नेमकं काय झालं?
दरम्यान, आरोपीला घटनास्थळी घेऊन जात असताना आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी हा अपघात झाला. यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर पंच आणि आरोपी देखील जखमी झालाय. अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी बीडच्या मुळूकवाडी गावात जमिनीच्या तुकड्याच्या वादातून वयोवृद्ध चुलता-चुलतीवर सख्या पुतण्याने कोयत्याने सपासप वार करून हल्ला केला होता. यामध्ये ८० वर्षीय चुलत्याचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणातील आरोपी असणाऱ्या रोहिदास निर्मळ याला पंचासह घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि त्यावेळी वापरण्यात आलेले हत्यार आणि कपड्यांची जप्त करण्यासाठी घेऊन जात असताना आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा अपघात झाला असून या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोपी देखील जखमी झाला आहे.
शेतीच्या वादातून काका पुतण्यामध्ये अनेक वेळा छोटे-मोठे वाद झाले होते. मात्र, शेतीच्या तुकड्यासाठी चक्क पुतण्याने चुलत्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शेतीचा वाद हा कुठपर्यंत जाऊ शकतो आणि रक्तरंजित कहानी निर्माण होऊ शकते ते या घडलेल्या घटनेने समोर आले आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्या दोघांनाही रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, त्यात चुलत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चुलतीवर अजूनही उपचार चालू आहेत.
सत्तेतून गेल्यानंतर प्रश्न विचारायलाही हिंमत लागते, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा