Friday, January 27, 2023
Home Blog Page 5266

मटणाचा रस्सा सांडल्याने वडील ओरडले; १० वर्षीय मुलाची आत्महत्या

0

पिंपरी: सांडल्यानंतर वडील रागावले म्हणून दहा वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन केली. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोरेवस्ती, येथे ही धक्कादायक घटना घडली. ( Ten year old boy commits suicide in Pimpri )

वाचा:

वेंकटेश लक्ष्मण पुरी (वय १०, रा. श्रीकुंज हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती- चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकटेश हा महात्मा फुले इंग्लिश स्कूल आकुर्डी या शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत होता. त्याचे वडील लक्ष्मण पुरी हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत तर आई धुण्या- भांड्याची कामे करते. वेंकटेश याला तीन वर्षांनी लहान बहीण आहे. अमावस्येच्या दिवशी सोमवारी पुरी यांच्या घरी मटणाचे जेवण केले होते. जेवताना वेंकटेश याच्याकडून मटणाचा रस्सा सांडला. त्यामुळे त्याचे वडील त्याच्यावर रागावले. त्याचा राग वेंकटेश याच्या मनात होता.

वाचा:

वेंकटेशने त्या रागातूनच आज सकाळी वडील लक्ष्मण आणि आई आपापल्या कामासाठी निघून गेले असता टोकाचे पाऊल उचलले. आज घरी वेंकटेश आणि त्याची तीन वर्षाची लहान बहीण हे दोघेच होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लक्ष्मण घरी आल्या असता वेंकटेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
वेंकटेशच्या लहान बहिणीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की, वेंकटेश याने बाथरूमच्या भिंतीवर चढून छताला ओढणीने स्वतःला लटकवून घेतले. याबाबत चिखली पोलीस तपास करीत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

ओबीसींच्या मनात आरक्षणाबाबत भीती; मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' वचन!

0

मुंबई: मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते ती त्यांनी मनातून काढून टाकावी. मी ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. याबाबत ओबीसी समाजाच्या शंका-कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी ॲडव्होकेट जनरल (महाधिवक्ता) यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू, अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी आज आश्वस्त केले. ( On )

वाचा:

ओबीसी व भटके विमुक्तांच्या न्याय मागण्यांसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री , अन्न व नागरी पुरवठा मंत्री , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी चळवळीतले अनेक नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले.

वाचा:

मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसींच्या हक्कासाठी सरकार तुमच्यासोबत आहे. ओबीसींचे कोणतेच प्रश्न दुर्लक्षित राहणार नाहीत. बारा बलुतेदार समाजाच्या प्रश्नांकडेही लक्ष आहे. नाभिक, मच्छिमार समाजाचे प्रश्न माहीत आहेत. करोनाचे संकट हे जगावर आलेले संकट आहे. कोणत्या एका समाजावरचे ते संकट नाही. आज सर्वच समाज संकटात आहेत, या संकटाची व्याप्तीही मोठी आहे त्यामुळे जपून पावले टाकावी लागत आहेत. ओबीसींच्या प्रश्नांची दखल मी यापूर्वीही घेतली आहे. आपण मिळून कामही सुरु केले होते. अर्थसंकल्पातून चांगली स्वप्ने राज्यासाठी घेऊन आलो असताना कोरोनाचे संकट आलं आहे. पण असे असले तरी ओबीसी समाजाचा एकही प्रश्न किंवा मुद्दा सोडून देणार नाही. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. विचारपूर्वक, कायमस्वरूपी ठोस निर्णय घेण्याचे मी वचन देतो. ओबीसी समाजाला न्याय देणारच. ठामपणे एकेक पाऊल पुढे टाकत जात आहोत. सरकारवर, माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

वाचा:

भुजबळ म्हणाले, ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. तसेच ओबीसी समाजावरही मराठा समाजाच्या आरक्षणामुळे कुठलाही अन्याय होणार नाही. ओबीसी महामंडळांसाठी आर्थिक तरतूद करून जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मंत्रिमंडळातील सर्व सहकारी ओबीसींच्या मागणीसाठी सकारात्मक आहेत. वडेट्टीवार म्हणाले, ओबीसीच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. ज्या जिल्ह्यात कमी आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. महाज्योतीचे कार्यालय नागपूर येथे केलेले असून सध्या महाज्योतीसाठी ५० कोटीची मागणी केलेली आहे. ओबीसी शिष्यवृत्तीसाठीचे एक हजार कोटी पैकी पाचशे कोटी मिळणार आहेत. बिंदूनामावली व पदोन्नतीबाबतचेही प्रश्न सोडवण्यात येतील. बारा बलुतेदारांसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यासाठीही प्रयत्न केला जाईल.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

देशात कुठेही करोनाचा सामूहिक संसर्ग नाही, केंद्राचं स्पष्टीकरण

0

नवी दिल्लीः काही भागांमध्ये आणि स्थानिक पातळीवर करोनाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. आणि सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं काही राज्यांनी म्हटलंय. पण देशात कुठेही सामूहिक संसर्गाला सुरुवात झालेली नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

सामूहिक संसर्गाची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेनं अजूनही नश्चित केलेली नाही. सामूहिक संसर्गचा टप्पा ठरण्याचा निर्णय संघटनेने संबंधित देशांना दिले आहेत, असं केंद्रीय आरोग्य विभागाचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी सांगितलं. एखाद्या व्यक्तील करोनाचा संसर्ग झाला आहे. ही व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली. हे सांगण्यास ते असमर्थ ठरत असेल. यामुळे करोना संसर्गाच्या साखळीचा तपास लावणं अवघड ठरत असेल, तेव्हा सामूहिक संसर्ग सुरू झालाय असं मानलं जातं, असं राजेश भूषण म्हणाले.

दिल्लीतील सेरो सर्व्हेबाबतही भूषण यांनी स्पष्टीकरण दिलं. एकूण लोकसंख्येपैकी फक्त २० टक्के जण करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. या अर्थ सामूहिक संसर्ग सुरू झाला असा होत नाही. सामूहिक संसर्गावरून काही तांत्रिक दावे केले जात आहे आणि यात कंटेन्मेंट झोनमध्ये किती प्रभावीपणे नियमांची अंमलबजावणी केली गेली हे महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

काही भागांमध्ये आणि स्थानिक पातळीवर करोनाचा संसर्ग आहे. तिथे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. पण तो सामूहिक संसर्ग आहे असं म्हणता येणार नाही, असं राजेश भूषण म्हणाले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यात सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचं म्हटलं होतं. राज्यातील तिरुवनंतपूर जिल्ह्यात सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचं ते म्हणाले. तर पश्चिम बंगालमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचं वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ११ लाखांवर

गेल्या २४ तासांत देशभरात ३७ हजार १४८ रुग्णांची भर पडून एकूण करोनारुग्ण ११,५५,१९१ झाले आहेत. गेल्या २४ तासांत करोनामुळे ५८७ मृत्युंची नोंद झाली असून आतापर्यंत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २८,०८४ वर पोहोचला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

ऑक्सफोर्डची लस करोनावर किती प्रभावी? हे आहे संस्थेचे उत्तर

0

नवी दिल्लीः करोनाविरोधातील लढाईत संपूर्ण जगाचं लक्ष लसीवर केंद्रीत झालं आहे. करोनाची लस तयार होत नाही तोपर्यंत करोनावर मात करणं शक्य नाही. अशा परिस्थितीत ऑक्सफोर्ड विद्यापीठातून एक चांगली बातमी समोर आली आहे. या लसीची मानवी चाचणी सुरूआहे आणि चाचणीमध्ये आणखी चांगले निकाल समोर आले आहेत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या या लसचे उत्पादन भारतातही केले जाणार आहे.

ऑक्सफोर्डच्या बहुप्रतिक्षित करोना लसीबाबत ‘टीव्ही टुडे नेटवर्क’ने ऑक्सफोर्ड व्हॅक्सीन ग्रुपचे डायरेक्टर अँड्र्यू जे पोलार्ड आणि पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली. अँटीबॉडीच्या प्रतिसादावरून हे दिसून येते की ही लस अत्यंत प्रभावी आहे. लसीची चाचणी यशस्वी असूनही, आता ही लस करोना विषाणूपासून संरक्षण देऊ शकते याचा पुरावा हवा आहे. आता या लसीची चाचणी वेगवेगळ्या लोकांवर केली जाईल आणि त्याचा इतर लोकांवर काय परिणाम होतो हे पाहण्याचे काम केले जाईल, असं अ‍ॅन्ड्र्यू पोलार्ड म्हणाले.

करोना साथीच्या काळात लस बनवणं आणि संपूर्ण जगाला ती पुरवणं हे एक मोठं आव्हान असणार आहे. अमेरिका आणि चीनमध्येही लस बनण्यावर काम सुरू आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याशी स्पर्धा आहे का? असा प्रश्न अ‍ॅन्ड्र्यू पोलार्ड यांना केला गेला. आम्ही ही स्पर्धा म्हणून नाही तर एकत्रित प्रयत्न म्हणून पाहतो. जगातील इतर देशांमधील कोविडवरील संशोधनात गुंतलेल्या लोकांसह आम्ही आपले अनुभव देखील सामायिक करतो जेणेकरुन एकत्रितपणे आपण करोनावर मात करू शकू, असं पोलार्ड म्हणाले.

काय असतील लसीचे दुष्परिणाम?

कोविड लसीचे दीर्घकालीन दुष्परिणाम आहेत का? जर आपण इतक्या वेगवान काम करत असाल तर लसीच्या गुणवत्तेवर परिणाम तर होणार नाही ना? असंही पोलार्ड यांना विचारलं गेलं. लस बनविण्याचा कोणताही शॉर्टकट मार्ग नाही. लस तयार करताना सामान्य दिवसांप्रमाणेच आजही क्लिनिकल चाचण्या केल्या जातात. त्यामुळे गुणवत्तेशी कुठलीही तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याकडे दीर्घकालीन डेटा उपलब्ध नाही. आम्हाला फक्त इतका फायदा होऊ शकतो की यापूर्वीही आम्ही या प्रकारची लस वापरतो, असं पोलार्ड म्हणाले.

आम्ही ही लस मोठ्या प्रमाणात तयार करणार आहोत आणि या आठवड्यात आम्ही या लसीसाठी परवानगी घेणार आहोत, असं भारतात ही लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला म्हणाले. डिसेंबरपर्यंत आम्ही ऑक्सफोर्ड लस Covishield चे 300-400 दशलक्ष डोस तयार करू, पूनावाला यांनी सांगितलं.

किंमत सुमारे १००० रुपये असू शकतेः पूनावाला

कोविड यांच्यासमवेत संपूर्ण जग संघर्ष करीत असल्याने आम्ही लसची किंमत किमान ठेवू. सुरुवातीला यावर कोणताही नफा घेतला जाणार नाही. भारतात त्याची किंमत सुमारे १००० रुपये किंवा त्यापेक्षाही कमी असू शकते. संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करीत आहे. म्हणून, लसची मागणी खूप जास्त असेल. अशा परिस्थितीत त्याचे उत्पादन व वितरण यासाठी आम्हाला शासकीय यंत्रणेची आवश्यकता असेल, असं पूनावाला यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

चिनी सैनिक मागे हटले नाहीत; पाळत ठेवण्यासह भारताचा युद्धाच्या तयारीला वेग

0

नवी दिल्लीः भारत-चीनमध्ये १४ जुलैला कमांडर स्तरावर बैठक झाली. या बैठकीत तणावाच्या ठिकाणांवरून सीमेवरील सैनिक मागे हटवण्यावर चीनने सहमती दर्शवली. पण चीनचा विश्वासघातकी चेहरा पुन्हा उघड झाला आहे. लडाखमध्ये एलएसीवर तणावाच्या ठिकाणांवरून (LAC) चिनी सैनिक मागे हटलेच नाहीए. यामुळे सीमेवरील तणावाची स्थिती कायम आहे. चिनी सैनिक अजूनही तिथे ठाण मांडून आहेत. ९ जुलैनंतर सीमेवर चिनी सैनिकांच्या कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत, असं सूत्रांनी सांगितलं.

दोन आठवड्यांचा कालावधी

सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी गलवान खोऱ्यातील पीपी -14 आणि पीपी -15 येथूनही सैनिक मागे घेण्यात आले होते. हा पहिला टप्पा पूर्ण झाला. दोन्ही देशांचे सैनिक एक ते दीड किलोमीटर मागे हटले आणि त्या ठिकाणी बफर झोन करण्यात आला. यामुळे आमने-सामने असलेले दोन्ही देशांचे सैनिक मागे हटल्याने तणाव काहीसा कमी झाला. पण हॉट स्प्रिंग भागातून बैठकीत ठरल्या प्रमाणे चिनी सैनिक मागे हटलेले नाहीत. पॅंगॉंग भागात फिंगर -4 मधील चिनी सैनिक 9 जुलैला फिंगर -5 पर्यंत मागे गेले.

आता एक आठवडा प्रतीक्षा करा

१४ जुलैच्या कोअर कमांडर स्तरावरील बैठकीनंतर फिंगर- 4 येथून चिनी सैनिक पूर्णपणे मागे हटतील असं वाटत होतं. पण चिनी सैनिक तिथून मागे हटलेले नाहीत. ते अजूनही तिथेच ठाण मांडून आहेत. सैनिक कशा प्रकारे मागे हटतील? यावर कोअर कमांडर स्तरावरील बैठकीत चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडताना दिसत नाहीए. सैनिक मागे हटवण्यासाठी बैठकीत दोन आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता एक आठवडा उलटून गेला आहे. पहिल्या टप्प्यातही चिनी सैनिक अखेरच्या काही दिवसांमध्ये मागे हटले होते. यामुळे पुढच्या आठवड्यात चिनी सैनिक पँगाँगमधून मागे हटतील, अशी अपेक्षा लष्कराच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. तरीही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे.

चीनवर विश्वास नाही

वाटाघाटी करूनही चीनवर विश्वास ठेवता येत नाही. नुकतेच लेह दौर्‍यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे स्पष्ट संकेत दिले. आतापर्यंत जी काही प्रगती झाली आहे त्याद्वारे हे प्रकरण सोडवायला हवे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.चीनशी असलेला सीमावाद कधीपर्यंत चालेल आणि तो मिटेल की नाही? याची कुठलीच हमी देता येणार आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले होते. चीन हा वाद हिवाळ्यापर्यंत वाढवेल, अशी शक्यता आहे. पण हिवाळ्यातही चिनी सैनिक मागे हटले नाहीत, तर भारतीय सैन्यही यासाठी सज्ज आहे.

हिवाळ्यासाठी तैनातीची तयारी

एलएसीजवळ ३० हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. एलएसीवर तैनात जवानांसाठी पूर्ण रसद आणि आवश्यक उपकरणं हिवाळ्यापूर्वी पोहोचली जातात. कारण हिमवृष्टीमुळे तिथे किमान सहा महिने तरी रस्ता बंद असतो. सध्या लष्कराकडून अतिरिक्त जवानांसाठीही पूर्ण व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे हिवाळ्यात अतिरिक्त सैनिक तैनात करण्याची आवश्यकता असेल तर अडचण येणार नाही.

युद्धाच्या शक्यतेनेही तयारीला वेग

युद्धाची स्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी भारतीय सैन्याकडून पूर्ण तयारी करण्यात येत आहे. पुढच्या आठवड्यात फ्रान्समधून ५ राफेल लढाऊ विमानं भारताला मिळणार आहेत. त्याचबरोबर एलएसीवर देखरेखीसाठी नौदलाची लढाऊ विमानंही तैनात करण्यात आली आहेत. तसंचडीआरडीओने तयार केलेल्या ‘भारत’ ड्रोनद्वारे नजर ठेवून चीनच्या सर्व बारीक हालचाली टिपण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेत तोंड दाखवायलाही जागा नाही'

0

जयपूरः राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी बंडखोर नेते यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केलीय त्यांची जनतेसमोर तोंड दाखवण्याचीही लायकी नाहीए, असं म्हणत अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना मंगळवारी पुन्हा टीकेचं लक्ष्य केलं.

राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी कट रचला गेला. पण हा कट वेळी उघड झाल्याने विरोधकांचे मनसुबे उधळले गेले, असा पुनरुच्चार गहलोत यांनी केला. तसंच आपलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावाही गहलोत यांनी केला.

राज्य सरकार एकीकडे करोनाच्या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भाजपसोबत सत्ता उलथवण्याचा कट रचत होते. सचिन पायलट आणि इतर कुठल्याही नेत्याचं नाव न घेतला गहलोत यांनी हा आरोप केला. हा प्रकार अजिबात खपवून घेणार नाही तो निषेधार्ह आहे. पक्षाशी गद्दारी करण्याऱ्यांना जनतेत तोंड दाखवायलाही जागा नाही, असं गहलोत म्हणाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.

देशात लोकशाहीला दुबळं करण्याचा हा प्रयत्न आहे. पण काँग्रेस आमदार असं होऊ देणार नाहीत. ते लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत, असं गहलोत म्हणाले. यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य व्हीप महेश जोशी यांनी अधिकृतपणे पत्रक जारी केलं आहे. सत्याचा विजय होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. आपलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल. सत्याचा विजय होऊन हे सरकार पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला.

लपाछपीचा खेळ करून सत्य आपलं करता येत नाही, असं गहलोत म्हणाले. यावेळी गहलोत यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या भारतीट ट्रायबल पार्टी आणि राष्ट्रीय लोक दलाच्या आमदारांचे आभार मानले. यावेळी आमदारांनी गहलोत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. आपण सर्वांनी मिळून सत्याचा विजय करू, असं ते आमदार म्हणाले. राजस्थान काँग्रेसने आठवडाभरात बोलावलेली विधिमंडळ पक्षाची ही तिसरी बैठक होती.

पायलट यांची आमदाराला नोटीस

सचिन पायलट यांनी आपल्याला ३५ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस आमदार गिरराजसिंह मलिंगा यांनी केला होता. आता सचिन पायलट यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आमदार खोटे आणि द्वेषपूर्ण आरोप करत आहेत, असं पायलट यांनी म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

घरात ठेवलेले पैसे घेऊन बायको पळाली!; पतीची पोलिसांकडे धाव

0

सांगली: कौटुंबिक वादातून चिडलेल्या पत्नीने घरातील तीस हजार रुपये घेऊन पोबारा केला. पतीने समजूत घालून पत्नीला माघारी बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी घरी येत नसल्याने आणि पैसेही मिळत नसल्याने अखेर पतीने पत्नीच्या विरोधात पोलिसात धाव घेतली. ग्रामीण पोलिसांनी तिच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दीक्षा भीमराव कांबळे (रा. समडोळी, ता. , सध्या रा. ) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. ( In Sangli )

वाचा:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील समडोळी येथे राहणाऱ्या भीमराव कांबळे यांच्याशी इचलकरंजी येथील साक्षी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. किरकोळ कारणांवरूनही दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२० ते २७ फेब्रुवारी २०२० या दरम्यान साक्षी यांनी घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून भीमराव यांनी घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले ३० हजार रुपये घेऊन माहेरी पोबारा केला. घरातील पैसे घेऊन पत्नी माहेरी गेल्याचे लक्षात येताच भीमराव यांनी तिची समजूत घालून पुन्हा माघारी बोलवण्याचा प्रयत्न केला.

वाचा:

मात्र, गेल्या साडेचार महिन्यांपासून पत्नीने पैसे दिले नाहीत आणि ती परतही आली नाही. अखेर भीमराव यांनी याबाबत मंगळवारी सांगली ग्रामीण ठाण्यात पत्नीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. भीमराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून पत्नी साक्षी भीमराव कांबळे यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

रुग्णाला बेड मिळत नसल्यानं नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन

0

म. टा. प्रतिनिधी, : करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील एकही रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाकडून सतत दिली जात आहे. मात्र दुसरीकडे शहरातील आठ ते दहा रुग्णालयात सहा ते सात तास फिरून देखील एका तरुणाला ऑक्सिजन बेड मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णाला बेड उपलब्ध न झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं आहे. नातेवाईकांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यानंतर रुग्णाला बेड उपलब्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे. ( in)

वाचाः

धायरी येथे राहणाऱ्या मनोज कुंभार या ३४ वर्षीय तरुणाला सकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे या तरुणाच्या मित्रांनी तातडीने ऑक्सिजन ॲम्बुलन्स बोलावून त्यामधून मनोजला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दुपारी दोन वाजल्यापासून शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयात जाऊन त्यांनी या तरुणाला ऍडमिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी निराशाच आली. आमच्याकडे सध्या ऑक्सीजन बेड उपलब्ध नाही तुम्ही रुग्णाला घेऊन दुसरीकडे जावा, असा सल्ला त्यांना हॉस्पिटल प्रशासनाकडून दिला जात होता. संबंधित तरुणाची करोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल उद्या येणार आहे.

वाचाः

तरुणाला बेड उपलब्ध न झाल्यानं तरुणाच्या नातेवाईकांनी अलका चौकात रुग्णवाहिका उभी करुन ठिय्या आंदोलन सुरू केलं. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून घडलेला प्रखार महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवण्यात आला. त्यावर पालिकेनं दळवी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देत असल्याचं आश्वासन नातेवाईकांना दिलं. त्यानंतरचं नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतलं.

दरम्यान, पुण्यात पुन्हा लॉकडाऊननंतरही करोनाचा संसर्ग आटोक्यात आला नाहीये. आज चोवीस तासात ५५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. करोना मृतांचा आकडा १४४५ एवढा झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

धक्कादायक: ब्ल्यू फिल्म दाखवून दाम्पत्याचे महिलेशी अनैसर्गिक कृत्य

0

नागपूर: ब्ल्यू फिल्म दाखवून दाम्पत्याने महिलेशी अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रतापनगर भागात उघडकीस आली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.

(वय ४४) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सरोज रामकिशन जांगिड (वय ४०, दोन्ही रा. शांतीविहार रेसिडेन्सी, दाते ले-आउट, सोनेगाव),असे रामकिशन याच्या पत्नीचे नाव आहे. पीडित ३८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. रामकिशन हा फर्निचर कंत्राटदार आहे.

वाचा:

पीडित महिला रुग्ण सांभाळण्याचे काम करते. २०११मध्ये रामकिशन व त्याची पत्नी पीडित महिलेच्या नातेवाइकाकडे भाड्याने राहायला आले. यादरम्यान पीडित महिला व सरोजची ओळख झाली. पीडित महिलेचे सरोजच्या घरी जाणे-येणे वाढले. माझे पती माझ्यावर प्रेम करीत नाहीत, असे सरोजने पीडित महिलेला सांगितले. त्यानंतर तिने पीडित महिलेसोबत बळजबरीने अश्लील चाळे केले. याची चित्रफितही सरोजने काढली. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन सरोज ही पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करायला लागली. त्यानंतर सरोजने पतीला याबाबत सांगितले. तिच्या पतीनेही चित्रफित व्हायरल करेन अशी धमकी देऊन पीडित महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य करायला सुरुवात केली. या अश्लील कृत्याची मोबाइलद्वारे चित्रफित तयार केली. ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन दाम्पत्य तिला ब्लॅकमेल करायला लागले.

वाचा:

रामकिशनने नंतर पीडित महिलला लग्नाचे आमिष दाखविले. तिला राजस्थान येथे नेले. तेथेही तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. पीडित महिलेने रामकिशन याला लग्नाची गळ घातली. त्यानंतर जांगिड दाम्पत्य दाते ले-आऊट येथे राहायला गेले. रामकिशन याने पीडित महिलेला लग्नास नकार दिला. या सगळ्या प्रकाराबाबत पीडित महिलेने प्रतापगर पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी अनैसर्गिक कृत्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रामकिशन याला अटक केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

गणपती मंडळांचा कौतुकास्पद उपक्रम; करोनारुग्णांना शोधणार

0

म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोना विरुद्धच्या लढ्यात गणेशोत्सव मंडळांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून शहराच्या मध्य भागातील २७२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्योत्सवाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलित करणे आणि घरी विलगीकरणासाठी मदत करणे अशा पद्धतीचे काम मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत केले जात आहे.
()

बुधवार पेठेतील कोतवाल चावडी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या एसटीडी बुथ येथील कोविड मदत केंद्राचे उद्घाटन महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई गणपती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, माणिकराव चव्हाण, लोकसहभाग सहनियंत्रण अधिकारी राजेंद्र निंबाळकर, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे आशिष महादळकर, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, नितीन पंडित, संजय बालगुडे, अ‍ॅड.प्रताप परदेशी, रवींद्र माळवदकर, भाऊ करपे, सुनील रासने आदी उपस्थित होते. ‘प्रशासन आणि गणेश मंडळांच्या सहकार्याने पुण्यातील कोरोना मुक्तीचा लढा यशस्वी ठरेल,’ अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

वाचाः

अशी असेल कार्यकर्त्यांच्या कामाची पद्धत
क्षेत्रीय कार्यालयाकडून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी रुग्णाच्या भागातील मंडळांच्या प्रतिनिधींना सूचना देतील. यामुळे बाधित रुग्णाची संपूर्ण माहिती तसेच संपर्कात आलेल्या इतर सर्व व्यक्तींची माहिती मिळणे सोपे होईल. रुग्णाच्या घरातील सदस्य व त्याच्या संपर्कातील लोकांना सणस ग्राउंड येथील केंद्रात तपासणीसाठी पाठविले जाईल.

वाचाः

परिस्थिती पाहून घरी विलगीकरण करण्यास कार्यकर्ते प्रोत्साहन देतील. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची स्थिती असेल तर तसा निरोप यंत्रणेला दिला जाईल. प्रातिनिधिक स्वरुपात कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हे काम सुरू होणार आहे. टप्याटप्याने याची व्याप्ती सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाढविण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts