नवी दिल्ली: अनेक नोकरदार लोकांसाठी मूल्यमापनाची (अप्रेसल) वेळ जवळ आली आहे आणि सध्याच्या महागाईच्या काळात चांगली पगारवाढ मिळणे यापेक्षा नोकरदारांसाठी आनंदाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. वर्षभर मेहनत केल्यानंतर, जेव्हा मूल्यांकनाची वेळ येते, तेव्हा गेल्या ३-४ महिन्यात काहीतरी चूक होते, असे कदाचित तुम्ही अनुभवले असेलच.

ज्या कंपन्यांचे कार्यप्रदर्शन चक्र जानेवारी ते डिसेंबर दरम्यान निश्चित आहे, अशांबद्दल बोलायचे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत अशा कंपन्या आर्थिक वर्ष २०२३ साठी कमी पगारवाढ देणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या वर्षी महागाईने उच्चांक गाठला असून, त्यानंतरही कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात संकोच करत आहेत.

एक दिवसाचा सक्तीचा पगार कपात; भाजप सरकार गोळा करत आहे ८० ते १०० कोटी
डेलॉइट इंडियाच्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण सर्व कर्मचार्‍यांनी निराश होण्याची गरज नाही कारण वेतनवाढ कपात सर्व क्षेत्रांमध्ये दिसणार नाही. असे नाही की सर्व क्षेत्रातील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार कमी करणार आहेत. हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टुरिझम, कंझ्युमर, एफएमसीजी आणि पॉवर कंपन्या इतर क्षेत्रांच्या तुलनेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ भेट देणे अपेक्षित आहे. २०२२ च्या तुलनेत या कंपन्या यंदा त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठी वाढ देणार आहेत. डेलॉइट इंडियाने आपल्या सर्वेक्षणात ३०० हून अधिक कंपन्यांचा समावेश करत आणि त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून वरील अहवाल मांडला आहे.

नोकरीत ग्रोथ होण्यासाठी या टिप्स फॉलो करा

तसेच हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना ८.५% पगारवाढीऐवजी ९.६% वाढ मिळणे अपेक्षित आहे. तर किरकोळ (रिटेल) कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांच्या पगारात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ करू शकतात.

यापूर्वी ऑगस्टमधील एका सर्वेक्षणानुसार २०२३ मध्ये भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सरासरी १०.४% पगारवाढ देऊ शकतात असे नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे २०२२ मध्ये कंपन्यांची सरासरी पगारवाढ १०.६ टक्के होती. तसेच यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातील अंदाजापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. त्यावेळी, सर्वेक्षण संस्थेने देशातील ४० क्षेत्रातील १,३०० हून अधिक कंपन्यांच्या डेटाचे पुनरावलोकन केल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Salary Hike 2023: भारतीय नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पगारात होणार ‘इतकी’ वाढ
अलीकडेच आर्थिक मंदीच्या भीतीने तरुणांचे वेतनवाढ आणि नवीन नोकरीचे स्वप्न भंगू लागल्याचे वृत्त समोर आले होते. जागतिक मंदीच्या भीतीमुळे जगातील अनेक देशांतील मोठ्या टेक कंपन्यांनी टाळेबंदी सुरू करत नवीन नोकर भरतीची प्रक्रियाही मंदावली आहे. मंदीचा कोणताही विशेष परिणाम भारतात दिसणार नाही, पण तरीही जागतिक स्तरावर काम करणारी कंपनी नोकरीच्या बाजारपेठेतील मंदीने त्रस्त आहे.

परिणामी नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांच्या पगारवाढीच्या आशा आता मावळल्या असून यापूर्वी नोकरी बदलताना उमेदवार ६० ते १०० टक्के पगारवाढीची मागणी करत होते, मात्र आता मागणी २० ते ३० टक्क्यांवर घसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here