राम जन्मभूमीमध्ये मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या सोबत आणखी चार पुजारी रामलल्लाची सेवा करतात. याच चार पुजाऱ्यांपैकी प्रदीप दास हे एक पुजारी आहेत. प्रदीप दास यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना होम क्वारंटीन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बरोबरच राम जन्मूभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आणि करोना विषाणूची लागण झालेल्या १६ पोलिस कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटीन करण्यात आले आहे.
दरम्यान, राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम ५ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २०० लोक सहभाग घेणार आहेत. करोनाच्या उद्रेकामुळे अधिक लोकांना आमंत्रण दिले जात नाहीए. फक्त निवडक लोकांनाच भूमिपूजन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
करोनाच्या संसर्गामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राम जन्मभूमी परिसरात ५०-५० लोकांचे वेगवेगळे ब्लॉक्स तयार करण्यात येत आहेत. यामध्ये केवळ २०० व्यक्ती बसू शकणार आहेत. देशातील ५० मोठे साधू या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्याच प्रमाणे देशातील ५० मोठे नेते आणि राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेले नेते येथे उपस्थित राहणार आहेत. यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे.
वाचा:
राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमीपूजन येत्या ५ ऑगस्टला होणार आहे. मात्र असे असले तरी ३ ऑगस्टपासून अयोध्येत या महोत्सवाला प्रारंभ होईल. येथे दिवाळीसारखे वातावरण दिसणआर आहे. यावेळी प्रशासनाकडून शहरात लाखो दिवे जाळण्यात येणार आहेत. तसेच सर्वसामान्यांना त्यांच्या घराबाहेर दिवे जाळण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.
ही बातमी नक्की वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times