Friday, January 27, 2023
Home Blog Page 5231

संजय दत्त पुन्हा गोत्यात; सुटकेविरोधात हायकोर्टात याचिका

0

मुंबई: मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेला अभिनेता याच्या अडचणी पुन्हा वाढण्याची चिन्हं आहेत. संजय दत्त याच्या सुटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्याला तुरुंगातून सोडण्यात आल्याचा आरोप एका याचिकेद्वारे करण्यात आला आहे. (Petition against Sanjay Dutt’s release)

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी ए. जी. उर्फ अरीवू यानं मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातील याचिका केली आहे. पेरारीवलन हा सध्या चेन्नईतील तुरुंगात आहे. संजय दत्तप्रमाणेच त्यालाही बेकायदा शस्त्रास्त्रविरोधी कायद्यांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. नऊ व्होल्टच्या दोन बॅटरी उपलब्ध करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या बॅटरींचा वापर राजीव गांधी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये करण्यात आला होता. याच प्रकरणात पेरारीवलन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील २९ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या पेरारीवलन यानं तुरुंग प्रशासनाकडून संजय दत्तच्या शिक्षेतील कपातीबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती त्याला मिळू शकली नाही. त्यामुळं त्यानं न्यायालयात धाव घेतली आहे. अॅड. नीलेश उके यांच्यामार्फत त्यानं न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वेळेआधी सुटला होता संजय दत्त

संजय दत्त याला २००६-०७ साली विशेष न्यायालयानं शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवून सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना ही शिक्षा एका वर्षाने कमी केली होती. त्यानंतर मार्च २०१३ साली संजय दत्त तुरुंगात गेला. शिक्षा भोगत असताना त्यांना अनेकदा पॅरोलवर सुट्टी देण्यात आली होती. शिवाय, २५ फेब्रुवारी २०१६ रोजी २५६ दिवस आधी त्याची तुरुंगातून सुटकाही करण्यात आली.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

यंदा दहहंडी साजरी करू नका; मनसेचं गोविंदा पथकांना आवाहन

18

मुंबई: राज्यात करोनाचं संकट असल्याने यंदा साजरा करू नका. दहीहंडी उत्सव साजरा न करण्याची संयमी भूमिका घेऊन करोनाला आळा घालूया, असं आवाहन मनसेने केलं आहे. यंदा हिरमोड झाला तरी पुढच्यावर्षी दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा करू, असंही मनसेने म्हटलं आहे.

यंदा राज्यावर करोनाचं संकट असल्याने सर्वधर्मीयांनी सण-उत्सवाला उत्सवी रुप देणं टाळलं आहे. अनेकांनी घरातच सण साजरे करून राज्यशासनालाही करोना रोखण्यासाठी सहकार्य केलं आहे. या आधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सव रद्द केल्याची घोषणा केलेली असतानाच आता मनसेनेही राज्यातील गोविंदा पथकांना यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. मनसेचे नेते, माजी आमदार यांनी एक पत्रक काढून हे आवाहन केलं आहे.

मी स्वत: गोविंदा आहे. त्यामुळे या सणाचं महत्त्व आणि उत्सुकता जाणून आहे. आमचा पक्ष हा कायमच आपले सर्व हिंदू सण थाटात, उत्साहात साजरे करावे हीच भूमिका वर्षानुवर्षे मांडत आला आहे. गोविंदाच्या थरांपासून ते अनेक विषयाबाबत आमचा पक्ष प्रत्येक वेळी गोविदांच्या बाजून उभा राहिला आहे. मात्र, यावेळी परिस्थिती ही अतिशय वेगळी आहे, या करोना महामारीमुळे यावर्षी आपण सर्वांनी जाहीर दहीहंडीचा उत्सव साजरा करू नये. यावर्षी जरी आपला हिरमोड होणार असला तरी पुढील वर्षी हा उत्सव आपण एकदम जल्लोषात व उत्साहात साजरा करून ती कसर भरून काढू, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

यावर्षी संयमी भूमिका घेऊन करोना महामारीला आळा घालूया, असं आवाहन त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व महाराष्ट्रातील इतरही शहरात दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांना व समस्त महाराष्ट्रातील बालगोपाळाना केलं आहे. यंदा दहहंडी साजरी न करण्यासंदर्भात फोनद्वारे मुंबई ‘दहीहंडी समनव्य समितीतील’ अनेक सदस्यांशी बोलून त्यांचं मन वळवणार असल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि मिरा-भाईंदरमध्ये एकूण ८०० ते ९०० गोविंदा पथके आहेत. या सर्व गोविंदा पथकांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा आधीच निर्णय घेतला आहे. त्यातच मनसेनेही हे महत्त्वाचं आवाहन केल्याने यंदा राज्यात दहीहंडी उत्सव साजरा होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'शिवसेनेला उपरती झाली तर एकत्र येऊ, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही'

5

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, असं वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी काही वेळातच याबाबत खुलासा केला आहे. ‘एकत्र यायला तयार आहोत याचा अर्थ आम्ही हात पुढे केला असा अर्थ नाही. शिवसेनेला उपरती झाली तर ते येतील. आम्ही त्यांच्याकडं जाणार नाही,’ असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ( on Shivsena-BJP Alliance)

हेही वाचा:

कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबत वक्तव्य केलं होतं. ‘राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही शिवसेनेसोबत आजही एकत्र यायला तयार आहोत. केंद्रीय नेतृत्वानं एखादा फॉर्म्युला तयार केला आणि मुख्यमंत्री यांना तो मान्य झाला तर भाजप-शिवसेना एकत्र येऊ शकते. आम्हाला केंद्राचे आदेश पाळावेच लागतात,’ असं ते म्हणाले होते. पाटलांच्या या वक्तव्यामुळं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेचच पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘शिवसेनेला उपरती झाली तर ते आमच्याकडे येतील. आम्ही तसा कुठलाही प्रयत्न करणार नाही. आताही शिवसेनेला आमच्यासोबत सरकार स्थापन करायचं असेल तर आम्ही एकत्र येऊ. काँग्रेस व राष्ट्रवादीला बाजूला ठेवायचं असं उद्धव ठाकरे यांना वाटलं तर केंद्रीय नेतृत्वाला ते तसं सांगतील. या भविष्यातील शक्यता आहेत,’ असंही ते म्हणाले.

हेही वाचा:

शिवसेना सोबत येण्याची शक्यता व्यक्त करताना पाटील यांनी बिहारचा दाखला दिला. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दलानं लालूप्रसाद यादव यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. त्यांच सरकारही स्थापन झालं. मात्र, त्यांचं जमलं नाही आणि एका वर्षात त्यांनी राजीनामा दिला. नंतर भाजपला एकत्र घेऊन सरकार स्थापन केलं होतं. महाराष्ट्रातही तसं होऊ शकतं,’ असं पाटील म्हणाले. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अंकितानं पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं; व्हिडिओ होतोय व्हायरल

5

मुंबई: अभिनेता याच्या निधनाच्या धक्क्यातून त्याची एक्स गर्लफ्रेंड सावरण्याचा प्रयत्न करतेय. सोशल मीडियावर सतत काही तरी मजेशीर पोस्ट शेअर करणारी अंकिता गेल्या महिन्यापासून गप्प झाली. सुशांतच्या निधनाला एक महिना झाल्यानंतर तिनं पहिली पोस्ट शेअर केली होती त्यानंतरही सुशांतसाठी तिनं आणखी दोन पोस्ट शेअर केल्या.

सुशांत या जगात नाहीए यावर विश्वास ठेवणं तिला अवघड जात असून त्याच्या आठवणीत तिनं देवापुढं दिवा लावला. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर अंकितानं दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर ती काल घराबाहेर पडली. काही सामान घेण्यासाठी अंकिता तिच्या आईसोबत एका दुकानात आली होती.यादरम्यान अंकितानं असं काही केलं त्यामुळं चाहत्यानी तिचं कौतुक केलं आहे.

अंकिता आणि तिची आई एका दुकानात काही सामान खरेदी करत होते. दुकानात असलेल्या अंकिताचं लक्ष दुकानाबाहेर उभ्या असलेल्या काही गरजू मुलांकडं गेलं. त्यानंतर अंकितानं दुकानातून काही चॉकलेट्स खरेदी केले आणि त्यांना दिले. अंकिताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून तिनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

दरम्यान, सुशांतच्या अखेरच्या चित्रपटाबद्दल देखील अंकितान एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. पवित्र रिश्ता ते दिल बेचारा…! एकदा शेवटचं….असं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अंकितानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील अंकिताला धीर देण्याचा प्रयत्न केलाय. सुशांतच्या निधनानंतर अंकिता मनानं खचली असल्याचं पाहायला मिळतंय. सुशांतच्या निधनापूर्वीची अंकिता आणि सध्याची अंकिता याच्यात खूपच फरक असल्याचं चाहते म्हणतायत. सतत सोशल मीडियावर काही तरी पोस्ट करणारी अंकिता अचानक आता गप्प झाली. तिनं गेल्या महिन्यापासून तीन पोस्ट शेअर केल्या, त्या देखील सुशांतसाठीच आहेत. त्यामुळं तिला या धक्क्यातून सावरण्यासाठी आणखी वेळ हवा आहे, असं तिच्या जवळच्या मैत्रिणीनं म्हटलं आहे.

‘पवित्र रिश्ता’
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांत आणि अंकिता एकत्र काम करत होते. त्यानंतर सुशांतनं मालिका सोडली आणि तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथं स्थिरावण्यासाठी त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केले. या दरम्यानच दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर २०११मध्ये एका डान्सरिअॅलिटी शोमध्ये सुशांतनं अंकिताला मागणी घातली होती. तिनंही त्याला होकार दिला. आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण काही दिवसानंतर एका पार्टीमध्ये अंकितानं सुशांतला एक सणसणीत थोबाडीत दिल्याच्या बातम्यांनी मध्ये खळबळ उडवून दिली होती. पण त्यानंतर दोघांनीही या घटनेचा इन्कार केला होता‘आमच्यात असं काही झालेलंच नाही. आम्ही पूर्वीसारखेच एकमेकांच्या गाढ प्रेमात आहोत. आमच्याविषयी असं काहीतरी छापणाऱ्या लोकांची तर आम्हाला कीवच येते.’असं या दोघांचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'करोनाग्रस्त मुख्यमंत्र्यांना सरकारी रुग्णालयावर भरवसा नाही काय?'

5

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करोना संक्रमित असल्याचं आढळल्यानंतर एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांचा करोनाचा दुसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह आलाय. दुसरीकडे, विरोधकांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या खासगी रुग्णालयावर दाखल होण्याच्या निर्णयावरून सरकारला घेरलंय.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भोपाळच्या चिरायु रुग्णालयात दाखल झालेत. इथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयातून सरकारी काम हाताळत आहेत. मंगळवारी मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळासोबत एक व्हर्च्युअल बैठकही आयोजित करण्यात आलीय. मंत्रिमंडळाचे सदस्य आपापल्या स्थानावरून या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे सहभागी होणार आहेत.

दुसरीकडे, भाजपमुळे सत्तेतून पायउतार व्हावं लागणाऱ्या नेत्यांनी मात्र शिवराज सरकारवर टीका करण्याची संधी साधलीय. काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या खासगी रुग्णालयात दाखल होण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलंय. ‘मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सरकारी रुग्णालयांवर भरवसा नाही, त्यामुळेच ते खासगी रुग्णालयात दाखल झालेत’ असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय.

वाचा :

वाचा :

‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भागात येणारं सरकारी हमीदिया रुग्णालय सोडून खासगी रुग्णालय स्वत:वर उपचारासाठी का निवडलं?’ असा प्रश्न काँग्रेस नेते यांनी विचारलाय. ‘जेव्हा काँग्रेस नेते कमलनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यावर याच हमीदिया रुग्णालयात शस्रक्रिया पार पडली होती. तेव्हा त्यांच्यापाशीही देशातील कोणत्याही बड्या खासगी हॉस्पीटलचा पर्याय असून त्यांनी सरकारी रुग्णालयाची निवड केली होती’ अशी आठवणही शर्मा यांनी यावेळी करून दिली होती.

आरोग्य मंत्री विश्वास सारंग यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, जे आरोग्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सरकारी हमीदिया रुग्णालयाच्या सुविधांचा विश्वास देऊ शकले नाहीत ते सामान्य जनतेला काय देणार?

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यात आत्तापर्यंत ८२० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अद्याप वेगवेगळ्या रुग्णालयांत ७ हजार ९७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. समाधानकारक बाब म्हणजे, १९ हजार ७९१ रुग्णांनी यशस्वीरित्या करोनावर मात केलीय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'भावाला मंत्रिपद न मिळाल्याचा सूड संजय राऊतांनी उगवला'

5

मुंबई: मुख्यमंत्री यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीची ‘तरुण भारत’ (नागपूर) या वृत्तपत्रातून खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘उद्धव यांची ही मुलाखत खदखदून हसवणारी होती. या मुलाखतीच्या आडून भावाला मंत्रिपद न मिळाल्याचा सूडच संजय राऊत यांनी उद्धव यांच्यावर उगवला,’ अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे.

नागपूर येथून प्रकाशित होणारे ‘तरुण भारत’ हे दैनिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक नाते सांगणारे आहे. आठ महिन्यांपूर्वी भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा आल्यानंतर ‘तरुण भारत’नं सातत्यानं भाजपची भूमिका मांडण्याचं काम केलं होतं. एरवीही ‘तरुण भारत’मधून भाजपवरील टीकेला उत्तर दिलं जातं. या वृत्तपत्राचे सहयोगी संपादक श्रीनिवास वैद्य यांनी आजच्या लेखातून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाष्य केलं आहे. ‘खळबळजनक अशी जाहिरात केलेली ही मुलाखत प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांची टिंगलटवाळी करणारी ठरली. आरशासमोर बसून मुख्यमंत्री आपलं प्रतिबिंब पाहताहेत असं वाटत होतं. ही मुलाखत पाहून अस्सल शिवसैनिकांनी दारे-खिडक्या बंद करून आपली डोकी भिंतीवर आपटून घेतली असतील,’ असा जोरदार टोलाही लगावण्यात आला आहे.

मुलाखतीत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हचं कौतुक केलं होतं. ‘राज्याचे मुख्यमंत्री जागतिक आरोग्य संघटनेला मार्गदर्शन करताहेत असं फेसबुक लाइव्ह पाहताना वाटत होतं. हे ज्ञान तुम्ही कुठून मिळवलं’, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. हा प्रश्न विचारून संजय राऊत यांनी ठरवून उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणले, असा आरोप लेखातून करण्यात आला आहे.

हेही वाचा:

संजय राऊत यांच्यावरही लेखातून तोफ डागण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या कृपेनं संपादक व खासदार झालेली व्यक्ती जेव्हा त्या कुटुंबप्रमुखाची मुलाखत घेईल, तेव्हा ते स्तोत्र असणे स्वाभाविक आहे. पण ही मुलाखत त्यापुढं जाऊन लाळघोटेपणाचा नवा नीचांक प्रस्थापित करणारी ठरली. संजय राऊत यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मुख्यमंत्र्यांनाही काही वाटलं नाही, हे देखील आश्चर्य आहे. करोनासारख्या संवेदनशील मुद्द्यावर भारतातील नामवंत डॉक्टरांचे ज्ञान आपल्यापुढे तोकडे आहे हे मुख्यमंत्र्यांनी मान्य करणे म्हणजे हद्दच झाली. देशातील समस्त डॉक्टरांचा हा अपमान आहे. महाराष्ट्रातील जनतेला मान खाली घालायची वेळ आली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रानेच काय, पण भारतानेही पाहिला नसेल आणि तो कुणाच्याही नशिबी येऊ नये,’ अशी बोचरी टीका लेखातून करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

भारतीय क्रिकेट खेळाडूंची सॅलरी स्लिप सोशल मीडियावर; पाहा व्हायरल पोस्ट

5

नवी दिल्ली: यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने १९८३ सालचा वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर २०११ साली महेंद्र सिंह धोनीच्या नेृत्वाखाली भारताने वानखेडे मैदानावर दुसरा वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून खेळाडूंना मोठी रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली. त्या तुलनेत १९८३ साली पहिला वर्ल्ड कप जिंकलेल्या संघातील खेळाडूंना अगदी अल्प मानधन आणि बक्षिस मिळत असे.

सध्या बीसीसीआय खेळाडूंसोबत वार्षिक करार करते आणि या करारानुसार त्यांना पैसे मिळतात. याशिवाय जाहिरातीच्या माध्यमातून क्रिकेटपटू मोठी कमाई करतात. सध्या काही खेळाडू सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून पैसे कमवतात. सध्याच्या करारानुसार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना सर्वाधिक ७ कोटी इतके मानधन मिळते.

वाचा-
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू याने १९८३ साली वर्ल्ड कप विजेत्या संघाचे पे-स्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पे-स्लिपनुसार भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला २ हजार १०० रुपये दिले होते. ही पे-स्लिप शेअर करताना रमीझ राजाने १९८६-८७ साली जेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा ५ कसोटी आणि ६ वनडे सामने खेळण्यासाठी ५५ हजार रुपये मिळाल्याचे सांगितले.

भारताने २०११ साली दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. या विजेत्या संघातील खेळाडूंना बीसीसीआयने दोन कोटी दिले होते. पण ८३च्या विजेत्या संघातील खेळाडू इतके नशिबवान नव्हते. लता मंगेशकर यांनी नॅशनल स्टेडियमवर एक कार्यक्रम केला होता. यातून जमा झालेल्या पैशातून प्रत्येक खेळाडूला एक-एक लाख रुपये देण्यात आले होते.

वाचा

१९८३ साली लॉर्ड्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अंतिम लढत झाली. तेव्हा वेस्ट इंडिज संघाने सलग दोन वर्ल्ड कप जिंकले होते आणि ते सलग तिसऱ्या फायनलमध्ये पोहोचले होते. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव ५४.४ षटकात फक्त १८३ धावांवर संपुष्ठात आला. के.श्रीकांत यांनी सर्वाधिक ३८ धावा तर मोहिंदरअमरनाथ यांनी २६ धावा केल्या. त्याआधीच्या सामन्यात झिम्बब्वे विरुद्ध नाबाद १७५ धावांची वादळी खेळी करणारा भारताचा कर्णधार कपिल देव फक्त १५ धावा करून बाद झाला.

तिसऱ्या विश्व विजयासाठी फक्त १८६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने जल्लोषाची तयारी केली होती. पण टीम इंडियाच्या मनात काही वेगळेच सुरू होते. वेस्ट इंडिजची पहिली विकेट ५ धावांवर पडली. त्यानंतर पुढच्या ६१ धावात वेस्ट इंडिजची अवस्था ५ बाद ६६ अशी झाली. वेस्ट इंडिजची पाचवी विकेट त्यांचा कर्णधार सर क्लाइव्ह लॉईड यांची होती. या सामन्यात कपिल देवने व्हिव्ह रिचर्ड्सचा शानदार असा कॅच घेतला होता.

त्यानंतर वेस्ट इंडिजा डाव ५२ षटकात १४० धावात संपुष्ठात आला आणि भारताने ४३ धावांनी विजय मिळवत पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. भारताकडून अमरनाथ आणि मदनलाल यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

'राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही हे त्यांना माहीत आहे'

4

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर टीका करताना त्यांना नारायण राणेंचा दाखला देणारे शिवसेनेचे माजी आमदार यांच्यावर भाजपचे आमदार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही हे त्यांना माहीत आहे,’ असा बोचरा टोला नीतेश यांनी क्षीरसागर यांना हाणला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. मुख्यमंत्री ठाकरे हे मीडियाला मुलाखत न देता केवळ ‘सामना’ला मुलाखत देतात, राज्यात न फिरता ‘मातोश्री’वर बसून राज्यकारभार करतात, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला क्षीरसागर यांनी सोमवारी उत्तर दिलं होतं. ‘पाटील हे अचानक आंबा पडल्यासारखे मोठे झालेले नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करू नये. असे अचानक मोठे झालेले कोणत्याही क्षणी पायदळी येऊ शकतात हे लक्षात ठेवावे. शिवसेनेवर टीका करतात त्यांची काय अवस्था होते, त्यांचा शेवट कसा होतो, याचा अनुभव नारायण राणे यांना आला आहे,’ असं क्षीरसागर म्हणाले होते.

पाटलांना इशारा देताना क्षीरसागर यांनी नारायण राणेंचा उल्लेख केल्यानं नीतेश राणे भडकले आहेत. त्यांनी लगेचच ट्वीट करून क्षीरसागर यांच्यावर तोफ डागली आहे. ‘राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही हे राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या भुंकणाऱ्यांना माहीत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीचे बिस्कीट आमचं नाव घेतले की मिळेल असा त्यांचा गैरसमज झाला असेल, असं नीतेश यांनी म्हटलं आहे. पण रामदास कदम सारख्यांचे किती दात उरले आणि काय अवस्था मातोश्रीने केली हेही लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

मुंबईतील प्रख्यात बिल्डरचा करोनामुळे मृत्यू; नोकरानं डाव साधला, पण

5

मुंबई: संकटात सगळेच होरपळून निघाले आहेत. मात्र, या करोना संकटातही काहींच्या संवेदना मरून गेल्यात. मुंबईतील एका प्रख्यात बिल्डरचा करोनानं मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या पश्चात नोकरांनी डाव साधला. त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचे प्रयत्न केले. कांदिवली क्राइम ब्रांचने या नोकरांचा डाव उधळला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शफीक शेख, प्रीतेश मांडलिया, अर्शद सय्यद, स्वप्नील ओगेलेकर अशी या आरोपींची नावे आहेत. यातील शफीक शेख हा याच बिल्डरकडे नोकरी करतो. त्यानेच हा कट रचला. अटक केलेल्या आरोपींपैकी शफीक हा बिल्डरकडे काम करत होता. काही दिवसांपूर्वी ८१ वर्षीय बिल्डरचे करोनामुळे निधन झाले. बिल्डर कोणती कागदपत्रे, महत्वाचे दस्तावेज कुठे ठेवायचा हे शफीकला माहिती होते. तो काहीतरी बहाणा करून ऑफिसमध्ये गेला. त्याने बिल्डरचा चेकबुक चोरी केला. त्यातील काही चेकवर सह्या करून ठेवल्या होत्या. त्याने ऑफिसमधून बिल्डरचा आधार कार्ड घेतला. त्याची झेरॉक्स काढून त्यावर आपल्या एका साथीदाराचा फोटो लावला. त्यानंतर एक नवीन झेरॉक्स काढली. ती घेऊन तो एका मोबाइल गॅलरीत गेला आणि तेथून बिल्डरच्या नावानं सिमकार्ड खरेदी केला. बिल्डरच्या खात्यातून रक्कम ट्रान्सफर करताना ओटीपी मिळावा म्हणून त्याने हे कृत्य केले. मात्र, शफीक आणि त्याच्या साथीदारांचा हा डाव उधळून लावला. कांदिवली क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव आणि शरद झीने यांच्या पथकाने त्यांना अटक केली. शफीकसह चौघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ३१ जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

स्वस्त कर्ज हवंय ; जाणून घ्या सध्याचे 'होम लोन'चे व्याजदर

5

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : गृहकर्जांच्या व्याजदरांवरून आता बँका आणि एनबीएफसींमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदर घटवून ६.८० टक्क्यांवर आणला आहे. या शिवाय बँकेने नोकरदार महिलांसाठी ६.७० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. मात्र, हा व्याजदर एक्स्टर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटवर (ईबीएलआर) अवलंबून असल्याने ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर ७००च्या वर आहे, त्यांनाच लाभ घेता येणार आहे.

सध्या बँकिंग यंत्रणेत आठ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोख रक्कम पडून आहे. या रकमेचा योग्य पद्धतीने विनिमय करण्यासाठी व्याजदर कमी करून कर्ज वाटपावर भर देण्यात येत आहे. तत्पूर्वी, रिझर्व्ह बँकेने रेपो दरांमध्ये कपात करून ही रक्कम बँकिंग व्यवस्थेत आणली आहे. त्यामुळे आता बँकांना कमीत कमी व्याजदराने कर्जे देण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. सध्या एमसीएलआरवर आधारीत अॅक्सिस बँकेचा व्याजदर ७.७० टक्के आहे. मात्र, गृहकर्जाचा बेस दर ८.८० टक्के आहे.

करोनाच्या साथीने बँकिंग व्यवस्थेला नव्या संकटात टाकले आहे. कर्ज हप्ते वसुलीस रिझर्व्ह बँकेनं मनाई केली आहे. जवळपास सहा महिने कर्जदारांची मासिक हप्त्यांपासून सुटका झाली आहे. त्यातच बुडीत कर्जाचे संकट गडद झाले आहे. करोना काळात लॉकडाउनमुळे किरकोळ कर्ज वितरणात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे बँकांकडे रोकड तरलता मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. रोखीला चालना देण्यासाठी बँकांनी गृह कर्ज आणि इतर कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका आणि बिगर बँकिंग वित्त संस्था यांच्यात स्पर्धा लागली आहे.

एचडीएफसी बँकेचा व्याजदर ६.९५ टक्के
सध्या एचडीएफसी बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर ६.९५ टक्के आहे. मात्र, त्यासाठी ग्राहकाचा सिबिल स्कोअर ७८० किंवा त्यापेक्षा वर असण्याची आवश्यकता आहे. हा दर १३ जूनपासून लागू करण्यात आला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार नोकरदार महिलांसाठी हा दर ६.९५ टक्के ते ७.४५ टक्क्यांच्या आसपास आहे. अन्य नोकरदारांसाठी हा दर ७ ते ७.५० टक्क्यांदरम्यान आहे. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर ६.९५ टक्के आहे.

स्टेट बँकेचा दरही ६.९५ टक्के
स्टेट बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर ६.९५ टक्के आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काही काळात बँका आणि एनबीएफसी यांच्यात व्याजदरावरून स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. त्यातून व्याजदर आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या बँका आणि एनबीएफसी अधिक दराने कर्ज देत आहेत, त्यांचे ग्राहक अन्य बँकांकडे वळत आहेत. युनियन बँकेचे गृहकर्जावरील व्याजदर ६.७० टक्के आहे. बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे सध्या ६.९५ टक्के दराने गृहकर्ज देण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts