Friday, January 27, 2023
Home Blog Page 5222

धारावी करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर; आज फक्त २ रुग्ण सापडले

5

मुंबईः आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या लवकरच करोनाच्या विळख्यातून बाहेर येत आहे. मुंबईकरांसाठी एक सकारात्मक बातमी पुढे आली आहे. आज धारावीत फक्त दोन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, माहिम परिसरात २५ रुग्णांची नोंद झाली आहे. (Coronavirus in dharavi)

गेल्या तीन महिन्यांपूर्वी धारावी हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळं धारावी करोनामुक्त करण्यास यश हाती आलं आहे. धारावीच्या या पॅटर्नचं कौतुक केंद्र सरकारनंही केलं आहे. बुधवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार धारावीत आता ८३ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण २ हजार ५४५ एकूण रुग्ण आहेत. आत्तापर्यंत २ हजार २१२ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात करुन सुखरुप घरी परतले आहे. धारावीत करोनाचा विळखा सैल होत असल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

वाचाः

एकीकडे धारावीत करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असताना धारावीला लागून असलेल्या माहीममध्येही करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. आज माहिममध्ये २५ करोनारुग्ण सापडले आहेत. त्यामुळं सध्या माहिममध्ये १ हजार ६५७ रुग्ण उपचार घेत आहेत. माहिममध्ये आतापर्यंत १ हजार ३५७ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.दादरमध्येही २५ नवीन रुग्ण सापडल्यांनं एकूण रुग्णसंख्या १ हजार ६८९पर्यंत पोहोचली आहे.

वाचाः

धारावी, दादर, माहीम हा भाग मुंबई पालिकेच्या जी उत्तर विभागात येतो. या विभागात आज एकूण ५ हजार ८९१ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यात ४ हजार ७४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण ७५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावीतील जुलै महिन्यातील स्थिती

१ जुलै- १४
२ जुलै- १९
३ जुलै- ८
४ जुलै- २
५ जुलै- १२
६ जुलै- ११
७ जुलै- १
८ जुलै- ३
९ जुलै- ९
१० जुलै- १२
११ जुलै- ११
१२ जुलै- ५
१३ जुलै- ६
१४ जुलै- ११
१५ जुलै- २३
१६ जुलै- १३
१७ जुलै- १०
१८ जुलै- ६
१९ जुलै- ३६
२० जुलै- १२
२१ जुलै- १०
२२ जुले- ५
२३ जुलै- ६
२४ जुलै- ६
२५ जुलै- १०
२६ जुलै- २
२७ जुलै- ९
२८ जुलै- ३
२९ जुलै- २

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राज्यात रुग्णसंख्येनं ओलांडला ४ लाखांचा टप्पा; २४ तासांत २९८ करोनाबळी

5

मुंबईः राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असला तरी करोना रुग्णांचा वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा अजूनही काळजी वाढवणारा आहे. २४ तासांत ९ हजार २११ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं आज राज्यातील रुग्णसंख्येनं चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात १० हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली होती. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी रुग्णसंख्या ठरली होती. तर राज्याचा रिकव्हरी रेटही वाढला होता. त्यामुळं महाराष्ट्र करोनाचा विळख्यातून बाहेर पडत असल्याचं चित्र होतं. मात्र, आज करोना रुग्णांच्या संख्येनं चार लाखांचा टप्पा पार केल्यानं आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी अधिक वाढली आहे. दिवसभरात २९८ जणांचा मृत्यू करोनामुळं झाला असून एकूण मृतांची संख्या १४ हजार ४६३ इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यूदरही ३. ६१ टक्के इतका आहे.

वाचाः

आज एकूण ७ हजार ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २ लाख ३९ हजार ७५५ करोनाबाधित रुग्णांनी करोनाची लढाऊ जिंकली आहे. राज्यातील रिकव्हरी रेटही ५९.८४ टक्के इतका आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार १२९ अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

वाचाः

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ चाचण्यांपैकी ४ लाख ६५१ (१९.८७ टक्के) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर, ४० हजार ७७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईत ८५ हजार रुग्ण बरे

मुंबईत २८ जुलैपर्यंत करोना रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला असून यातील तब्बल ८५ हजार ३२७ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत फक्त २० हजार १२३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. धारावी, दादर, माहीम हा भाग पालिकेच्या जी उत्तर विभागात येतो. या विभागात आज एकूण ५ हजार ८९१ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यात ४ हजार ७४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण ७५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मासेमारी की आणखी काही? दक्षिण अमेरिकेतील 'या' देशाजवळ २६० चिनी नौका!

4

क्विटो: चीनचे आक्रमक विस्तारवादी धोरण आता जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू असल्याचे चित्र आहे. चीनपासून जवळपास १५ हजार किमी दूर असलेल्या दक्षिण अमेरिकेच्या एका देशाच्या बेटाभोवती २६० चिनी मच्छिमारांच्या नौका दिसून आल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने चिनी नौका दिसल्यामुळे दक्षिण अमेरिकेतील देशही सतर्क झाले आहेत.

दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर देशाच्या गॅलपागोस बेटांभोवती 260 चिनी मासेमारी करणाऱ्या नौका दिसून आल्या. चीनपासून या भागाचे अंतर सुमारे १५ हजार किलोमीटर आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे इक्वाडोरचे संरक्षण मंत्री ओसवाल्डो जेरिन यांनी सांगितले की, चिनी मच्छिमारांचे जहाज यावेळी आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. तर, दुसरीकडे इक्वाडोरच्या नौसेनेने गॅलपागोस बेटाच्या भोवती आपली गस्त वाढवली आहे. या बेटांजवळ चिनी जहाज पोहचल्यास बेटाजवळ असणाऱ्या सागरी जीवनाची हानी होण्याची शक्यता आहे.

वाचा: वाचा:

इक्वाडोरचे राष्ट्रपती लेनिन मोरेना यांनी एक आठवडा आधी ट्विट करून या ऐतिहासिक बेटाच्या संरक्षणासाठी प्रतिबद्धता जाहीर केली होती. त्यानंतर इक्वाडोरच्या नौदलाने गॅलपागोस बेटांपासून २०० मैल अंतरावर २६० नौका दिसून आल्याचे सांगितले. या चिनी मच्छिमारांच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेता इक्वाडोर सतर्क झाला आहे.

वाचा:

गॅलपागोस बेट हे समुद्री जैवविविधतेसाठी ओळखले जाते. येथील मोठ्या आकाराचे कासवे जगभरात आर्कषणाचे केंद्रबिंदू आहेत. त्याशिवाय, या बेट समूहांवर राजहंस आणि अल्बाट्रोसच्या अनेक प्रजाती आहेत. मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला सिद्धांतही या ठिकाणाहून प्रेरीत असल्याचे म्हटले जाते.

वाचा:

याआधीदेखील गॅलपागोस बेटाजवळून २०१७ मध्ये एक चिनी जहाज ताब्यात घेण्यात आले होते. समुद्री मार्ग चुकल्याने हे जहाज या ठिकाणी आले असल्याचे म्हटले जात होते. या जहाजाची तपासणी केल्यानंतर जहाजावर ३०० टन सागरी वन्यजीव आढळले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सचिन पायलट यांनी केले 'या' काँग्रेस नेत्याचे अभिनंदन, म्हणाले…

5

नवी दिल्ली: काँग्रेसचे बंडखोर नेते () यांनी पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा (Govind SinghDotasara) यांचे राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे (RPCC) अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आपण कोणाच्याही दबावात न येता राज्यात सरकार स्थापनेसाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचा पूर्ण सन्मान कराल, असा विश्वास व्यक्त करत सचिन पायलट यांनी गटाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. यापूर्वी पायलट हे राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदावरून आणि राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले होते.

पायलट यांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. सचिन पायलट यांना १८ आमदारांचा पाठिंबा आहे. पायलट यांच्या बंडाला उत्तर देताना गेहलोत यांनी सभापतींच्या नोटीशीद्वारे पायलट आणि त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांच्या विधानसभा सदस्यत्वाला आव्हान दिले आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून न्यायालयात कायदेशीर लढाई लढली जात आहेत.

विशेष म्हणजे सचिन पायलट यांनी अद्याप अधिकृतपणे काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. ते सातत्याने आपण अजूनही काँग्रेस पक्षाचे सदस्य असल्याचे म्हणत आहेत. अशोक गेहलोत सरकार सचिन पायलट यांच्या विरोधाचा सामना तर करत आहेतच. पण दुसऱ्या बाजूने त्यांना राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडूनही निर्माण झालेल्या अडसराला देखील सामोरे जावे लागत आहे. एकीकडे गेहलोत विधानसभेचे अधिवेशन बोलण्याची मागणी करीत आहेत, तर दुसरीकडे राज्यपाल कलराज मिश्र मात्र त्यांच्या मागणीच्या विरोधात असल्याचे दिसत आहे.

वाचा:
राजस्थानच्या राजकीय लढाईत एकीकडे काँग्रेस भारतीय जनता पक्षावर (भाजप) सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप करीत आहे, तर दुसरीकडे भाजप या आरोपाचा इन्कार करत हा काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद असल्याचा दावा करत आहे. आता सर्वांचे लक्ष विधानसभा अधिवेशनाकडे लागले आहे.

वाचा:

जर राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावले तर सर्वांचे लक्ष गेहलोत गट, पायलट गट आणि भाजप यांची रणनीती काय असेल यावरच असेल, हे स्पष्ट आहे.

हे फोटोफीचर नक्की पाहा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अनलॉक ३ : केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी; जिम, योगाला परवानगी, पण शाळा-कॉलेज बंदच

4

नवी दिल्लीः अनलॉकसाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना; जिम आणि योगा क्लासेस ५ ऑगस्टपासून सुरू करता येणार, रात्रीची संचारबंदीही हटवली. पण शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

क्रिकेटपटू नव्हे तर देव… विश्वविजेत्या खेळाडूने उघडलं कोव्हिड सेंटर

5

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला देशात वाईट परिस्थिती सुरु आहे. सरकार कोव्हिडबरोबर लढण्यासाठी सर्वतोपरी उपाय करताना दिसत आहे. पण आपली लोकसंख्या पाहता हे उपाय कमी पडताना दिसत आहेत. पण जेव्हा वाईट परिस्थिती निर्माण होते, तेव्हाच देवाचे रुप पाहायला मिळते, असे म्हटले जाते. सध्याच्या घडीला सामन्य लोकांसाठी एक क्रिकेटपटू देव झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या विश्वविजेत्या खेळाडूने कोव्हिड सेंटर उभारल्याचे पाहायला मिळत आहे.

करोना झालेल्या लोकांची संख्या वाढत असल्यामुळे सर्व जणांवर रुग्णालयात उपचार करणे शक्य होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. पण ज्या व्यक्तीला करोना झाला आहे, त्याची आबाळ होत कामा नये. त्याला चांगले उपचार आणि जेवण मिळावे, असा विचार भारताच्या एका विश्वविजेत्या क्रिकेटपटूने केला आहे. त्यामुळेच त्याने एका कोव्हिड सेंटरलची उभारणी केली आहे आणि लोकांना मोफत उपचार आणि जेवण कसे मिळेल, यासाठी तो प्रयत्नशील आहे.

या क्रिकेटपटूच्या गावामध्ये करोना म्हणजे नेमकं काय आणि त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात, हे लोकांना माहिती नव्हते. क्रिकेटपटूच्य गावात बाहेरील राज्यातून पाच करोनाचे रुग्ण आलेले होते. त्यामुळे गावकऱ्यांना करोनाचा धोका जास्त होता. पण लोकांना याबाबत काहीच माहिती नव्हते. त्यामुळे संपूर्ण गावात हा क्रिकेटपटू जनजागृती करत फिरत होता. तोंडाला मास्क का लावावेत, सुरक्षित अंतर कसे ठेवावे, आपले हात कसे स्वच्छ करावेत, याबाबतची माहिती तो सर्वांच्या घरी जाऊन देत होता. पण आता तर त्याने त्यापुढचेही काम केले आहे. आता या क्रिकेटपटूने आपल्या गावात चक्क कोव्हिड सेंटर स्थापन केले आहे.

गुजरातमधील भरुच या गावात भारताच्या विश्वविजयी संघातील क्रिकेटपटू मुनाफ पटेल हा राहत आहे. पण गावकऱ्यांना करोनाबद्दल काहीही माहिती नव्हती. पण जर गावात करोनाचे रुग्ण आढळले तर त्यांचे उपचार कुठे होणार, हा प्रश्न त्याला पडला. त्यामुळे त्याने आपल्या गावात कोव्हिड सेंटरची उभारणी केल्याचे पाहायला मिळते आहे.

ज्या व्यक्तींना करोनाची लक्षण आढळतील त्यांना या कोव्हिड सेंटरमध्ये ठेवले जाऊ शकते. त्याचबरोबर या रुग्णांवर योग्य ते उपचार आणि त्यांना दोन वेळचे चांगले जेवण मिळावे, यासाठी हा क्रिकेटपटू कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. करोडो रुपये कमावलेले खेळाडू काहीही करताना दिसत नसले तरी मुनाफ हा सामान्य माणसांसाठी मदतीचा हात देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

या दिवशी होणार पावसाळी अधिवेशन, राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

0

मुंबईः राज्यात करोना व्हायरसचा प्रसार वाढत आहे. करोनाचा अटकाव करण्यासाठी राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊन ३१ जुलै रोजी संपणार आहे. लॉकडाऊनच्या काळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक व्यवसाय सुरु करण्यास सरकारनं परवागनी दिली आहे. तसंच, करोनाच्या प्रादुर्भावामुळंही पुढे ढकलण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाबाबतही सरकारनं निर्णय घेतला आहे. आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ()

मुंबईसह राज्यातील करोना संसर्गजन्य साथरोगाच्या प्रादूर्भावाचा आढावा घेतल्यानंतर राज्य विधिमंडळाचे ३ ऑगस्टपासून मुंबईत होणारे पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबर रोजी मुंबईत होईल.

याआधी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी होणार होते. मात्र, करोनामुळं ते पुढे ढकलून ३ ऑगस्ट रोजी ठरले होते. मात्र, अद्यापही करोनाची परिस्थिती जैसे थे असल्यानं पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.

वाचाः

ठाकरे सरकारच्या बैठकीतील निर्णय

धर्मादाय संघटनेतील पदोन्नती साखळीत समतोल साधणे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५०मधील कलम ५मधील पोट-कलम (२ अ)मध्ये सुधारणा करण्यास मान्यता

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात करोना साथीच्या प्रादुर्भावामुळं राज्यातील शासकीय कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत अडचणीसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करण्याचा निर्णय

विधानमंडळाचे सन २०२०चे तिसरे (पावसाळी) अधिवेशन ७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यास मान्यता

महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प व आशियाई विकास बँकेशी करार

कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गंत विशाल प्रकल्पांसाठी गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे निकष सुधारण्यास मान्यता

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

गणपतीला कोकणात कसं जाणार?; 'या' मुद्द्यांवर अडलं गाडं

5

मुंबई: तसेच मुंबई महानगर प्रदेशातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. यंदा मात्र संसर्गाने चाकरमान्यांच्या वाटेत विघ्ने उभी केली आहेत. अवघ्या २५ दिवसांवर आला असतानाही कोकणात कसे जायचे?, या प्रश्नाचे उत्तर चाकरमान्यांना मिळालेले नाही. सरकार पातळीवर सुरू असलेल्या गोंधळाचा मोठा मनस्ताप चाकरमान्यांना झाला आहे. ( )

वाचा:

कोकणातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. गणेशोत्सवाला दरवर्षी मुंबई व आजूबाजूच्या शहरांमधून किमान ८ ते १० लाख चाकरमानी कुटुंबकबिल्यासह कोकणातील आपल्या मूळगावी जातात. यंदा मात्र करोना साथीमुळे चाकरमान्यांची मोठी कोंडी झाली आहे. करोनासोबतच क्वारंटाइन, वैद्यकीय तपासणी, ई-पास अशा अनेक अडचणींच्या कचाट्यात चाकरमानी अडकला आहे.

वाचा:

कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांबाबत सरकारकडून अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत मुख्यमंत्री यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यात काही सूचनाही देण्यात आल्या मात्र सरकारकडून ठोस असा कोणताच निर्णय वा नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणात जायचे तर कसे?, हा प्रश्न प्रत्येक चाकरमान्याला पडला आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातात. त्यासोबतच एसटीकडूनही ज्यादा बस सोडल्या जातात. यंदा रेल्वेची शक्यता अगदीच धुसर असून एसटी बसबाबत मात्र आशा आहे. परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी तसे सूतोवाच केले आहेत. मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळाल्यास चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार, असे त्यांनी म्हटले आहे.

वाचा:

नियमावलीत या आहेत अडचणी

> कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाइन कालावधी १४ ऐवजी ७ दिवसांचा करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार यांनी हा मुद्दा जोरकसपणे मांडला आहे. मात्र, कोकणातील अनेक ग्रामपंचायतींचा याला विरोध आहे. संस्थात्मक वा होम क्वारंटाइनचा कालावधी १४ दिवसांचाच असावा, यावर या ग्रामपंचायती ठाम आहेत. तसे ठराव अनेक ग्रामपंचायतींनी केले आहेत.

> १४ दिवसांच्या क्वारंटाइनची अट आयसीएमआरने घालून दिलेली आहे. केंद्राच्या अखत्यारितील हा विषय आहे. त्यामुळे हा कालावधी ७ दिवसांचा करायचा असेल तर केंद्राकडून त्यासाठी परवानगी आवश्यक आहे. अशी परवानगी सध्याच्या घडीला मिळेल का?, हा कळीचा प्रश्न आहे.

> जे कोकणात जाणार आहेत त्यांची मुंबईतच करोना चाचणी करण्यात यावी व चाचणी निगेटिव्ह आली तर पुन्हा कोकणात जाऊन क्वारंटाइन राहण्याची अट असू नये, अशी सूचनावजा मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या मागणीला चाकरमान्यांनी उचलून धरलं असलं तरी क्वारंटाइनमधून इतकी सूट मिळण्याची शक्यता अजिबात नाही.

> मुंबईतील व्यक्ती गावी होम क्वारंटाइन राहिल्यास त्याच्यासोबत तेथील कुटुंबातील सदस्यांनाही १४ दिवस क्वांरटाइन राहण्याची अट आहे. ही अट अनेक कुटुंबांसाठी जाचक ठरत आहे.

> करोनाची स्थिती लक्षात घेऊन राज्यात अद्याप जिल्हाबंदी उठवण्यात आलेली नाही. त्यामुळेच मुंबई महानगर प्रदेशाबाहेर रत्नागिरी वा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक आहे. हा ई-पास मिळवताना चाकरमान्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यात एजंटचा शिरकाव झाला असून त्यांच्याकडून राजरोसपणे लूट सुरू आहे. गणेशोत्सवासाठी खास बाब म्हणून ई-पासची अट शिथील केली जावी वा तो सहज उपलब्ध व्हावा, असा चाकरमान्यांचा आग्रह आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

एअरटेल युजर्संना झटका, आधीसारखा नाही मिळणार डिस्काउंट

5

नवी दिल्लीः टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलकडून एप्रिलमध्ये लाँच करण्यात आलेल्या सुपर हिरो प्रोग्राम मध्ये बदल केला आहे. एअरटेलच्या या सर्विस अंतर्गत युजर्संना बेनिफिट्स मिळत होते. जे दुसऱ्या एअरटेल युजर्सचे अकाउंट रिचार्ज करीत होते. आता पर्यंत या प्रमाणे करीत असलेल्या रिचार्जवर ४ टक्के डिस्काउंट मिळत होता. वन्ली टेक च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, एअरटेलने या डिस्काउंटमध्ये बदल केला आहे.

वाचाः

आधी मिळत असलेले ४ टक्के डिस्काउंटला आता कमी केले आहे. तसेच अनेक प्लान विना डिस्काउंट कूपन शिवाय ऑफर केले जात आहे. सुपरहिरो प्रोग्रामला खास करुन करोना संसर्ग काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान घोषित केले होते. याच्या मदतीने सब्सक्रायबर्सला आपसात कनेक्टेड राहण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले होते. नवीन अपडेटच्या माहितीनुसार, एयरटेलने या प्रोग्रामध्ये इनरोल झालेल्या युजर्संसाठी डिस्काउंट बेनिफिट्स ४ टक्के कमी करुन ते २ टक्के केले आहे.

वाचाः

स्वस्त प्लानवर बेनिफिट्स कमी
एअरटेलच्या ज्या प्लान्समध्ये आधीच्या तुलनेत कमी बेनिफिट्स मिळणार आहेत. त्यात ९९ रुपये, १२९ रुपयांच्या प्रीपेड प्लानचा समावेश आहे. तसेच १९ रुपये, २० रुपयांच्या किंमतीचे प्लानवर आता कोणताही डिस्काउंट मिळणार नाही. याआधी एअरटेल १८ रुपये आणि १९ रुपये या प्लानवर १ रुपयांचा डिस्काउंट मिळत होता. आता ४५ रुपये आणि ४९ रुपये या प्लानवर रिचार्ज केल्यास १ रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. आधी हा प्लान २ रुपयांचा डिस्काउंट ऑफर करीत होता.

वाचाः

या प्लान्सवर डिस्काउंट नाही
लेटेस्ट २८९ रुपयांच्या प्रीपेड प्लानला आता या प्रोग्रामवरून हटवले आहे. हा विना कोणत्याही डिस्काउंट कूपन शिवाय येतो. टॉकटाईमच्या चार पॅक्सवर सुद्धा चार टक्क्यांऐवजी दोन टक्के करण्यात आले आहे. या रेंजमध्ये ५ हजार रुपयांपासून १०० रुपये किंमतीच्या पॅकचा समावेश आहे. २० रुपये आणि १० रुपये किंमतीच्या पॅक्सवर आता कोणताही डिस्काउंट नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

संतापजनक! लातूरमध्ये करोना रुग्णाच्या नातेवाइकानं केला डॉक्टरांवर चाकूहल्ला

5

लातूर: येथील अल्फा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत असून, या रुग्णालयात आज सकाळी एका रुग्णाच्या नातेवाइकानं डॉक्टरांवर चाकूनं हल्ला केला. सुदैवानं या हल्ल्यातून डॉक्टर बचावले. त्यांच्यावर उपचार केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचा कहर सुरू आहे. रुग्णांची संख्या आता तीन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी, अजूनही चिंता कायम आहे. आरोग्य यंत्रणा अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहे. अशावेळी रुग्णांच्या नातेवाइकांनीही सहकार्य करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूरमधील अल्फा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाइकानं आज, बुधवारी करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर चाकू हल्ला केला. डॉ. दिनेश वर्मा असं डॉक्टरांचं नाव आहे. या प्राणघातक हल्ल्यातून ते बचावले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गेल्या चार दिवसांपासून रुग्ण या रुग्णालयात दाखल होता. ते वयोवृद्ध होते. त्यात त्यांना मधुमेहाचा त्रास होता. रुग्णाची प्रकृती गंभीर होती हे नातेवाइकांना माहीत होते. मात्र, रुग्ण दगावल्यानंतरही त्याच्या एका नातेवाइकानं डॉ. वर्मा यांच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेमुळं तीव्र संताप व्यक्त होत असून, लातूरमधील संघटनेनं या घटनेचा निषेध केला आहे. सध्याच्या कठीण प्रसंगातही डॉक्टर हे रुग्णांना सेवा देत आहेत. अशावेळी ही घटना घडणे निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया लातूर जिल्हा आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केली. हल्ल्याची घटना निषेधार्ह असून, आरोपीवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच अमित देशमुख यांनीही यामध्ये लक्ष घालावे, असे संघटनेने सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा प्रवृत्ती रोखण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहितीही संघटनेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.


Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts