Udyanraje bhosale Press Conference | आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मान ठेवायचा नसेल तर त्यांचे नाव घेऊ नका. हे असेच सुरु राहिले तर चुकीचा पायंडा पडेल. शिवाजी महाराजांचा अपमान करणे, ही एक फॅशन होऊ जाईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे खडा टाकून पाहण्याचा प्रकार आहे. हे सर्व रोखायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.

हायलाइट्स:
- छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळावर जाऊन प्रतिकात्मक आंदोलन करणार
- महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल का होत नाही?
आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मान ठेवायचा नसेल तर त्यांचे नाव घेऊ नका. हे असेच सुरु राहिले तर चुकीचा पायंडा पडेल. शिवाजी महाराजांचा अपमान करणे, ही एक फॅशन होऊ जाईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे खडा टाकून पाहण्याचा प्रकार आहे. हे सर्व रोखायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा हक्क नाही, किंबहुना ते घेऊ नये, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांनी आपल्या देशाला लोकशाही आणि सर्वधर्मसमभावाचा विचार दिला. पण आज ठिकठिकाणी केवळ स्वार्थापोटी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर सुरु आहे. देशातील बहुतांश राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. महाराजांची प्रतिमा प्रत्येक कार्यक्रमात असते. त्यांना अभिवादन केलं जातं. आम्ही त्यांच्या मार्गावर आणि आदर्शावर चालत आहोत, असे सर्वजण म्हणतात. मग शिवाजी महाराजांविषयी इतक्या विकृत पातळीवर जाऊन वक्तव्य होत असताना, त्यांची अवहेलना होत असताना, कोणालाच चीड कशी येत नाही? सर्व राजकीय पक्षांचा अजेंडा वेगवेगळा असला तरी त्यांचा मुलभूत विचार हा शिवाजी महाराजांच्या आदर्शांना अनुसरून आहे. मग हे सर्वजण छत्रपतींचा अपमान होत असताना एकत्र येऊ आवाज का उठवत नाहीत, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण सुरु आहे: उदयनराजे भोसले
अलीकडच्या काळात शिवाजी महाराजांविषयी विकृत वक्तव्यं केली जात आहेत. चित्रपट आणि विविध माध्यमातून गलिच्छप्रकारे चुकीचं चित्र उभं केलं जात आहे. हे विकृतीकरण थांबले नाही तर उद्या लहान मुलांच्या समोर हाच तोडलेला,मोडलेला इतिहास येईल. त्यांना सत्य परिस्थिती समजणार नाही. हाच खरा इतिहास आहे, असे त्यांना वाटेल. ही परिस्थिती टाळायची असेल तर याविरोधात आवाज उठवणे ही माझी एकट्याची नव्हे तर सर्वांची जबाबदारी आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. छत्रपती शिवरायांनी लोकशाहीचा ढाचा निर्माण केला. देशातील युगपुरूष आणि राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात राष्ट्रद्रोहासारखी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.