परभणी : परभणीच्या सेलू शहरातील मोरेगाव रस्त्यावर नंदकिशोर बाहेती यांच्या मालकीची कोहिनूर रोप प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीमध्ये आठ माकडांच्या टोळीने शनिवारी ३:३० वाजताच्या सुमारास धुमाकुळ घातला. एका माकडाने तर फॅक्टरीमधील आठ कर्मचार्‍यांच्या शरीराच्या विविध ठिकाणी चावा घेऊन गंभीर जखमी केले. जखमी कामगारांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तर माकडांच्या भीतीमुळे कंपनीतील ६५० कर्मचाऱ्यांना दोन दिवस काम बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

सेलू शहर व परिसरात मागील आठवड्यापासून शेतकरी व शेतमजुरांना माकडांच्या या टोळीने नाकी नऊ आणले आहे. माकडांच्या या टोळीने शनिवारी कोहिनूर रोप प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीत घुसून धुमाकुळ घातला. फॅक्टरीमधील ६५० कामगारांपैकी ८ कामगारांना एका माकडाने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे फॅक्टरीमध्ये एकच खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. फॅक्टरीचे मालक नंदकिशोर बाहेती यांनी वन विभागाशी संपर्क साधला असून माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

सीमाप्रश्न : चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो; समितीचे निमंत्रण, मंत्री चंद्रकांत पाटील बेळगावला जाणार
मात्र, त्यांच्याकडे प्रशिक्षक म्हणून एकच कर्मचारी असून तोही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी तहसीलदार दिनेश झांपले यांनी देखील वन विभागाशी संपर्क करून या माकडांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे सांगितले. परंतु अद्यापही या माकडांचा बंदोबस्त करण्यात आला नाही. रविवारी देखील फॅक्टरी बंद ठेवण्यात आली होती.

माकडांचा हल्ल्यात जखमी झालेल्या प्रदीप साळुंखे, किशोर काळे, बबलू पिंक पडदे, विष्णू नाईकनवरे, रामेश्वर बैस, राघवेंद्र कौल, गणपत कुलकर्णी, गणेश गोरे या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, तिसर्‍या दिवशी म्हणजे आज सोमवारी वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी जाळ्या लावून आठही माकडांना पकडले. त्यामुळे तिसर्‍या दिवशी आज २८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजल्यानंतर कामाला सुरुवात केली आहे.

शिरुरमध्ये भाजपचं नियोजन, कोल्हेंकडूनही वेगळे संकेत, आढळरावांची ‘डाव उलटविण्याची तयारी’!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here