Friday, January 27, 2023
Home Blog Page 5218

लज्जास्पद! माजी आमदाराने केला १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

5

कन्याकुमारी: नागरकोईलमधील माजी आमदाराने एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पाच विशेष पथके नेमण्यात आली होती. अखेर ए. मुरुगेशन (वय ५३) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

१२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुरुगेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरारी झाला होता. तिरुनेलवेली जिल्ह्यातील उवारी आणि थिसायनविलाई गावांमध्ये तो लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी पोलिसांच्या पाच विशेष पथकांनी शोधमोहीम सुरू केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुरुगेशनला सोमवारी एआयएडीएमकेमधून बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणात त्याच्यासह इतर चार जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील महिला पोलीस ठाण्यात त्याची चौकशी करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी कन्याकुमारी येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी ई-पास अनिवार्य असताना, तो जिल्ह्याच्या सीमेबाहेर गेलाच कसा, असा प्रश्न पडला असून, पोलीस याची चौकशी करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

माजी कर्णधाराची क्रिकेट पाकिस्तान.कॉम मुलाखत; BCCIने बंदी का घातली होती माहित नाही

5

कराची: मॅच फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदीला सामोरे गेलेला भारताचा माजी कर्णधार याने बीसीसीआयने माझ्यावर का बंदी घातली होती याचे उत्तर अद्याप मिळाले नाही, असे म्हटले. बीसीसीआयने डिसेंबर २००० साली अझरूद्दीवर आजीवन बंदी घातली होती.

क्रिकेट पाकिस्तान.कॉम ला दिलेल्या मुलाखतीत अझरूद्दीने सांगितले की, मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने २०१२ साली माझ्यावरील बंदी हटवली. जे काही झाले त्यासाठी मी कोणाला दोषी देत नाही. माझ्यावर बंदी का घालण्यात आली याचे उत्तर आजही मिळाले नाही.

वाचा-
बंदीच्या निर्णयानंतर मी त्या निर्णयाविरुद्ध लढण्याचे ठरवले. मला आनंद होतोय की १२ वर्षानंतर मी त्यातून मुक्त झालो. हैदराबाद क्रिकेट संघाचा अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत सहभागी होताना मला खुप आनंद झाल्याचे अझरने सांगितले.

भारताकडून ९९ कसोटीत ६ हजार १२५ आणि ३३४ वनडेत ९ हजार ३७८ धावा करणाऱ्या अझरचे नाव २०१९ साली राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील एका स्टॅडला देण्यात आले आहे.

वाचा-
भारताकडून १०० कसोटी सामने खेळता न आल्याबद्दलचे दुख: नसल्याचे तो म्हणाला. मला वाटते की जे नशिबात असते तेच मिळते. मला वाटत नाही की ९९ कसोटी सामने खेळण्याचा माझा विक्रम कोणी मोडू शकेल. कारण चांगला खेळाडू १००हून अधिक कसोटी नक्की खेळेल.

वाचा-
मी जेव्हा खराब फॉममध्ये होतो तेव्हा पाकिस्तानचे महान फलंदाज जहीर अब्बास यांनी मला मार्गदर्शन केले होते. तशाच पद्धतीने मी देखील युनिस खान याची मदत केली होती. १९८९च्या पाकिस्तान दौऱ्यात माझी निवड झाली नव्हती. कारण माझा फॉम खराब होता. तेव्हा कराचीत मी सराव करत असताना अब्बास यांनी माझी अडचण विचारली. त्यांनी मला ग्रिपमध्ये थोडा बदल करण्यास सांगितला. मी त्यानुसार बदल केल्यानंतर धावा झाल्या, असे अझर म्हणाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

'लॉकडाऊन'मुळे मानवी तस्करी वाढण्याची भीती

0

‌वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

करोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे गरीब कुटुंबांचे रोजगार बुडाले आहेत. परिणामी संपल्यानंतर लहान मुले, तसेच मोठ्या माणसांच्या तस्करीचे प्रमाण वाढण्याची भीती स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणात ८९ टक्के स्वयंसेवी संस्थांनी ही भीती व्यक्त केली. त्यामुळे गावपातळीवर याबाबत देखरेख वाढवण्याची, तसेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज या संस्थांनी व्यक्त केली आहे.

”ने हे केले आहे. ‘लॉकडाउन आणि त्यामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने गरीब कुटुंबांवर, विशेषत: बालकांवर झालेला परिणाम’ या शीर्षकाअंतर्गत हा अभ्यास करण्यात आला. लॉकडाउननंतर मजुरीच्या उद्देशाने वाढण्याची भीती यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. लॉकडाउननंतर करण्यासाठी मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज ७६ टक्के स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केला आहे.

मानवी तस्करीची भीती असलेल्या राज्यांमध्ये २७ एप्रिल ते ५ मे या पहिल्या टप्प्यात ५३ स्वयंसेवी संस्थांच्या, तर १७ ते २४ मे या दुसऱ्या टप्प्यात २४५ कुटुंबांच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. स्वयंसेवी संस्थांचे तळागाळापर्यंत संबंध असल्याने त्यांचा प्रतिसाद नोंदवण्यात आला, तर गरीब कुटुंबांवर लॉकडाउनच्या परिणामांचा तपशिलवार अभ्यास करण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.


वाचा :

वाचा :

अभ्यासातील निरीक्षणे

– लॉकडाउनकाळात ८५ टक्के कुटुंबांचे उत्पन्न शून्यावर

– तीन ते १० हजारांदरम्यान उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे प्रमाण पूर्वीच्या ४७ टक्क्यांवरून लॉकडाउनकाळात तीन टक्क्यांवर

– एक हजाराच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे प्रमाण १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर

– जमापुंजी संपलेल्या कुटुंबांचे प्रमाण २८ टक्क्यांवरून ६८ टक्क्यांवर

– ४३ टक्के कुटुंबांचे कसेबसे पोट भरते

– १० टक्के कुटुंबांना रोजच्या जेवणाची भ्रांत

– २१ टक्के कुटुंबांना मुलांना रोजगारासाठी पाठवावे लागू शकते.

– ८१ टक्के स्वयंसेवी संस्थांच्या मते, लॉकडाउननंतर सावकारी वाढेल, अनेक कुटुंबे कर्जाच्या खाईत जातील.

– ६४ टक्के स्वयंसेवी संस्थांना बालविवाह वाढण्याची भीती. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हरयाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये हे प्रमाण ७१ टक्के

– ८५ टक्के संस्थांना शाळेतून गळती वाढण्याचे भय

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर; स्वत: बसले ड्रायव्हिंग सीटवर

5

मुंबई: राज्यातील करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर आता राज्य सरकारनं पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. पुण्यातील चिंताजनक परिस्थितीची मुख्यमंत्री यांनीही गंभीर दखल घेतली असून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते स्वत: पुण्याला रवाना झाले आहेत. स्वत: गाडी चालवत ते सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘मातोश्री’हून निघाले आहेत. ( to visit Pune)

हेही वाचा:

पुणे जिल्ह्यात करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत पुणे जिल्ह्यानं मुंबई आणि ठाण्यालाही मागे टाकलं आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही पुण्यातील करोनाचा संसर्ग आटोक्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तालयात आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व पुण्याचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं समजतं. आजच्या दौऱ्यात मुख्यमंत्री पुण्यातील ससून किंवा नायडू रुग्णालयाला भेट देण्याचीही शक्यता आहे.

राज्यात करोनाचे संकट असताना मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, असा आरोप सातत्यानं होत होता. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी या आरोपांना उत्तर दिले होते. घरात राहून तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं मी महाराष्ट्रात पोहोचत असतो. सातत्यानं प्रशासनाशी चर्चा करत असतो, असं ते म्हणाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात फिरायला हवं. लोकांना धीर द्यायला हवा,’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांचा हा दौरा होत आहे.

करोनाच्या काळात उद्धव ठाकरे हे केवळ मुंबईतील कोविड सेंटरच्या पाहणीसाठी बाहेर पडले होते. श्री विठ्ठलाची शासकीय पूजा व निसर्ग वादळानंतरचा कोकण दौरा वगळता ते क्वचितच बाहेर दिसले होते. याउलट, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जाऊन आले. त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर टीका होऊ लागली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अनैतिक संबंधांवरून तरुणाला बेदम मारहाण, मुंडण केल्यानंतर मूत्र पाजलं

5

जैसलमेर: अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर काही जणांनी त्याला जबरदस्ती मूत्र पाजलं. त्याचं मुंडण करण्यात आलं. जिल्ह्यातील चौहटन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

काही लोक एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. अनैतिक प्रेमसंबंधांवरून या केल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणाला झाडा बांधलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणाला जबरदस्तीने मूत्र पाजले, तसेच त्याचे मुंडण करण्यात आले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाला काही जणांनी झाडाला बांधले आहे. त्याचे मुंडण केले असून, त्याला जबरदस्तीने मूत्र पाजले, असे या व्हिडिओत दिसते. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात जायला नको, असं दोन्ही गटांनी परस्पर संमतीने ठरवले. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून गंभीर दखल घेतली आणि आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक अजित सिंह हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, चौहटनचे एसएचओ पेमा राम हे २८ जुलैला गस्तीवर होते. त्यावेळी त्यांनी हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला. पोलीस चौकशीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. अनैतिक संबंधांवरून हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी पीडित तरुणाच्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली. तक्रार दाखल करण्याबाबत विचारणा केली असता, दोन्ही पक्षकारांनी तक्रार दाखल करायची नाही असं ठरलं आहे. आम्ही तक्रार दाखल करणार नाही, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी अखेर व्हिडिओच्या आधारे कलम २४९, ३२३ आणि ३४२ अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. लवकरच, पीडित तरुणाची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पाच कॅमेऱ्याचा रेडमी नोट ९ खरेदीची आज संधी, किंमत ११,९९९ पासून सुरू

5

नवी दिल्लीः शाओमीचा रेडमी नोट सीरीजचा नोट ९ स्मार्टफोन बजेट किंमतीत पॉवरफुल फीचर्स करतो. आता पर्यंत झालेल्या फ्लॅश सेलमध्ये हा फोन अवघ्या काही मिनिटात आउट ऑफ स्टॉक झाला आहे. जर तुम्ही पाच कॅमेऱ्याचा खरेदी करण्याच्या विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. या फोनचा आज पुन्हा एकदा दुपारी फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता शॉपिंग साइट अॅमेझॉन आणि वरून फोन खरेदी करण्याची संधी आहे.

वाचाः

ची किंमत
शाओमीचा हा फोन तीन रॅम आणि स्टोरेज मध्ये येतो. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः

फोनला तीन रंगात खरेदी करता येवू शकते. अॅक्वा ग्रीन, आर्कटिक व्हाईट आणि पेबल ग्रे असे हे तीन रंग आहेत. याचा चौथा कलर ऑप्शन स्कारलेट रेड सुद्धा अॅमेझॉन प्राइस डे सेल २०२० च्या दरम्यान ६ ऑगस्ट रोजी खरेदी करता येवू शकते. या फोन खरेदीवर HSBC बँक कार्ड्स वर ५ टक्के डिस्काउंट आणि अॅमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्ड होल्डर्स (प्राईम मेंबर्स) ला ५ टक्के कॅशबॅक मिळतो. नॉन प्राइम मेंबर्सला या कार्डवरून ३ टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे.

वाचाः

रेडमी नोट ९ चे खास वैशिष्ट्ये
स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी+ (1080×2340 पिक्सल्स) डॉट नॉच डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. यात मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6 जीबी LPDDR4x रॅम देण्यात आला आहे. डिव्हाईस अँड्रॉयड १० बेस्ड MIUI 11 सोबत येतो. या फोनमध्ये 9W रिवर्स चार्जिंग फीचर देण्यात आले आहे.

कॅमेरा फीचर्स मध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाटी देण्यात आला आहे. रियर पॅनेलवर यात क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात सेन्सर ४८ मेगापिक्सलचा आहे. तसेच, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,020mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

अनलॉक ३: महाराष्ट्रात इनडोअर व्यायामशाळा बंदच राहणार

5

मुंबई: अनलॉकचा तिसरा टप्पा जाहीर करताना केंद्र सरकारनं जीम आणि व्यायामशाळा खुल्या करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी राज्यातील परिस्थिती पाहून येथील इनडोअर जीम आणि व्यायामशाळा बंदच राहणार आहेत, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने बुधवारी ‘अनलॉक तीन’बाबत नवीन गाइडलाइन्स जारी केल्या. या गाइडलाइन्स विचारात घेऊन राज्य सरकारनंही मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन राहणार असून कंटेनमेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू असतील. मात्र, इतर ठिकाणी काही अधिकच्या सवलती देण्यात आल्या आहेत.

केंद्राच्या गाइडलाइन्समध्ये जीम व व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं राज्यातही त्या सुरू राहणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, राज्य सरकारनं याबाबत तातडीनं खुलासा केला आहे. राज्यात केवळ बाह्य (आऊटडोअर) जिम्नॅस्टिक्सना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून ५ ऑगस्टपासून परवानगी असेल. इनडोअर जीम, व्यायामशाळा बंदच राहतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय सुरू? काय बंद?

अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सुरू राहणार

मार्केट, आणि इतर दुकाने सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू राहणार

मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकाने उघडण्यास परवानगी

५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू राहणार.

मॉलमधील फूड कोर्ट, सिनेमागृहावर बंदी कायम. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट व रेस्टॉरंट्सना किचन सुरू ठेवण्यास मुभा

बांधकाम व्यावसायिकांना काम सुरू ठेवण्यास परवानगी, मान्सूनपूर्व कामे रखडली असल्यास काम सुरू करता येणार

रेस्टॉरंट व मोठ्या हॉटेलना होम डिलिव्हरीसाठी परवानगी

ऑनलाइन- डिस्टन्स लर्निंग अॅक्टिव्हिटी सुरू ठेवता येणार

खासगी कार्यालये कर्मचाऱ्यांच्या १० टक्के व १० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करता येणार

सरकारी कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार

स्विमिंग पूलवर बंदी कायम

ऑनलाईन/ सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून शिक्षण सुरू राहणार

केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा सुरू राहणार

अत्यावश्यक सेवा आणि कार्यालयीन कामासाठी जिल्हांतर्गंत प्रवास करता येणार.

लग्न समारंभसाठी सरकारनं २३ जूनला जारी केलेले आदेश कायम असणार आहेत.

वृत्तपत्र प्रिटिंग आणि वितरणाला परवानगी आहे

खासगी वाहनांचा वापरही फक्त अत्यावश्यक असल्यास करण्याच्या सूचना

दुचाकीवरून प्रवास करताना हेम्लेट बंधनकारक. तसंच, चारचाकी वाहनामध्ये फक्त ३ माणसांना परवानगी

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अंबानी ग्रुप कर्ज फेडण्यात ठरले अपयशी; बँकेचा मुख्यालयावर ताबा

5

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स समूह रोज नवी भरारी घेत आहे. रिलायन्स जिओमधील गुंतवणूक असो की संपत्ती वाढल्यामुळे श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचल्यामुळे मुकेश अंबानी गेल्या काही महिन्यात सातत्याने चर्चेत येत आहेत. पण आता बातमी आहे मुकेश अंबानी यांचे बंधू यांच्याबद्दलची…

वाचा-

खासगी क्षेत्रातील यस बँकेने मुंबईतील अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मुख्य कार्यालय, स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. बुधवारी एका जाहिरातीत बँकेने सांगितले की, मुंबईतील सांताक्रूज येथील २१ हजार वर्ग फूटपेक्षा अधिक जागा असलेले मुख्यालय आणि दक्षिण मुंबईतील नागिन महल या दोन मजली इमारतीचा ताबा घेतला आहे.

वाचा-
रिलायन्स भवनचा ताबा २२ जुलै रोजी SARFESIया कायद्यानुसार घेतला आहे. अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपला २ हजार ८९२ कोटीचे कर्ज फेडण्यात अपयश आले. या वर्षी मार्च महिन्यात इडीच्या चौकशीत अनिल अंबानी यांनी सांगितले होते की यस बँकेकडून त्यांनी घेतलेले कर्ज सुरक्षित आहे. बँकेकडून घेतलेले हे कर्ज कोणत्याही परिस्थितीत परत करणार असून भलेही त्यासाठी संपत्ती विकावी लागली तरी चालेल.

वाचा-
या चौकशीत अनिल अंबानी यांनी बँकेचे माजी संचलाक राणा कपूर, पत्नी आणि मुलगी अथवा यांच्या नियंत्रणात असलेल्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. मे महिन्यात इडीने राणा कपूर त्यांच्या मुली रोशनी, राधा आणि राखी कपूर यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सध्या बँकेचा दारभार प्रशांत कुमार हे सांभाळत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सॅमसंगचा जबरदस्त फोन आज होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स

5

नवी दिल्लीः सॅमसंग आज आपला प्रसिद्ध गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. दुपारी १२ वाजता या एका कार्यक्रमात या फोनला लाँच करण्यात येणार आहे. गॅलेक्सी Galaxy M31s ची टक्कर मार्केटमधील वनप्लस नॉर्ड, रियलमी एक्स३, आणि रेडमी नोट ९ प्रो मॅक्स यासारख्या स्मार्टफोन्ससोबत होईल. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या फोनची किंमत २० हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. फोनचा पहिला सेल ६ आणि ७ ऑगस्ट रोजी अॅमेझॉनवर होणार आहे.

वाचाः

जबरदस्त फीचर्ससोबत होणार लाँच
सॅमसंगचा हा फोन मिड रेंज सेगमेंटमध्ये अनेक फीचर्ससोबत एन्ट्री करणारा आहे. कंपनीने अॅमेझॉनवर या फोनची एक मायक्रो वेबसाइट लाइव्ह केली आहे. या मायक्रोसाइट मध्ये फोनचे काही वैशिष्ट्ये दाखवले आहेत. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे यात 6000mAh बॅटरी दिली आहे. फोन २५ वॉट फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सोबत येते.

वाचाः

८ जीबी रॅम आणि Exynos प्रोसेसर
सॅमसंग गॅलेक्सी M31s मध्ये मोठा सुपर AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो फुल एचडी रिझॉल्यूशन सोबत येईल. डिस्प्लेच्या टॉप सेंटरमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी पंच होल डिस्प्ले दिला आहे. फोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येईल. या फोनचा एक ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा व्हेरियंट सुद्धा कंपनी लाँच करू शकते. सॅमसंग या फोनमध्ये Exynos 9611 चिपसेट देण्याची शक्यता आहे.

जबरदस्त कॅमेरा सेटअप
कंपनी या फोनच्या कॅमेरा फीचर्सला खूप प्रमोट करीत आहे. यात तुम्हाला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्ससोबत एक १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा अँगल सेन्सर, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

राम मंदिराचं ई-भूमिपूजन? उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकारच नाही: दानवे

5

औरंगाबाद: अयोध्येतील राम मंदिराचं ई-भूमिपूजन करण्यात यावं या मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सल्ल्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री यांनी टीका केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव असताना उद्धव ठाकरे स्वत: पंढरपूरला पूजेसाठी गेले होते. त्यांना राम मंदिराच्या भूमिपूजनावर बोलण्याचा अधिकारच काय?, असा खोचक सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

राम मंदिराचं ऑनलाइन भूमिपूजन करण्याचा उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण ते स्वत: जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते. राज्यात करोनाचं संकट असतानाही ते पूजेला गेले होते. अशी टीका दानवे यांनी केली आहे. ठाकरे यांनी विठ्ठलाची पूजा ऑनलाइन पद्धतीने केली असती तर त्यांना बोलण्याचा आणि सल्ला देण्याचा अधिकार होता. मात्र, स्वत: करोना काळात महापूजा करायची आणि दुसऱ्यांना करोना आहे म्हणून ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला द्यायचा हा दुटप्पीपणा आहे, असंही ते म्हणाले.

राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याचे शॅडो मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल दानवे यांना करण्यात आला. त्यावर, शरद पवार हे मुख्यमंत्री नाहीत, पण महाविकास आघाडीचे कर्णधार आहेत, असं ते म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’ला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी करोनाचं संकट असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं ई-भूमिपूजन करावं, असा सल्ला दिला होता. राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार की नाही? एक व्यक्ती म्हणून हो की नाही हे मी काहीही सांगेल. मी मुख्यमंत्री आहे, पूर्ण सुरक्षेत मी व्यवस्थित जाऊन येईलही. मुद्दा तो नाही. एखाद्या गावात मंदिर बांधायचं असेल तर मोठा जल्लोष केला जातो. लोक मंदिर निर्माणाच्या कार्यात भाग घेतात. उत्सुकता असते. चैतन्य सळसळतं. अयोध्येतील राम मंदिर हे काही सर्वसामान्य मंदिर नाही. या मंदिराला लढ्याची पार्श्वभूमी आहे. इतिहास आहे. हा जागतिक कुतुहुलाचा विषयही आहे. रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अनेक वर्षांपासून ते या क्षणाची वाट पाहत होते. त्यांच्या भावनेचं काय करणार? लाखो राम भक्तांना राम मंदिराच्या भूमिपूजनाला येऊ देणार की अडवणार? कि कळत न कळत त्यांच्यात करोनाचा प्रसार होऊ देणार? असा सवाल करतानाच करोनामुळे आपण नागरिकांना मंदिरातही जाण्यास बंदी घातली आहे. अशावेळी तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही भूमिपूजन करू शकता. ई-भूमिपूजनही करू शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. शिवाय भूमिपूजन सोहळ्याला जाणार की नाही? याबाबत त्यांनी कोणतंच सूतोवाच केलं नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरे भूमिपूजनाला जाणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts