीय तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. सारंग बाच्छेराव देशमुख (वय २२ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे. ते मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. पोलीस तपासातून आत्महत्येचे खरे कारण समोर येणार आहे.

 

Untitled design (32)
परभणी: कापड दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. सारंग बाच्छेराव देशमुख (वय २२ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे. ते मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. पोलीस तपासातून आत्महत्येचे खरे कारण समोर येणार आहे. या घटनेमुळे बोरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पेठ गल्ली मध्ये राहणारा सारंग देशमुख हा युवक गावातील एका कापड दुकानावर कामाला होता. रविवार असल्यामुळे त्याला कामावरून सुट्टी होती. त्यामुळे तो घरीच होता. घरी असताना त्याने सायंकाळच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी सारंगला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
हॉटेलमध्ये ‘ती’ तुझी वाट बघतेय! पोहोचलास की फोटो पाठव! मुंबईत ३५० जणांना मेसेज गेला अन्…
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन सारंग देशमुख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. दरम्यान सारंग देशमुख याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे. हे मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. पोलीस तपासातून सारंगच्या आत्महत्येचे खरे कारण समोर येणार आहे. या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बोरी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सारंग देशमुख याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here