लंडन: युनायटेड किंगडममध्ये (ब्रिटन) वाढणारे निव्वळ स्थलांतर कमी करण्यासाठी देशाचे पंतप्रधान ऋषी सुनक परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासह सर्व पर्यायांचा विचार करत आहेत. बीबीसीच्या एका अहवालात याबाबतचा दावा करण्यात आला असून ब्रिटनमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी कमी दर्जाच्या पदव्या घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर हे विद्यार्थी आपल्या सोबत अनेकांना घेऊन आले आहेत.

ब्रिटिश पंतप्रधान आणि पत्नी ब्रिटनच्या ‘एशियन रिच लिस्ट 2022’ मध्ये; तर एक अख्खं कुटुंब पहिल्या क्रमांकावर
बीबीसीच्या अहवालानुसार, डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्थलांतरितांची संख्या कमी करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे. कमी दर्जाच्या पदव्या मिळवलेल्या आणि आश्रितांना आणणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना रोखण्याचा विचार पंतप्रधान सुनक करत आहेत. मात्र, यादरम्यान, कमी दर्जाची पदवी म्हणजे काय? याबाबत प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिले नाही.

ओएनएसकडाऊन आकडेवारी जाहीर
ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (ओएनएस) गेल्या आठवड्यात जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये इतर देशांमधून ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांची संख्या १.७३ लाख होती, जी २०२२ मध्ये ५.४ लाख झाली आहे. म्हणजेच एका वर्षात ३.३१ लाखांची वाढ नोंदवण्यात आली. पण लक्षात घ्या की, ही आकडेवारी केवळ परदेशी विद्यार्थ्यांचीच नाही, तर ब्रिटनमध्ये पोहोचलेल्या सर्वांचाही यात समावेश आहे.

भारतीयांना ३००० व्हिसा; जी-२० परिषदेत ब्रिटनच्या पंतप्रधानांची घोषणा
विद्यापीठांना धोका
दरम्यान, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवत स्थलांतरितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे ब्रिटनसाठी अवघड असेल, असा दावाही बीबीसीच्या अहवालात करण्यात आला आहे. राष्ट्रीय विद्यापीठे ब्रिटीश विद्यार्थ्यांकडून कमी आकारले जाणारे पैसे भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्कावर अवलंबून असतात, त्यामुळे कमी दर्जाच्या पदवींवर बंदी घातल्यास काही विद्यापीठांना दिवाळखोरीचा सामना करावा लागू शकतो. परिणामी एकूणच ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील हे पाऊल घातक ठरू शकते.

भारतीयांचे लंडन ड्रीम्स पूर्ण होणार! मोदींसोबतच्या पहिल्याच भेटीत ऋषी सुनक यांनी भारताला दिलं गिफ्ट
भारतीय समुदायाच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या एका संघटनेने शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) सरकारला देशाच्या इमिग्रेशन आकडेवारीतून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची विनंती केली. नॅशनल इंडियन स्टुडंट्सचे अध्यक्ष सनम अरोरा म्हणाले की, जे विद्यार्थी तात्पुरते ब्रिटनमध्ये आहेत त्यांना स्थलांतरित म्हणून गणले जाऊ नये.

जर भारतीय विद्यार्थी संख्येबद्दल बोलायचे झाले तर, ब्रिटनमध्ये पोहोचणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. याबाबतीत भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. ओएनएसच्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत ब्रिटनने भारतीय विद्यार्थ्यांना जारी केलेल्या व्हिसाच्या संख्येत २७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here