Friday, January 27, 2023
Home Blog Page 5250

मुंबईतील करोना संसर्गाची स्थिती अधिक वाईट: शरद पवार

0

नाशिक: राज्यात टेस्टिंग वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार यांनी दिली. ( worried on )

वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दौऱ्यावर असून आज त्यांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. नाशिकमधील वाढत्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवन, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील करोना उपाययोजनांचा आढावा शरद पवार यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला.

भारतात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यांत रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, सोलापूर, अकोला याठिकाणी करोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही मुंबई येथील स्थिती अधिक वाईट आहे. अनेक तज्ज्ञांनी आपल्याला येत्या काळात करोनासोबत जगावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्या जिल्ह्यांतील सर्व प्रमुखांची बैठक घेऊन, समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

वाचा:

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काही महिने कोरोनाशी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना द्यावा हा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आज नाशिक जिल्हा आढावा बैठक घेण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले. राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. पण तेथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत असे करून चालणार नाही. जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये ही सरकारची भूमिका आहे. पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील गरजू करोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर या महागड्या औषधांची उपलब्धता करून ५० औषधे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. याआधी देखील २५ औषधे देण्यात आली होती तसेच गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी नेहमीच पुढाकार घेण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

वाचा:

आरोग्याप्रमाणे आर्थिक संकटदेखील मोठे आहे. राज्यात नामांकित औद्योगिक केंद्रे आहेत. ही केंद्रे सुरू करून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊन बाबत निर्णय घ्यावा असे आवाहनही त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

रस्त्यावर चहा विकणाऱ्या मुलाला शिक्षणासाठी पोलिसांनी केली मदत

0

मुंबईः महाराष्ट्रात करोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाला रोखण्याचे आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलिसांवरही मोठे आव्हान आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवरील ताण अधिक वाढला आहे. परंतु या संकटाच्या काळातही पोलिस मुंबईकरांच्या सेवेसाठी आजही तत्पर आहेत. वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ओंकार व्हनमाने या कर्मचाऱ्याने चहा विकणाऱ्या एका मुलाला शिक्षणासाठी वह्या-पुस्तक खरेदी करून दिली आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मांटुगा परिसरात बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ओंकार यांची सागर माने या शाळकरी मुलाची ओळख झाली. करोनाचं संकट असताना या मुलांकडनं चहा घ्यायचा का असं विचार मनात घोंगावत असतानाच त्यांनी मुलाची आपुलकीनं चौकशी केली. मार्च महिन्यात वडील वारल्यानंतर सागरनं आपल्या वडिलाचं कॅन्टीन पुढं सुरु ठेवलं आहे. घरात आई आजारी आहे त्यामुळं लॉकडाऊनमध्ये तो स्वतः चहा विकतोय आणि रोज २०० रुपये मिळवतोय. तसंच, आता शाळा सुरु झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, घर भाडं ही द्यायचं आहे. सागरच्या या परिस्थितीत ओंकार यांनी त्याला मदतीचा हात दिला आहे.

पुढे काय करायचंय? असा प्रश्न विचारला असताना सागरनं तुमच्यासारखं पोलिस व्हायचंय असं चटकन उत्तर दिलं. त्यानंतर ओंकार यांनी सागरला दहावीची पुस्तक आणि वह्या घेऊन दिल्या. तसंच, अभ्यासाकरिता काही अडचण आल्यास मला संपर्क कर असं आश्वासनं देऊन आपला फोन नंबरदेखील दिला.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री यांनीही ओंकार यांचे कौतुक केलं आहे. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते, जिद्द तेव्हाचं जन्माला. पोलिस दलातील संवेदनशील पोलिस कर्मचारी ओंकार व्हनमारे यांनी केलेल्या या कामाचं मला खूप कौतुक वाटतं, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोना मृत्यूदर शून्यावर येणार?; CM ठाकरेंनी टास्क फोर्सला दिला 'हा' टास्क

0

मुंबई: रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यूदरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री यांनी आज सांगितले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईस्थित राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज संवाद साधला व चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ( On Mortality Rate Of Coronavirus )

वाचा:

‘करोना मृत्यूदर कमी करणे नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत हे पाहून त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे. म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले’, असे सांगतानाच रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

वाचा:

यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले. टास्क फोर्सचे प्रमुख यांनी यावेळी सांगितले की, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधे देऊ नयेत. अडचण येईल तेव्हा तात्काळ आम्हाला संपर्क करा.
डॉ राहुल पंडित म्हणाले, ही विशेष औषधे महत्त्वाची नाहीत तर रुग्णांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे खूप आवश्यक आहे. डॉ शशांक जोशी, डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी देखील उपचारांविषयी जिल्ह्यांच्या डॉक्टर्स व शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली व शंकानिरसन केले तसेच उपचाराविषयी सूचना केल्या. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन आधीच करण्यात आली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पोटासाठी रस्त्यावर लाठीकाठीचा खेळ; 'वॉरिअर आजीं'ना मिळाला मदतीचा हात

0

पुणेः भर उन्हा पावसात रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ खेळत जगण्याची लढाई लढणाऱ्या आजींना मदतीचा हात मिळाला आहे. हालाखीच्या परिस्थिकीमुळं त्यांच्यावर भररस्त्यावर लाठी काठी फिरवून गुजराण करण्याची वेळ आली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या.

शांताबाई पवार असं या आजींचं नाव आहे. हा हडपसर येथे राहतात. त्यांच्या मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नातवांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. काबाड कष्ट करून त्यां नातवांचा सांभाळ करत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून करोनाचे संकट आहे. लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्या या कुटुंबाची उपासमारी सुरू आहे. शेवटी लॉकडाऊन उठल्यावर न खचता पदर खोचून आजी पुन्हा उभ्या राहिल्या. रस्त्यावर काठी फिरवण्याची कला सादर करण्यास सुरुवात. अनेकांनी या आजीला सोशल मीडियावर व्हायरल केल्याने अवघ्या दोन तीन दिवसातच त्या सोशल मीडियावर स्टार झाल्या. अगदी अभिनेते आणि अधिकाऱ्यांनीही त्यांची स्तुती करत त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. काही संस्थांनीही आजींना मदतीचा हात दिला आहे.

काल दिवसभर सोशल मीडियावर आजींचा व्हिडिओ व्हायरल झाला. आज अनेकांनी आजींची भेट घेऊन विचारपूस केली आणि त्यांना किराणा तसेच ताडपत्री व इतर साहित्याची मदत पोहोचवली. आजींना कसलीही अडचण येणार नाही, यासाठी सातत्याने संपर्कात राहणार असल्याचंही जागृती ग्रुपचे राज देशमुख यांनी सांगितले.

आजींनी मानले आभार

सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात मिळालेल्या कौतुकानं आजी भारावून गेल्या आहेत. ‘करोनाच्या संकटात बाहेर पडू नको असं सगळे मला सांगत होते पण मला माझी लेकर जगवायची होती. मला बाहेर पडणं भागचं होतं. मी बाहेर पडले आणि माझ्या केसालाही धक्का लागला नाहीये. माझा व्हिडिओ सगळीकडे पोहोचला आणि माझे मदतीसाठी अनेक जण पुढे आले. ज्यांनी मला मदत केली त्यांचे मी आभार मानते,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः

आजीच्या मदतीसाठी रितेश सरसावला आहे. त्याने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना आजीचा संपर्क कोणाला कुठे होतो का विचारले. अवघ्या थोड्या वेळातच रितेशला आजींचा संपर्क मिळाला. आता रितेश आजीला कोणत्या पद्धतीने मदत करतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पीएमपीचे १२ वर्षात १५ अध्यक्ष; आता 'या' अधिकाऱ्याकडे सोपवला कारभार

0

म. टा. प्रतिनिधी, पुणेः स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांची पुणे महानगर परिवहन महमंडळाच्या (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या साडेचार महिन्यांपासून पूर्णवेळ अध्यक्षाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीएमपीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला आहे.

पीएमपीच्या अध्यक्ष नयना गुंडे यांची जानेवारी महिन्यात आदिवासी कल्याण व संशोधन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली होती. रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पीएमपीचा पदभार देण्यात आला होता. मात्र, सूर्यवंशी यांनी पीएमपीचा पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे गुंडे आणि सूर्यवंशी या दोघांच्याही बदल्या रद्द करून गुंडे यांच्याकडेच पीएमपीची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर, मार्च महिन्यात गुंडे यांची ‘यशदा’मध्ये उपमहासंचालक म्हणून बदली झाली; परंतु गुंडे यांच्याकडे पीएमपीची अतिरिक्त जबाबदारी सोपविली होती.

वाचाः

जगताप हे मूळ भारतीय संरक्षण मालमत्ता सेवेतील २००१च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते डेप्युटेशनवर पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून २०१४मध्ये दाखल झाले होते. त्यानंतर २०१७मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१९मध्ये त्यांची बदली करण्यात आली होती.

पीएमपीला १२ वर्षांत १५ अध्यक्ष

पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण करून २००७मध्ये पीएमपीची स्थापन करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत पीएमपीला १५ अध्यक्ष लाभले. त्यापैकी आर. एन. जोशी वगळता एकाही अधिकाऱ्याला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. जोशी यांच्यानंतर गुंडे यांनी दोन वर्षे काम पाहिले. तसेच, १५ अध्यक्षांपैकी आठ अधिकारी अतिरिक्त कारभार पाहणारे होते.

वाचाः

जगतापांपुढे आव्हानांचा डोंगर

पीएमपी अध्यक्षापुढे संस्थेचे सक्षमीकरण करणे, पुणेकरांना चांगली सेवा देणे आणि संचित तोटा कमी करणे ही आव्हाने कायमच असतात. आता या आव्हानांबरोबरच करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून पीएमपीला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान जगताप यांच्यापुढे असणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राम मंदिराच्या भूमिपूजनाला आव्हान; RSS कार्यकर्त्यांची याचिकाकर्त्याच्या आईला धमकी

0

मुंबई: अयोध्येत येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होत असून या सोहळ्याला माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी एका याचिकेद्वारे अलाहाबाद हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्याचा निषेध करत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) काही कार्यकर्त्यांनी गोखले यांच्या मिरा रोड येथील निवासस्थानाबाहेर ” अशा घोषणा देत निदर्शने केली. या घटनेची राज्याचे गृहमंत्री यांनी गंभीर दखल घेतली असून गोखले यांना तातडीने पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ( RSS Workers Protest Against )

वाचा:

साकेत गोखले यांचं मिरारोड येथील काशिमिरा भागातील इमारतीत घर असून आज सायंकाळी इमारतीच्या आवारात शिरून आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी गोखले यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असतानाच गोखले यांनी आपल्या घरातून व्हिडिओ शूट करून तो ट्विटरवर पोस्ट केला. त्यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व ठाणे ग्रामीण पोलिसांना टॅग केले. या व्हिडिओची अवघ्या काही मिनिटांतच देशमुख यांनी दखल घेतली व वेगाने पावले टाकण्यात आली. गंभीर बाब म्हणजे गोखले यांच्या आईलाही धमकावण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणाला वेगळंच वळण लागताना दिसत आहे.

गुंडगिरी खपवून घेणार नाही: गृहमंत्री

अनिल देशमुख यांनी गोखले यांच्या ट्विटला रिप्लाय देताना ही बाब सरकारने गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केले आहे. देशमुख यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिलेच शिवाय तातडीने गोखले यांना पोलीस सुरक्षाही पुरवली. महाराष्ट्रात अशाप्रकारच्या गुंडगिरीला जराही थारा दिला जाणार नाही, असे देशमुख यांनी गोखले यांना आश्वस्त केले. गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर गोखले यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी गोखले यांच्या घरी भेट दिली व निदर्शकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांना सांगितले.

वाचा:

गोखले यांच्या ‘त्या’ दाव्याने खळबळ
साकेत गोखले आधीपासूनच चर्चेत आहेत. राज्यात गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम भाजप पदाधिकाऱ्याच्या कंपनीला दिले होते, असा गंभीर आरोप साकेत गोखले यांनी केला आहे. तसे पुरावेच त्यांनी दिले आहेत. त्याचा आधार घेत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. घटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु जो प्रकार उघड झाला आहे त्यावरून असे निदर्शनास येत आहे की, महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. त्यामुळेच या प्रकाराची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Coronavirus: दिवसभरात ५ हजार रुग्ण करोनामुक्त; २७८ दगावले

0

मुंबईः राज्यात करोनाचा वाढता आकडा आता चिंता वाढवणारा ठरत आहे. तर एकीकडे करोनामुक्त होणाचे प्रमाणही वाढत आहे. आज राज्यात तब्बल ५ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यातील करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के इतके आहे. अशी माहिती यांनी दिली आहे. ( in )

आज राज्यात ९ हजार ६१५ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या ३ लाख ५७ हजार ११७ झाली आहे. तर आज २७८ जण करोनामुळं दगावले आहेत. त्यामुळं एकूण करोना मृतांचा आकडा आता १३ हजार १३२वर पोहोचला आहे. राज्यातील मृत्यू दर ३. ६८ टक्के इतका झाला आहे. आज तपासण्यात आलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ चाचण्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७ (१९.९८%) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

वाचाः

आज राज्यात ५ हजार ७१४ रुग्ण एकाचवेळी बरे झाल्यानं दिलासा मिळाला आहे. तर आत्तापर्यंत १ लाख ९९ हजार ९६७ करोना रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या विविध रुग्णालयांत १ लाख ४३ हजार ७१४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, ४५ हजार ८३८ जणं संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात नोंद झालेले २७८ मृत्यू हे मुंबई मनपा-५४, ठाणे-४, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-१०,कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-१६, वसई-विरार मनपा-४, पालघर-२,रायगड-१०, पनवेल मनपा-४, नाशिक-१, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे- १, जळगाव-९, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-८, पुणे मनपा-४९, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर-५, सोलापूर मनपा-४, सातारा-३, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, हिंगोली-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-३, बीड-२, नांदेड-३, नांदेड मनपा-१, यवतमाळ-१,नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

गूड न्यूज… भारतामध्ये लवकरच सुरु होणार क्रीडा स्पर्धांचे आयोजन

0

भारतातील क्रीडा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच भारतामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करायला सुरुवात होणार आहे. भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आज ही माहिती दिली आहे.

भारतामध्ये एका दिवसात जवळपास ४०-५० हजार करोनाचे रुग्ण सापडत आहेत. पण ही परिस्थिती लवकरच निवळेल, असे भारताच्या क्रीडा खात्याला वाटत असावे. कारण यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीपासून भारतीय खेळाडूंना सराव करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे सराव झाल्यानतंर स्पर्धा कधी खेळवल्या जातील, असे काही जणांचे म्हणणे आहे.

भारतामध्ये सप्टेंबरपासून क्रीडा स्पर्धांना सुरुवात होऊ शकते, अशी महत्वाची घोषणा आज क्रीडा मत्र्यांनी केली आहे. पण या स्पर्धा सुरु करताना सुरक्षेचे उपायही केले जाणार आहेत. गेल्या आठवड्यापासून ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी आपला सराव सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. आता लवकरच क्रीडा स्पर्धाही चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.

याबाबत भारताचे क्रीडा मंत्री रिजिजू यांनी सांगितले की, ” सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून भारतामध्ये क्रीडा स्पर्धांना आम्ही सुरुवात करणार आहोत. यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढायला मदतही होईल. आम्ही क्रीडा स्पर्धा सुरु करणार असलो तरी सुरक्षेचे उपायही यावेळी केले जाणार आहेत. करोनानंतर स्पर्धा भरवताना नवीन नियम बनवले जाणार आहे. हे नियम आम्ही सर्व संघटकांना पाठवणार आहोत. हे नियम खेळाडूंनाही लागू असतील.”

रिजिजू पुढे म्हणाले की, ” खेळाडूंनी आता सराव करायला सुरुवात केली आहे, हे पाहून मला आनंद झाला आहे. करोनानंतर स्पर्धा कशा भरवल्या जातील, नवीन नियम काय असतील, याबाबत मी राष्ट्रीय संघटनांबरोबर बोललो आहे. यापुढे स्पर्धा भरवायच्या असतील तर नेमक्या काय गोष्टी कराव्या लागतील, यावर आमची चर्चा झाली आहे. कारण स्पर्धा सुरु झाल्यावर बरीच लोकं एकत्रित येतील. तर काही गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील. त्यामुळे कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या याबाबत आमची चर्चा झालेली आहे. यापुढे नियम पाळूनच सर्व स्पर्धा भरवण्यात येतील.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

दुर्दैवं! करोनाच्या भीतीनं कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या, नंतर अहवाल आला निगेटिव्ह

0

म. टा. प्रतिनिधी, : करोनानं देशासह राज्यभरात () धुमाकूळ घातला असून, हजारो नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. करोना संसर्गाचा धसका सगळ्यांनीच घेतला आहे. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. करोना झाल्याच्या भीतीने एका तरुणाने आज, दुपारी कोविड सेंटरमध्येच आत्महत्या केली. मात्र, संध्याकाळी या तरुणाचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

करोना संसर्गाचा लोकांनी किती धसका घेतला आहे, हे तालुक्यातील या घटनेने सिद्ध झाले. केवळ पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर आता आपल्याला देखील करोनाचा संसर्ग होणार या भीतीनेच तरुणाने आत्महत्या केली. पण दुपारी आत्महत्या केलेल्या या दुर्देवी तरुणाचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. त्यात तो निगेटिव्ह आला. केवळ भीतीनेच या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली.

गडहिंग्लज () तालुक्यातील लिंगनूर कसबा नूर या गावातील ही घटना आहे. या गावातील सुधीर दत्तात्रय येसरे हा ३२ वर्षाचा तरूण शेती करतो. चार दिवसांपूर्वी गावात एक जण करोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना प्रशासनाने गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर येथे नेले. तेथे सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल येईपर्यंत सर्वांना तेथेच ठेवण्यात येणार होते. त्यानुसार येसरे याला देखील तेथे ठेवण्यात आले. अहवाल येण्यास विलंब लागत असल्याने तो अस्वस्थ होता. आपला अहवाल काय येणार याची त्याला काळजी लागली होती. अहवाल पॉझिटिव्ह येणार अशी त्याला भीती वाटत होती. यामुळे त्याच्या अस्वस्थेत भर पडू लागली. यामुळे घाबरलेल्या येसरेने कोव्हिड सेंटरमधील बाथरूममध्ये आत्महत्या केली.

दोन दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी दुपारी सर्वांचा अहवाल आला. ज्यांचा ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी वाहन मागवण्यात आले. त्यानुसार या सेंटरवर वाहन आले. येसरे याचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याला घरी पाठवण्यासाठी शोधाशोध सुरू झाली. तो बराच वेळ सापडेना. शेवटी बाथरूममध्ये त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अहवालाची वाट न पाहताच त्याने आपली जीवनयात्रा संपवली होती. पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. ते पाहण्यासाठी तो मात्र राहिला नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

आयपीएल एक आठवडा लवकर का खेळवणार, जाणून घ्या महत्वाचे कारण

0

यापूर्वी आयपीएल २६ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याचे आपण सर्व ऐकत होतो. पण आता काही दिवसांपूर्वी आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याचे समजते आहे. आयपीएल यावेळी एक आठवडा लवकर का खेळवण्यात येत आहे, जाणून घ्या महत्वाचे कारण…

ऑस्ट्रेलियातील विश्वचषक आणि आशिया चषक या दोन महत्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आणि आयपीएलचा मार्ग सुकर झाला. आयपीएल भारतात खेळवणे धोक्याचे असल्याचे बीसीसीआयला वाटले आणि त्यांनी आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा मार्ग निवडला. पण पूर्वी जी आयपीएलची तारीख जाहीर करण्यात आली होती, त्यापेक्षा एक आठवडा लवकर यावेळी आयपीएल खेळवले जाणार असल्याचे समजते.

यावर्षी आयपीएल एक आठवडा लवकर खेळवण्यात येणार आहे, कारण आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेल्यावर भारतीय संघाला प्रथम १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. जर आयपीएल एक आठवडा उशिरा खेळवली गेली असती तर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये १४ दिवस क्वारंटाइन होण्यासाठी जास्त वेळ मिळाला नसता. त्यामुळे आयपीएल एक आठवडा लवकर खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

भारतीय खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाने काही नियम सांगितले आहेत आणि या नियमांचे पालन भारतीय खेळाडूंना करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर भारतीय संघाला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यानंतर ते सराव सुरु करू शकतात आणि त्यानंतर मालिका खेळवली जाऊ शकते. या सर्व गोष्टींचा कालावधी पाहिला तर भारतीय संघ जवळपास महिनाभर ऑस्ट्रेलियामध्ये खेळू शकणार नाही. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ट्वेन्टी-२०, वनडे आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मात्र हा नियम जास्त पटलेला दिसत नाही. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाकडे खेळाडूंना एक आठवड्यासाठी क्वारंटाइन करावे, अशी विनंती केली होती. कारण खेळाडू १४ दिवस फक्त हॉटेलमध्ये बसून राहणे योग्य नाही, असे गांगुली यांना वाटत होते. पण यावेळी गांगुली यांची विनंती ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळानी फेटाळली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Latest posts