Tuesday, October 4, 2022
Home Blog Page 4300

बापरे! लाईट बिल पाहून हरभजन सिंगचीच पडली विकेट, तुम्हीही चक्रावाल…

0

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानात बऱ्याच विकेट्स घेतल्या आहे. पण सध्याच्या घडीला लाईट बिल पाहून हरभजनची विकेट पडल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण एवढी रक्कम लाईट बिलमध्ये आली असून हरभजन यामुळे चक्रावून गेला आहे. पण आता हे बिल भरायचे की नेमके काय करायचे, असा प्रश्न त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीलाच विचारला आहे.

करोनाच्या काळात लाईटचे मीटर रिडींग करणारे व्यक्ती आलेले नाहीत. त्यामुळे ते आता अंदाजाने लाईट बिल पाठवत आहेत. यापूर्वीही काही जणांना आतापर्यंत न भरलेली रक्कम लाईट बिलमध्ये आली आहे. त्यामुळे एवढी मोठी रक्कम भरायची तरी कशी, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. यावेळी हरभजनने तर चक्क वीज पुरवठा करण्याचा कंपनीला चांगलेच धारेवर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत कधीही एवढे लाईटचे बिल हरभजनला आले नव्हते. पण आता यावेळी नेमके करायचे तरी काय, हा प्रश्नच त्याने वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीला विचारला आहे.

हरभजन यावेळी जवळपास सात पटीने जास्त लाईटचे बिल आल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बऱ्याच सेलिब्रेटींना असाल अनुभव आला होता. त्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता. वीज पुरवठा करणारी कंपनीचे डोके ठिकाणावर तरी आहे ना, असा रोष आता लोकांच्या मनात आहे. कारण आतापर्यंतच्या बिलाच्या बऱ्याच पटीने यावेळी त्यांना लाईट बिल आल्याचे पाहायला मिळाले आहे.

हरभजनला यावेळी सात पट जास्त बिल आले आहे. हरभजनच्या बिलचा आकडा पाहाल तर तुम्हीही हैराण व्हाल. कारण हरभजनला यावेळी ३३, ९०० एवढं बिल आलं आहे. हरभजनच्या घरी अदानी ही कंपनी वीर पुरवठा करते. त्यामुळे त्याने आता अदानी या कंपनीला धारेवर धरले आहे. हरभजन यावेळी म्हणाला की, ” पूर्ण एरियाचं बिल मला पाठवलंय का? हरभजनला ३३, ९०० एवढे लाईट बिल आहे. हे माझ्यासाठी दर महिन्याला येणाऱ्या बिलाच्या सात पटआहे.”

हरभजनने आपल्याला सातपट बिल आल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ हरभजनला दर महिन्याला ४५००-५००० हजार एवढे लाईट बिल येत असावे. पण यावेळी तर चक्क त्याला ३३, ९०० एवढे लाईट बिल आल्याचे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

अंधश्रद्धेचे बळी! भूत उतरवण्यासाठी मारहाण; काकासह आजीचा जीव घेतला

0

कल्याण: अंगात संचारलेले भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून तंत्रमंत्रानंतर केलेल्या बेदम मारहाणीत आजी आणि काकाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याणमधील खडकपाडा परिसरात घडली. पंढरीनाथ तरे (वय ५०) आणि चंदूबाई तरे (वय ७६) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे (वय २७), विनायक कैलास तरे (वय २२) आणि मांत्रिक सुरेंद्र पाटील (वय ३५) यांच्यासह मृताच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. खडकपाडा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मृताची पुतणी कविता तरे हिच्या अंगात दैवीशक्ती संचारत असल्यामुळे तिला पंढरीनाथ यांची पत्नी आणि कविताची आई सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे नियमित घेऊन जात असत. ढोंगी मांत्रिक सुरेंद्र याने त्यांना पंढरीनाथ आणि चंदूबाई या दोघांना भूतानं पछाडले असून, घराला त्याचा त्रास होत असून हे भूत उतरवल्यास घरात भरभराट येईल, असे सांगितले. त्यांच्या अंगातील भूत तंत्रमंत्र करून पळवावे लागेल अशी बतावणी केली. या अंधश्रद्धेला बळी पडत विनायक आणि कविता यांनी काका आणि आजीचे मन वळवून त्यांना अंगातील भूत उतरवून घेण्यास तयार केले. यानंतर पंढरीनाथ तरे यांच्या अटाळी येथील राहत्या घरातच भूत उतरविण्याची तयारी केली गेली.

२५ जुलैला दुपारी ४ वाजल्यापासून हा जीवघेणा प्रकार सुरू झाला. त्यात मृताचा अल्पवयीन मुलगादेखील सामील झाला. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चंदूबाई आणि पंढरीनाथ यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यात आली. हा अघोरी प्रकार दुपारी ४ वाजल्यापासून रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत सुरू होता. मांत्रिकासह इतर तिघांनी पंढरीनाथ आणि चंदूबाई यांना मारहाण केली. या मारहाणीत या दोघांचाही अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मयताचा भाचा देवेंद्र भोईर याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. देवेंद्र याच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी पहाटे गुन्हा दाखल केला असून, चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिघांना अटक केली असून, अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Kargil Vijay Diwas: भारतीय क्रिकेटपटूंनी कसा केला जवानांना सलाम, पाहा…

0

भारताने आजच्याच दिवशी पाकिस्तानवर कारगिल युद्धात विजय मिळवला होता. भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी १९९९ साली भारताने कारगिल युद्ध जिंकत पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे आज कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय क्रिकेटपटूंनीही आजच्या दिवशी भारतीय जवानांना सलाम ठोकत कुर्निसात केला आहे. भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूंनी देशभक्तीपर नेमके काय म्हटले आहे, पाहा…

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने एक व्हिडीओ यावेळी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करून रैनाने म्हटले आहे की, ” भारतीय जवान हेच खरे नायक आहे. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला मानवंदना देतो. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, सुरक्षितपणे श्वास घेता यावा, यासाठी बलिदान देणाऱ्या जवानांप्रती माझी मान कायम झुकलेलीच राहील. आम्ही कायमच तुमचे ऋणी राहू.”

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने कारगिल दिनाबद्दल म्हटले आहे की, ” कारगिल युद्धादरम्यान भारताच्या ताकदिच्या, वीरतेच्या आणि निस्वार्थ बलिदानाच्या अगणित गोष्टी अविस्मरणीय अशाच आहे. आम्ही नेहमीच देशाप्रती त्यांचे कायम ऋणी राहू.”

भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने यावेळी म्हटले आहे की, ” कारगिल विजय दिवसाबद्दल भारताचे जे शूर जवान शहिद झाले त्यांना माझ्याकडून श्रद्धांजली. आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी राहू.”

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भारताच्या जवानांचा फोटो शेअर केला आहे. यावेळी कैफ म्हणाला की, ” आपल्या शूर जवानांच्या वीरतेला आणि साहसाला सलाम. तुम्ही आता म्हणूनच आम्ही आहोत. कारण तुम्ही दिवस-रात्र निस्वार्थपणे देशाची सेवा करता आणि आमची रक्षा करता. तुम्हाला सलाम. जय हिंद…”

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने यावेळी म्हटले आहे की, ” कारगिल युद्धातील सर्व जवानांना माझे नमन. या युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली. भारतीय जवान नेहमीच आमची सुरक्षा करत असतात, त्यासाठी त्यांना बलिदानही द्यावे लागते. त्यामुळे त्यांना सलाम, जय हिंद…”

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन महिने हे युद्ध चालू होते. पण भारताने अखेर या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

सेटवर सुरू झाली सोशल डिस्टन्सिंगसाठी ‘दादा’गिरी

0

कल्पेशराज कुबल

कोणत्याही मालिकेच्या सेटवर सर्वाधिक आवाज असतो तो; त्या मालिकेच्या दिग्दर्शकाचा. दिग्दर्शकाचा शब्द सेटवर अखेरचा असतो. दिग्दर्शक जर तापट आणि शिस्तप्रिय असेल, तर सेटवरचे सगळेच त्याला घाबरून असतात. सध्याचं चित्र मात्र काहीसं वेगळं आहे. म्हणजे, दिग्दर्शक सांगेल ते होतंच. पण, प्रत्येक सेटवर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातंय की नाही हे कठोरपणे पाहण्यासाठी ”ची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येकाला त्याचं ऐकावंच लागतं.

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. शूटिंगचं काम करताना एका ठिकाणी अनेक मंडळी एकत्र काम करत असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. नव्यानं चित्रीकरण करताना सरकारनं काही नियम घालून दिले आहेत. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवूनच चित्रीकरण केलं जाणं आवश्यक आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. या सर्व नियमांची पूर्तता कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींकडून योग्य तऱ्हेनं होतेय की नाही यावर हा ‘सोशल डिस्टन्सिंग दादा’ बारीक लक्ष ठेवून असतो. सेटवर जर कुणी मास्क न घालता वावरत असेल, किंवा सुरक्षित अंतर न ठेवता एकमेकांशी बोलत असेल, तर लगेचच हा ‘दादा’ येऊन त्या संबंधित कलाकाराला, तंत्रज्ञाला खबरदारी पाळण्याविषयी कडक सूचना देतो. म्हणूनच कलाकारांनी सेटवरच्या या ‘दादा’चं नामकरण ‘सोशल डिस्टंसिंग दादा’ असं केलं आहे.

नियम काय सांगतो?

चित्रीकरणासाठी राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली होती. सरकारकडून जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, सेटवर एक व्यक्ती सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होतेय की नाही? यावर लक्ष ठेवेल. त्यासाठी सेटवर एका निरीक्षकाची नियुक्ती केली जाणं आवश्यक आहे. म्हणूनच सध्या हिंदी-मराठी मालिकांचा चित्रीकरणाच्या सेटवर एक सुपरवायजर असतो, जो सेटवरील घडामोडींवर आणि कलाकार, तंत्रज्ञ यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून असतो. बहुतांश वेळा ही व्यक्ती सुरक्षारक्षकांपैकीच कुणीतरी असते.

काय करतो ‘सोशल डिस्टन्सिंग दादा’?

* कलाकार, तंत्रज्ञ सेटवर येण्याअगोदर संपूर्ण सेटचं करून घेणं.

* मेकअप रूम्सचं निर्जंतुकीकरण करून घेणं.

* सेटवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाची, ऑक्सिजन पातळीची नोंद ठेवणं.

* सेटवर प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायजर लावून सॅनिटाइज करणे.

* दिवसभर सेटवर वावरुन लक्ष ठेवणं.

* कुणी व्यक्ती मास्क न वापरता सेटवर वावरत असेल, तर त्याला मास्क वापरण्याबाबत सूचना करणं.

* कुणी व्यक्ती सुरक्षित वावराचे नियम वारंवार न पाळताना आढळल्यास संबंधित व्यक्तीची तक्रार मालिकेचे निर्माते किंवा कार्यकारी निर्मात्याकडे करणं.

सेटवर सकाळी पहिल्यांदा मी हजेरी लावतो. अगोदर स्वतःला योग्य प्रकारे सॅनिटाइज करून नंतर आमच्या टीमकडून मी संपूर्ण सेटचं निर्जंतुकीकरण करुन घेतो. हळहळू जेव्हा सेटवर कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी येऊ लागले की त्यांना सॅनिटाइज करणं, त्यांच्या शरीराचं तापमान, ऑक्सिजन पातळीची तपासणी मी करतो. दिवसभर सेटवर मी इकडे-तिकडे फिरत असतो. सेटवरील प्रत्येकावर माझं लक्ष असतं. कुणी व्यक्ती मास्क न लावता फिरत असेल तर त्याला सूचित करण्याचं काम माझं आहे. सध्या तर मला पाहून सेटवरचे सगळे जण सावध होतात.

– सौरभ नवले, सुरक्षारक्षक ()

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मोदींनी पाकिस्तानला 'या' शब्दात चांगलेच फटकारले, म्हणाले…

5

नवी दिल्ली: यांनी () या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कारगिल विजय दिवसाचा संदर्भ देऊन जवानांच्या बलिदानाच्या स्मृती जागवल्या. या वेळी पंतप्रधानांनी पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले. याबरोबरच मोदींनी कोरोना विषाणू, स्वयंपूर्ण भारत, आसाम आणि बिहारचा पूर अशा मुद्द्यांचा देखील उल्लेख केला. लवकरच भारताचा स्वतंत्र्य दिन येत असून या दिनानिमित्त देशवासीयांनी कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानवर साधला निशाणा

कारगिल दिनी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधला. दुष्टांचा स्वभाव हा सर्वांशी शत्रूत्व राखणे असचा असतो. असे लोक आपले हीत करणाऱ्यांचे देखील नुकसान करत असतात. पाकिस्तानने भारताच्या पाठीत सूरा खुपसला होता. पाकिस्तानने भारताची जमीन ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचेही मोदी म्हणाले.

कोरोनापासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प करा: मोदी

१५ ऑगस्ट रोजी, म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यदिनी देशवासीयांनी कोरोनापासून स्वतंत्र होण्याचा संकल्प केला पाहिजे, असे आवाहन देशातील जनतेला केले. करोनाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, आज आपल्या देशात करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. देशातील कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही बरेच कमी आहे. मात्र, करोनाचा धोका आजही कायम असून आपल्याला कोरोनाविरुद्ध गंभीरपणे लढावे लागेल, असेही मोदी म्हणाले. ज्या गोष्टी प्रतिकारशक्ती वाढवतात त्याचा अवलंब करा, आयुर्वेदिक काढे वगैरे घेत राहा. कोरोनाच्या या काळात आम्हाला इतर आजारांपासून मुक्त राहिले पाहिजे. या काळात रुग्णालयात जाण्याची गरज पडू नये, याची काळजी घ्यावी लागेल, असेही मोदी म्हणाले.

वाचा-

देश आसाम-बिहारच्या सोबत आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये संवाद साधताना पुराचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की कोरोनाच्या या संकटाच्या काळात आसाम आणि बिहारसाठी पूर हे नवीन आव्हान आहे. संपूर्ण देश या संकटात पीडित लोकांच्या पाठीशी उभा आहे, असेही मोदी म्हणाले.

वाचा:

सुरिनाम देशाता केला उल्लेख
या वेळी मोदींनी आफ्रिका खंडातील सूरीनाम देशाचा उल्लेख केला. शेकडो वर्षांपूर्वी भारतीय लोक तेथे गेले होते. आता एका चतुर्थांशपेक्षा जास्त भारतीय मूळ असलेले लोक त्या देशाचे नागरिक आहेत. भारतीय वंशाचे चंद्रिकाप्रसाद त्या देशाचे राष्ट्रपती आहेत. तेथील भाषा, ‘सरनामी’ ही एक सामान्य भाषा असून ती ‘भोजपुरी’ ची बोली आहे, असे मोदी म्हणाले. आपल्या राष्ट्रपतिपदाची शपथ घेताना चंद्रिकाप्रसाद यांनी वेदांमधील मंत्रांचे उच्चारण केले होते, असेही मोदी म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

… अशी ही देशभक्ती, हिमा दासने जिंकलेलं सुवर्णपदक 'करोना वॉरियर्स'ना केलं समर्पित

5

करोनाच्या काळतही भारताला सुवर्णपदक मिळालं होतं. त्यानंतर भारताची धावपटू हिमा दास हीने देशभक्तीचा नजारा पेश करत आपलं हे सुवर्णपदक ‘करोना वॉरियर्स’ना समर्पित केले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा ही २०१८ साली खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती. भारताने या स्पर्धेत ४ बाय ४०० या रीले प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. या स्पर्धेत बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. पण बेहरिनच्या संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी आढळली आहे. त्यामुळे आता बेहरिनचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या रौप्यपदकाचे रुपांतर आता सुवर्णपदकामध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भारताच्या या संघात जगप्रसिद्ध धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. त्यामुळे आता या चारही भारताच्या धावपटूंना सुवर्णपदक दिले जाणार आहे. हिमाने हे सुवर्णपदक आता ‘करोना वॉरियर्स’ना समर्पित केल्याचे पाहायला मिळत आहे. देशभक्ती कशी असावी, याचा उत्तम नमुना हिमा दासने दाखवला आहे.

याबाबत हिमाने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये हिमाने सांगितलं की, ” काही दिवसांपूर्वीच मला आशिया चषक स्पर्धेचे ४ बाय ४०० मीटर मिक्स रिले स्पर्धेचे सुवर्णपदक मिळाले होते. हे सुवर्णपदक मी ‘करोना वॉरियर्स’ना समर्पित केले आहे. कारण सध्याच्या घडीला पोलिस, डॉक्टर्स आणि अन्य ‘करोना वॉरियर्स’ हे मोलाचे काम करत आहेत. करोनाच्या काळात लोकांना सुरक्षित कसे ठेवता येईल, हे ‘करोना वॉरियर्स’ पाहत आहेत. त्यामुळे हे सुवर्णपदक मी ‘करोना वॉरियर्स’ना समर्पित करत आहे.”

याबाबत भारताच्या अॅथलेटीक्स संघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले की, ” आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यामध्ये आता आठ सुवर्णपदकांचा समावेश झाला आहे. भारताच्या अॅथलेटीक्स पदकांची संख्या आता एकूण २०वर गेली आहे. या सुवर्णपदकाचा नक्कीच भारताच्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयारी करताना फायदा होणार आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

भारतीय उपखंडात अल कायदा हल्ला करण्याच्या तयारीत: UN

5

वृत्तसंस्था, संयुक्त राष्ट्र: अफगाणिस्तानमध्ये जवळपास सहा हजार दहशतवादी सक्रीय असल्याचा दावा संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात करण्यात आला आहे. यातील बहुतांशी दहशतवादी पाकिस्तानमधील ‘तहरीक-ए-तालिबान’ या संघटनेशी संबंधित आहेत. त्याशिवाय भारतीय उपखंडात दहशतवादी हल्ला करणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आयसिस, अल-कायदा आणि त्यांच्या संबंधित व्यक्ती, संघटना यांच्याशी निगडीत एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार, अल कायदा (एसक्यूआयएस) तालिबानअंतर्गत अफगाणिस्तानमधील निमरूज, हेलमंद आणि कंदाहर प्रांतात सक्रिय आहे. त्याशिवाय बांगलादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये अल कायदाचे १५० ते २०० सदस्य आहेत. सध्या या एसक्यूआयएसचा म्होरक्या ओसामा महमूद असून त्याने आसिम उमर याची जागा घेतली आहे. आमिर उमरला ठार करण्यात आल्यानंतर अल कायदा त्याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत आहे.

वाचा:

अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘तहरीक-ए-पाकिस्तान’चे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर असून त्यांनी पाकिस्तानमध्ये मोठे हल्ले करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याशिवाय, जमात-उल-अहरार आणि लष्कर-ए-इस्लामद्वारा करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात तहरीकने मदत केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची अधिक शक्यता आहे. अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशतवादी गट सक्रिय असून हे गट तालिबानशी संबंधित आहेत. अफगाणिस्तानमध्ये अल कायदा १२ प्रातांत गुप्तपणे सक्रिय असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

अहवालानुसार, अफगाणिस्तानमधील दहशतवादी गट मोठे हल्ले करण्यास सक्षम आहेत. यातील बहुतांशी गटांनी अमेरिकेसोबत झालेल्या शातंता कराराला विरोध दर्शवला आहे. एप्रिल महिन्यात मालदीवमध्ये शासकीय कार्यालयांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जवाबदारी यातील काही गटांनी घेतली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'मैं पुलीस हूँ' म्हणाला, महिलेचे दागिने घेऊन पळाला!

4

म. टा. प्रतिनिधी, नगर: ‘मैं पुलिस हूँ, तुम्हारे गलीं में मर्डर हुआ हैं,’ असं म्हणून एका महिलेचे लक्ष विचलित करून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व एक तोळ्याची सोन्याचे गंठण पळवून नेल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून काल रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभेदार गल्ली परिसरात राहणारी एक महिला रस्त्यावरून पायी जात असताना एका नंबरप्लेट नसलेल्या मोटरसायकलवर दोन अज्ञात व्यक्ती आल्या. या दोघांपैकी एक जण हिंदीमध्ये ‘मैं पुलिस हूँ, तुम्हारे गलीं में मर्डर हुआ हैं’ असं संबंधित महिलेला म्हणाला. त्यानंतर या दोघांनी संबंधित महिलेला गळ्यातील सोने काढून तिच्याकडे असणाऱ्या पिशवीत टाकण्यास सांगितले.

संबंधित महिलेने स्वतःच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन व एक तोळ्याची सोन्याचे गंठण काढून ते स्वतःच्या पिशवीत टाकण्यासाठी मोटरसायकलवर असलेल्या व्यक्तीकडे दिले. त्यावेळी संबंधित महिलेच्या पिशवीत सोन्याचे दागिने टाकण्याचे भासवत हातचलाखी करत हे सोन्याचे दागिने मोटरसायकलवरील दोघे जण घेऊन पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात ठकबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार हे पुढील तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

बॉलिवूडमध्ये माझ्या विरोधात गँग- ए.आर. रहमान

0

मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या अनेक मुद्द्यावर वाद सुरू आहेत. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत. रहमानच्या मते, बॉलिवूडमध्ये असा एक टगट आहे जो त्याच्याविरोधात काम करत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये त्याला काम मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. रहमान यांचं हे वक्तव्य अशावेळी आलं जेव्हा बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रहमानने हा खुलासा केला.

बॉलिवूडमध्ये कमीत कमी काम करण्यावरून त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काही लोक त्यांच्याबद्दल सिनेसृष्टीत अफवा पसरवत आहेत. त्यामुळे सिनेनिर्माते आणि त्यांच्यात गैरसमज निर्माण होत आहेत. ‘मी चांगल्या सिनेमांना नकार देत नाहीत. पण काही गँग आहेत जे माझ्याविरुद्ध अफवा पसरवत आहेत आणि यामुळे फक्त गैरसमज निर्माण होत आहेत. जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना दोन दिवसांमध्ये चार गाणी दिली. त्यावेळी छाब्रा म्हणाले की, अनेकांनी मला तुमच्याकडे न येण्याबद्दल सांगितलं. यासंबंधीचे अनेक किस्सेही सांगितले.’

रहमान पुढे म्हणाले की, ‘मी ऐकलं आणि ठीक आहे एवढंच म्हणालो. आता मला कळलं की सिनेसृष्टीत मला काम का मिळत नव्हतं आणि माझ्याजवळ चांगले सिनेमे का येत नव्हते. फार कमी लोकांना मला काम करताना पाहायचं आहे तर काही असेही आहेत जे माझ्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत.’

ए.आर रहमान शेवटी म्हणाले की, ‘माझ्या नशिबावर फार विश्वास आहे. मला वाटतं जे काही असतं ते देवाची देण असते. याचमुळे मी माझ्या सिनेमांवर आणि इतर गोष्टींवर काम करत आहे. तुम्ही सर्वजण माझ्याकडे येऊ शकता. तुम्ही चांगल्या सिनेमांची निर्मिती करत आहात आणि तुमचं मी स्वागतच करेन.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

बांगलादेशला आपल्याकडे वळवण्यासाठी अमेरिका देणार मोठी भेट!

5

वॉशिंग्टन: आशिया खंडात आणि विशेषत: दक्षिण आशियामध्ये चीनच्या वाढत्या वर्चस्वामुळे अमेरिकेची चिता वाढली आहे. चीनकडून बांगलादेशला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अमेरिकेनेही हालचाली सुरू केल्या आहेत. बांगलादेशला आपल्या गटात ओढण्यासाठी अमेरिका मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येचा आरोपी रशिद चौधरीला अमेरिका बांगलादेशला सुपूर्द करू शकतो. बांगलादेशमध्ये १९७५ मध्ये सत्तापालट करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधान शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील आरोपी रशिद चौधरीने २००६ मध्ये अमेरिकेत शरणागती पत्करली होती. मात्र, अमेरिकेचे अटर्नी जनरल विलियम बार यांनी चौधरी यांच्या प्रकरणाशी निगडीत काही कागदपत्रे जून महिन्यात मागवली होती. त्यामुळेच अमेरिका आरोपी रशिद चौधरीला पुन्हा बांगलादेशकडे सोपवू शकतात अशी चर्चा आहे.

वाचा:

आरोपी रशीद चौधरीला बांगलादेशकडे सोपवण्याची मागणी शेख हसीना सरकारकडून सातत्याने करण्यात येत होती. आरोपी चौधरीवर गु्न्हा निश्चित होऊन त्याला दोषीही सिद्ध करण्यात आले आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमन यांनी दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक अमेरिकन अधिकाऱ्याकडे ही मागणी केली आहे. मागील काही वर्षात बांगलादेशमधील अनेक आरोपींविरोधातील खटला संपला असून अनेकांना दोषी सिद्ध करण्यात आले आहे. त्यातील रशिद चौधरी एक हायप्रोफाइल आरोपी आहे.

वाचा:

वाचा:

बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबूर रहमान हे विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आहे. शेख मुजीबूर यांची हत्या झाली तेव्हा शेख हसीना आणि त्यांची बहीण परदेशात शिक्षणासाठी असल्यामुळे बचावल्या होत्या. तर, इतर कुटुंबीयांना ठार करण्यात आले होते.

चीनने बांगलादेशला आपल्याकडे वळवण्यासाठी अनेक सवलती, पॅकेज जाहीर केले होते. त्याशिवाय बांगलादेशमध्ये चीनने गुंतवणूकही केली आहे. भारतासोबत तणाव निर्माण झाल्यानंतर चीनने बांगलादेशमधील बहुतांशी माल करमुक्त केला होता.

वाचा:

दरम्यान, २०१९ मध्ये शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा धुरा सांभाळल्यानंतर भारताशी संबंधित अनेक प्रकल्प धीम्यागतीने सरकत आहेत. त्याऐवजी चीनच्या पायाभूत प्रकल्पांना अतिशय महत्त्व दिले जात आहे. तर, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेख हसीनांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर चीन-पाकिस्तानकडे बांगलादेश झुकत असून ट्रम्प प्रशासन चिंतेत दिसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts