Tuesday, December 6, 2022
Home Blog Page 4809

गर्लफ्रेंडला भेटल्यामुळे जोफ्रा आर्चरला भरावा लागणार दंड, वाचा पूर्ण गोष्ट…

0

इंग्लंडच्या संघाबरोबर असताना गर्लफ्रेंडला भेटायला गेल्यामुळे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला आता दंड भरावा लागणार आहे. कारण इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कडक कारवाई केली आहे.

पहिला कसोटी सामना संपल्यावर आर्चर हा गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मँचेस्टर येथून दोन तासावर असलेल्या ब्रिगटेन येथे तिच्या घरी गेला होता. त्यानंतर इंग्लंडने त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यामधून संघाबाहेर केले आहे. आता त्याला दोन करोना चाचण्या कराव्या लागतील आणि त्यामध्ये निगेटीव्ह सापडल्यावरच त्याला सामना खेळता येणार आहे.

गर्लफ्रेंडला भेटल्यामुळे आर्चरवर आता दंड भरावा लागणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आर्चरला सक्त ताकिदही दिली आहे. त्यामुळे गर्लफ्रेंडला भेटण्याची गोष्ट आर्चरला चांगलीच भोगावी लागल्याचे पाहायला मिळाले आहे.

नेमके काय आहे प्रकरण…
चार महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये क्रिकेटला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने काही गोष्टी केल्या आहेत. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने जैव सुरक्षित वातावरण बनवले आहे. जैव सुरक्षित वातावरणासाठी इंग्लंडने एक मशिन क्रिकेट मैदानात लावली आहे. त्यामुळे व्हायरसचे संक्रमण होत नाही. पण या वातावरणासाठी काही नियमही बनवण्यात आले आहेत.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हा संघाबरोबर होता. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. पण दुसऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर काढण्यात आले. कारण आर्चर हा गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मँचेस्टर येथून दोन तासावर असलेल्या ब्रिगटेन येथे तिच्या घरी गेला होता. ही गोष्ट इंग्लंडच्या संघाला समजली. इंग्लंडच्या खेळाडूंसाठी हॉटेलचा रुम ते मैदानातील प्रवास हा सर्व सॅनिटराईज केला आहे. त्यामुळे काही गोष्टींची काळजी खेळाडूंनीही घ्यायची आहे.

आर्चरने हे नियम मोडले आणि तो गर्लफ्रेंला तिच्या घरी जाऊन भेटून आला. त्यामुळेच आता त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आहे. आर्चरला आता आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्या आता दोन करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचण्यांमध्ये जर आर्चर निगेटीव्ह सापडला तरच त्याला इंग्लंडच्या संघाकडून खेळता येणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

लग्नाला यायचंय, 'करोना' कृपेनं आधी क्वारंटाइन व्हायचं हं!

0

नगर: व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक नियमावली करण्यात येऊ लागली आहे. नगर जिल्ह्यामध्ये तालुक्यात तर बाहेरगावातून लग्नाला येणाऱ्या मंडळींनी थेट संस्थात्मक कक्षातच थांबावे लागणार आहे. तसे आदेशच देण्यात आले आहेत. ( in Ahmednagar )

वाचा:

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. याकाळात लग्नासाठी नियमावली निश्चित केली असली, तरी तिचे पालन होत नसल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या मंडळीमुळे तसेच एखाद्या लग्नाला गेल्यामुळे देखील करोना झाल्याचे समोर येऊ लागले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात तर लग्नासाठी कडक नियमावलीच करण्यात आली आहे. तहसीलदार एफ.आर.शेख यांनी तसे आदेशही काढले आहेत.

वाचा:

राज्य सरकारने लग्नाला उपस्थित राहण्यास ५० व्यक्तींसाठी परवानगी दिलेली आहे. परंतु अनेक लग्नसोहळ्यात ५० व्यक्तीच्या उपस्थितीचे बंधन पाळले जात नसल्याचे अनेक प्रकरणात निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे करोना या व्हायरसचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता, त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी येथून पुढे लग्न सोहळ्यासाठी आवश्यक ती परवानगी स्थानिक करोना ग्राम दक्षता समितीकडून घ्यावी लागणार आहे. ज्याच्या घरी लग्न आहे, त्यांनी लग्न सोहळ्याचा संपूर्ण तपशीलासह अर्ज ग्राम सुरक्षा समितीकडे द्यावा. त्यामध्ये ५० पेक्षा जास्त व्यक्ती लग्नाला उपस्थित राहणार नाहीत, या बाबतचे लेखी हमीपत्र द्यावे. हमीपत्रासोबतच लग्नाला उपस्थित राहणाऱ्या ५० व्यक्तींची यादी देण्यात यावी. अर्जामध्ये लग्नाची तारीख, वेळ, ठिकाण स्पष्टपणे द्यावे. लग्नासाठी बाहेरगावाकडून येणाऱ्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइन कक्षात थांबावे लागेल. लग्नाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण तपशीलासह नोंद, नोंदवहीला घेण्यात यावी. प्रत्येक व्यक्तीचे तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात यावे. लग्नाचे व्हिडिओ चित्रिकरण करून त्याची एक कॉपी ग्रामदक्षता समितीला द्यावी. हे व्हिडिओ चित्रिकरण पाहून त्यामध्ये जर लग्नाला ५० पेक्षा जास्त व्यक्ती असल्यास तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा:

नगरपालिका हद्दीत लग्न असल्यास लग्नाचे व्हिडिओ चित्रिकरण करून त्याची एक कॉपी नगरपालिकेला द्यावी लागणार आहे. लग्नाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने साबण व पाण्याने हात धुवावे, प्रत्येकाने नाक व तोंडावर पुर्णवेळ मास्क लावावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

गेहलोत सरकारला दिलासा, बीटीपीचा पाठिंबा!

0

जयपूर, राजस्थान : राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय चढाओढी दरम्यान अर्थात ( / ) नं अडचणीत आलेल्या सरकारला आपला पाठिंबा व्यक्त केलाय. बीटीपीनं शनिवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समर्थनाचं पत्र सोपवलं. राजस्थानच्या जनतेनंच निवडलेलं सरकार असावं, अशी आपली इच्छा असल्याचं बीटीपीनं म्हटलंय.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही याला दुजोरा दिलाय. ‘भारतीय ट्रायबल पक्षाच्या दोन्ही आमदारांनी प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपलं मागणीपत्रावर चर्चा करून सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केलीय’ असं ट्विट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलंय.

वाचा :

वाचा :

वाचा :

याअगोदर भारतीय ट्रायबल पक्षानं काँग्रेसच्या सचिन पायलट विरुद्ध अशोक गेहलोत या दोन्ही गटांतील लढाईत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र, शनिवारी काँग्रेससोबत झालेल्या बैठकीनंतर बीटीपीच्या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केलाय.

‘आम्ही सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. त्या मान्य करण्यासाठी आता सरकारनं होकार दर्शवलाय. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसच्या समर्थनासाठी तयार आहोत. बहुमत चाचणी झालीच तर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ’ असं या बैठकीनंतर बीटीपीनं म्हटलंय.

जनतेनं निवडलेलं सरकार पाडण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचंही यावेळी बीटीपीनं म्हटलंय. बीटीपीचे दोन आमदार रामप्रसाद आणि राजकुमार रौत यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी बीटीपीकडून पक्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या व्हिपमध्ये कोणत्याही पक्षाचं किंवा गटाचं समर्थन न करण्याचा आदेश आमदाराना देण्यात आला होता.

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'लॉकडाऊन'पेक्षाही कठोर पाऊल; कोल्हापुरात पुढचे १५ दिवस प्रवेशबंदी

0

कोल्हापूर: गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. शनिवारी दीडशेवर रुग्ण आढळल्याने जिल्ह्याने आतापर्यंत दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून जिल्ह्यात कडक जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पंधरा दिवस कोल्हापुरात इतर जिल्ह्यातील व्यक्तींना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी दिले जाणारे ई-पास तातडीने बंद करण्यात आले आहेत. ( )

वाचा:

पहिल्या टप्यात कोल्हापूर जिल्ह्यात करोना संसर्गाचे प्रमाण अतिशय कमी होते. पण मुंबई, पुणे आणि इतर रेडझोन भागातून लोक परतू लागल्याने संसर्ग वाढत गेला. गेल्या चार पाच दिवसांत तर करोना च्या आकडेवारीने कहरच केला. पूर्वी रोज पंधरा वीस करोना बाधित आढळत होते. पण चार दिवसात रोज दोनशे ते तीनशे रुग्ण आढळू लागले. त्यामुळे आठ दिवसांतच बाधितांच्या संख्यने दोन हजाराचा टप्पा पार केला. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्याची मागणी होऊ लागली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्याची घोषणा केली. २० ते २६ जुलै या दरम्यान सात दिवस दूध व औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार सोमवार पासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

वाचा:

कोल्हापुरात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे करोना संसर्ग वाढत आहे. त्याचा पुरावा शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड अशा तालुक्यात मिळाला. या भागात मुंबईहून मोठ्या प्रमाणात नागरिक आले आहेत. यामुळे येत्या दोन आठवड्यात जिल्ह्यात कुणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी ई-पास दिले जातात. ते तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. आजपासूनच त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती कोल्हापूर क्षेत्रातील (आधारकार्ड पत्यानुसार) असेल तरच परवानगी देण्यात येईल. तसेच मालवाहतूक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा देत असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सुट देण्यात येणार आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. यामुळे १५ दिवस परजिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला कोल्हापुरात येता येणार नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोना विरुद्ध लढाईत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार

0

बारामती: तालुक्यात विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच , रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा, तसेच या कामाच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज दिले. ( On Coronavirus )

वाचा:

जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात करोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. बारामती शहरासह ग्रामीण भागातही करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. करोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच संस्थात्मक क्वारंटाइन ठिकाणी आवश्यक त्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. बारामती शहरातील खासगी रुग्णालय करोना रुग्णांच्या उपचारासाठी तातडीने ताब्यात घेण्याबाबतही अजित पवार यांनी सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वाचा:

करोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांसोबतच करोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पिटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरचे नियोजन या सर्व महत्त्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसूत्रता येईल. कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहिजेत, असे निर्देशही अजित पवार यांनी दिले.

वाचा:

यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभागाचे धोडपकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे,सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, जि.प. चे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पोलीस अधिकाऱ्याची हत्या; आरोपीला भाजप नेत्याकडून 'सर्टीफिकेट'

0

बुलंदशहर, उत्तर प्रदेश : डिसेंबर २०१८ मध्ये उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये जमावानं केलेल्या हल्ल्यात () एका पोलीस निरीक्षकाची हत्या करण्यात आली होती. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. याचं कारण म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी याचा एका भाजप नेत्यासोबत व्हायरल झालेला फोटो…

बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयानं जमावानं हिंसाचार घडवून आणला होता. या हिंसेत पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह () यांची हत्या घडवून आणण्यात आली होती. सुबोध कुमार यांच्या हत्येचा रट रचण्याचा आरोप शिखर अग्रवाल याच्यावर करण्यात आला होता. हाच शिखर अग्रवाल सध्या भाजपचे बुलंदशहरचे जिल्हाध्यक्ष () यांच्यासोबत दिसतोय.

शिखर अग्रवाल आणि अनिल सिसोदिया यांचा हा फोटो १४ जुलैचा आहे. संघटनेनं आयोजित केलेल्या ‘पंतप्रधान जन कल्याणकारी योगी जागरुकता मोहिमे’च्या एका कार्यक्रमाचे अनिल सिसदिया मुख्य पाहुणे होते. याच कार्यक्रमातला हा फोटो आहे.

या फोटोत भाजप जिल्हाध्यक्ष शिखर अग्रवाल याला एक प्रमाणपत्र देताना दिसत आहेत. या प्रमाणपत्रात शिखरचा उल्लेख संघटनेचा महासचिव म्हणून करण्यात आलाय. शिखर हा भाजपच्या तरुण संघटनेचा स्थानिक अध्यक्षही होता. सध्या तो जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.

वाचा :

वाचा :

भाजप नेत्याचं स्पष्टीकरण

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांची गोची झाली. सिसोदिया यांनीही लगेच सारवासारव करत ‘संघटनेचा भाजपशी काहीही देणं-घेणं नाही. मला केवळ मुख्य पाहुणा म्हणून पाचारण करण्यात आलं होतं. याहून अधिक काहीही नाही’ असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

काय घडले होतं डिसेंबर २०१८ मध्ये?

३ डिसेंबर २०१८ मध्ये बुलंदशहरच्या स्याना भागात कथित स्वरुपात गाईचे काही अवशेष सापडले होते त्यानंतर परिसरात हिंसा उफाळली होती. पोलिसांना याची सूचना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु, जमावानं उलट त्यांच्यावरच हल्ला केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची हत्या करण्यात आली. तसंच गोळी लागल्यानं सुमित नावाच्या आणखीन एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.

वाचा :

वाचा :

पोलीस निरीक्षकांच्या हातातून रिव्हॉल्वर हिसकावल्यानंतर त्याच हत्यारानं गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. इतकंच नाही तर कुऱ्हाडीनं त्यांच्या डोक्यावर अतिशय निर्दयीपणे वार करण्यात आले होते. त्यांच्या हातांची बोटंही छाटण्यात आली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी सुबोध कुमार यांचा मृतदेह सरकारी गाडीत टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्नही केला होता.

ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली होती. त्यांनी आपला गुन्हाही कबूल केला. या घटनेतील ३३ पैंकी ७ आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली होती. यातील एक शिखर अग्रवाल हादेखील आहे. तुरुंगाबाहेर आल्यानंतर शिखर अग्रवाल याला फुलांची माळ घालून त्याचं स्वागत करण्यात आलं तसंच ‘श्री राम’ची घोषणाबाजी करण्यात आली होती. यावरही मोठा वाद झाला होता.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सुशांतसिंह आत्महत्या: बॉलिवूडच्या 'या' निर्मात्यावर प्रश्नांचा भडिमार; चार तास कसून चौकशी

0

मुंबई: अभिनेता आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांची झाडाझडती सुरू केली आहे. आज बॉलिवूडचे प्रख्यात निर्माते आणि यशराज फिल्म्सचे सर्वेससर्वा यांची आज पोलिसांनी चार तास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून असंख्य प्रश्नांचा भडिमार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

वांद्रे पोलिसांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन आदित्य चोप्रा यांची कसून चौकशी केली. चोप्रा यांचा बंगला वर्सोवा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असल्याने वर्सोवा येथेच ही चौकशी करण्यात आली. यशराज फिल्म्सने सुशांतबरोबर केलेले कॉन्ट्रॅक्ट आणि सुशांतला देण्यात आलेल्या चित्रपटांच्या ऑफर्सबाबत पोलिसांकडून चोप्रा यांना प्रश्न विचारण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, या चौकशीनंतर चोप्रा यांनी मीडियाला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. दिग्दर्शक शेखर कपूर हे सुशांतला घेऊन पानी हा सिनेमा बनवणार होते. या सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रा यांच्या यशराज फिल्म्समार्फत होणार होती. मात्र, हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. या सिनेमासाठी सुशांतने ११ महिने कठोर मेहनत घेतली होती. मात्र, अचानक हा सिनेमा बंद झाल्याने त्याला नैराश्य आलं होतं, असं शेखर कपूर यांनी पोलिसांना सांगितलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर चोप्रा यांची चौकशी करण्यात आली.

सुशांतने सोबतचा करार मोडला होता आणि मलाही करार मोडायला सांगितलं होतं, असं रिया चक्रवर्तीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आज आदित्य चोप्रा यांच्याकडून या संदर्भात काय माहिती घेतली याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

पोलिसांनी काल सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्यावर उपचार करणाऱ्या दोन मनोविकार तज्ज्ञांचीही चौकशी केली होती. सुशांत नेमकी कोणती औषधे घेत होता, त्याचा इलाज कसा सुरू होता, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांची कबुली जबाब नोंदवून घेतले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ३७ लोकांची कसून चौकशी केली आहे. पोलीस अजूनही काही लोकांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुशांतसिंहने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बराचवेळ दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या नोकराने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर मनोविकार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते, असं सूत्रांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Sindhudurg Boat Capsize सिंधुदुर्गात विचित्र दुर्घटनेत दोन नौकांना जलसमाधी; ८ जण बचावले, १ बेपत्ता

0

सिंधुदुर्ग: मधील सर्जेकोटच्या समुद्रात एका विचित्र दुर्घटनेत दोन नौकांना जलसमाधी मिळाली आहे. या दुर्घटनेत ७ मच्छिमार सुदैवाने बचावले असून १ मच्छिमार बेपत्ता आहे. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. समुद्र खवळलेला असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. ( )

खाडीपात्रात समुद्राच्या मुखाजवळच आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास एक बुडाली होती. या नौकेत चार मच्छिमार होते. या चौघांना वाचवण्यासाठी दुसरी नौका गेली होती. मात्र समुद्र खवळलेला असल्याने लाटांच्या तडाख्यात दुसरी नौकाही बुडाली. या नौकेतही चार जण होते. दरम्यान, सर्वजण पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे लाटांच्या तांडवातही ७ जणांनी पोहत किनारा गाठला मात्र एक मच्छिमार अद्याप बेपत्ता आहे. दिवाकर जानू देऊलकर (२५) असे या मच्छिमाराचे नाव आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

आयफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, जाणून घ्या डिटेल्स

0

नवी दिल्लीः अॅमेझॉन इंडियाने ” सेल आयोजित करण्याची माहिती दिली. अॅमेझॉन इंडियावर आज रात्रीपासून सेल सुरू होणार असून २५ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये लेटेस्ट आयफोन ११ सीरीज, अॅपल वॉच, मॅकबुक वर जबरदस्त ऑफर्स दिले जाणार आहेत.

वाचाः

या अॅपलच्या सेलमध्ये वर ५ हजार ४०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट सोबत आतापर्यंत सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सूट नंतर या फोनला ६२ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येवू शकते. अॅपलची वेबसाईट वर फोनची किंमत ६८ हजार ३०० रुपये आहे.

वाचाः

याशिवाय iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max वर ४ हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिला जाणार आहे. जर एचडीएफसी बॅक डेबिड कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ला ४१ हजार ५०० रुपयांत खरेदी करता येवू शकते.

वाचाः

अॅपल डेज दरम्यान ग्राहकांना अॅपलची लेटेस्ट अॅक्सेसरीज यासारखे जसे आयपॅड, अॅपल वॉच आयपॅड अॅक्सेसरीज आणि दुसऱ्या मॅक अॅक्सेसरीज सारखे की बोर्ड, केबल्स, पॉवर अडेप्टर आदीवर सूट मिळू शकते.

वाचाः

अॅपल वॉच सीरिज ३ या सेलमध्ये २३ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येवू शकते. एचडीएफसी कार्ड सोबत खरेदी केल्यानंतर १ हजार रुपयांची फ्लॅट सूट दिली जावू शकते. तर आयपॅडवर ५ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जावू शकते. HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्ड वरून अॅपल मॅकबुक प्रो खरेदी केल्यास ७ हजार रुपयांपर्यंत तात्काळ डिस्काउंट मिळण्याची संधी आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

पत्नीला करोना, मंत्री झाले क्वॉरंटाइन; मराठवाड्यातील आमदारही पॉझिटिव्ह

0

नगर: राज्याचे जलसंधारण मंत्री यांच्या पत्नीला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गडाख स्वत: क्वॉरंटाइन झाले असून कुणीही भेटायला येऊ नये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तर राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील विधान परिषदेचे सदस्य यांनाही करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शंकरराव गडाख यांच्या पत्नी आणि नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांची काल करोना चाचणी करण्यात आली होती. आज त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्वत: गडाख यांनी ट्विटर आणि फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. तसेच आपण होम क्वॉरंटाइन होणार असून काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय तुम्हीही तुमच्या घरीच राहा. कुटुंबीयांची काळजी घ्या, असं आवाहन गडाख यांनी केलं आहे.

तर राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. दुर्रानी यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts