Thursday, August 11, 2022
Home Blog Page 3865

धक्कादायक… भारताने जिंकलेल्या २०११च्या विश्वचषकात झाली होती मॅच फिक्सिंग

0

भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर मात करत विश्वचषक उंचावला होता. पण या अंतिम फेरीत मॅच फिक्सिंग करण्यात आली होती, असा धक्कादायक आरोप आता श्रीलंकेच्या माजी क्रीडा मंत्र्यांनीच केला आहे.

भारताने १९८३ सालानंतर २०११मध्ये विश्वचषक जिंकला होता. २०११ साली झालेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्डेडियमवर झाला होता. या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. पण हा अंतिम सामना फिक्स करण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासा आता समोर येत आहे.

भारताने जेव्हा २०११ साली विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री महिंदनंदा अलूठगमगे होते. महिंदनंदा यांनीच भारताने विश्वचषक जिंकला तेव्हाचा अंतिम सामना फिक्स करण्यात आलेला होता, असे सांगितले आहे. ‘न्यूज फर्स्ट’ला मुलाखत देताना महिंदनंदा यांनी सांगितले की, ” विश्वचषकातील अंतिम सामना हा फिक्स करण्यात आला होता, हे यापूर्वीही मी सांगितले आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आणि जर कोणाला याबाबत वाद विवाद करायचा असेल तर त्यासाठी मी सज्ज आहे. मी यामध्ये खेळाडूंना सहभागी करणार नाही, पण काही समूहांनी मिळून हा सामना फिक्स केला होता.”

या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करत असताना श्रीलंकेने महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर २७४ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी २७५ धावांची गरज होती. भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण भारताने माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना लवकर गमावले होते. त्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते. पण त्यानंतर गौतम गंभीर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने हा विश्वचषक गाजवला होता. या विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी करत युवराज हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. अंतिम फेरीतील गौतम गंभीरची खेळी आणि त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकार अजूनही कोणी विसरू शकलेला नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

चायनीज अॅपमुळे कोणता आहे धोका, जाणून घ्या

0

नवी दिल्लीः चिनी मोबाइल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपन्या या भारतात एक वाढत असलेले मार्केट आहे. पासून पर्यंत आणि हेलो अॅप पर्यंत हे सर्व चायनीज अॅप्स भारतात खूप प्रसिद्ध आहेत. या अॅप्सचा वापर इतका भयानक सिद्ध होऊ शकतो की, तुम्ही त्याचा विचार करु शकत नाही. काही रिपोर्ट्सच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे की, धोकादायक असतात. त्यांच्यामुळे काय नुकसान होऊ शकते, जाणून घ्या.

वाचाः

गरज नसलेले अॅक्सेस मागितले जाते
एका इनफॉर्मेशन सिक्योरिटी फर्मच्या स्टडीत म्हटले की, Helo, Shareit आणि UC ब्राउझर यासारख्या १० पैकी ६ प्रसिद्ध चायनीज अॅप्स युजर्संना कॅमेरा आणि मायक्रोफोनचा अॅक्सेस मागतात. परंतु, या अॅप्समध्ये या सारख्या अॅक्सेसचे कोणतेही काम नसते. पुण्याच्या Arrka Consulting चे सह संस्थापक संदीप रावने म्हटले की, हे जगभरातील टॉप ५० अॅप्सकडून मागितलेल्या परमिनशनपेक्षा ४५ टक्के जास्त आहे.

अधिक चायनीज अॅप्स लोकेशनचा अॅक्सेस मागते. rrka Consulting च्या सह संस्थापक शिवांगी नाडकर्णी यांच्या माहितीनुसार, यूसी ब्राऊझर लोकेशनचा अॅक्सेस मागते. ही व्यक्ती कुठून माहिती सर्च करतेय, याची माहिती मिळवता यावी यासाठी हा कंपनीचा खटाटोप आहे. यासारखे अॅक्सेस हा फूड डिलिव्हरी देणाऱ्या अॅप्ससाठी गरजेचा आहे. यूसी ब्राऊझरला हे कशासाठी हवे आहे?

वाचाः

कोणता अॅप पाठवतो डेटा
स्टडीमध्ये हेही उघड झाले आहे की, अॅप्स युजर्संचा डेटा सात विदेशी एजन्सीला ट्रान्सफर करते. यात म्हटले की, ६९ टक्के यूएस ट्रान्सफर केला जातो. रिपोर्टनुसार, टिकटॉक आपला डेटा चायना टेलिकॉमला पाठवतो. तर विगो व्हिडिओ आपला डेटा Tencent, ब्यूटीप्लस आपला डेटा Meitu आणि QQ व UC ब्राउजरला डेटा आपली पॅंरंट कंपनी Alibaba पर्यंत पोहोचवतो.

हेरगिरीचाही आरोप
चायनीज अॅप्सवर हेरगिरी आणि धोका करीत असल्याचा आरोग करण्यात आलेले आहेत. २०१७ मध्ये भारतीय इंटेलिजन्स एजन्सी ने असा ४२ मोबाइल अॅप्लिकेशन्सचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. जो चायनीज डेव्हलपर्सने तयार केलेला आहे. किंवा चीन संबंधी त्यात लिंक आहे. हा इशारा भारतीय लष्कर आणि अर्ध सैनिक दल यांच्यासाठी जारी केला होता. त्यावेळी म्हटले होते की, हे अॅप्स सायबर अटॅक करण्याची क्षमता ठेवतात.

वाचाः

बँक अकाउंट होऊ शकते रिकामे
नुकतेच Upstream च्या एका रिपोर्टमध्ये प्रसिद्ध चायनीज अॅप Snaptube वर युजर्संची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. यात म्हटले की, विना परमिशन युजर्संना प्रीमियम सर्विससाठी साइन अप करण्यात येते. तसेच जाहाराती डाऊनलोड आणि क्लिक सुद्धा केले जाते. रिपोर्टच्या माहितीनुसार गेल्या वर्षी ७ कोटीहून अधिक फ्रॉड ट्रान्झॅक्शन स्नॅपट्यूब कडून करण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Yuvraj Singh: माफी मागितली तरी युवराजची सुटका नाही; कोर्टाने दिला हा आदेश!

0

नवी दिल्ली: भारताचा माजी अष्ठपैलू खेळाडू युवराज सिंगच्या अडचणी इतक्या लवकर संपणार असे दिसत नाही. उलट त्या वाढत चालल्या आहेत. लाइव्ह चॅटमध्ये वापरल्याचे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांना नोटिस बजावली आहे.

वाचा-
इस्टाग्रामवरील लाइव्ह चॅटवर रोहित शर्माशी बोलताना युवीने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या संदर्भात बोलताना गंमतीने एक कमेंट केली. त्यानंतर सोशल मीडियावर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता. तर रजत कलसन यांनी हरियाणातील हांसी येथील पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. न्यायालयाने या प्रकरणी आता मागितला आहे.

वाचा-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित सीडी तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पण आता न्यायालयाच्या आदेशानुसार यावर स्टेटस रिपोर्ट सादर करावा लागेल.

रजत कलसन यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणाचा रिपोर्ट डीसीपी रोहताश सिंह यांच्याकडे सोपवला होता. पण काही दिवसांपूर्वी डीसीपींची बदली झाल्याने नवे डीसीपी विनोद शंकर यांच्या हाती तपास आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास गंभीरपणे करत आहे. तक्रारकर्त्यांनी सादर केलेला पुरावा लॅबकडे पाठवला आहे. लॅबचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

वाचा-

युवराज सिंगने मागितली माफी

वाचा-
जेव्हा या प्रकरणी युवराजला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली तेव्हा युवीने सोशल मीडियावर माफी मागितली होती. माझा हेतू कोणाच्या भावना दुखवण्याचा नव्हता. त्यामुळे मी माफी मागतो, असे युवराज म्हणाला होता. आपण जर कोणाला दुखावले असेल तर त्याची सपशेल माफी मागत आहे. आपल्या ट्विटमध्ये युवराजने म्हटले होते की, ” रंग, धर्म, पंथ किंवा लिंग यामध्ये आतापर्यंत मी कोणताच भेदभाव केलेला नाही. लोकांसाठी मी आतापर्यंत झटत आलो आहे. त्यामुळे कोणत्याही असमानतेवर माझा विश्वास नाही. त्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो.”

वाचा-
रोहितसोबत बोलताना युवराजने या दोन क्रिकेटपटूंबद्दल गंमतीने जातीवाचक शब्द वापरले. हा शब्द वाल्मिकी समाजाबद्दल होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

सुशांतला धोनीनंतर या क्रिकेटपटूचा बायोपिक करायचा होता; फोटो झाला व्हायरल!

0

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूतने ३४व्या वर्षी आत्महत्या करून जीवन संपवले. सुशांतचा मोठ्या पडद्यावरील प्रवास २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून सुरू झाला होता. पण भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटाने सुशांतला खरी ओळख मिळाली. फक्त चित्रपट चाहते नाही तर क्रिकेटचे विशेषत: धोनीचे चाहते सुशांतचे फॅन झाले. त्यामुळेच सुशांतच्या निधनामुळे फक्त सिनेचाहत्यांना नाही तर क्रिकेटपटू आणि क्रिकेट चाहत्यांना वाईट वाटले.

वाचा-
भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटूनी सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सुशांतच्या अभिनयाने प्रभावित केले होते.

वाचा-
xtratime या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतला भारताचा दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करायची इच्छा होती.

सुशांत आणि सौरव गांगुलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात हे दोघे एकत्र दिसत आहेत. सुशांतने गांगुलीसोबतचा हा फोटो २०१८ मध्ये शेअर केला होता. धोनीच्या बायोपिकमधील सुशांतच्या कामाचे कौतुक गांगुलीने केले होते. या दोघांची कोलकातामध्ये भेट झाली होती. तेव्हा क्रिकेटबद्दल चर्चा झाली.

वाचा-

सुशांतच्या निधनावर धोनीची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्याच्या निधनाने धोनीला मोठा शॉक बसला होता. धोनीचे मॅनेजर आणि एम.एस धोनीच्या बायोपिकचे निर्माते अरुण पांडे यांनी सांगितले की, जेव्हा धोनीला सुशांतच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा तो खुप निराश झाला.

बायोपिकची () तयारी करण्यासाठी सुशांतने धोनीसोबत बराच वेळ घालवला होता. या चित्रपटासाठी सुशांतला क्रिकेटपटू म्हणून तयार करण्याची जबाबदारी माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्यावर होती. मुंबईतील वांद्रे-कुर्ला येथील अकादमीत सुशांतने क्रिकेटचा सराव केला होता.

वाचा-

सुशांत स्वत: क्रिकेट खेळत होता. त्यामुळे त्याला धोनीचा बायोपिक करताना फार अवघड गेले नाही. विशेष म्हणजे सुशांतने ज्या बॉलिवडू चित्रपटातून पदार्पण केले. त्या चित्रपटाचा विषय क्रिकेटवर आधारित होता. काय पो छे या चित्रपटात सुशांतने एका क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रटात त्याने ज्या अली नावाच्या मुलाला क्रिकेट प्रशिक्षण दिले होते. तो आता एक जलद गोलंदाज असून महाराष्ट्र संघाकडून खेळतो. आयपीएल २०२० च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने २० लाख रुपयांची बोली लावून दिग्विजयला (Digvijay Deshmukh) करारबद्ध केले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Jio आणि Airtel चे जबरदस्त प्लान, रोज २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

0

देशभरात सध्या ३० जून पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन तसेच वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने अनेकांना जास्तीचा डेटा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे तुम्ही जर ग्राहक असाल तर रोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग मिळणाऱ्या या प्लानविषयी जाणून घ्या. रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे डेटा लिमिटचे अनेक प्लान ऑफर केले आहेत. रोज १.५ जीबी डेटा असलेले प्लान खूप प्रसिद्ध आहेत. युजर्संना जास्त डेटा हवा असल्यास त्यांच्यासाठी रोज २ जीबी डेटा प्लान सुद्धा आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओ आणि एअरटेलच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या प्लानविषयी माहिती सांगत आहोत, या प्लानमध्ये कॉलिंग सुद्धा दिली जाते. जाणून घ्या या प्लानविषयी….

एअरटेलचा २९८ रुपयांचा प्लान

हा प्लान २ जीबी डेटाचा सर्वात स्वस्त प्लान आहे. याची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळते. थँक्स बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम, विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्स्ट्रिम या सारख्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्लान

हा प्लान २९८ रुपयांच्या प्लानसारखाच आहे. यात वेगळेपण म्हणजे युजर्संना अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप सोबत मिळतो. रोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात युजर्संना एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळतात.

एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्लान

एअरटेलचा ४४९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अन्य प्लानप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळते.

एअरटेलचा ६९८ रुपयांचा प्लान

हा प्लान ८४ दिवसाचा आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. या प्रमाणे युजर्संना १६८ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळते.

एअरटेलचा २४९८ रुपयांचा प्लान

कंपनीचा हा रोज २ जीबी डेटा देणारा प्लान आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. हा महागडा प्लान आहे. युजर्संना या प्लानमध्ये ७३० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळतात.

रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा प्लान

जिओचा हा सर्वात स्वस्त २ जीबीचा प्लान आहे. यात ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचा ४४४ रुपयांचा प्लान

जिओचा ४४४ रुपयांचा प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. यात जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचे ५९९ रुपयांचा प्लान

रोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात युजर्संना १६८ जीबी डेटा मिळतो. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तर जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या शिवाय, १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्य जिओचा २३९९ रुपयांचा प्लान

एका वर्षाची वैधता असलेला हा प्लान आहे. या प्लानमध्ये ३६५ दिवसांसाठी एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना जिओ ते जिओ नेटवर्वकर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १२ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळतात.

रिलायन्स जिओचा २५९९ रुपयांचा प्लान

हा प्लान २३९९ रुपयांच्या प्लानसारखाच आहे. यात ३६५ दिवसांसाठी ७३० जीबी डेटा आणि १२००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. यात १० जीबी अतिरिक्त डेटा (730GB+ 10GB) मिळतो. तसेच Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

भारताकडून वनडेतील पहिले ऐतिहासिक शतक; थेट नाबाद १७५ धावा!

0

नवी दिल्ली: १८ जून १९८३ ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात खास अशी आहे. इंग्लंडच्या ट्रेंटब्रिज वेल्स मैदानावर वर्ल्ड कप स्पर्धेतील एक महत्त्वाची लढत सुरू होती. क्रिकेटच्या मैदानावर त्या दिवशी जे झाले ते शानदार असे होते आणि तो क्षण पुन्हा कोणालाच अनुभवता येणार नाही असा ठरला. त्या दिवशी मैदानावर जे लोक उपस्थित होते ते सर्व जण आज ही स्वत:ला लकी मानतात. त्यांनी जे पाहिले ते इतर कोणाला पाहता आले नाही कारण या सामन्याचे रेकॉर्डिंग झाले नाही. बीसीसीचा संप आणि मैदानात कोणाकडेच कॅमेरा नसल्याने क्रिकेट इतिहासातील सर्वात शानदार खेळी रेकॉर्ड झाली नाही. ही खेळी फक्त स्कोअरबुकमध्ये पाहता येते.

वाचा-
आजपासून ३७ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा कर्णधार कपिल देवने वनडे क्रिकेटमध्ये अशी फलंदाजी केली ज्याची आठवण आज देखील सर्व जण करतात. झिम्बाब्वे त्यांचा पहिला वर्ल्ड कप खेळत होती आणि सेमीफायनल सामन्यात त्यांनी भारताला अडचणीत आणले होते. फक्त ९ धावांवर भारताचे ४ फलंदाज बाद झाले. तेव्हा मैदानात उतरले कर्णधार निखंज. १७ धावांवर भारताची पाचवी विकेट पडली. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा सामना करणे अवघड होते. पण कपिल देव यांच्या खेळीने सामन्याचे चित्रच बदलले.

वाचा-

तेव्हा वनडेत ६० षटकांचा सामना व्हायचा. भारताने ८ बाद २६६ धावा केल्या. यात कपिल देवच्या नाबाद १७५ धावा होत्या. भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरारष्ट्रीय स्तरावरील हे पहिले शतक होते, ही गोष्टी फार कमी जणांना माहित आहे. सुनिल गावसकर यांच्या मते वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजांकडून झालेल्या शतकांपैकी कपिल देव यांचे शतक सर्वोत्तम होते. मी जितक्या वनडे खेळी पाहिल्या आहेत. त्यापैकी ही सर्वोत्तम आहे आणि मी खुप प्रमाणात वनडे सामने पाहिले आहेत.

वाचा-
कपिल देव यांच्या या ऐतिहासिक खेळीत सैयद किरमानी यांची मोलाची साथ मिळाली. किरमानी यांनी २४ धावा केल्या. या दोघांनी ९व्या विकेटसाठी विक्रमी भागादीरी केली होती. कपिल देव यांनी ४९व्या षटकात शतक केले आणि पुढच्या ११ षटकात त्यांनी ७५ धावा केल्या होत्या.

कपिल देव यांच्या या खेळीमुळे भारत फक्त अंतिम फेरीत पोहोचला नाही तर संघात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला. कपिल जेव्हा मैदानात आले तेव्हा त्यांनी सुरुवातीला हवेत शॉट खेळले नाही. चेंडूवर नजर स्थिर झाल्यानंतर आक्रमक शॉट खेळले. कपिल देवने १३८ चेंडूत १६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १७५ धावा केल्या. या खेळीत त्यांचा स्ट्राइक रेट होता १२६.८१ इतका.

उत्तरादाखल झिम्बब्वेला २३५ धावा करता आल्या. भारताकडून मदन लाल यांनी सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. बिन्नी यांनी २ तर कपिल, अमरनाथ, सिंद्धू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यानंतर भारतीय संघाने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा धक्कादायक पराभव करत पहिले विजेतेपद मिळवले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

विना रिचार्ज मिळवा ५० रुपये, BSNLची ऑफर

0

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेडकडून आपल्या ग्राहकांना ५० रुपयांपर्यंत दिले जात आहे. ही ऑफर टॉकटाईम लोनसोबत येते. कंपनीची ही ऑफर अशा वेळी आहे. ज्यावेळी काही युजर्संना आपल्या फोनमध्ये कॅश न नसल्याने रिचार्ज करु शकत नाही. तसेच लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. बाकी टेलिकॉम ऑपरेटर्सकडून सुद्धा ग्राहकांना दिलासा दिला आहे.

वाचाः

बीएसएनएलने अशा युजर्संसाठी ऑफर आणली आहे. काही कारणांमुळे आपला नंबर रिचार्ज करु शकत नाही. OnlyTech रिपोर्टच्या माहितीनुसार, बीएसएनएलकडून विना रिचार्ज युजर्संना ५० रुपयांपर्यंत लोन या ऑफर अंतर्गत मिळत आहे. युजर्संना या प्रमाणे वेगळ्या टॉकटाईम लोन ऑफर १० रुपये, २० रुपये, ३० रुपये आणि ५० रुपये दिला जात आहे. या प्लान्सचा फायदा घेण्यासाठी युजर्संना USSD कोड डायल करावे लागेल.

असा मिळणार फायदा
लोन ऑफरचा फायदा घेण्यासाठी युजर्संना सर्वात आधी आपल्या फोनवरून *511*7# डायल करावे लागेल. हा कोड डायल केल्यानंतर त्यांना एक प्रॉम्प्ट दिसेल. या ठिकाणी युजर्स निवडू शकेल की, कोणत्या किंमतीचे लोन हवे आहे. रक्कम सिलेक्ट केल्यानंतर युजर्संना सेंड बनटनवर क्लिक करावे लागेल. युजर्स ‘Check my points’ ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करू शकता. या टॉकटाईम लोन प्लानची बाकी माहिती शेअर करण्यात आली नाही.

वाचाः

नंतर द्यावे लागेल पेमेंट
कंपनीकडून २०१६ मध्ये असाच एक प्लान आणला होता. त्यावेळी युजर्सना १० रुपयांचे लोन एसएमएसच्या मदतीने मिळवता येत होते. त्यानंतर पुढील रिचार्जवेळी ११ रुपये युजर्संकडून घेतले जात होते. नवीन लोन ऑफर मध्ये सुद्धा युजर्संकडून चार्ज घेतला जाईल. युजर्संना लोन घेण्यासाठी ऑप्शन मिळत आहे. परंतु, हे स्पष्ट नाही की, लोन घेतल्यानंतर किती परत करायचे आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

अॅपलचा धमाका, या आयफोनची जबरदस्त जादू

0

नवी दिल्लीः काउंटरपॉइंट रिसर्चने आपल्या नवीन रिपोर्टमध्ये म्हटले की, फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या सेलमध्ये १३ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. ही घसरण २०२० च्या पहिल्या तिमाहीत नोंदली गेली आहे. या वर्षी प्रीमियम स्मार्टफोन्सच्या सेलमध्ये जबरदस्त घसरण झाली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, या सेगमेंटमध्ये अॅपलचा जबरदस्त दबदबा राहिला आहे. टॉप ५ प्रीमियम स्मार्टफोनच्या यादीत अॅपलचे ४ मॉडलचा समावेश आहे. केवळ एक मॉडल हुवेईचा आहे. अन्य कोणत्याही ब्रँडला या टॉप ५ मध्ये स्थान मिळवता आले नाही.

वाचाः

हे आहेत टॉप ५ प्रीमियम स्मार्टफोन्स
टॉप ५ प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये ३० टक्के शेअर सोबत आयफोन ११ पहिल्या नंबरवर आहे. दुसऱ्या नंबरवर आयफोन ११ प्रो मॅक्स आहे. तिसऱ्या नंबरवर आयफोन ११ प्रो तर चौथ्या नंबरवर आयफोन एक्सआर या फोनने स्थान पटकावले आहे. हुवेईचा मेट ३० प्रो पाचव्या नंबरवर आहे.

अॅपल आयफोन ११ सर्वात जास्त प्रसिद्ध
या रिपोर्टच्या माहितीनुसार, २०२० च्या पहिल्या तिमाहित आयफोन ११ जगातील सर्वात प्रसिद्ध फोन ठरला. ब्लॅक, व्हाईट, लँवेंडर, रेड, ग्रीन आणि येलो कलरमध्ये उपलब्ध आहे. आयफोन ११ मध्ये ६.१ इंचाचा LCD IPS HD डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये A13 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. iPhone 11 मध्ये फेस आयडीचा सपोर्ट दिला आहे. अॅपलचा दावा आहे की, च्या तुलनेत iPhone 11 ची बॅटरी १ तास जास्त चालते. हा फोन ३० मिनिटा पर्यंत २ मीटर डेप्थ वॉटर रेजिस्टेंट आहे. आयफोन ११ च्या फ्रंटमध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर बॅकला ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅकला १२-१२ मेगापिक्सलचे २ कॅमेरे दिले आहेत.

वाचाः

आयफोन एक्सआर टॉप ५ मध्ये
iPhone XR मध्ये ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. युजर्संना या फोनमध्ये ३डी टचची मजा मिळणार नाही. आयफोन एक्सआर मध्ये ए १२ बायोनिक प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फेसआयडी, टच टू वेकअप आणि ड्यूल सिम यासारखे फीचर्स दिले आहेत. फोटोग्राफीसाठी फोकस पिक्सलसोबत १२ मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा दिला आहे. यात स्मार्ट एचडीआर, डेप्थ कंट्रोल सोबत पोर्ट्रेट मोड देण्यात आला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

सिंधुदुर्गात पावसाचे 'धुमशान'; अनेक नदी-नाल्यांना आला पूर

0

सिंधुदुर्ग: दोन दिवस जिल्ह्यात पावसाने संततधार धरली असून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत. अतिपावसामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. दोन दिवसांत सरासरी १०० मिमी पावसाची नोंद झाली असून मान्सून दाखल झाल्यापासून आजवर जिल्ह्यात ८५० मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे काही ठिकाणी चिखलमय झाला असून कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाचा:

जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले असून कणकवली नजीकच्या असलदे गावातील रिक्षाचालक याला अपघातात जीव गमवावा लागला आहे. हायवेवरील पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने रिक्षाला अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक जेठे गंभीर जखमी झाला. आज त्याचे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे ठेकेदार कंपनीविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. गंभीर बाब म्हणजे पावसाळा सुरू होऊन काही दिवसच झाले असताना महामार्गावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल आला आहे. कणकवली जवळच्या पुलाला भेगा पडल्याने त्याविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या दालनात ठेकेदार कंपनी, संबंधित अधिकारी आणि नागरिक यांची एक बैठक झाली. त्यात प्रांताधिकाऱ्यांनीही महामार्गाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, सिंधुदुर्ग व जिल्ह्यांत पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. उद्या १८ जून रोजी या दोन्ही जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

वाचा:

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

शहीद जवानाच्या वडिलांना पाहून सेहवागला झाले देवाचे दर्शन…

0

लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये कुंदन कुमार ओझा यांचाही समावेश होता. कुंदन शहीद झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी एक प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया पाहिल्यावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला गहीवरून आले आहे. कारण या शहीद जवानाच्या वडिलांमध्ये मला देवाचे दर्शन झाले, असे मत सेहवागने व्यक्त केले आहे.

भारतीय जवान शहीद झाल्यावर बरेच जण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण आपल्या देशाचे रक्षण करताना जवानांनी दिलेली ही आपल्या प्राणांची आहुती सर्वांसाठी मोलाची ठरत आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे ४३ सैनिक जखमी झालेत. या झटापटीत १७ भारतीय जवान शहीद झाल्याचे लष्कराने काल रात्री उशिरा सांगितले. या घटनेवर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

कुंदन शहीद झाल्यावर त्यांच्या वडिलांची एक प्रतिक्रीया घेण्यात आली होती. यामध्ये त्यांनी सांगितले की, ” माझ्या मुलाने देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. मला दोन नातू आहेत आणि त्यांनाही मी भारतीय सैन्यामध्ये पाठवणार आहे.” आपला मुलगा शहीद झाल्यावरही त्याच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया ही भावूक होती. यानंतर सेहवाग म्हणाला की, ” ही इश्वराच्या रुपातील माणसं आहेत. चीनला आम्ही लगेच आरसा दाखवू.”

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणही यावेळी जवान शहीद झाल्यावर भावूक झालेला पाहायला मिळाला आणि त्याने एका ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इरफान म्हणाला की, ” काही वेळेला सीमेवर आपल्या जवानांना शहीद व्हावे लागते. माझी अशी इच्छा आहे आणि मी त्यासाठी प्रार्थना करतो की, यावर एक मार्ग असा काढायला हवा, जेणेकरून एका आईला आपला मुलगा गमावल्याचे दु:ख होणार नाही. कोणत्याही पित्याला आपला वंश गमवावा लागू नये. एका भावाला आपला मित्र गमवावा लागू नये आणि एका बहिणीला एक हात गमवावा लागू नये ज्यावर ती राखी बांधते.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Latest posts