अयोध्या येथील राममंदिराचा प्रश्न गेले अनेक वर्षे वादात होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यावर पडदा पडला. त्यानंतर तेथे राममंदिर बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मंदिर बांधकामास लवकरच सुरूवात होणार आहे. या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम भव्य दिव्य करण्यासाठी नियोजन सुरू होते. पण करोना संसर्गाने देशात हाहाकार माजल्याने ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या पाच ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाची उत्सुकता देशभर लागून राहिली आहे. भूमीपूजनाचा शुभारंभ धनिष्ठा नक्षत्रावर म्हणजे १२ वाजून १५ मिनीटांनी तर सांगता समारंभ शतभिषा मुहूर्तावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाच ऑगस्टचाच मुहूर्त कसा निश्चित झाला याबाबत पंडित विजयेंद्र शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना नुकतीच माहिती दिली.
वाचाः
अयोध्या येथील राम मंदिराचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी महाराज उर्फ किशोरजी व्यास आणि पंडित शर्मा यांचे अनेक वर्षापासून स्नेहाचे संबंध आहेत. स्वामी गोविंद महाराज यांनी शर्मा यांच्याशी संपर्क साधून राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी शुभ मुहूर्त काढून देण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांना चार मुहूर्त पाठवण्यात आले. त्यामध्ये २९ जुलै, ३१ जुलै, तीन ऑगस्ट व पाच ऑगस्ट या तारखांचा समावेश होता. यामध्ये पाच ऑगस्टची तारीख निश्चीत करण्यात आली. तसे त्यांना कळवण्यात आले.
वाचाः
शर्मा यांनी प्रसारमाध्यमाला सांगितले की, देशभर उत्सुकता लागलेल्या या कार्यक्रमाचा मुहूर्त काढून देण्याचा मान आपल्याला मिळाला याचा अत्यानंद आहे. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा मुहूर्त देखील आपणच काढून दिला होता. पंडित विजयेन्द्र शर्मा यांनी वेद, पुराण आणि शास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यांचा ज्योतिष्याशास्त्राचा देखील गाढा अभ्यास आहे. बनारस हिंदू विद्यापीठाचे ते सुवर्णपदक विजेते आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times