मुंबई : मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी लोकल म्हणजे लाईफलाईन आहे. रोज हजारो लोक मुंबईत रेल्वेने प्रवास करतात. यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. कामानिमित्त महिलांना रोज घराबाहेर पडावं लागतं. कधी पहाटे तर कधी अगदी उशिरा कामाला जाणाऱ्या महिलांची संख्याही जास्त आहे. अशात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. मुंबईत मात्र अनेकजणींना याबाबत फारशी चिंता करावी लागत नाही. कारण, रात्रीच्या अगदी शेवटच्या ट्रेनमध्ये सुद्धा महिलांच्या प्रत्येक डब्ब्यात सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी असतात. याबद्दल रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला काय वाटते, तिच्या भावना व्यक्त करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबई-ठाणे वाहतूक कोंडींवर पर्याय सापडला, ‘या’ मार्गावर बांधणार U आकाराचा उड्डाणपूल


‘नृत्या गिरी’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या डब्यात एकच महिला प्रवास करत होती आणि यावेळी डब्यात पोलीस कर्मचारी उभा होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘जेव्हा ती एकटी रात्रीच्या वेळी प्रवास करते’ असे लिहले आहे. सोशल माध्यमांवर या व्हिडिओ अनेकांनी लाईक केलं असून यातून रात्रीच्या वेळी मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या असंख्य महिलांच्या भावना सांगण्यात आल्या आहेत.

पोलीस कर्मचारी नेमहीच त्यांचे कर्तब्य बजावत असतात. अशात महिलांच्या सुरक्षेसाठी १० नंतर सर्व महिलांच्या डब्यामध्ये सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी असतात. याचाच हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Mumbai Water Cut : मुंबईत पुढचे २ दिवस पाण्याचा मेगाब्लॉक, या १० भागांत २९-३० तारखेला पाणीकपात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here