अहमदनगर: विरोधकांकडून ‘ओली पार्टी’ केल्याचा आरोप झाल्यावर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. यांनी थेट मांसाहार सोडल्याचीच घोषणा केली. आपण दारू तर पित नाहीच, मांसाहार करीत होतो, तोही आजपासून बंद करीत आहोत, अशी घोषणाच विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना डॉ. लहामटे यांनी केली आहे.

वाचा:

राजकारणी मंडळी जाड कातडीचे असतात. त्यांच्याविरुद्ध तक्रारी आणि आरोप झाले तरी फरक पडत नाही, असा सर्वसाधारण समज असतो. मात्र, आमदार लहामटे यांनी आरोप होताच मांसाहार सोडून देण्याची घोषणा केल्याने हा आरोप त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते.
करोनाच्या काळात अकोल्यात झालेल्या एका कथित ओल्या पार्टीची चर्चा सुरू होती. या पार्टीत एक करोना बाधित व्यक्ती होता. आमदार लहामटे हेही या पार्टीत सहभागी झाले होते, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला होता. या घटनेची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आमदार लहामटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. खरंतर आपण पूर्वी मांसाहार करीत नव्हतो, आरोप करणाऱ्यांच्या संगतीत पूर्वी असल्याने मांसाहार करायला शिकलो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर प्रश्न मांसाहार केल्याचा नाहीच, कंटेन्मेंट झोनमध्ये लोकप्रतिनिधीनेच पार्टी करून नियम मोडल्याचा आहे, असे उत्तर आरोप करणारे भांगरे यांनी दिले आहे.

वाचा:

लहामटे म्हणाले की, मित्राच्या अग्रहाखातर मांसाहार करण्यासाठी गेलो होतो. मात्र, विरोधकांनी आरोप करताना दारू पार्टीचा उल्लेख केला आहे. आपण दारू पित नाही. मांसाहार करीत होतो, तोही आता बंद करीत आहोत. मधल्या काळात बारा वर्षे मांसाहारही बंद होता. मात्र, भाजपमध्ये असताना आता आरोप करणाऱ्या नेत्यांनीच आपल्याला पुन्हा मांसाहार करण्यास शिकविले. त्यांना तर हा प्रकार रोजच चालतो. पार्टीत जो मित्र करोनाबाधित असल्याचा उल्लेख आहे, त्याच्याशी आपला संपर्क झालेला नाही. यानंतर आपण स्वत: चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही सरकारी नियम मोडला गेला असेल तर कारवाईला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here