२०२१ मध्ये रॉट्सचक यांना डास चावला. त्यामुळे त्यांना डाव्या मांडीवरील त्वचेचं प्रत्यारोपण करावं लागलं. सुरुवातीला फ्लू सारखी लक्षणं जाणवली आणि ते आजारी पडले. त्यांना जेवायला जमत नव्हतं. अंथरुणात उठून बसता येत नव्हतं. रॉट्सचक यांची अवस्था दिवसागणिक खालावत होती.
डाव्या मांडीवर सेराटिया नावाच्या जीवाणूनं हल्ला केला. या जीवाणूनं रॉट्सचक यांची जवळपास निम्मी मांडी खाल्ली. ही सगळी लक्षणं एशियन टायगर डास चावल्याची असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. रॉट्सचक यांच्यावर एकूण ३० शस्त्रक्रिया झाल्या. त्यांच्या पायाची दोन बोटं कापावी लागली. चार आठवडे ते कोमात होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुदैवानं यातून ते बरे झाले.
Mosquito Bite, भयंकर! डास चावल्यानं भीषण अवस्था; ३० शस्त्रक्रिया झाल्या, २ बोटं गमावली, ४ आठवडे कोमात – man slips into coma undergoes 30 operations after mosquito bite
सध्या डासांमुळे होणारे आजार वाढत आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजारामुळे सगळेच हैराण झाले आहेत. डासांमुळे अनेकदा धडधाकट माणसंही आजार पडतात. माणसासाठी जीवघेण्या ठरणाऱ्या प्राण्यांमध्ये डासांचा क्रमांक वरचा लागतो. डासांमध्ये एका व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.