Monday, February 6, 2023
Home Blog Page 5224

पृथ्वी शॉनंतर अजून एक खेळाडू डोपिंगमध्ये दोषी, होणार बंदीची कारवाई

0

गेल्यावर्षी भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा उत्तेजक सेवन चाचणीमध्ये पॉझिटीव्ह सापडला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. पण आता भारताचा एक युवा खेळाडूही उत्तेजक सेवन चाचणीमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे, त्यामुळे त्याच्यावर आता बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

कामगिरी अधिक चांगली होण्यासाठी या युवा खेळाडूने एक औषध घेतल्याचे म्हटले जात आहे. या खेळाडूची जेव्हा उत्तेजक चाचणी घेण्यात आली तेव्हा त्यामध्ये अनाबोलिक स्‍टेरॉयड N19 -नोरैंड्रोस्टेरोन हे औषध सापडले होते. हे औषध आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी घेतले जाते, असे ब्रिटिश जनरल ऑफ मेडिसिनने म्हटले आहेत. त्यामुळे आता या युवा खेळाडूवर कडक कारवाई होणार असल्याचे समजते.

सध्याच्या घडीला राष्ट्रीय उत्तेजक सेवनविरोधी संस्था (नाडा) ही भारतामध्ये उत्तेजक सेवन चाचणी घेत असते. ‘नाडा’ने या खेळाडूच्या युरिनचे काही नमुने घेतले होते. हा एक अष्टपैलू क्रिकेटपटू आहे आणि मार्च महिन्यात या क्रिकेटपटूला संघातून बाहेर करण्यात आले होते, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली होती.

वाचा-

हा क्रिकेटपटू मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. बीसीसीआयच्या २३ वर्षीय क्रिकेट स्पर्धेत त्याने प्रतिनिधीत्व केले होते. या खेळाडूचे नाव सांगण्यात आलेले नाही, पण हा खेळाडू मध्य प्रदेशचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे आता समोर आले आहे. हा खेळाडू जर उत्तेजक चाचणीत दोषी आढळला असेल तर त्याच्यावर बंदीची कारवाई अटळ असल्याचे म्हटले जात आहे.

वाचा-

या खेळाडूवर काय होऊ शकते कारवाईयापूर्वी जेव्हा पृथ्वी शॉ हा उत्तेजक सेवन चाचणीमध्ये दोषी आढळला होता, तेव्हा त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. पण पृथ्वीपेक्षा हे प्रकरण जास्त गंभीर असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता या खेळाडूवर चार वर्षांची बंदी येऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण या बदीनंतर हा खेळाडू आपली काय भूमिका मांडतो, यावर शिक्षेचा पुर्नविचार होऊ शकतो. त्यामुळे आता हा खेळाडू नेमकी काय भूमिका मांडतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

आज १३ हजार ४०८ रुग्णांची करोनावर मात; रिकव्हरी रेटही वाढला

0

मुंबईः राज्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय ही वस्तुस्थिती असली तरी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे. आज विक्रमी संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासांत विविध रुग्णालयांतून १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) ६९. ६४ टक्के इतका झाला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. आत तब्बल १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रग्ण बरे होण्याच्या दरात एक टक्क्यानं वाढ झाली असून सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ६९.६४ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७ हजार ५१३ अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

वाचाः

करोना विषाणूचा राज्यात उपद्रव वाढला असून, दररोजच बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज तब्बल १२ हजार ७१२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ इतकी झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ०८ हजार ८८७ चाचण्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ (१८.८४ टक्के) चाचण्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचाः

आज राज्यात ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के इतका आहे. राज्यात आज झालेल्या मृत्यूंमुळं राज्यातील एकूण मृतांचा आकडा १८ हजार ६५० इतका झाला आहे. आज नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर, ६६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४० मृत्यू नाशिक- १२, ठाणे जिल्हा- ११, पालघर-३, कोल्हापूर- ३, परभणी-२, धुळे- २, उस्मानाबाद-२, औरंगाबाद-१, लातूर-१, नंदूरबार-१, सांगली-१ आणि सोलापूर- १ असे आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

खरा सेलिब्रिटी कोण?; सयाजी शिंदेचे 'हे' मत लाखमोलाचे

0

कोल्हापूर: अभिनेते, आमदार, खासदार, गायक, कवी हे कसले सेलिब्रिटी? त्यांच्याऐवजी दोनशे-तीनशे वर्षे देणाऱ्या झाडांना करा, त्यांचा शोध घेऊन त्यांना टॉप टेनचा दर्जा द्या, असे आवाहन अभिनेते आणि सह्याद्री वनराई वृक्षचळवळीचे प्रणेते यांनी केले. ( on Environment )

जगातील दोनशे देशातील कोटीहून अधिक लोकांना ‘’ या चळवळीत सहभागी करून घेतलेल्या हिच्या गाजलेल्या भाषणांच्या मराठीतील पहिल्या व्हिडीओचा लोकार्पण समारंभ अभिनेते शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मेहता प्रकाशनच्या ‘ग्रेटाची गोष्ट’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. फ्रायडेज फॉर फ्युचरच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

वाचा:

अभिनेते शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, ‘आपल्याला वर्षानुवर्षे ऑक्सिजन देणारी झाडे हीच खरी श्रीमंती आहे. आई नंतर त्यांनाच खरे महत्त्व आहे. त्यामुळे त्या त्या भागातील, गावातील जुन्या झाडांचा शोध घ्या, त्यांना सेलिब्रिटी करा. त्यांना पाहण्यासाठी सहली काढा. पर्यावरण वाचवा हा विचार कपाटात बंद आहे, तो बाहेर काढा, प्रत्येकांनी पाच झाडे लावा, त्यांचे वाढदिवस साजरे करा. प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये वृक्ष बँक करा, अभ्यासक्रमात पर्यावरण या विषयाची सक्ती करा. हे सारे केले तरच पर्यावरणाचा ऱ्हास थांबणार आहे.’

पर्यावरण वाचवण्यासाठी ग्रेटा थनबर्ग नावाच्या नववीत शिकणाऱ्या स्वीडन देशातील मुलीने शाळा बंद आंदोलन पुकारले. जे बोलू शकत नाहीत, अशा झाडे, वेली, पशू, पक्षी, नद्या, डोंगर यांचा ती आवाज बनली. जगातील सर्व पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष व उद्योगपतींच्या समोर ती निर्भीडपणे बोलत राहिली अन मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन उभे राहिले. त्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे, असे आवाहनही सयाजी शिंदे यांनी केले.

वाचा:

नितीन डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले. सिद्धार्थ सयाजी शिंदे याने ग्लोबल वॉर्मिंगचे संकट चिंताजनक असून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी प्रा. सुहास वायंगणकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कुत्री, मांजरंही आत्महत्या करत नाहीत!

काळ निश्चितच कठीण आहे, पण या काळात देखील कुत्री, मांजरं आत्महत्या करत नाहीत. आत्महत्या करू नये हे त्यांनाही कळते. मग आपण कशासाठी आत्महत्या करत आहे, असा सवाल करून सयाजी शिंदे म्हणाले, ‘कठीण प्रसंगीच आपण खंबीर व्हायला शिकले पाहिजे.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोना चाचण्यांचे दर कमी; प्रति तपासणीसाठी इतके रुपये मोजावे लागणार

0

मुंबईः राज्यात करोनाचे संकट वाढत असताना आरोग्य प्रशासनानं महत्त्वाची पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरांनुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, अशी आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

वाचाः

राज्य शासनाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी करोना चाचण्यांचे दर निश्चित केले होते. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यााठी २५०० रुपये दर आकारायचा निर्णय झाला होता. काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जात होते. अशा वेळी त्यांच्याकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारावेत असे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले.

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी लागणारे रिएजंटस्, व्हीटीएम कीट व पीपीई किट यांची उपलब्धता वाढल्याने त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तपासणी खर्चात कपात होणे आवश्यक होते. याबाबी लक्षात घेऊन प्रयोगशाळा व किटस् उत्पादकांशी चर्चा करून समितीने शिफारशींसह आपला अहवाल शासनला सादर केला. त्यानुसार चाचण्यांचे पुन्हा सुधारीत दर निश्चित करण्यात आले.

वाचाः

त्यामुळे आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टींग त्याकरीता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये आकारण्यात येईल. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, करोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये सुधारीत दरानुसार आकारण्यात येणार आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कोकणात गणपतीला जाण्याची अजूनही संधी; आता 'ही' टेस्ट द्यावी लागणार!

0

मुंबई: कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी १० दिवसांच्या होम क्वारंटाइनची अट असल्याने उशीर न करता हजारो चाकरमानी वेळेत एसटी बसने वा खासगी वाहनाने आपल्या गावी दाखल झाले आहेत. आता उद्यापासून मुंबई-ठाण्यातून गावी जाण्यासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिकच खडतर असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. ( )

वाचा:

हा कोकणातील सर्वात मोठा सण असून विशेषत: आणि जिल्ह्यात घरोघरी बाप्पांचे आगमन होते. या सणाला दरवर्षी मुंबई, ठाणे, पालघर भागात नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी येतात. यंदा मात्र करोना साथीमुळे या चाकरमान्यांच्या वाटेत अनेक विघ्ने उभी ठाकली. यात राज्य सरकारने एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देत काहीसा दिलासा दिला असला तरी चाकरमान्यांचा मनस्ताप कमी झालेला नाही.

वाचा:

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याला अनुसरून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनीही नियमावली तयार केली आहे. ही नियमावली लक्षात घेता उद्यापासून मुंबईतून कोकणात येण्यासाठी निघणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला ४८ तास आधी करोना चाचणी करून घेण्याचे बंधन असणार आहे. त्यासोबतच जिल्ह्यात पोहचल्यानंतर ३ दिवस राहावं लागणार आहे. त्यामुळे कोकणच्या वाटेतील अडथळ्यांची मालिका सुरूच असून या स्थितीतही चाकरमान्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. विशेषत: नोकरदार वर्गासाठी इतकी मोठी सुट्टी मिळणे अशक्य असल्याने करोना चाचणीची अट पूर्ण करून गाव गाठण्याची मनाची तयारी अनेकांनी केली आहे. अशा चाकमान्यांचा ओघ उद्यापासून पाहायला मिळणार आहे.

वाचा:

उद्यापासून ‘हे’ आहेत नियम…

> १३ ऑगस्ट व नंतर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ४८ तास अगोदर कोविड-१९ ची चाचणी ( ) करून घ्यावी लागणार आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असला तरच कोकणात जाता येणार आहे. जिल्ह्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन दिवस होम क्वारंटाइन रहावे लागेल. तसे जिल्हा प्रशासनाने आधीच जाहीर केले आहे.

> एसटी बसने कोकणात येण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. मात्र, इतर खासगी गाड्यांनी येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक आहे.

> मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवरून १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान एसटी बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे संकेत ; जुलैमध्ये इंधन मागणीत घसरण

0

मुंबई : अनलॉकअंतर्गत वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली तरी इंधन मागणीत मात्र अपेक्षेनुसार वाढ झालेली नाही. जुलै महिन्यात झाल्याने अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचे दिसून आले आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात इंधनाचा मागणी ११.७ टक्क्यांनी कमी झाली आहे. इंधनाच खप हे अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे प्रतिबिंब दाखवत असते. मात्र गेल्या महिन्यात इंधन मागणी कमी झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन तेल कंपन्यांच्या ताब्यात देशातील ९० टक्के रिटेल विक्री केंद्रे आहेत. या तेल शुद्धीकरण कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुद्ध इंधनाच्या मागणीमध्ये डिझेलची मागणी दोन पंचमांश असते. ही मागणी जुलै महिन्यात १३ टक्क्यांनी कमी नोंदवली गेली. या महिन्यात ४.८५ टन डिझेलची विक्री झाली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात ही मागणी २१ टक्के होती, असे इंडियन ऑइलचे म्हणणे आहे. शुद्ध इंधनाची किरकोळीतील मागणी सातत्याने घटत चालल्यामुळे तेल शुद्धीकरणाच्या प्रमाणावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे याचा थेट परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर आणि पर्यायाने आर्थिक ताळेबंदावरही होई लागला आहे.

दरम्यान पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल ८०.४३ रुपये असून डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये आहे. तर डिझेल ७७.०४ रुपये प्रती लीटर आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४२ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सोलापूर: मुलगी तरुणासोबत पळाली; कुटुंबीयांनी वडिलांना झाडाला बांधून मारले

5

: सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी तरुणासोबत पळाली म्हणून रागाने तिच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या वडिलांना झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातील भाळवणी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका ५० वर्षांच्या व्यक्तीला तरुणीच्या कुटुंबीयांनी झाडाला बांधून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांची मुलगी या व्यक्तीच्या मुलासोबत पळून गेली होती. त्यामुळे त्यांनी रागातून तरुणाच्या वडिलांनाच मारहाण केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणीचे वडील आणि काही नातेवाइकांसह नऊ जणांविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. १ ऑगस्ट रोजी पीडित व्यक्तीच्या मुलासोबत तरुणी पळून गेली होती. तिच्या आईवडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. काही दिवसांनी तरूण आणि तरूणी दोघेही लग्न करून घरी परत आले. त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तिथे ही दोन्ही मुलेही होती. गावात तुमचं लग्न लावून देऊ असे सांगून तरुणीचे पालक दोघांना सोबत घेऊन गेले. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतर दोघेही पुन्हा ७ ऑगस्ट रोजी पुन्हा पळून गेले. मुलीचे वडील आणि तिचे नातेवाइक संतापले. ते सर्व तातडीने तरुणाच्या घरी पोहोचले. घरात त्याचे वडील होते. त्यांना तरुणीच्या कुटुंबीयांनी एका झाडाला बांधले आणि बेदम मारहाण केली. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांसह नऊ जणांविरोधात पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

आयपीएलमध्ये संधी न मिळाल्यामुळेच मुंबईच्या युवा क्रिकेटपटूची आत्महत्या

5

यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये आपल्याला संधी मिळेल, असे मुंबईच्या एका युवा क्रिकेटपटूला वाटत होते. पण यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे मुंबईच्या युवा क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याचे आता समोर आले आहे.

आयपीएलमध्ये खेळलो की आपण प्रसिद्ध होतो आणि त्यानंतर बऱ्याच संधी आपल्याला मिळतात, असा युवा क्रिकेटपटूंचा ग्रह आहे. त्यामुळे काहीही करून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी आपल्याला लवकर मिळायला हवी, यासाठी युवा खेळाडू प्रयत्नशील असतात. पण आयपीएल सोडल्यास अन्य क्रिकेटचा ते जास्त विचार करत नाहीत. त्यामुळे आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही तर क्रिकेटपटू निराश होतात. या गोष्टीमुळे निराश झालेल्या युवा क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याचे मुंबईच्या पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले आहे.

मुंबईमधील कुरार पोलिस स्टेशनमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये संधी न मिळाल्यामुळे मुंबईचा युवा क्रिकेटपटू करण तिवारी हा निराश झाला होता. सूत्रांनी सांगितले की, ” यावर्षी होणाऱ्या आयीएलमध्ये संधी न मिळाल्यामुळे करण हा निराश झाला होता. करणने ही गोष्ट उदयपूर येथे राहणाऱ्या आपल्या सर्वात जवळच्या मित्राला फोन करून सांगितली. त्याचबरोबर आपण निराश झाल्यामुळे आत्महत्या करायला जात आहोत, असेही त्याने आपल्या मित्राला सांगितले. त्यानंतर या मित्राने त्याच्याच शहरात राहणाऱ्या करणच्या बहिणीला फोन करून ही माहिती दिली. करणच्या बहिणीने त्याच्या आईला ही गोष्ट त्वरीत सांगितली. पण तोपर्यंत उशिर झाला होता. कारण तोपर्यंत आपल्या रुमचा दरवाजा बंद करून करणनने आत्महत्या केली होती. त्यानंतर करणला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, पण हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.” (दैनिक जागरण या वृत्तसंस्थेने ही बातमी पहिल्यांदा दिली होती.)

करण सोबत त्याची आई आणि भाऊ राहत होता. त्याच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार संधी मिळत नसल्याने करण गेल्या काही दिवसांपासून निराश होता. करणने आत्महत्या करण्याआधी राजस्थानमधील एका मित्राला फोन केला होता. आपल्याला संधी मिळत नसल्याबद्दल निराश असल्याचे त्याला सांगितले होते. तसेच मी आयुष्य संपवण्याचा विचार करत असल्याचे करणने मित्राला सांगितले होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर १०.३०च्या सुमारास करण त्याच्या बेडरूममध्ये गेले आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला. गेल्या काही वर्षांपासून करण संधीची वाट पाहत होता, असे त्याचा मित्र आणि अभिनेता जितू वर्मा याने सांगितले. मुंबईच्या सिनिअर संघाचे कोच विनायक सामंत यांनी सांगितले की, त्यासाठी चांगला क्रिकेट क्लब आम्ही शोधत होतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

भरदिवसा थरार! दुचाकी अडवली, लूटमारीनंतर काही मिनिटांत तरूण पसार

5

म. टा. प्रतिनिधी, सांगली: सांगलीतील वाल्मिकी आवास परिसरात दोन अज्ञात तरुणांनी एका व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून लुटले. १८ ते २० वयोगटातील तरुणांनी व्यावसायिकाचा मोबाइल आणि पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. याबाबत चंपालाल कोटेचा (वय ४९, रा. कलानगर) या व्यावसायिकाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कोटेचा हे दुचाकीवरून मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास जुना बुधगाव रस्त्यावरून निघाले होते. वाल्मिकी आवास परिसरात १८ ते २० वर्षे वयोगटातील दोन तरुणांनी त्यांना आडवले. चाकूचा धाक दाखवत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या दोघांनी त्यांच्याकडील मोबाइल, पैशांचे पाकीट आणि दुसऱ्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. यासह पाकिटातील एटीएम कार्ड, आधार कार्ड आणि लायसन्स घेऊन ते पसार झाले. भरदिवसा व्यावसायिकाला लुटल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी दीपक कोटेचा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सुशांतसिंग राजपूतच्या प्रेमात रिया चक्रवर्ती का पडली, सांगतोय भारतीय क्रिकेटपटू…

5

भारतामध्ये सध्याच्या घडीला बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे आणि तिची कसून चौकशी केली जात आहे. पण आता तर एका भारताच्या क्रिकेटपटूने सुशांतसिंग राजपूतच्या प्रेमात रिया चक्रवर्ती का पडली, याबाबत काही गोष्टी सांगितल्याचे पाहायला मिळत आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांना बिहारमध्ये पोलिसांत जाऊन एक तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार सुशांतची प्रेयसी रियाने त्याचे बरेच पैसे लाटले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. सुशांतच्या खात्यामधून रियाने बरेच पैसे काढून आपल्या नातेवाईकांना दिले, असेही या तक्रारीमध्ये म्हटले गेले आहे.

रिया आणि सुशांत यांचे प्रेमप्रकरण आता चांगलेच गाजत आहे. पण रिया सुशांतच्या प्रेमात का पडली असावी, याबाबत भारताच्या एका क्रिकेटपटूने आपले मत व्यक्त केले आहे. रियाचे सुशांतच्या प्रेमात पडणे हे साहजिकत होते, कारण सुशांतकडे भरपूर पैसे आणि प्रसिद्धी होती. या क्रिकेटपटूने ट्विट करून नेमके काय म्हटले आहे, ते पाहूया…

भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने रियाला उद्देशून एक ट्विट केले आहे. यापूर्वीही मनोजने सुशांतबाबत ट्विट केलेले होते. रियाबाबतच्या ट्विटमध्ये मनोजने म्हटले आहे की, ” हे सर्व लबाड लोकांसाठी आहे. पैसा हा फक्त आळशी मुलींना प्रभावित करत असतो. ज्या महिलेकडे गुणवत्ता आहे ती हेमनत करते. जेव्हा एखादी महिला मेहनत करत असते आणि तिला जेव्हा जोडीदार म्हणून श्रीमंत माणूस भेटतो तेव्हा तिच्यासाठी तो एक बोनस असतो. यशस्वी होण्याची ती एक शिडी नक्कीच नसते.”

या ट्विटमधून मनोजने रियाला चांगलेच सुनावले आहे. रियाकडे गुणवत्ता नव्हती, त्यामुळेच तिने सुशांतचा आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिडीसारखा वापर केला, असा मनोजच्या ट्विटचा अर्थ निघत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयमार्फत सुरू असला तरी अंमलबजावणी संचलनालयाच्याकडून देखील या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत.

रियानं महेश भट्ट यांच्या मदतीनं सुशांतला त्रास दिला आणि त्यामुळंच त्यानं आत्महत्येचं पाऊल उचचलं असंही म्हटलं जात आहे. त्यामुळं रिया आणि महेश भट्ट यांच्यातील नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. इतकंच नव्हे तर जेव्हापासून महेश भट्ट यांनी रिया चक्रवर्तीला सुशांतला सोडण्याचा सल्ला दिला होता असं समोर आलं आहे, तेव्हापासून ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महेश भट्ट यांची जुलैमध्ये मुंबई पोलिसांनी चौकशी केली होती.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा रिया आणि महेश भट्ट यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तेव्हा देखील तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. या टीकेला उत्तर देताना तिनं एक पोस्ट शेअर केली होती. महेश भट्ट यांच्यासोबत एक फोटो शेअर करत ‘तू कौन हैं , तेरा नाम हैं क्या ? सीता भी यहाँ बदनाम हुई’, असं रियानं म्हटलं होतं.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Latest posts