Friday, January 27, 2023
Home Blog Page 5246

बापाने कानशिलात लगावले; डोकं भिंतीवर आपटून ६ वर्षीय मुलीचा मृत्यू

4

कोल्हापूर: जेवणार नाही असा हट्ट करत असलेल्या सहा वर्षाच्या मुलीला रागावलेल्या वडिलांनी जोरात कानशिलात लगावले. यामुळे तिचे डोके भिंतीवर आपटले. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पण मुलीचा हट्ट तिच्यासह तिच्या वडिलांना मात्र फारच महागात पडला. तिचा तर जीव गेलाच, शिवाय मुलीचा खून केला म्हणून तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. ( )

अनन्या तानाजी मंगे (वय ६ रा. लाड बोळ, जयभवानी गल्ली, ) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. शनिवारी या प्रकरणामागील खरे कारण पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी या घटनेप्रकरणी मुलीचे वडील तानाजी दिलीप मंगे (वय २९, रा. , राज्य कनार्टक) याला अटक केली.

वाचा:

कसबा बावडा येथील जयभवानी गल्लीत राहण्यास आलेल्या अनन्या मंगे या सहा वर्षीय मुलीचा शुक्रवारी मृत्यू झाला. मुलगी घरात खेळताना चक्कर येऊन पडून जखमी झाली आणि उपचारापूर्वीच मृत्यूमुखी पडली असे प्राथमिक कारण पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी ही माहिती घरातील आई वडिलांकडून मिळाली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आल्यावर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. तेव्हा खरे कारण उघडकीस आले.

मंगे हा ताराबाई पार्क येथे वॉचमन म्हणून काम करतो. त्याची मुलगी अनन्या ही दोन वर्षापूर्वी खेळताना पडली होती. तेव्हापासून तिला अधून मधून फिट यायच्या. तिचा स्वभाव फार हट्टी होता. दोन दिवस ती जेवण्यास टाळाटाळ करत होती. आग्रह करूनही ती जेवत नसल्याने चिडलेल्या वडिलांनी शुक्रवारी तिच्या कानशिलात लगावली होती. त्यामध्येच तिचा मृत्यू झाला होता. पण खेळताना पडून जखमी झाल्याचे सांगून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न झाला होता.

वाचा:

गल्लीत याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर शहर पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक सुमिता पाटील, पोलिस कॉन्स्टेबल तानाजी चौगले आणि राजू वरक यांनी तपासाची दिशा वळवली. पोलिसांनी कसबा बावडा जयभवानी गल्लीत चौकशी केली असता मुलगी जखमी झाल्यानंतर परिसरात वादावादी झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अनन्याचे वडील तानाजी यांना ताब्यात घेतले. त्यांनी मुलगी खेळताना पडली, अशी माहिती दिली. पण पोलिसांनी खोलवर चौकशी केल्यावर त्यांनी मुलीला जोरात कानशिलात मारल्यावर तिचे डोके भिंतीवर आदळले. त्यामध्ये ती जखमी झाल्याची कबुली दिली. पोलिसांनी वडील तानाजी मंगे यांना अटक केली. त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोनानंतर आता 'या' गोष्टीमुळे देशाचा मुड बदलणार!

5

मुंबई: गेल्या चार महिन्यांपासून करोना व्हायरसमुळे होणारे मृत्यू, आर्थिक अडचणी आदींमुळे नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. देशातील लोकांचा हा मुड बदलण्याचे काम करू शकेल, असे मत माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार याने व्यक्त केले आहे.

वाचा-
आयपीएलचा १३वा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते. स्टार स्पोर्टसच्या एका शो मध्ये बोलताना तो म्हणाला, हे महत्त्वाचे नाही की कोठे होणार आहे. आयपीएल युएईमध्ये होत आहे आणि क्रिकेट खेळण्यासाठी ती एक चांगली जागा आहे. त्याच बरोबर मला असे वाटेत की आयपीएलच्या आयोजनामुळे देशाचे मुड बदलेल.

वाचा-
या वर्षी हे महत्त्वाचे ठरणार नाही की कोणचा संघ विजेता होईल, कोणता फलंदाज सर्वाधिक धावा करेल आणि कोणता गोलंदाज सर्वाधिक विकेट घेईल. टी-२० स्पर्धेमुळे देशाचा मुड सहज बदलून जाईल. त्यामुळेच मला वाटते की आयपीएलचा हा हंगाम अन्य हंगामापेक्षा मोठा ठरेल. कारण हे देशासाठी आहे, असे गंभीर म्हणाला.

बीसीसीआयने या वर्षी देशातील करोना व्हायरसमुळे युएईमध्ये १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळावधीत आयपीएलचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप स्थगित केल्यामुळे आयपीएलच्या आयोजनासाठी वेळ उपलब्ध झाला.

वाचा-
आयपीएल २००९ आणि २०१४चा काही भाग देशातून बाहेर झाला होता. क्रिकेटच्या इतिहासा असे कधीच झाले नव्हते की, कोणत्याही देशातील स्पर्धा अखेरच्या क्षणी दुसऱ्या देशात शिफ्ट केली असेल. पण भारतात २००९ साली असे झाले होते. आता करोनामुळे पुन्हा असे घडत आहे.

इंग्लंडचा धाडसी निर्णय
एका बाजूला संपूर्ण जगभरात क्रिकेट बंद असताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज दौऱ्याचे आयोजन केले. त्यानंतर पाकिस्तान सोबत द्विपक्षीय मालिका होणार आहे. आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप स्थगित केल्यामुळे आयपीएलचे आयोजन शक्य झाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Breaking: राज्यात आज २५७ करोनाबळी; २४ तासांत ९२५१ नवीन रुग्ण

0

मुंबई: राज्यात आज संसर्गामुळे २५७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ९२५१ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ७२२७ जणांची करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७ हजार १९४ रुग्ण झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण () ५६.५५ इतका झाला आहे. हा टक्का हळूहळू वाढत असल्याने ते चांगले संकेत मानले जात आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भारतीय लष्करावर गंभीर टीका, JNU तील स्कॉलरविरोधात FIR दाखल

584

नवी दिल्लीः सोशल मीडियाद्वारे द्वेष पसरवण्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी जेएनयूचा स्कॉलर साजिद बिन सईद याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काश्मिरी नागरिकांचा नरसंहार केला, असा आरोप त्याने केला होता. याविरोधाती पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून लवकरच त्याची चौकशी होऊ शकते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे तयार केलेल्या योजनांची अंमलबजावणी करून भारतीय लष्कर काश्मिरी नागरिकांचा नरसंहार करत आहे. भाजपने आपल्या प्रादेशिक लालसेला रोखले पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या नियमाच्या आधारावर काश्मिरी नागरिकांनी आपला निर्णय घेण्यासाठी तयार व्हायला हवे. आंतरराष्ट्रीय संस्थांनी आता या प्रकरणी हस्तक्षेपाची वेळ आली आहे’, असं तो म्हणाला. साजिद बिन सईद हा कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे.

इमामविरोधात चार्जशीट दाखल

दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी जेएनयूचा पीएचडी स्कॉलर शरजील इमामविरोधात बेकायदेशीर कारवायांप्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जामिया मिलायामध्ये हिंसा झाली होती. तसंच फेब्रुवारीत दिल्लीत दंगल उसलळी होती. या प्रकरणी तो आरोपी आहे. अलिकडेच तो करोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. इमामविरोधात दिल्ली, असाम, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये देशद्रोह, दंगल घडवणं आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याच्या आरोपवरून गुन्हा दाखल केला गेला आहे. शरजीलने गेल्या डिसेंबरमध्ये जामिया परिसराच्या बाहेर प्रक्षोभक भाषण दिले होत, असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'अयोध्येत दिपोत्सव होणार, PM मोदी राम मंदिर भूमिपूजनाला येणार'

4

अयोध्याः पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्यासाठी ५ ऑगस्टला अयोध्येत येणार आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिली. योगी आदित्यनाथ हे आज सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व प्रथम राम जन्मभूमी येथे प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. यानंतर हनुमान गढी येथे रामभक्त हनुमानाचे दर्शन घेतले.

योगी आदित्यनाथ यांनी यानंतर अयोध्येतील खासदार आणि आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठीकाल श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्र्सचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी हे ५ ऑगस्ट होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी येणार आहे. आम्ही अयोध्येतील राम मंदिर जगाती सर्वात सुंदर मंदिर असेल आणि ते देशाचा अभिमान असेल. यात स्वच्छतेला सर्वप्रथम प्राधन्य असेल, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

जगाला अपेक्षित आहे अशी सुंदर अयोध्या स्वंयशिस्तेने उभारण्याची क्षमता आपल्यात आहे. राम मंदिराच्या निमित्ताने ही संधी आपल्याला मिळाली आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. आपण एका शुभ कार्यक्रमासाठी एकत्र येत आहोत. हे आपले सौभाग्य आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत ‘दिपोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येतील प्रत्येक घर ४ आणि ५ ऑगस्टला दिव्यांनी उजळून निघेल. दिपावलीचा उत्सव हा अयोध्येशी संबंधित आहेत. अयोध्येचं नाव जुळल्याशिवाय दिपावली होऊ शकत नाही. यामुळे कुणावर कुठलीही टीका-टीप्पणी न करता एक सकारात्मक विचारांनी आपल्याला पुढे जायचं आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

राम मंदिर भूमिपूजन
अयोध्येत राम मंदिर बांधणीसाठी भूमिपूजन सोहळा होणार आहे. ५ ऑगस्टला हा भूमिपूजनाचा कार्यक्र होणार आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जवळपास २०० पाहुणे उपस्थित राहतील असं सांगण्यात येतंय.

राम मंदिराची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. तसंच त्यात आणखी दोन सभा मंडप वाढवण्यात आले आहेत. याधीच्या मूळ प्रतिकृतीनुसार मंदिराची उंची कमी होती आणि दोन सभा मंडपही नव्हते. मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी किमान तीन ते साडे वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ३ ऑगस्टपासून अयोध्येत तीन दिवसांचा वेदिक विधीही आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. अयोध्य सर्वत्र मोठ मोठे सीसीटीव्ही उभारण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून देण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

चीनचे धाबे दणाणले; ही दिग्गज कंपनी भारतात येणार

5

नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे चीनची प्रतिमा जगभरात खराब झाली आहे अशातच भारतासोबत सीमेवरील कुरापतीमुळे त्यांच्याबद्दल नाराजी आहे. अनेक कंपन्या त्यांचे चीनमधील उत्पादान अन्य देशात नेण्याचा विचार करत आहेत. गेल्या काही दिवसात अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी त्याचा भारतातील व्यवसाय वाढवण्यास सुरूवात केली आहे.

वाचा-
कालच अॅपल सारख्या दिग्गज कंपनीने भारतात त्यांच्या टॉप मॉडेलचे उत्पादन सुरू केल्याची घोषणा केली होती. आता या कंपनीने भारतात व्यवसाय वाढवण्याची घोषणा केली आहे. झूमने या आठवड्यात या संदर्भात माहिती दिली. कंपनी भारतातील व्यवसाय तीन पट वाढवणार आहे.

वाचा- सुरू
झूमने हैदराबाद आणि बेंगळुरू येथे नवे डेटा सेंटर्स सुरू करण्याची तयारी केली आहे. अर्थात कंपनीने अद्याप हे सांगितले नाही की, भारतात किती कर्मचारी घेणार आहे. पण हे मात्र निश्चित आहे की त्यांच्या या निर्णयामुळे देशात काही प्रमाणात रोजगाराच्या संधी तयार होतील.

वाचा-
भारतात सध्या ७० कोटी इंटरनेट युझर्स आहेत आणि अद्याप ५० कोटी लोक इंटरनेटचा वापर करत नाहीत. हे लोक भविष्यात नेटचा वावर करू शकतील. देशात इंटरनेटचा वापर वाढत असल्यामुळे झूमने व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावाधीत भारतात झूमचे फ्री युझर्स ६ हजार ७०० टक्क्यांनी वाढले आहेत. . करोना काळात ऑनलाइन काम करणाऱ्यांनी झूम अॅपचा वापर केला. झूमचा वापर डिसेंबरपर्यंत रोज एक कोटी लोक करत होते. हा आकडा आता एप्रिल मध्ये ३० कोटीवर पोहोचला आहे.

वाचा-
झूम ही अमेरिकन कंपनी असून चीनसोबतचे संबंध बिघडत चालले आहेत. काही दिवसांपूर्वी डेटा चीनमधून येते यावरून वाद झाला होता. कंपनीचा डेटा चीनमधील सर्व्हरमध्ये राहतो. इतक नव्हे तर चीन सरकारच्या सांगण्यावरून झूम कंपनीने काही मानवाधिकार ग्रुप बंदी केले होते. झूमचे चीनमध्ये ७०० कर्मचारी आहेत.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुख्यमंत्री राज्यात का फिरत नाहीत? पवारांनी सांगितलं नेमकं कारण

5

औरंगाबाद: मुख्यमंत्री मुंबईत राहून राज्यभरातील करोना परिस्थितीचा आढावा घेत उपाययोजना करीत आहेत. ते दिवसभर त्याच कामात असतात. मुख्यमंत्र्यांची टीम राज्यभर फिरत असून कॅप्टननने फक्त नियंत्रण ठेवणे अपेक्षित असते, असे सांगत काँग्रेसचे अध्यक्ष खासदार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची पाठराखण केली. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ( praised Chief Minister )

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. ८०व्या वर्षी तुम्ही फिल्डवर असताना मुख्यमंत्री का फिरत नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी पवार यांना विचारला. त्यावर पवार यांनी ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करीत कार्यशैली समजावून सांगितली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत असले तरी राज्यभरातील करोना परिस्थितीचा नियमित आढावा घेत आहेत. दिवसभर त्याच कामात ते बुडालेले असतात. पालकमंत्री आणि इतर मंत्री त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती सांगतात. त्यानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. कॅप्टनने टीमवर नियंत्रण ठेवावे. त्यांची टीम राज्यभर फिरत आहे. एका जिल्ह्यात येऊन हाताळावी अशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्र्यांचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे, असे पवार म्हणाले. मला एका जागी बसवत नाही. मी लोकांमध्ये राहणारा माणूस असल्यामुळे फिरत असतो, असेही पवार म्हणाले. हा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

१० ते २ वाजण्याच्या दरम्यान करोना होत नाही का?; उदयनराजेंचा प्रश्न

6

सातारा: ‘करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक बाबींसाठी १० ते २ वाजण्याच्या दरम्यान काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली आहे. ‘१० ते २ या वेळेत करोना होत नाही का,’ असा प्रश्न त्यांनी केलाय.

करोना महामारीवर सामूहिक प्रयत्नांद्वारे करावयाच्या उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजे यांनी आज जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतली. जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासह व अन्य तज्ज्ञ मंडळींशी चर्चा केल्यानंतर निदर्शनास आलेल्या काही गोष्टी उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढं मांडल्या. ‘लॉकडाऊन हा करोनाची साखळी तोडण्याचा पर्याय नव्हे. तसं असेल तर मग काही तास शिथिलता कशी दिली जाते? त्या काळात करोना होत नाही का?,’ असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा:

लॉकडाऊनमुळं अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. लोकांचे रोजगार गेले आहेत. चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळं लस लवकरात लवकर मिळावी,’ अशी प्रार्थनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केली.

उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या सूचना

१] सातारा जिल्ह्याकरीता टास्क फोर्स स्थापित करणे.

२] एफसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करणे.

३] शासकीय सर्वसाधारण रुग्णालयांची कार्यक्षमता जास्तीत जास्त उपयोगात आणणे.

४] कोणतेही लक्षण नसलेल्या कोविड रुग्णांना घरच्या घरी उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करणे

५] शासकीय किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी मेडिसिन असलेल्या फिजीशियन्सची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे.

६] सर्वसाधारण रुग्णालय फक्त कोविड-१९ च्या रुग्णांसाठी समर्पित करणे व अन्य रोगाचे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचारार्थ पाठविणे.

७] डब्ल्यूयुआययडी टास्क फोर्स समितीने सुचवल्याप्रमाणे रुग्णांना डिस्चार्ज देणेबाबत धोरण ठरवणे.

८] कोविड वगळता इतर रुग्णांसाठी आर्यांग्ल हॉस्पिटलचा पर्याय निर्माण करून तो पर्याय राबविणे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सोनियाजी, १६ वर्षे लागली तुम्हाला? नरसिंह रावांच्या नातवाचा सवाल

0

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या १०० व्या जयंती निमित्त कॉंग्रेसकडून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दिल्लीत शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नरसिंह राव यांचे कौतुक केले. कॉंग्रेसला त्यांच्या ‘कामगिरी आणि योगदाना’वर अभिमान असं सोनिया गांधी म्हणाल्या.

सोनिया यांनी केले नरसिंह रावांचे कौतुक

नरसिंहराव जेव्हा देशाचे पंतप्रधान बनले, तेव्हा देश एक गंभीर आर्थिक संकटातून जात होता. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे देश अनेक आव्हानांना तोंड देऊ शकला, असं कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या.

नरसिंह राव यांच्या नातवाचा सवाल

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे नातू आणि तेलंगण भाजप नेते एन. व्ही. सुभाष यांनी कॉंग्रेस नेतृत्वाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कॉंग्रेसला त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यास १६ वर्षे कशी लागली? यांच्याशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कधीही उपस्थित राहिले नाहीत, असं एन.व्ही. सुभाष म्हणाले.

‘पीव्ही नरसिंह राव यांच्या योगदानाचे कौतुक करण्यास कॉंग्रेसला १६ वर्षे कशी लागली. नरसिंह राव यांच्या जयंती आणि पुण्यतिथीवर आयोजित कोणत्याही कार्यक्रमात सोनिया गांधी आणि राहुल गांधी कधीच उपस्थित राहिले नव्हते, असं एन.व्ही. सुभाष म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेनेनं याबाबत वृत्त दिलं आहे. २८ जून १९२१ रोजी जन्मलेल्या नरसिंह राव यांचे २३ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले. कॉंग्रेस आता त्यांचा शताब्दी सोहळा साजरा करीत आहे.

१९९१ पासून ते ९६ पर्यंत देशाचे पंतप्रधान

पी. व्ही. नरसिंह राव हे २१ जून १९९१ ते १६ मे १९९६ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात भारतात आर्थिक उदारीकरणाचे रस्ते मोकळे झाले. नरसिंह राव यांच्याशी गांधी कुटुंबीयांचे संबंध चांगले नव्हते, असं सांगितलं जातंय. राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात काँग्रेस कुटुंबाशी त्यांचे संबंध काहीसे कटुतेचे होते, असं सांगितलं जातं.

गांधी कुटुंबीयांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधीवर केली होती. “२००४ ते २०१४ दरम्यान कुठल्याही जाहीर सभेत किंवा कार्यक्रमात पीव्ही नरसिंह राव यांच्या चांगल्या कामांचे कौतुक केले असेल तर त्यांनी पुरावा द्यावेत हे आपले कॉंग्रेसला आव्हान आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी लोकसभेत म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोना संपणार नाही, कारण… भाजप आमदाराने ट्वीट केला हा व्हिडिओ

0

मुंबई: लक्षणे नसतानाही पॉझिटिव्ह येत असलेले करोना चाचणीचे अहवाल… कोणत्याही उपचाराशिवाय बरे होणारे रुग्ण… या सगळ्यामुळं करोनाच्या आजाराबद्दल सर्वसामान्यांच्या मनात संशयकल्लोळ माजला आहे. या संशयाला बळकटी देणारा एक खळबळजनक व्हिडिओ भाजपचे आमदार यांनी ट्वीट केला आहे. व्हिडिओ ट्वीट करताना राणे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोपही केला आहे. (BJP MLA Tweets Video)

दोन डॉक्टरांमध्ये फोनवरून झालेल्या संभाषणाचा हा व्हिडिओ आहे. मुंबईच्या कूपर रुग्णालयातील हे दोन वरिष्ठ डॉक्टर असल्याचा दावा नीतेश यांनी ट्वीटमधून केला आहे. व्हिडिओमध्ये एक डॉक्टर खळबळजनक गौप्यस्फोट करताना दिसतोय. ‘करोना हा मोठा धंदा झाला आहे. त्यातून अनेकांना मोठी मलई मिळत आहे. क्वारंटाइन सेंटर वगैरेच्या नावानं २५-२५ आणि ५०-५० कोटी दिले जाताहेत. महापालिकेचा सगळा पैसा संपवून टाकला आहे. करोनाचा बिझनेसच सुरू केला आहे. आमचे डीन आणि आम्ही कोविड सेंटरमध्ये जातो, तेव्हा बघून लक्षात येतं की हा धंदा सुरू आहे. त्यांना हा करोना संपवायचा नाही कारण हा धंदा बंद होईल. आपल्या सरकारनं आता हा धंदाच सुरू केला आहे,’ असं हा डॉक्टर म्हणतो.

‘ह्यांना अर्थव्यवस्थेशी काही देणंघेणं नाही. त्यांची इकॉनॉमी सुधारते तेवढंच त्यांना हवं आहे. हे राजकारणी करोनातूनही पैसे कमवताहेत. लोकांच्या जिवाची ह्यांना काहीही पडलेली नाही,’ असा संतापही हा डॉक्टर व्यक्त करताना दिसतो.

या व्हिडिओचा हवाला देऊन नीतेश यांनी राज्य सरकारवर कोविड घोटाळ्याचा आरोप केला आहे. ‘आम्ही पुन्हा पुन्हा जे सांगत होतो, तेच हे डॉक्टर सांगत आहेत. महाराष्ट्र सरकारनं करोनाचा धंदा केला असून त्यातून प्रचंड पैसा कमावला जात आहे,’ असा आरोप नीतेश यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts