aurangabad news: शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन मुलींनी एका मुलीला मारहाण केली. मुलीचे केस ओढत त्या मुलीला इतर दोन मुलींनी कमरेच्या बेल्टने मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येतंय. तर यावेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची भांडण सोडवण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली.

दहा दिवसांपूर्वी नाशिकच्या गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या ठिकाणी चार मुली एकमेकींच्या झिंज्या ओढताना दिसत आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. बघ्यांनी फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. हाणामारी करणाऱ्या विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.
विद्यार्थिनींमध्ये झालेल्या हाणामारीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र समाज माध्यमांवर मुलींमधील या ‘दंगल’चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिला तर हा सर्व प्रकार महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये घडलेला असावा असे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयातच झालेल्या या प्रकारामुळे शिक्षक किंवा कर्मचारी हा सर्व प्रकार घडत असताना कुठे होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्याऐवजी घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी त्याचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.