Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Nov 2022, 5:35 pm

Jalna News : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील एका ८ वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही हत्या घरात ९वी मध्ये शिकणाऱ्या चुलत बहिणीनेच केली असल्याचं समोर आलं आहे.

 

Jalna Ghansawangi Crime
जालना हादरलं! काकांकडे शिकायला, तिथेच झाला घात; ८ वर्षीय चिमुरडीला निर्घृणपणे संपवलं

हायलाइट्स:

  • ८ वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या
  • क्षुल्लक कारणावरुन मुलीला संपवलं
  • जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील धक्कादायक घटना
जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील एका ८ वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही हत्या घरात ९वी मध्ये शिकणाऱ्या चुलत बहिणीनेच केली असल्याचं समोर आलं आहे. ईश्वरी रमेश भोसले असं मृत मुलीचं नाव आहे. ईश्वरी इयत्ता दुसरीमध्ये असून ती खरपुडी रोडवरील एका इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ईश्वरीचे वडील शेतकरी असून त्यांनी तिला शिक्षणासाठी जालना येथे चौधरी नगरमध्ये राहणाऱ्या आपल्या काकांकडे शिक्षणासाठी ठेवले होते.

आज सकाळी ईश्वरी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता तिच्या मागोमाग तिच्या चुलत बहिणीने बाथरूमचा दरवाजा आतून लावून ईश्वरीच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. यातच ईश्वरीचा जागीच मृत्यू झाला. या हत्येच नेमकं कारणं समोर आलेलं नसून क्षुल्लक वादातून टोकाचं पाऊल उचलून ही हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने अजित पवारांचंही ऐकलं नाही, खडसेंनी जाहीरपणे सांगितलं…
ईश्वरीच्या काकांची रक्त-लघवी तपासणीची लॅब घनसावंगी तालुक्यात असल्याने दररोज ते जालना येथून ये-जा करतात. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास ईश्वरी ही काकांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. तिच्या गळ्यावर, हातावर धारदार शस्त्राचे वार होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तिला तातडीने मंठा चौफूलीवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.

सत्तेतून गेल्यानंतर प्रश्न विचारायलाही हिंमत लागते, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here