Friday, January 27, 2023
Home Blog Page 5235

राम मंदिरासाठी सोन्या, चांदीच्या विटांचा ओघ; ट्रस्टने भाविकांना केले 'हे' आवाहन

0

व्ही.एन. दास, अयोध्याः राम जन्मभूमी मंदिर तीर्थ ट्रस्टने नागरिकांना आवाहन केले आहे. यापुढे चांदीच्या, सोन्याच्या विटांसह इतर दान स्वीकारणार नाही, असं ट्रस्टचे सरचिटणीस चंपताराय यांनी सांगितलंय. सोन्या, चांदी आणि इतर धातूंच्या विटा दान देऊ नये. त्याऐवजी दानशूरांनी ट्रस्टच्या खात्यात रक्कम जमा करावी, असं चंपतराय म्हणाले. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला अयोध्येत येत आहेत.

जानेवारीत काही नागरिकांनी चांदीच्या विटा दान केल्या. ते दान सामान्य समजलं गेलं. पण आता अनेक देणगीदार चांदी आणि सोन्याची साहित्य दान करण्यासाठी येत आहेत. पण याचे मूल्यांकन करणे ट्रस्टसाठी कठीण आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आतापर्यंत १ क्विंटलहून अधिक बहुमूल्य विटा

देणगीदारांकडून देण्यात येणाऱ्य सोन्या, चांदीच्या ठेवण्यासाठी बँकेत कोणतेही लॉकर नाहीत. यामुळे सर्व देणगीदारांना देणगी ऑनलाइन किंवा रोख रक्कम ट्रस्टच्या खात्यात जमा करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आतापर्यंत १ क्विंटलपेक्षा अधिक चांदी व इतर धातूंच्या विटा दान करण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले.

PM मोदी ५ ऑगस्टला अयोध्येत

राम मंदिरांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला अयोध्येत येणार आहेत. पंतप्रधानांचे वेळापत्रक निश्चित केले गेले आहे. सकाळी साडेअकरा वाजता ते अयोध्येत पोहोचतील आणि नागरिकांना संबोधितही करतील. अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून रामजन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय. विशेष पाहुण्यांसह साधु-संत आणि अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती आहे.

फक्त ३२ सेकंदात पायाभरणी

पंतप्रधान मोदी अयोध्येत राम मंदिरच्या प्रवासा दरम्यान भाषणही देतील. त्यांचा कार्यक्रम दोन तासांचा असेल. भूमिपूजनाची वेळ दुपारी १२.१५ मिनिटं आणि ३२ सेकंदाची आहे. यावेळी पंतप्रधान मोदी हे श्रीराम मंदिराचा शिलान्यासही करतील.

टाइम कॅप्सूल २०० फूट खाली ठेवला जाइल

रामजन्मभूमीचा इतिहास सिद्ध करण्यासाठी न्यायालयात दीर्घकाळ लढाई लढावी लागली. यामुळे आता राम मंदिर बांधताना ‘टाइम कॅप्सूल’ बनवून ते २०० फूट खोलवर ठेवले जाईल. भविष्यात जेव्हा कोणाला इतिहास पहायचा असेल तेव्हा रामजन्मभूमीच्या संघर्षाच्या इतिहासासह तथ्यही समोर येतील. यामुळे येथे कोणताही वाद उद्भवू शकणार नाही, असं रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य रामेश्वर चौपाल म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

गहलोतांचे धाबे दणाणले, सचिन पायलट गटाने जारी केला व्हिडिओ

5

जयपूर: राजस्थानमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे. बंडखोर नेते सचिन पायलट यांची काँग्रेसने हकालपट्टी केली. पण आता सचिन पायलट यांच्या गटाने सोमवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना हादरवले आहे. गहलोत गटातील १० ते १५ आमदार सचिन पायलट यांच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार हेमाराम चौधरी यांनी केलाय. या दाव्यामुळे बहुमताचा दावा करणारे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा गट हादराला आहे.

सचिन पायलट यांच्यासोबत असलेले तीन बंडखोर आमदार परण्यास इच्छुक असल्यातं काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यापूर्वी सांगितलं होतं. सुरजेवाला यांच्या या वक्तव्यानंतर पायलट गटाने एक व्हिडिओ जारी केलाय. सचिन पायलट यांच्या गटात असलेले ज्येष्ठ नेते हेमाराम चौधरी हे या व्हिडिओत दिसून येत आहेत. अशोक गहलोत याच्या गटातील १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. घेराबंदीतून मुक्त झाल्यानंतर लवकरच तुमच्याकडे येऊ असं ते आमदार सांगत आहेत. गहलोत यांनी आमदारांवरील बंधनं हटवली तर त्यांच्या बाजूने किती आमदार आहेत हे स्पष्ट होईल, असं हेमाराम चौधरी म्हणाले.

दुसरीकडे, राजस्थान सरकारवरील राजकीय संकट सोमवारी अधिक गहरे झाल्याचं चित्र होतं. राजभवनच्या प्रश्नांना शनिवारी रात्री उत्तर म्हणून गेहलोत सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलण्यासाठी पाठवलेला सुधारित प्रस्तावावरही राज्यपालांनी कुठलीच हमी दिली नाही. याउलट राज्यपाल कलराज मिश्र यांनी आणखी एक पत्र सरकारला पाठवले. तीन मुद्द्यांवर सहमती दर्शवल्यानंतरच सरकारला अधिवेशन बोलावता येईल, असं राज्यपालांनी या पत्रात कायदेशीर सल्ल्यानंतर स्पष्ट केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

क्रिकेटपटूला मिळाला प्रेमात धोका, पण त्यानंतरची लव्हस्टोरी ठरली सुपरहिट

5

काही जणांना आयुष्यात एकदा प्रेम करण्याची संधी मिळते, तर काही काहींना बऱ्याचदा ही संधी मिळते. कदाचित खरं प्रेम नेमकं, असतं तरी काय, हे सामजायला त्यांना जास्त वेळ लागत असावा. अशीच एक गोष्ट क्रिकेटपटूच्या बाबतीतही घडली. क्रिकेटच्या मैदानात धडाकेबाज फलंदाजी करणारा क्रिकेटपटू आपल्या प्रेयसीबरोबर डेटिंगही करत होता. पण काही काळात तिने त्याचा साथ सोडला. त्यामुळे तो निराश झाला होता. आता काय करायचे, हे त्याला समजत नव्हते. त्याचवेळी एक चेहरा त्याच्या समोरून गेला आणि पहिल्याच नजरेत तो एका मुलीच्या प्रेमात पडला.

बॉलीवूडच्या सिनेमाला साजेशी अशीच या क्रिकेटपटूची लव्ह स्टोरी आहे. कारण पहिल्या भेटीतच तो तिच्यावर फिदा झाला होता. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी काही ना काही युक्ती करायचा. महिन्याभरानंतर तो तिला डेटिंगवर घेऊन गेला होता. त्याचवेळी त्यांने आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितली आणि तिनेही होकार दिला. त्यानंतर या दोघांची लव्हस्टोरी सुपरहिट ठरल्याचे पाहायला मिळाले.

वाचा-

एका पार्टीमध्ये त्या दोघांची भेट झाली. ती खेळाशी निगडीत कार्यक्रम करायची, सूत्र संचालन करायची. त्यामुळे खेळाडूंच्या पार्टीमध्ये तिचं येणं जाणं होतं. यावेळी क्रिकेटपटूला ती आवडली आणि त्याने ही गोष्ट आपल्या सहकारी क्रिकेटपटूच्या पत्नीला सांगितली. त्यानंतर त्या क्रिकेटपटूच्या पत्नीने या दोघांची ओळख करून दिली आणि एका सुपरहिट लव्हस्टोरीला सुरुवात झाली.

ही लव्ह स्टोरी आहे तरी कोणत्या क्रिकेटपटूची…
क्रिकेटच्या मैदानात धडाकेबाज कामगिरीने त्याने सर्वांचे मन जिंकले होते, दिसायलाही तो हँडसम होता. पण पहिल्या प्रेम प्रकरणात त्याच्याबरोबर धोका झाला होता. पण त्यानंतरची त्याची लव्ह स्टोरी सुपरहिट ठरली होती. हा क्रिकेटपटू आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन.

एका पार्टीमध्ये वॉटसनला ली फर्लांग नावाची निवेदिका मनात भरली होती. ही गोष्ट त्याने आपल्या संघातील ब्रेट लीच्या बायकोला सांगितली. त्यानंतर ब्रेट लीच्या बायकोने वॉटसन आणि ली फर्लांग यांची ओळख करून दिली. त्यानंतर महिन्याभरात या दोघांनी डेटिंगला सुरुवात केली. चार वर्षे या दोघांनी डेटिंग केल्यावर २०१० साली लग्न केले. आता या दोघांना दोन अपत्यही आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी फडणवीसांचा अपशकुन; 'या' मंत्र्यांचा संताप

5

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगलं काम करत आहेत, वाढदिवसादिनी त्यांच्या संयमी व सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवं होतं. ते न करता त्यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी भाजपने कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्या कामाचे कौतुक राहू द्या; किमान अपशकुन तरी करू नका, असा सल्ला ग्रामविकास मंत्री यांनी भाजपला दिला. ( Slams And BJP )

वाचा:

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच जगातील २१० हून अधिक राष्ट्रांसह भारतातही करोना महामारीचा संसर्ग सुरू झाला . अशा परिस्थितीत प्रशासनाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना, एवढ्या कमी वेळेत करोना सारख्या या जागतिक महामारीवर राज्यात विजय दृष्टिक्षेपात आणला गेला आहे. त्यामुळेच खरंतर आजच्या वाढदिनी संयमी व सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवं होतं. परंतु; ते राहिलं बाजूलाच. त्यांच्यावर तोंडसुख घेऊन त्यांना अपशकुन घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्या या घाणेरड्या प्रयत्नाबद्दल आम्ही निषेधच व्यक्त करीत आहोत.’

वाचा:

फडणवीसांना मुश्रीफांचा खोचक सल्ला

मुश्रीफ म्हणाले, आज मुख्यमंत्री ठाकरे यांचा वाढदिवस. आजच भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणी बैठक बोलावली होती. या बैठकीतील विरोधी पक्षनेते यांचे भाषण दूरचित्रवाणीवर लाइव्ह ऐकले. संपूर्ण राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करीत असताना मात्र त्यांना अपशकुन करीत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर सातत्याने म्हणतात, महाराष्ट्रातील सरकार आम्ही पडणार नाही. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अंतर्गत विरोधामुळे सरकार पडेल, असाही दावा करतात. तर मग फडणवीसांना माझा सल्ला आहे, की शांत राहून आमच्यातील अंतर्गत विरोधामुळे सरकार पडायची तर वाट बघा. किमान एवढा तरी शहाणपणा शिल्लक ठेवा की! असा फटकाही मुश्रीफ यांनी लगावला.

वाचा:

काय म्हणाले फडणवीस?

आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेलो नाही. आम्ही संघर्षातून पुढं आलो आहोत. जमिनीवर राजकारण करणारे लोक आहोत. आमचा डीएनए संघर्षाचा आहे, असा अप्रत्यक्ष टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हाणला. करोनाच्या लढ्यात राज्यातील रिक्षा सरकार पुरतं अपयशी ठरलंय. पण त्याकडं लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आमच्यावर सरकार पाडण्याचा आरोप केला जात आहे. रोज तेच तुणतुणं लावलं जातंय. सरकार पाडून दाखवा असं आव्हान दिलं जातंय. स्वत:च मारायचं आणि स्वत:च रडायचं यातला हा प्रकार आहे. पण आम्हाला सरकार पाडण्यात अजिबात रस नाही. आम्ही ते पाडणार नाही. तुम्ही सरकार चालवून दाखवा, असं आव्हान फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिलं.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोनाबाधितांना मदत करण्यासाठी पुढे आली अपंगांची टीम

5

शरीर सुदृढ नसले तरी मन आणि विचार चांगले असले की चांगले काम नक्कीच घडते. या गोष्टीचा उत्तम वस्तुपाठ दाखवून दिला आहे तो भारतातील अपंगांच्या संघाने. भारतातील करोनाग्रस्तानांच्या मदतीसाठी या अपंगांच्या टीमने धाव घेतली असून ते हे पुण्यांचे काम करत असल्याचे आता समोर आले आहे.

आतापर्यंत या अपंगांच्या संघाने २ लाख ५० हजार जेवणाची पॅकेट्स वाटलेली आहेत. त्याचबरोबर सध्याच्या काळात पीपीई किट्स महत्वाच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी २२ हजार पीपीई किट्सही वाटल्या आहेत. त्याचबरोबर १६ हजार अन्न-धान्यांची पाकिटंही त्यांनी वाटल्याचे पुढे आले आहे. रेड झोन असो किंवा कोणताही भाग, या अपंगांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हे काम केल्याचे पाहायला मिळत आहे.

क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन इंडियाचे (सीएबीआई) जी. महंतेश आणि संघातील दृष्टीहीन आणि अपंग खेळाडूंनी करोना व्हायरसच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. ज्यामुळे हजारो करोनाबाधितांना फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोणतीही तमा न बाळगता हे अपंग खेळाडू करोनाबाधितांना घरी जाऊन मदत करत असल्याचे आता समोर आले आहे. सध्याच्या काळात जे रोजंदारीवर असलेले कामगार आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना दोन वेळचे जेवण कसे देता येईल, यासाठी महंतेश आणि त्यांची अपंगांची टीम प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला गरज आहे, त्याला कुठेही न जाता आपल्या घरीच सर्व काही मिळायला हवे, यासाठीही ते प्रयत्न करत आहेत.

महंतेश यांनी सोमवारी सांगितले की, ” करोनामुळे देशांतील असहाय्य लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदत करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. ज्यांना खरंच गरज आहे आणि ज्यांच्यावर वाईट परिस्थिती आली आहे त्यांना आम्ही घरी जाऊन मदत करत आहोत. त्यासाठी कोण कोणत्या विभागात राहतं, याची पर्वा आम्ही करत नाही. करोनाच्या काळात उपासमारीमुळे कोणावर मृत्यूची वेळ येऊ नये, असे आम्हाला वाटते. त्याचबरोबर २२ पीपीपई किट्सही आम्ही वाटलेल्या आहेत. जेवढे आम्हाला शक्य आहे तेवढी समाजाला नक्कीच आम्ही करत राहणार आहोत. यासाठी आम्हाला काही जणांचे अर्थसहाय्यही मिळत आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

शुभसंकेत: २४ तासांत ८७०६ रुग्ण करोनामुक्त; नवीन बाधितांची संख्या घटली

0

मुंबई: राज्यात संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत असताना करोनाच्या आजच्या आकडेवारीतून मोठा दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. राज्यात आज तब्बल ८७०६ रुग्णांनी करोनावर मात केली असून तुलनेत दिवसभरात दाखल झालेल्या नवीन रुग्णांचा आकडा कमी म्हणजे ७९२४ इतका आहे. हे आकडे करोना आटोक्यात आणण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास सुरू झाल्याचे संकेत देणारे ठरले आहेत. ( )

वाचा:

राज्यात आतापर्यंत १९ लाख २५ हजार ३९९ जणांची करोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील ३ लाख ८३ हजार ७२३ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण १९.९२ टक्के इतके आहे. गेल्या २४ तासांचा विचार केल्यास राज्यासाठी खूपच दिलासा देणारे आकडे समोर आले आहेत. गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा करोनामुक्त रुग्णांचा आकडा ८ हजार पार गेल्याचे पाहायला मिळाले. आज एकूण ८ हजार ७०६ रुग्णांनी करोनावर मात केली व त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही () वाढून ५७.८४ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत २ लाख २१ हजार ९४४ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे आज करोना बाधित नवीन रुग्णांचा आकडा कमी राहिला. २४ तासांत ७९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले.

वाचा:

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ८३ हजार ७२३ इतकी असली तरी त्यातील अॅक्टिव्ह म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ५९२ इतकी आहे. त्यात जिल्ह्यात सर्वाधिक ४८ हजार ६७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३४ हजार ४७१ इतकी आहे. पालिका हद्दीत अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी होत चालला असून सध्या २१ हजार ८१२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. करोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईसाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत.

आणखी २२७ रुग्ण दगावले

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाने आणखी २२७ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा १३ हजार ८८३ इतका झाला आहे. सर्वाधिक ६१३२ करोनामृत्यू मुंबईत झाले आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात करोनाने २३८६ तर पुण्यात १८३८ जण आतापर्यंत दगावले आहेत. त्यामुळे मृत्यूदराबाबतची चिंता कायम आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोनाने वडिलांचा मृत्यू, मुलांनी घराच्या मागे पुरला मृतदेह

1

कोलकाताः पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील ही घटना आहे. एका ७० वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीयांनी प्रशासनाला कळवलं. पण १२ तास उलटूनही कुणीच आलं नाही. अखेर कुटुंबांने मृतदेह घराच्या मागे असलेल्या जागेत पुरला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ही घटना घडली.

कोलकातामध्ये नोकरीला असलेली व्यक्ती कामावरून परतल्यानंतर गेल्या रविवारी आजारी पडली. करोना चाचणीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या व्यक्तीचा रिपोर्ट शुक्रवारी आला. त्यात ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात प्रशासनाने संबंधित व्यक्तीला दाखल करून घेण्यासाठी त्याच्या घरी अॅम्ब्युलन्स पाठवली. या पण अॅम्ब्युलन्स पोहोचण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

घरी पोहोचलेल्या अॅम्ब्युलन्सने संबंधित व्यक्तीचा मृतदेह नेण्यास नकार दिला. पोलीस यासंदर्भात निर्णय घेतील, असं सांगून अॅम्ब्युलन्स चालक निघून गेला. यानंतर संबंधित कुटुंबाने प्रशासनाची अनेक तास वाट बघितली. कित्येक तास वाट बघितल्यानंतर काही कर्मचारी त्यांच्या घरी आले. त्यांनी कुटुंबीयांना पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट (पीपीई किट) दिले. आणि मृत व्यक्तीच्या दोन मुलांना त्यांच्या वडिलांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यास सांगितले आणि निघून गेले.

प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे कुटुंब अडचणीत आले. मग स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. पण स्थानिक नागरिकांनी त्यांना अंत्यस्कार करण्यास मज्जाव केला. यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे? असा प्रश्न कुटुंबासमोर होता. कुठलाही पर्याय न उरल्याने अखेर मृत व्यक्तीच्या दोन मुलांनी पीपीई किट घातले. घरामागे खड्डा खोदून रात्री उशिरा त्यांना मृतदेह पुरवा लागला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोना: सर्वात मोठी चाचणी सुरू; ३० हजारजणांना टोचणार लस

4

वॉशिंग्टन: करोनाला अटकाव करणाऱ्या आणखी एका लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. या अंतिम टप्प्यात ३० हजारजणांना लस टोचण्यात आली आहे. अमेरिकेतील Moderna Incने विकसित केलेल्या लशीची ही अंतिम टप्प्यातील चाचणी आहे. जगभरातील काही मोजक्याच लशींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अॅण्ड मॉडर्ना इंककडून संयुक्तरीत्या ही चाचणी सुरू आहे. या अंतिम टप्प्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना खरी लस देण्यात आली की डमी लस दिली आहे, याची माहिती देण्यात आली नाही. लशीचे दोन डोस दिल्यानंतर त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. यापैकी कोणत्या स्वयंसेवकांच्या गटांना संसर्ग होतोय हेही पाहिले जाणार आहे. अमेरिकेतील ज्या भागांमध्ये करोनाचा सर्वाधिक फैलाव झाला आहे, त्या भागात हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. मॉडर्ना लशीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ४५ स्वयंसेवकांचा सहभाग होता. या स्वयंसेवकांमध्ये करोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढली होती. त्याशिवाय हलकासा ताप येण्यासारखी काही साइड्स इफेक्टही आढळली होती. अमेरिकेतील ८७ ठिकाणी या लशीची चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास ३० हजारजणांना ही लस टोचण्यात येणार आहे. करोनाच्या बचावापासून ही लस किती प्रभावी आहे, याचाही शोध घेण्यात येणार आहे.

वाचा:

वाचा:

देशामध्ये वापरण्यात येणारी लशीची चाचणी स्वत: करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. त्यामुळे या लशीच्या चाचणीवर सरकारची देखरेख आहे. या अंतिम टप्प्यातील चाचणी ही लस कितपत सुरक्षित आहे, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर वैज्ञानिक या लशीची तुलना करणार आहे. पुढील महिन्यात ऑक्सफोर्डच्या लशीची चाचणी होणार असून सप्टेंबर महिन्यात जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, ऑक्टोबरमध्ये Novavaxच्या लशीची चाचणी सुरू होणार आहे.

वाचा:

या वर्षाअखेरपर्यंत या लशीच्या चाचणीचे अंतिम ठोस निष्कर्ष समोर येतील असा अमेरिकन सरकारला विश्वास आहे. लस विकसित करण्यासाठी अमेरिकन सरकारने मॉडर्ना कंपनीला मोठ्या प्रमाणावर अर्थ साहय्य केले आहे. पहिल्या दोन टप्प्यातील चाचणीही यशस्वी झाली असल्याचे कंपनीने म्हटले होते. मात्र, या चाचणीशी संबंधित माहिती कंपनीने जाहीर केली नव्हती.

वाचा:

दरम्यान, चीनची वैद्यकीय क्षेत्रातील कंपनी Sinopharm ने विकसित केलेल्या ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अबुधाबीत सुरू करण्यात आली आहे. या चाचणीच्या अंतिम टप्प्यात १५ हजार स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये जवळपास २०० देशांच्या नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळेच या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत १८ ते ६० वर्षापर्यंतच्या वयोगटातील स्वयंसेवकांचा समावेश आहे.

जगभरातील काही देशांमध्ये लस विकसित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जवळपास १३ लशी क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चीनच्या लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. चीनच्या पाच, ब्रिटन २, अमेरिकेत ३, रशिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी एक लस क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झालेले नेते!

5

कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार हे आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झालेले नेते आहेत आणि असे अचानक मोठे झालेले नेते पायदळी यायला फार वेळ लागत नाही, असा टोला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष यांनी लगावला. चंद्रकांता पाटलांसारख्या नेत्यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. ( Slams )

वाचा:

मुख्यमंत्री ठाकरे हे मीडियाला मुलाखत न देता केवळ सामना या दैनिकाला मुलाखत देतात, राज्यात न फिरता मातोश्रीवर बसून राज्य कारभार करतात, अशी टीका आमदार पाटील यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आसूड ओढताना क्षीरसागर यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे या सरकारी रुग्णालयास एक कोटी रुपये किंमतीचे साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर म्हणाले, भाजप व शिवसेनेची तीस वर्षे युती होती. तरीही मातोश्रीच्या कामाची पद्धत या नेत्यांना कशी माहीत नाही. मातोश्रीचे नेते कधीही मीडियाला बाईट देत नाहीत. ते आपली भूमिका सामना च्या माध्यमातून मांडतात. मुख्यमंत्र्यांना असा प्रश्न विचारण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षात कोणत्या मीडियाला बाइट दिले, असा सवाल करून ते म्हणाले, मुख्यमंत्री अतिशय संयमाने आणि शांतपणे काम करत आहेत. पाच वर्षांत भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यभर फिरून कामाचा केवळ डिंडोरा पिटला. असा डिंडोरा पिटून राज्यकारभार करता येत नाही. तशी सवय या मुख्यमंत्र्यांना नाही.

वाचा:

राणेंचे काय झाले बघा!

अचानक आंबा पडल्यासारखे मोठे झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करू नये असा इशारा देताना ते म्हणाले, असे अचानक मोठे झालेले नेते कोणत्याही क्षणी पायदळी येऊ शकतात हे लक्षात ठेवावे. शिवसेनेवर जे टीका करतात त्यांची काय अवस्था होते, त्यांचा शेवट कसा होतो, हे यांना आलेल्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे, असा टोलाही त्यांनी मारला.

दरम्यान, भाजपचे राज्यातील नेते सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर टीकेची मालिकाच लावली आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या असून आता शिवसेनेच्या प्रत्युत्तरावर भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

उद्धव ठाकरेंना सध्या हिंदुत्वापेक्षा CMपदाची खुर्ची महत्त्वाची वाटते: भाजप

5

कोल्हापूर: राम जन्मभूमी बाबत काहीही न करता आम्हीच सर्व केले, हा दावा अनेकजण करत आहेत, असा टीकेचा बाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी शिवसेनेवर मारला. मुख्यमंत्री यांना हिंदुत्वापेक्षा सध्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची महत्त्वाची वाटत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. ( Targets )

वाचा:

भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, येत्या पाच ऑगस्टला अयोध्या येथे भूमीपूजनाचा समारंभ पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे. अनेक वर्षे ज्या क्षणाची रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण आता आला आहे. तीन कोटी जनता तेथे प्रत्यक्ष या स्वप्नपूर्तीचा आनंद घेणार होती. पण करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ भव्य दिव्य करता येत नाही. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने व्हावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर विश्व हिंदू परिषदेने टीका केली. तीन कोटी नाही पण किमान तीनशे लोकांनी तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहून हा समारंभ करण्याचे नियोजन केले आहे.

वाचा:

राम मंदिराच्या भूमीपूजनाचे निमंत्रण मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आले आहे, यामुळे त्यांची अडचण झाल्याचे सांगताना पाटील म्हणाले, या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रणाची गरज नाही, असे शिवसेनेचे खासदार म्हणत होते. आता मात्र निमंत्रण दिल्यानंतर कार्यक्रमाला जायचे की नाही या पेचात मुख्यमंत्री अडकले आहेत. कारण त्यांना आता हिंदुत्वापेक्षा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची महत्वाची वाटत आहे. ही खुर्ची टिकवायची असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दुखावणे परवडणार नाही, असे त्यांना वाटत असावे.

वाचा:

मराठा समाजाच्या मुलांची झोप उडाली

मराठा आरक्षण सुनावणीवरून सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीनंतर या खटल्याचा निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मात्र सरकारकडून पुरेशी कागदपत्रे मिळाली नाहीत, त्यामुळे बाजू मांडण्यासाठी आणखी मुदत द्या, अशी विनंती सरकारच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. याचा अर्थ असा होतो की, सरकारने या वकिलांना पुरेशी कागदपत्रेच दिली नाहीत. ही जर वस्तुस्थिती असेल तर इतके दिवस आमची पूर्ण तयारी झाल्याचे सरकार खोटे सांगत होते हे स्पष्ट होते. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात अंतिम निकाल लागत नाही, तो पर्यंत मराठा आरक्षण गृहीत धरून नोकर भरती करता करता येणार नाही असे स्पष्ट करून यामुळे मराठा समाजाच्या मुलांची मात्र झोप उडाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts