navi mumbai mansarovar railway station fire news, Navi Mumbai : नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग, ४२ दुचाकी जळून खाक – fierce fire near mansarovar railway station in navi mumbai 42 two wheelers gutted
नवी मुंबई : नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ दुचाकींना आग लागल्याची घटना घडली आहे. या आगत पार्किंगमधील तब्बल ४२ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली जात आहे. परंतु, या भीषण आगीत गाड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वे स्थानका बाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना ही आग लागली आहे. आगीत पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या ४२ गाड्या जळून खाक झाल्या असून समाजकंटकाकडून ही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जगातील सर्वात मोठा गिटारफिश सापडला गोव्याच्या किनाऱ्यावर; ११४ सेमी लांब, पाहा फोटो मुंबईमध्ये कामासाठी येणारे लोक मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर आपल्या दुचाकी पार्क करतात. आज देखील नेहमी प्रमाणे येथे दुचाकी पार्क करून अनेक जण कामावर गेले होते. परंतु, सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास या पार्किंगमध्ये आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, पार्रिंगमधील ४२ दुचाकी या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत या दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.