Delhi Crime News: दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखीच आणखी एक घटना घडली आहे. पतीच्या हत्येच्या आरोपाखाली महिलेला आणि तिच्या मुलाला अटक करण्यात आली. दोघांनी मृतदेहाचे तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर दररोज गुपचूप मैदानाजवळ एक-एक तुकडा फेकला. अवैध संबंधांमधून हा प्रकार घडला.

दिल्ली पोलिसांनी आसपास असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे महिलेसह दोघांना अटक केली. घरातील फ्रिजदेखील जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांना काही महिन्यांपूर्वी पांडव नगरात काही मानवी अवयव सापडले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्हीत कैद झालेले फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी एक महिला आणि एक तरुण संशयास्पद स्थितीत मैदानाच्या आसपास दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अवैध संबंधातून अंजन दासची हत्या केल्याचं आरोपींनी चौकशीत सांगितलं. अंजन दासचे अनेक महिलांशी अवैध संबंध होते. त्यावरून घरात वाद व्हायचे. एके दिवशी वाद वाढला आणि पत्नी आणि मुलानं अंजन दासला संपवलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.