Thursday, August 11, 2022
Home Blog Page 3851

Mohammed Shami: भारतीय गोलंदाजाची हॅटट्रिक; या संघाचा झाला होता स्वप्नभंग!

0

नवी दिल्ली: गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्प
र्धेत भारताची कामगिरी शानदार अशी होती. साखळी फेरीतील पहिल्या तिनही लढतीत टीम इंडियाने विरुद्ध संघाला संधी दिली नव्हती. अशाच भारताची लढत होती ती अफगाणिस्तान संघाविरुद्ध, हा सामना भारतासाठी सोपा मानला जात होता. पण प्रत्यक्षात सामना सुरू झाल्यानंतर चित्र बदलले. साउथ हॅम्पटन येथे झालेल्या सामन्यात भारत हारता हारता जिंकला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो जलद गोलंदाज . या सामन्यात शमीने हॅटट्रिक घेतली. वर्ल्ड कप क्रिकेटमधील भारतीय संघाकडून झालेली ही दुसरी हॅटट्रिक होती.

वाचा-
साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला फक्त २२४ धावांवर रोखले. भारताकडून कर्णधार विराट कोहली (६७) आणि केदार जाधव (५२) यांनी अर्धशतकी खेळी केली.

२२५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तान संघाने विजयाचे लक्ष्य जवळ जवळ गाठले होते. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने गोलंदाजीत ३३ धावा देत २ विकेट तर नंतर ५५ चेंडूत ५२ धावा केल्या. नबी संघाला वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवून देईल असे वाटत असताना शमीने हॅटट्रिक घेतली.

वाचा-
शमी ४९व्या षटकात गोलंदाजीला आला तेव्हा अफगाणिस्तानला १६ धावा हव्या होत्या. पहिल्या दोन चेंडूवर त्यांनी ४ धावा घेतल्या. आता अखेरच्या ४ चेंडूत १२ धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर नबीने शमीचा चेंडू हवेत खेळला आणि लॉन्ग ऑनला हार्दिक पंड्याने कॅच घेतला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर शमीने आफताबची बोल्ड घेतली आणि अखेरच्या चेंडूवर मुजीब बोल्ड घेत त्याने हॅटट्रिक पूर्ण केली.

भारताने हा सामना ११ धावांनी जिंकला. वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारा शमी दुसरा भारतीय तर नववा गोलंदाज ठरला. त्याआधी चेतन शर्माने १९८७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेतली होती.

वाचा-

वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारे गोलंदाज
>> चेतन शर्मा (१९८७)
>> सकलेन मुश्ताक (१९९९)
>> चमिंडा वास (२००३)
>> ब्रेट ली (२००३)
>> लसित मलिंगा (२००७)
>> केमार रोच (२०११)
>> लसित मलिंगा (२०११)
>> स्टीव्ह फिन (२०१५)
>> जेपी डुमिनी (२०१५)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Nitesh Rane: काँग्रेसच्या थोरातांची शिवसेनेला इतकी चिंता का?: नीतेश राणे

0

कणकवली: ‘ग्रामीण भागातील जुन्या कडवट शिवसैनिकांना वा नेत्यांची साधी विचारपूस केली जात नाही. मग काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची ‘सामना’ला इतकी चिंता का,’ असा सवाल भाजपचे कणकवलीचे आमदार यांनी केला आहे. (Nitesh Rane Criticises )

वाचा:

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कथित नाराजीच्या मुद्द्यावरून अलीकडेच यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेस नाराज नसल्याचे आणि महाविकास आघाडी भक्कम असल्याचे थोरात यांनी जाहीर केले होते. त्यावरून विखेंनी थोरातांवर टीका केली होती. काँग्रेस इतकी लाचार कधी झाली नव्हती, असं ते म्हणाले. थोरातांनी त्यांना जशास तसं उत्तर दिलं. त्यावरून दोघांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. या वादात उडी घेत शिवसेनेनं आज ‘सामना’च्या अग्रलेखातून विखे-पाटील यांच्यावर टीका केली होती. सत्तेसाठी पक्ष सोडून जाणाऱ्यांवरही अग्रलेखातून निशाणा साधला होता. कोकण आणि तळकोकणचा उल्लेखही त्यात होता. त्यावरून नीतेश राणे संतापले आहेत.

आणखी वाचा:

नीतेश राणे यांनी ट्टिव करून शिवसेनेला इशारा दिला आहे. ‘सामना’चं आमच्यावर प्रेम आहे. असणारच. का नाही असणार? कारण शेवटी जुनं ते सोनं असतं. पण शिवसेनेला काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता का? ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारातही घेतलं जात नाही,’ असं राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘काही पत्रं माझ्याकडंही आहेत. तळकोकणच्या प्रहारमधून लवकरच छापतो. मग बघू कशी कुरकुर होते, असा इशाराच नीतेश यांनी दिला आहे.

आणखी वाचा:

राणे, विखेंबद्दल ‘सामना’त काय म्हटले आहे?

‘मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्‍यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले आहे. भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे आम्हाला आश्चर्य वाटते. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. हे बाटगे विरोधी पक्षात घुसल्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे,’ असा हल्लाबोल शिवसेनेनं ‘सामना’तून केला आहे.

आणखी वाचा:

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

या भारतीय अॅप्समध्ये लागला आहे चीनचा पैसा, युजर्समध्ये संताप

0

नवी दिल्लीः भारतात गेल्या काही दिवसांपासून चीनी उत्पादानावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली आहे. परंतु, भारताच्या अनेक टॉप कंपन्यांत चीनची गुंतवणूक आहे. यात पेटीएम (Paytm), ओला (Ola), झोमॅटो (Zomato) आणि मेक माय ट्रिप (Make My Trip) यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांत चीनची गुंतवणूक असल्याची माहिती समोर आल्यानंतर युजर्स आता आपला राग प्ले स्टोरवर काढत आहेत. भारतात अनेक मोठ्या स्टार्ट अॅप्सची फंडिंग चीनकडून केली जाते. म्हणेजच भारतातील कंपन्यांत चीनची मोठी गुंतवणूक आहे. युजर्स यामुळे खूप नाराज झाले असून ते आपला राग प्ले स्टोरवर जाहीर करीत आहेत.

वाचाः

प्ले स्टोरवर अशा अॅप्सना देत आहेत कमी रेटिंग
या भारतीय अॅप्सना प्ले स्टोरवर युजर कमी रेटिंग देत आहेत. तसेच या अॅप्सना प्ले स्टोरवर निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा करीत आहेत. गेल्या आठवड्यापासून या अॅप्सच्या रेटिंगमध्ये खूप घसरण पाहायला मिळत आहे.

भारतात चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांचे शेअर्स
भारतात चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांचा दबदबा आहे. मार्केटमध्ये या कंपन्यांचे मोठे शेअर्स आहेत. मार्च २०२० मध्ये Xiaomi, Oppo आणि Vivo यासारख्या कंपन्यांचे मार्केट शेअर ७३ टक्के होते.

वाचाः

भारतीय अॅप सुद्धा अनइन्स्टॉल करीत आहेत युजर्स
ज्या भारतीय अॅप्समध्ये चिनची गुंतवणूक आहे. त्या अॅप्सला युजर अनइन्स्टॉल करीत आहेत. या अॅप्सना चीनची सर्वात मोठी इंटनरनेट कंपनी Tencent, Alibaba कडून फंडिंग होते. फंडिंग घेतली असली तरी या कंपन्या भारतीय आहेत. तसेच कंपन्यांचे मालक सुद्धा भारतीय आहेत.

कंपन्यांनी नाही दिली कोणतीही प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकारानंतर पेटीएम, झोमॅटो आणि ओला सारख्या कंपन्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच भारतात चिनी मालांचा बहिष्कार दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, सध्या तरी युजर्स आपला राग प्ले स्टोरवर व्यक्त करीत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

बँक खात्यातून १.११ लाख रुपये लंपास, KYC च्या नावावर मोठा 'खेळ'

0

नवी दिल्लीः बँक ऑनलाइन फ्रॉड दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतीच पुण्यातील एका ६१ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या खात्यातून हॅकर्सने १ लाख ११ हजार रुपये लंपास केले आहेत. शनिवारी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, हॅकर्सने एसएमएस द्वारे एका फेक नंबरवरून कॉल करुन अपडेट आणि एक्सटेंड करण्याचे खोटे सांगितले. शुक्रवारी सुद्धा अशीच घटना घडली होती. ज्यात एका व्यक्तीच्या खात्यातून १,९६,३९३ रुपये चोरी करण्यात आले होते.

वाचाः

KYC मुदत संपल्याची वॉर्निंग

सायबर क्रिमिनल्स युजर्सला एसएमएस करून ई-वॉलेट सेक्शन साठी KYCची तारीख संपली असल्याचा इशारा दिला. या एसएमएसमध्ये हॅकर्सने एक नंबर देत या नंबरवर कॉल करण्यास सांगितले. केवायसी एक्सटेंड करण्यास सांगितले. या दोन्ही बँक ग्राहकांना हॅकर्संनी मोठ्या चलाखीने आपल्या जाळ्यात फसवले. त्यांच्याकडून बँक डिटेल्सची माहिती काढली आणि पैसे आपल्या अकाऊंटला ट्रान्सफर केले.

अॅपवरून होतेय चोरी

हॅकर्सने ज्यांची फसवणूक करायची आहे त्यांना ‘Quick Support App’ नावाचे एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले होते. या अॅपच्या मदतीने सायबर क्रिमिनल्सने दोन्ही ग्राहकांच्या खात्यातून आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. या सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला या संबंधी काही खास माहिती देत आहोत. हॅकर्सच्या भूलथापांना बळी पडू नका.

वाचाः

या गोष्टी ध्यानात ठेवा

फेक कॉल आणि एसएमएस पासून राहा अलर्ट

युजर्संना लक्ष्य करण्यासाठी हॅकर सर्वात आधी कॉल करून वॉलेट किंवा KYC ची मुदत संपली असल्याचे खोटे सांगतात. हॅकर्स युजर्संना विश्वासात घेऊन सांगतात की, ऑनलाइन व्हॅलिडेशनने याला पुन्हा एकदा अॅक्टिव करता येऊ शकते.

कोणताही अॅप डाऊनलोड करु नका

KYC अपडेट साठी युजर्सला हॅकर्स अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. हॅकर्स युजर्संना सांगतात की, त्यांना केवायसी वैधता साठी स्टेप बाय स्टेप गाईडलाईन्स देण्यात येईल. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर हॅकर्स युजरच्या फोनची स्क्रीन पाहू शकतात.

वाचाः

पैसे ट्रान्सफरचा खेळ

अॅप इन्स्टॉल केल्यानंतर हे अॅप काम करतेय की नाही, हे तपासण्यासाठी हॅकर युजर्सला वॉलेटमध्ये छोटा टोकन अमाउंट ट्रान्सफर करण्यास सांगतात. असे करीत असताना हॅकर्स पासवर्ड आणि अन्य माहीतीची चोरी करतात.

मोठी अमाउंड करतात ट्रान्सफर
हॅकर्स युजर्संना बँक डिटेल्सचा वापर करून आपल्या अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्सफर करतात. ट्रान्झॅक्शनआधी युजर्सच्या नंबवरवर जो ओटीपी येतो. तो ओटीपी सायबर क्रिमिनल्स अॅपच्या माध्यमातून पाहू शकतात. तसेच दोन मिनिटात आपल्या नंबरवर पैसे ट्रान्सफर करुन घेतात. त्यामुळे सर्वांनी सावध राहणे गरेजेच आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

नोकियाची जबरदस्त ऑफर, एका स्मार्टफोनवर दुसरा फ्री

0

नवी दिल्लीः HMD Global ने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत नोकिया ७.२ () खरेदी केल्यानंतर ग्राहकांना जबरदस्त डील ऑफर केली जात आहे. नोकिया ७.२ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फोनसोबत स्मार्टफोन केस फी मिळणार आहे. तसेच फोनसोबत कंपनी आणखी एक नोकिया स्मार्टफोन फ्री देत आहे. नोकिया ७.३ फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नोकिया सी१ (Nokia C1) फोन फ्रीमध्ये दिला जात आहे. नोकियाची ही जबरदस्त ऑफर येथेच संपत नाही ग्राहकांना एक जबरदस्त जॅकेट सुद्धा मिळत आहे.

वाचाः

काय आहे ऑफर ?
नोकिया ७.२ चा ६ जीबी रॅमचा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी केस, जॅकेट, आणि नोकियाचा सी१ फोन फ्रीमध्ये देत आहे. ही ऑफर फिलिपिन्स ग्राहकांसाठी आहे. फिलिपिन्स मध्ये हा फोन १५,९९० पीएचपी म्हणजेच २८५ यूरो आहे.

एका फोनसोबत दुसरा फोन फ्री
नोकिया ७.२ सोबत कंपनी नोकिया सी१ फोन फ्रीमध्ये देत आहे. नोकिया C1 (Nokia C1) स्मार्टफोन अँड्रॉयड ९ पाय गो एडिशनवर चालतो. नोकिया सी१ फोनमध्ये ५.४५ इंचाचा FWVGA IPS डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये दोन्ही कॅमेऱ्यासोबत फ्लॅश दिला आहे. फोनमध्ये 1.3GHz क्वाड कोर प्रोसेसर सोबत १ जीबी रॅम दिला आहे. फोनमध्ये १६ जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येतो. फोनमध्ये 2,500 mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

नोकिया ७.२ चे खास फीचर्स
नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम दिली आहे. स्मार्टफोनमध्ये रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅकला प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. तसेच फोनमध्ये बॅकला ८ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येतो. फोनमध्ये 3,500 mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

व्होडाफोनचा धमाका, फ्री मध्ये मिळतोय 5GB डेटा

0

नवी दिल्लीः व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या ५ प्रीपेड रिचार्जवर ५ जीबी पर्यंत अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. कंपनीचे हे प्लान वेगवेगळ्या किंमतीत आणि वैधतेत येत आहे. व्होडाफोनच्या या प्लानमध्ये १४९ रुपये, २१९ रुपये, २४९ रुपये, ३९९ रुपये, आणि ५९९ रुपयांचा समावेश आहे. तसेच कंपनीच्या आणखी दोन ४९ रुपये आणि ७९ रुपयांच्या ऑलराऊंडर पॅक्सवर सुद्धा एक्स्ट्रा डेटा दिला जात आहे.

वाचाः

कोणत्या प्लानवर किती डेटा
या ऑफर अंतर्गत २ जीबी डेटाचा प्लान १४९ रुपयांच्या प्लानमध्ये १ जीबी डेटा फ्री दिला जात आहे. या प्रमाणे २८ दिवसांच्या वैधतेत एकूण ३ जीबी डेटा युजर्संना वापरता येईल. दुसरा २१९ रुपयांचा प्लान आहे. ज्यात रोज १ जीबी डेटा मिळत होता. आता या प्लानमध्ये २ जीबी डेटा अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्रमाणे २८ जीबी ऐवजी ग्राहकांना ३० जीबी डेटा मिळणार आहे.

रोज १.५ जीबी डेटा देणाऱ्या २४९ रुपये, ३९९ रुपये आणि ५९९ रुपयांच्या तीन प्लानमध्ये ५ जीबी अतिरिक्त डेटा मिळत आहे. या तीनही प्लानमध्ये अनुक्रमे, २८ दिवस, ५६ दिवस, आणि ८४ दिवसांची वैधता मिळते. हे सर्व प्लान अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. कंपनीने ही ऑफर App व Web Exclusive आहे. म्हणजेच रिचार्जसाठी तुम्हाला व्होडाफोन अॅप किंवा वेबसाईटचा वापर करावा लागेल.

वाचाः

ऑलराऊंडर पॅक्सवर ऑफर
व्होडाफोन ४९ रुपये आणि ७९ रुपयांच्या ऑलराऊंडर पॅक्सवर सुद्धा ३०० एमबी डेटा फ्री दिला जात आहे. ४९ रुपयांच्या पॅकमध्ये २८ दिवसांची वैधता आणि ३८ रुपयांचा टॉकटाईम, १०० एमबी डेटा मिळत होता. तसेच ७९ रुपयांच्या पॅकमध्ये २८ दिवसांची वैधता ६४ रुपयांचा टॉकटाईम आणि २०० एमबी डेटा मिळत होता.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

वर्ल्ड कप २०११ची फायनल फिक्स? किमान सचिनसाठी तरी चौकशी करा!

0

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या एका माजी क्रीडा मंत्र्यांनी भारतात २०११ साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील अंतिम सामना फिक्स झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता.

वाचा-
वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाने घरच्या मैदानावर विश्वचषक उंचावण्याची ही पहिलीच वेळ होती. पण अंतिम सामना फिक्स झाल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली. भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा श्रीलंकेचे क्रीडा मंत्री महिंदनंदा अलूठगमगे होते. ‘न्यूज फर्स्ट’ला दिलेल्या मुलाखतीत महिंदनंदा म्हणाले की, ” विश्वचषकातील अंतिम सामना हा फिक्स करण्यात आला होता, हे यापूर्वीही मी सांगितले आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आणि जर कोणाला याबाबत वाद विवाद करायचा असेल तर त्यासाठी मी सज्ज आहे. मी यामध्ये खेळाडूंना सहभागी करणार नाही, पण काही समूहांनी मिळून हा सामना फिक्स केला होता.”

वाचा-
लंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपावर आता त्याच देशाच्या एका माजी कर्णधाराने आणि २०११च्या वर्ल्ड संघाच्या निवड समितीचे प्रमुख असलेल्या यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. आणि भारतीय क्रिकेट चाहत्याचा विचार करून तरी या फिक्सिंग आरोपाची चौकशी झाली पाहिजे.

वाचा-
जेव्हा अशा प्रकारचे गंभीर आरोप केले जातात तेव्हा याचा परिणाम अनेक लोकांवर होतो. यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयने याची चौकशी केली पाहिजे, असे डिसिल्वाने म्हटले आहे. ज्या पद्धतीने आम्ही वर्ल्ड विजयाचा आनंद साजरा केला. त्याच पद्धतीने सचिन आणि भारतातील कोट्यवधी चाहत्यांनी तो आनंद साजरा केला. भारत सरकार आणि क्रिकेट बोर्डाचे हे कर्तव्य आहे की त्यांनी याची चौकशी करावी.

वाचा-
सचिन तेंडुलकरचा हा अखेरचा वर्ल्ड कप होता आणि त्याच्या करिअरमधील ही एकमेव वर्ल्ड कप विजेतेपद आहे. ही चौकशी यासाठी महत्त्वाची आहे की पुन्हा अशा प्रकारचे आरोप होऊ नयेत. भारताने खरच एक वर्ल्ड कप जिंकला होता, हे समोर आले पाहिजे, असे डिसिल्वा म्हणाला.

वाचा-
अंतिम फेरीत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करत असताना श्रीलंकेने महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर २७४ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी २७५ धावांची गरज होती. भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण भारताने माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना लवकर गमावले होते. त्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते. पण त्यानंतर गौतम गंभीर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने हा विश्वचषक गाजवला होता. या विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी करत युवराज हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. अंतिम फेरीतील गौतम गंभीरची खेळी आणि त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकार अजूनही कोणी विसरू शकलेला नाही.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

सानियाची भेट घेतल्यानंतरच शोएब इंग्लडच्या दौऱ्याला जाणार

0

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याचे निश्चित केले आहे. पण जेव्हा पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये जाणार आहे तेवहा माजी कर्णधार शोएब मलिक हा त्यावेळी पोहोचणार नाही. कारण पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला भेटल्यानंतरच तो या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते आहे.

सध्याच्या घडीला सानिया आणि तिचा मुलगा हे दोघेही भारतामध्येच आहेत. करोना व्हायरसच्या या काळात आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांमध्ये शोएबने सानिया आणि आपल्या मुलाची भेट घेतलेली नाही. त्यामुळे आधी पत्नी आणि मुलाची भेट घेतल्यानंतरच तो इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

पाकिस्तानचा २९ खेळाडूंचा संघ हा २८ जूनला इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पण शोएब मात्र या संघाबरोबर इंग्लंडला जाणार नाही. शोएब या दौऱ्याच्या पूर्वी पत्नी सानियाला भेटणार आहे आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने त्याला परवानगीही दिली आहे. त्यामुळे आता शोएब २४ जुलैला पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडमध्ये भेटणार आहे.

पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी सांगितले की, ” शोएब आपल्या कुटुंबियांपासून पाच महिने दूर आहे. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा आहे. ही त्याची विनंती आम्ही मान्य केली आहे. सध्याच्या घडीला बऱ्याच सवलती सुरु झाल्या आहेत, त्यामुळे आम्ही शोएबला कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देत आहेत. शोएब कुटुंबियांना भेटल्यावर थेट इंग्लंडला रवाना होणार आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

बापरे…मुंबई इंडियन्सबरोबर काम केलेल्या क्रिकेटपटूला झाला करोना

0

सध्याच्या घडीला एक धक्कादायक बातमी समोर आली असून मुंबई इंडियन्सबरोबर काम करणाऱ्या एका व्यक्तीला करोना व्हायरसची लागण झाल्याचे आता समोर आले आहे.

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला सर्व खेळाडू आपल्या घरीच आहेत. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफही आपल्या घरी आहे. पण करोना कसा होऊ शकतो, हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ही बातमी जेव्हा चाहत्यांनी वाचली तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण मुंबई इंडियन्सबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीला जर करोना झाला तर आयपीएलचे काय होणार, हा प्रश्न त्यांना पडला आहे.

वाचा-

जर आयपीएलमधील संघाशी निगडीत असलेल्या व्यक्तीला करोना झाला, तर काय करायचे याबाबत अजून बीसीसीआयने ठरवलेले नाही. पण संघाशी निगडीत असलेल्या व्यक्तीला करोना झाल्यामुळे आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडू सुरक्षित आहे की नाही, हा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.

हा व्यक्ती आहे तरी कोण…ही व्यक्ती २०१८ साली मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर होती. त्यावेळी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रेहमान हा मुंबईच्या संघाबरोबर जोडला गेलेला होता. त्याची मदत ही व्यक्ती करत असल्याचे पाहायला मिळाले होते. करोना झालेली ही व्यक्ती आहे बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू नफीस इक्बाल. नफीस हा बांगलादेश संघाचा कर्णधार तमीम इक्बालचा भाऊ आहे. आता नफीसला करोना झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या संपर्कातील लोकांचीही करोना चाचणी करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला नफिसची प्रकृती सुधारत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांची चिंता कमी झाली आहे.

वाचा-

नफीस हा मुस्ताफिझूरमुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक भाग झाला होता. मुस्ताफिझूरला बरीच भाषेची अडचण येत होती. त्यामुळे नफीस मुस्ताफिझूरसाठी भाषांतरकार म्हणून काम करत होता. नफीसने २००३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००५ साली त्याने १२१ धावांची खेळी साकारली होती, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. नफीस २००६ नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

फ्लिपकार्टवर सेलः स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या सर्वकाही

0

नवी दिल्लीः Flipkart वर पुन्हा एकदा बिग सेव्हिंग डेज सेलला सुरुवात होणार आहे. देशातील सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टवर २३ जून ते २७ जून या दरम्यान ‘BIG SAVING DAYS’ सेल मध्ये एचडीएफीसी बँक कार्ड्स आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. फ्लिपकार्टवर क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वरून कमीत कमी ४९९९ रुपयांच्या खरेदीवर १५०० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट आणि डेबिट कार्डवरून खरेदी केल्यानंतर ५०० रुपयांची सूट मिळणार आहे.

वाचाः

सुपर सेव्हिंग ऑफर्स अंतर्गत मोबाइल आणि टॅबलेट वर जबरदस्त ऑफर्स दिले जात आहे. विवो झेड वनच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटचा फोन १९ हजार ९९० रुपयांऐवजी १४ हजार ९९० रुपये आणि आयफोन ७ प्लस ३७ हजार ९०० रुपया ऐवजी ३४ हजार ९९९ रुपये, एमआय मॅक्सचा ६ जीबी स्टोरेजचा फोन ३७ हजार ९९९ रुपया ऐवजी १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. तसेच ओप्पो ए९ २०२० स्मार्टफोन १८ हजार ९९० रुपयांऐवजी १२ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. स्मार्टफोनवर नो कॉस्ट ईएमाय, कार्डलेस क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात येत आहे.

वाचाः

टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर सुद्धा या फ्लिपकार्ट सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, कंप्लिट अप्लायसेंज प्रोटेक्शन आणि एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी करण्याची संधी आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्ससरीज कॅटिगरीत हेडफोन आणि स्पीकर्स वर ६० टक्क्यांपर्यंत सूट, स्मार्टवॉच आणि बँड्सवर ६० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ई कॉमर्स कंपनी बेस्ट सेलिंग लॅपटॉपवर ४० टक्के सूट ऑफर केली जात आहे. या प्रोडक्ट्सवर नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स लागू आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Latest posts