रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री तीन वाजता भास्कर एनआरएस रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पोहोचले. त्यांच्या गळ्यात त्रिशूळ अडकलेलं होतं. त्रिशूळ जवळपास ३० सेंटिमीटर लांबीचं आणि खूप जुनं असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. विशेष म्हणजे त्रिशूळ आरपार जाऊनही भास्कर यांना वेदना होत नव्हत्या.
एनआरएस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तातडीनं एक टीम तयार केली. डॉ. अर्पिता महंती, सुतीर्थ साहा आणि डॉ. मधुरिया यांनी एसोसिएट प्रोफेसर डॉ. प्रणबाशिष बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली डॉक्टरांची एक टीम तयार केली. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी भास्कर यांच्या गळ्यात अडकलेलं त्रिशूळ काढण्यासाठी एक विशेष ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शस्त्रक्रियेला सुरुवात झाली.
शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची होती. मात्र आमच्या टिमनं यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्णाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉ. प्रणबशीष बॅनर्जी यांनी दिली. त्रिशूळ जवळपास दीडशे वर्षे जुनं आहे. ऐतिहासिक त्रिशुळाची कित्येक पिढ्यांपासून पूजा केली जात असल्याचं भास्कर राम यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.