Tuesday, December 6, 2022
Home Blog Page 4844

रियलमीच्या स्वस्त फोनचा आज सेल, किंमत ८,९९९

0

नवी दिल्लीः स्वस्त गेमिंग स्मार्टफोन खरेदी करायचा विचार असेल तर तो फोन आज खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. रियलमीचा स्वस्त स्मार्टफोन चा आज दुपारी १२ वाजता सेल आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आणि रियलमी इंडियाची वेबसाइटवर हा सेल सुरू होणार आहे. कंपनीने सांगितले की, या फोनचा लिमिटेड स्टॉक उपलब्ध होणा आहे. रियलमी नार्जो सीरिज कंपनीने मे महिन्यात लाँच केली होती. सीरीजचा आणखी एक रियलमी Narzo 10 सुद्धा आहे.

वाचाः

फोनची किंमत आणि ऑफर्स
या स्मार्टफोनच्या 3GB + 32GB मॉडलची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तर 4GB + 64GB मॉडलच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन ब्लू आणि व्हाइट या रंगात उपलब्ध आहे. या फोनवरील ऑफर अंतर्गत Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक दिला जात आहे. तसेच ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय सुद्धा दिला आहे.

वाचाः

रियलमी चे वैशिष्ट्ये
अँड्रॉयड १० वर चालणाऱ्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनचा रिझॉल्य़ूशन 720×1,600 पिक्सल आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. तसेच ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो जी ७० प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे.

रियर कॅमेऱ्यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. यात रिव्हर्स चार्जिंग फीचर सुद्धा दिले आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस/A-जीपीएस आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यासारखे फीचर देण्यात आले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

करोनानंतरच्या पहिल्याच सामन्यात जेसन होल्डरचा धुमाकूळ

0

करोनानंतर चार महिन्यांनंतर पहिल्यांचा खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी होल्डरने नेत्रदीपक कामगिरी करत इंग्लंडला पिछाडीवर ढकलल्याचे पाहायला मिळाले. चार महिन्यानंतर पहिल्यांदा सुरु झालेल्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस हा होल्डरनेच गाजवल्याचे पाहायला मिळाले.

होल्डरने आज अचूक आणि भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले होते. होल्डरने तिखट मारा करत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी घाडण्याची किमया साकारली. होल्डरच्या या दमदार कामिगरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांमध्येच आटोपला. होल्डरने भन्नाट गोलंदाजी करत २० षटकांत फक्त ४२ धावात देत इंग्लंडच्या सहा खेळाडूंना माघारी धाडले. होल्डरने यावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन्स स्टोक्सबरोबरच, ऑली पोप, झॅक क्राऊली, जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांना पेव्हेलियनचा रस्ता दाखवला.

इंग्लंडने आज १ बाद ३५ या धावसंख्येवरून आपला पहिला डाव सुरु केला. इंग्लंडला यावेळी पहिले दोन धक्के दिले ते वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रियलने. पण त्यानंतर मात्र होल्डरने भेदक मारा करत इंग्लंडला मोठी धावसंख्या रचण्यापासून रोखले. होल्डरच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. इंग्लंडकडून सर्वाधिक ४३ धावा या स्टोक्सने केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

EXCLUSIVE… आयपीएल आधी की विश्वचषक, सांगत आहेत संजय मांजरेकर

0

सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात सर्वात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे आयपीएल. या वर्षी आयपीएल होणार की नाही? विश्वचषक रद्द होणार का? असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडलेले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं एका खास मुलाखतीमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू, समालोचक, स्तंभलेखक यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर आज फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून मांजरेकर यांची खास मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये करोनानंतरचे क्रिकेट कसे असेल, त्याचबरोबर सुरुवातीला आयपीएल व्हावी कि विश्वचषक, याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

सध्याच्या घडीला आयपीएल कधी होणार, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. आशिया चषक रद्द होणार, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काल सांगितले होते. त्याचबरोबर विश्वचषकही रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण आयपीएल की विश्वचषक, कोणत्या गोष्टीने क्रिकेटची धडाकेबाज सुरुवात व्हायला हवी, याबाबत मांजरेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मांजरेकर म्हणाले की, ” जेव्हा क्रिकेट पूर्वपदावर येईल. तेव्हा प्रेक्षक मैदानात जाऊन सामना पाहू शकतील की नाही, हे सांगू शकत नाही. पण जेव्हा टीव्हीवर क्रिकेट सुरु होईल तेव्हा माझ्यामते आयपीएल पहिलं होईल. ”

पहिलं आयपीएल का व्हायला हवं…पहिली मोठी स्पर्धा आयपीएल होईल. त्यानंतर टी-२० विश्वचषक होईल. मला वाटतं की आयपीएल पहिलं होईल. मला वाटतं की, सध्याच्या घडीला बराच काळ सरलेला आहे आणि क्रिकेटला पुन्हा आपल्याला सुरु करायचं आहे. तर मला असं वाटतं की, पहिलं आयपीएल व्हायला पाहिजे. हे वर्ष ट्वेन्टी-२० क्रिकटचं होतं. त्यामुळे भारताने सध्या जास्त लक्ष ट्वेन्टी-२० क्रिकेटकडे द्यायला हवं. क्रिकेट सुरु करताना कसोटी सामने वैगेरे सुरु करणं, हे कितपत बरोबर आहे ते माहिती नाही, असेही मांजरेकर यांनी यावेळी सांगितले.

आयपीएल मोठी इंडस्ट्री आहे….आयपीएलवर भारतीय क्रिकेटची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे आयपीएल होणं ही भारतीय क्रिकेटची गरज आहे आणि त्याला प्राथमिकता द्यायला हवी. आयपीएलमध्ये फक्त मजा नाहीए, तर त्यामध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्याही अवलंबून आहेत. आयपीएल ही एक मोठी इंडस्ट्री आहे. त्यामुळे आयपीएल पहिल्यांदा सुरु व्हायला हवी, असं मला तरी वाटतं, असेही मांजरेकर यावेळी म्हणाले.

खेळाडूंना मैदानात परतायला किती वेळ लागेल…सध्याच्या युगातले खेळाडू हे फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रीत करतात. सर्व खेळाडू आपल्यापरीने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काही ना काही तरी गोष्टी नक्कीच करत असतील. त्याचबरोबर ज्या खेळाडूंना दुखापती आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला ब्रेक आहे. कारण दुखापतींसाठी सर्वात चांगला उपाय हा विश्रांती हा असतो. त्यामुळे दुखापतग्रस्त खेळाडूंना बरं होण्यासाठी हा काळ चांगला आहे. सध्याची पिढी ही सराव सामन्यांवर जास्त भर न देता नेट्समध्ये चांगला सराव करते. या खेळाडूंना नेट्समध्ये चांगला सराव करण्याची संधी मिळाली. पण खेळाडूंना मैदानात परतायला जास्त वेळ लागणार नाही, असेही मांजरेकर यांनी सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Mumbai-Goa Highway: पोलादपूरजवळ दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

0

रत्नागिरी: घाटापासून जवळच तालुक्यातील धामणदेवी गावाच्या हद्दीत रस्त्यावर दरड कोसळल्याने ठप्प झाला आहे. महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली आहे. रात्रीची वेळ असल्याने दरड हटवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ( )

रत्नागिरी बातमी | Ratnagiri News | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

नवा 'मेड इन इंडिया' फोन आला, किंमत ₹6000 पेक्षा कमी

0

नवी दिल्लीः जर तुम्हाला बजेट फोन खरेदी करायचा असेल आणि तोही ‘ फोन. तर तुमचा शोध या ठिकाणी संपू शकतो. देसी कंपनी लावाने भारतात लाँच केला आहे. या फोनला स्वस्त किंमतीत बाजारात लाँच केले आहे. या फोनच्या रियर पॅनेलवर ८ मेगापिक्सलचा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये कॅप्सूलसारखा कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. तसेच ट्रॅडिशनल डिव्हाईसेज प्रमाणे रुंद बेजल्स दिले आहेत.

वाचाः

भारतातील किंमत आणि सेल
Lava Z61 Pro ची किंमत भारतीय मार्केटमध्ये ५ हजार ७७४ रुपये ठेवण्यात आली आहे. २ जीबी रॅम असलेला हा फोन दोन ग्रेडिएंट फिनिश मिडनाईट ब्लू आणि एंबर रेड मध्ये खरेदी करता येवू शकतो. लावाकडून सांगण्यात आले आहे की, हा फोन फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनशिवाय ऑफलाइन स्टोर्सवरून सुद्धा पुढच्या आठवड्यापासून खरेदी करता येवू शकेल.

वाचाः

Lava Z61 Pro ची वैशिष्ट्ये
लावाच्या या फोनमध्ये ड्युल सिम कार्ड देण्यात आले. स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच वर आणि खाली रुंद बेजल्स दिले आहेत. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकतो.

वाचाः

या फोनमध्ये रियर पॅनेलवर एलईडी सोबत ८ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा सेंन्सर दिला आहे. तसे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा टॉप बेजल दिला आहे. कॅमेऱ्याच्या फीचर्समध्ये बोकेह मोड, बर्स्ट मोड, पॅनोरमा आणि फिल्टर्स वैगरे यांचा समावेश आहे. फोनमध्ये 3,100mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

आता नव्या फोनसोबत चार्जर मिळणार नाही, ही कंपनी करू शकते सुरुवात

0

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंबनी सॅमसंग लवकरच आपल्या ग्राहकांना एक झटका देण्याची शक्यता आहे. एका ताज्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. कंपनी फोनसोबत मिळणारा देणे बंद करू शकते. असा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. सॅमसंगची माहिती देणारी वेबसाईट Sammobile ने ही माहिती उघड केली आहे. कंपनी पुढील वर्षी काही स्मार्टफोनच्या बॉक्समधून चार्जर देणे बंद करणार आहे. कंपनीने हा निर्णय लागू केला तर पहिल्यांदा सॅमसंगच्या फोनसोबत चार्जर मिळणार नाही.

वाचाः

काय होईल फायदा ?
सॅमसंग जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी दरवर्षी कोट्यवधी फोनची विक्री करते. त्यामुळे सॅमसंग अर्ध्या फोनमधील चार्जर देणे बंद करीत असेल तर कंपनीला मोठा फायदा होऊ शकतो. चार्जर बंद करून कंपनी फोनची किंमत कमी करू शकते, असाही अंदाज बांधला जात आहे.

वाचाः

सध्या चार्जिंग पोर्ट संपूर्ण जगात कमोबेश एकसारखा आहे. जवळपास सर्वच कंपन्या यूएसपी टाईप सी पोर्ट कडे जात आहेत. त्यामुळे सॅमसंग कंपनी याचा फायदा घेऊ शकते. सॅमसंग पहिली कंपनी नाही. ज्या कंपनी संदर्भात अशा बातम्या येत आहेत. काही रिपोर्ट्समधून अॅपल सुद्धा आपल्या iPhone 12 सीरीज सोबत चार्जर न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

वाचाः

सॅमसंग कंपनी पहिली कंपनी नाही. ज्यांच्याकडे ही अफवा होती. कारण, अॅपलचा आगामी iPhone 12 सीरीज बॉक्समध्ये चार्जर न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. हेडफोन जॅकचे सामान जर अॅपलने देणे बंद केले तर सॅमसंग सुद्धा हे पाऊल उचलू शकते. बाजारात हेडफोन जॅक आणि एयरफोन न देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. आता चार्जर सुद्धा न देण्याचा निर्णय कंपन्या घेवू शकतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'अनलॉक' फोन तुमच्या परवानगीविना चालणार नाही, जबरदस्त ट्रिक

0

नवी दिल्लीः अँड्रॉयड स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अनेक फीचर्स आणि सेटिंग्स मिळतात. अनेक फीचर्स तर असे असतात जे आपल्या फोनमध्ये असतात परंतु, त्या फीचर्स बद्दल आपल्याला माहिती नसते. ज्या व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करतात त्यांच्यासाठी हे खास फीचर्स आहे. ज्या फीचरची आपण चर्चा करीत आहोत. त्याचे नाव Pin the Screen () किंवा आहे.

वाचाः

या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे फोन अनलॉक असला तरी कोणीही तुमच्या परवानगी विना फोनचा वापर करू शकणार नाही. हे फीचर अँड्रॉयड 5.0 व्हर्जन नंतर सर्व मध्ये मिळते.

वाचाः

काय आहे या फीचरचे काम
या फीचर द्वारे तुम्ही कोणत्याही अॅपला स्क्रीनवर लॉक-पिन करू शकता. त्यानंतर दुसऱ्या अॅपमध्ये जाण्यासाठी लॉकस्क्रीन पासवर्डची गरज लागते. हे फीचर ज्यावेळी खास ठरू शकते. ज्यावेळी तुम्हाला तुमचा फोन अन्य दुसऱ्या व्यक्तीकडे द्यावा लागत असेल. अनेकदा फोन दुसऱ्यांच्या हातात दिल्यास ते अनेक अॅप्समध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अशा वेळी हे फीचर खूप कामी येते. तुमच्या परवानगी विना कुणालाही कोणत्याही अॅप्समध्ये जाता येत नाही.

वाचाः

कसा कराल याचा वापर

>> सर्वात आधी स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा.
>> आता Security & Locations या ऑप्शनमध्ये जा. या ठिकाणी Advanced चा पर्याय दिसेल.
>> या पर्यायामध्ये तुम्हाला Screen Pinning चे ऑप्शन दिसेल. यावर टॅप करा.
>> जर हे Off असेल तर याला On करा.
>> आता ज्या अॅपला पिन करायचे आहे. त्याला ओपन करा. पुन्हा Recent Apps च्या ऑप्शनवर जा.
>> आता अॅपवर लॉग इन प्रेस करा. आणि Pin च्या ऑप्शनला निवडा.
>> पुन्हा दुसऱ्या अॅपवर जाण्यासाठी Home आणि Back बटनसोबत दाबावे लागेल. आणि लॉकस्क्रीन पासवर्डचा वापर करावा लागेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

या रियलमी बजेट फोनचे युजर्स ७५ लाखांहून अधिक

0

नवी दिल्लीः चीनच्या स्मार्टफोन कंपनीची सी सीरिजच्या फोनची वेगाने प्रसिद्धी होत आहे. इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर एक घोषणा केली आहे. कंपनीच्या बजेटमधील सीरीजच्या युजर्सची संख्या ही भारतात ७५ लाखांहून अधिक झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. २०१८ मध्ये लाँच झालेल्या या सीरीजच्या फोन युजर्संची संख्या वेगाने वाढत आहे. आता कंपनी १४ जुलै रोजी सुद्धा लाँच करणार आहे.

वाचाः

माधव सेठ यांनी आपल्या ट्विटमध्ये नवीन डिव्हाईसच्या लाँचची माहिती देताना सांगितले की, कंपनी या सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन समावेश करणार आहे. नवीन मॉडलचे नाव Realme exec असल्याचे समोर आले होते. परंतु, आता या नावाऐवजी Realme C11 या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या स्मार्टफोनला मलेशियात आधीच लाँच करण्यात आलेले आहे. Realme C सीरीज मध्ये Realme C1, C2 आणि C3 या फोनचा समावेश आहे.

वाचाः

किती असेल किंमत ?
आपल्या ट्विटमध्ये रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले की, भारतात ७५ लाख हून अधिक युजर्स कंपनीच्या बजेटमधील फोनचा वापर करीत आहेत. तसेच या तिन्ही डिव्हाईसेजला फ्लिपकार्टवर चांगली रेटिंग्स मिळाली आहे. रियलमी मोबाइल्स ट्विटर पेजवर दोन टीझर पोस्ट करण्यात आले होते. ज्यात एंट्री लेवल सी सीरिज मॉडलकडे इशारा करण्यात आला होता. मलेशियात लाँच करण्यात आलेल्या सी११ या फोनची किंमत १०० डॉलर म्हणजेच ७ हजार ५०० रुपये ठेवण्यात आली आहे.

वाचाः

समोर आले फीचर्स
भारतात १४ जुलै रोजी लाँच करण्यात येणाऱ्या Realme C11 मध्ये ६.५ इंचाचा (720×1600) चे IPS LCD पॅनेल वॉटरड्रॉप नॉच डिझाईन देण्याची शक्यता आहे. डिस्प्लेत ८८.७ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो मिळणार आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम सोबत MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. तसेच हा फोन अँड्रॉयड १० सोबत येईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

वनप्लसच्या स्वस्त फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा

0

नवी दिल्लीः आपला स्वस्तातील स्मार्टफोन घेऊन येत असल्याचे अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत. आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्टमध्ये याची किंमत आणि कॅमेऱ्यापर्यंतची माहिती लीक झाली आहे. रोमानियाच्या एका रिटेलर evoMAG.ro च्या माहितीनुसार या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. याआधी लीक झालेल्या ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा असेल, असा दावा केला होता.

वाचाः

किंमत किती असणार?
कंपनीने एक प्रोमो व्हिडिओतून सांगितले होते की, या फोनची लाँचिंग २१ जुलै रोजी केली जाणार आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी मॉडलची किंमत ३९ हजार रुपये असू शकते. भारतीय बाजारात या फोनची किंमत किती असू शकते याची माहिती लाँचिंग दरम्यान स्पष्ट होईल.

वाचाः

स्मार्टफोनमध्ये काय खास असू शकते
रिटेलरने फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना सांगितले की, एका रिपोर्टच्या माहितीनुसार, या फोनमध्ये ६.५५ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. यात तुम्हाला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६५जी प्रोसेसर मिळेल. तसेच फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी दिली जावू शकते.

वाचाः

हा फोन ५जी सपोर्ट असणार आहे. कॅमेऱ्याचे दोन दावे करण्यात आले आहे. एका रिपोर्टमध्ये म्हटले की, ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे. तर आता नव्याने आलेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला जावू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Konkan Ganeshotsav: गणपतीला गावी जायचंय?; ७ ऑगस्टनंतर सिंधुदुर्गात प्रवेश नाही!

0

सिंधुदुर्ग: गणेशोत्सवासाठी , तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे. ( )

यंदा ऑगस्ट महिन्यात आहे. २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्याअनुशंगाने जिल्ह्यात चाकरमान्यांना प्रवेश देण्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वात मुख्य निर्णय म्हणजे इतर जिल्ह्यांतून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून ई-पास नसल्यास वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना गाव नियंत्रण समितीच्या सल्ल्याने १४ दिवस क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी परजिल्ह्यातून येण्याअगोदर क्वारंटाइन राहण्यासाठी घराची क्षमता, सोयी सुविधा काय आहेत, याची खात्री करूनच जिल्ह्यात यावे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. त्याचवेळी परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या घरातील स्थानिक सदस्यांवर घराबाहेर पडण्याकरता निर्बंध राहणार आहेत, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

रत्नागिरी बातमी | Ratnagiri News | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

Latest posts