Friday, January 27, 2023
Home Blog Page 5278

जिओची २४९ रुपयांत 56GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग ऑफर

0

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे अनेक रिचार्ज प्लान आहेत. ज्यांची वैधता २८ दिवसांची आहे. जिओकडे २ जीबी डेटा दररोज ऑफरचे प्लान सुद्धा आहेत. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या एका अशा प्लानची माहिती सांगणार आहोत.

वाचाः

ज्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. याची वैधता २८ दिवसांची आहे. जिओचा ३४९ रुपयांचा पॅकची माहिती देत आहोत. ज्यात रोज ३ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. २४९ रुपयांचा रिलायन्स रिचार्ज पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच एकूण ५६ जीबी डेटा युजर्संना मिळतो.

वाचाः

जिओच्या या प्लानमध्ये डेटाशिवाय कॉलिंगची सुविधा दिली जाते. जिओ नेटवर्क्सवर ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची मजा घेता येवू शकते. नॉन जिओ नेटवर्कवर १ हजार नॉन जिओ कॉलिंग मिळते. २४९ रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा ऑफर केला जावू शकतो.

वाचाः

तसेच, याशिवाय, जिओकडे ४४४ रुपये, ५९९ रुपये, २३९९ रुपये, २५९९ रुपयांचे रिचार्ज पॅकमध्ये सुद्धा २ जीबी डेटा ऑफर केला जातो. हे सर्व रिचार्ज पॅक सुद्धा सोबत येतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

धुळ्यात गँगवॉर; भररस्त्यात पाठलाग करून तरुणाचा निर्घृण खून

0

म. टा. वृत्तसेवा, धुळे: धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान टोल नाक्याजवळ एका हॉटेलवर दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा खून करण्यात आला. या हाणामारीत लाठ्या-काठ्यांसह तलवारी व हत्यारांचा वापर झाला. तर गावठी कट्ट्यातून गोळीबारही करण्यात आला.

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन गट हत्यार घेऊन एकमेकांच्या मागे धावत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात टोळीयुद्धात राहुल मिंड या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. राहुलवर चार गोळ्या फायर करण्यात आल्या असून धारधार शास्त्रांनी देखील वार करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. आपल्या काही साथीदारांसोबत स्वतःच्या हॉटेलमध्ये राहुल बसला होता. त्या वेळी जुना वाद असलेली टोळी चाल करून आली आणि राहुल त्याच्या तावडीत सापडला या जीवघेण्या हल्ल्यात राहुलचा जीव गेला. उपचारासाठी त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत याबाबत कारवाई सुरू होती.

जमावाच्या मारहाणीत दरोडेखोर ठार

नांदुरी-नाशिक रस्त्यावरील ओम साई पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून २ लाखांचा ऐवज चोरून नेला. मालकाने आरडाओरडा केल्याने जमावाने दोन दरोडेखोरांना पकडून बेदम मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण पळून गेले. दरम्यान कळवण पोलिसांनी दरोड्याचा व जमावाविरोधात खुनाचा असे परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

आठ दिवसांपूर्वीच धुळ्यात झाली होती तरुणाची हत्या

धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी कालिकादेवी मंदिराशेजारी जितेंद्र शिवाजी मोरे (वय ३४, रा. फुले कॉलनी, मोगलाई साक्रीरोड) या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. आठ दिवसांपूर्वीच ही घटना घडली होती. जितेंद्र मोरे शहरातील खासगी कुरिअर कंपनीत येथे कुरिअर वाटपाचे काम करायचा. घटनास्थळाच्या काही अंतरावर तरुणाची मोटरसायकल आढळून आली. याबाबत पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'हा' आहे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा संघ!

0

नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये सुरूवातीचा काळ हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचा होता. या दोन्ही संघांनी क्रिकेटवर बरीच वर्ष वचस्व ठेवले होते. त्यानंतर वेस्ट इंडिज, मग भारत आदी संघांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला कट्टर देण्यास सुरूवात केली. वनडेतील सर्वोत्तम संघ मानला जातो. सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शानदार कामगिरी करत आहे. त्याआधी महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियामध्ये मोठे बदल झाले. धोनीच्या आधी असा बदल सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली झाला.

वाचा-
आयसीसीचे स्पर्धांचे विजेतेपद मिळवणाऱ्या टीम इंडियाने एका पेक्षा एक फलंदाज दिले आहेत. भारतीय संघात आक्रमक फलंदाजांची कमी नाही. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या संघाचा विचार केल्यास भारतीय संघ सर्वात आघाडीवर आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने सर्वात जास्त चौकार मारले आहेत.

वाचा-
भारतीय संघाने आतापर्यंत १८ हजार ३०० चौकार मारले आहेत. तर आयसीसी वनडे वर्ल्ड कपचे सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत १६ हजार ६९७ चौकार मारले आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे. त्यांनी १५ हजार ६७३ चौकार मारले आहेत. त्यानंतर श्रीलंकेचा क्रमांक येतो. त्यांनी १४ हजार ६१७ मारलेत. तर वेस्ट इंडिजने १३ हजार ७०६ आणि इंग्लंडने १३ हजार ५०६ चौकार मारलेत.

वाचा-
याच बरोबर क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याचा विक्रम भारताच्या विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने ५४ वेळा पहिल्या चेंडूवर चौकार मारला आहे. यात कसोटी क्रिकेटमध्ये २५ वेळा पहिल्या चेंडूवर चौकार मारला. वनडे क्रिकेटमध्ये २६ वेळा तर टी-२० क्रिकेटमध्ये ३ वेळा अशी कामगिरी केली. त्याने भारताकडून १०४ कसोटी सामन्यात २३ शतकांसह ८ हजार ५८६ धावा केल्या. यात ३१९ ही त्याची सर्वोच्च धाव संख्या आहे. तर २५१ वनडेत ८ हजार २७३ धावा केल्या. वनडेत २१९ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. टी-२०त १९ सामन्यात त्याने ३९४ धावा केल्या.

वाचा-

मारणारे संघ
१] भारत- १८ हजार ३००
२] ऑस्ट्रेलिया- १६ हजार ६९७
३] पाकिस्तान- १५ हजार ६७३

पहिल्या चेंडूवर सर्वाधिक वेळा चौकार मारणारा सेहवाग
कसोटी- २५
वनडे-२६
टी २०- ३

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेफ ऑनलाइन बँकिंग टिप्स पाहिल्या का?

0

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन स्कॅमर्स युजर्सच्या बँक अकाउंटच्या डिटेल्सची चोरी करण्यासाठी नवीन नवीन पद्धत अवलंबित आहेत. सायबर गुन्हेगारी सध्या अनेकांची चिंता वाढवणारी आहे. बँकिंग सेक्टर सध्या हॅकर्सच्या हिटलिस्टवर आहेत. अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. बँकिंग ऑनलाइन फ्रॉडची वाढत्या घटना वेगाने वाढत आहेत. डिजिटल पेमेंट्स सुद्धा वेगाने वाढत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंग ट्रान्झॅक्शन साठी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काही टिप्स बँकेच्या ग्राहकांसाठी दिल्या आहेत. ४५ सेकंदाच्या या व्हिडिओत एसबीआयने सुरक्षित ऑनलाइन बँकिंगच्या टिप्स सांगितल्या आहेत. याआधीही एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी सेफ नेट बँकिंग साठी टिप्स दिल्या आहेत.

वाचाः

एसबीआयकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत वेगवेगळी वेळ दाखवण्यात आली आहे. जाणून घ्या यासंबंधी….

>> जर तुम्हाला कोणताही फ्रॉड कॉल, ईमेल आणि टेक्स्ट मेसेज मिळाल्यास त्या लक्षपूर्वक वाचा. त्यात अर्जंट पेमेंट करण्यास सांगितले जावू शकते.

>> तुमच्या बँक अकाउंटमध्ये असा व्यवहार दिसतील जो तुम्ही केला नाही.

>> जर तुम्ही कोणासोबत सुद्धा माहिती किंवा अकाउंट संबंधीत माहिती शेयर केली असेल.

वाचाः

एसबीआयने नेट बँकिंगचा वापर करणाऱ्या खातेदारांना सल्ला दिला आहे की, बँकिंग सायबर फ्रॉड प्रकरणी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग (https://cybercrime.gov.in/) किंवा पोलिस स्टेशना जावून गुन्हा दाखल करा. तसेच देशाची सर्वात मोठी सरकारी बँकेचे म्हणणे आहे की, सायबर क्राईम छोट्याशा घटनेला सुद्धा लपवू नका. तात्काळ याची तक्रार संबंधितांन द्या.

वाचाः

वाचाः

एसबीआयने आपल्या ट्विट मध्ये लिहिले, सावधान आणि अलर्ट राहून सायबर – क्रिमिनल्स पासून आपली सुरक्षा करा. सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता. आणखी डिटेल्स माहिती साठी https://bit.ly/3h0jWie या वेबसाईटला भेट द्या.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल भारत सरकारचे एक पाऊल आहे. या अंतर्गत पीडित व्यक्ती किंवा तक्रारदार सायबर क्राईमची तक्रार ऑनलाइन नोंदवू शकतात. हे पोर्टल देशाचे गृहमंत्रालयाच्या अधिकाराखाली काम करते आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

गँगस्टर विकास दुबेच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे

0

कानपूर, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या कानापूरमध्ये कुख्यात गँगस्टर याचा काही दिवसांपूर्वी ”सोबत झालेल्या चकमकीत एन्काऊंट मृत्यू झाला होता. अनेकांसाठी हा एन्काउन्टर ‘अपेक्षित’ असाच होता. साहजिकच दुबेच्या मृत्यूनंतर या ‘कथित’ एन्काऊन्टरवर तसंच उत्तर प्रदेशातील कायदे-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थि झाले होते. आता विकास दुबे याचा पोस्टमॉर्टेम अहवाल समोर आलाय.

या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून विकास दुबे याचा मृत्यू गोळी लागल्यानंतर हेमरेज अर्थात खूप रक्तस्राव झाल्यामुळे तसंच तीव्र धक्क्यामुळे (शॉक) झाल्याचं समोर येतंय. या रिपोर्टममध्ये विकास दुबे याच्या शरीरावर १० जखमा असल्याचंही सांगण्यात आलंय. यातील सहा गोळी लागल्याचे निशाण आहेत तर बाकीचे पळण्याच्या प्रयत्ना दरम्यान पडल्यानं झालेल्या जखमा असल्याचं सांगण्यात येतंय.

वाचा :

वाचा :

रिपोर्टनुसार, तीन गोळ्या दुबेचं शरीर छेदून बाहेर पडल्या आहेत. यातील एक गोळी उजव्या खांद्यावर तर दोन गोळ्या छातीच्या डाव्या बाजुला लागल्या आहेत. त्यामुळे या गोळ्या जवळून मारल्या गेल्याचं प्रदमदर्शनी दिसत असलं तरी पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मात्र किती अंतरावरून गोळ्या झाडण्यात आल्या? याचा उल्लेख नाही. सर्व गोळ्या विकासच्या समोरच्या भागावर लागल्यानं पळताना विकासनं एसटीएफचा मुकाबला केल्याचंही समोर येतंय. याशिवाय विकासच्या डोक्याला, कोपरा आणि पोटावरही जखमा आहेत.

कानपूरच्या बिकरू गावात आठ पोलिसांच्या हत्येचा मुख्य आरोपी विकास दुबे याचा १० जुलै रोजी एसटीएफनं खात्मा केला होता. विकासला मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला उज्जैन हून कानपूरला आणताना एसटीएफच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आणि ती उलटली. याच गाडीत विकास दुबे असल्याचं सांगण्यात येतंय. यानंतर विकानं पोलिसांची पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. एसटीएफनं त्याला आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला परंतु, त्यानं गोळीबार केला. त्यानंतर एसटीएफनं त्याला सहा गोळ्या मारल्या. या चकमकीत त्याचा मृत्यू झाला, असं एसटीएफकडून सांगण्यात आलं होतं.

वाचा :

वाचा :

विकास दुबेच्या अगोदर पोलिसांच्या हत्याकांडात समावेश असलेल्या सहा आरोपींना एन्काऊन्टरमध्ये ठार करण्यात आलं होतं. विकासचा साथीदार प्रभात याला फरिदाबादमध्ये अटक करण्यात आली होती. त्याचीही गाडी पंक्चर झाली, त्यानं पोलिसांचं हत्यार घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत तो मारला गेला, असं सांगण्यात आलं होतं.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

टी-२० वर्ल्ड कपसाठी आज हाय व्होल्टेज बैठक; IPLचे काय होणार?

0

दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची () आज सोमवारी ऑनलाइन बैठक होणार आहे. या बैठकीत या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आयसीसी बाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही बैठकीमध्ये आयसीसीने याबाबत निर्णय घेण्याचे टाळले होते. आता मात्र आयसीसीला याबाबत निर्णय घ्यावाच लागेल. आयसीसीच्या या निर्णयावर सर्वात जास्त लक्ष असेल ते बीसीसीआयचे कारण जर आयसीसीने ही स्पर्धा स्थगित केली तर IPLचा मार्ग मोकळा होईल.

वाचा-
आयसीसी टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात करोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने मे महिन्यातच वर्ल्ड कप आयोजन करण्यास असमर्थता व्यक्त केली होती.

वाचा-
भारतात देखील करोना रुग्णांची संख्या १० लाखाच्या पुढे गेली आहे. तर मृतांची संख्या २६ हजाराच्या पुढे आहे. अशात आयपीएलचे आयोजन करायचे असेल तर त्याला केंद्र सरकारची परवानगी लागेल. किंवा मग ही स्पर्धा बाहेरच्या देशात आयोजित करता येईल.

आयपीएलच्या आयोजनासाठी पहिले पाऊल होते की आशिया कप स्पर्धा स्थगित होण्याचे, आता आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप स्थगित झाल्यास आम्हाला या योजनेवर काम करता येईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा-
या वर्षी होणारी टी-२० स्पर्धा ऑस्ट्रेलियात २०२२ साली आयोजित करण्याची शक्यता आहे. कारण भारतात २०२१ साली वर्ल्ड कप होणार आहे. ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना वर्ल्ड कपच्या ऐवजी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेची तयारी करण्यास सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युएईमध्ये आयपीएलचे आयोजन होऊ शकते.

वाचा-
आयपीएलच्या आयोजनासाठी युएई आणि श्रीलंकेने उत्सुकता दाखवली होती. पण बीसीसीआयची पहिली पसंद युएई असल्याचे समजते. ही स्पर्धा आर्थिक कारणासाठी बीसीसीआयला गरजेची आहे. जर स्पर्धा झाली नाहीतर बीसीसीआयला कोट्यवधीचे नुकसान होऊ शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

आता ब्रिटनने दिला चीनला झटका, घेतला जबरदस्त निर्णय

0

नवी दिल्लीः भारत-चीन या दोन देशातील संबंध गेल्या काही दिवसांपासून बिघडले आहेत. भारत सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने थयथयाट केला. भारतासह अनेक देशाने चीन विरोधी भूमिका घेतली आहे. या यादीत आता ब्रिटन सुद्धा आले आहे. ब्रिटनच्या सरकारने डेव्हलप करण्यासाठी जपानकडे मदत मागितली आहे. याआधी ब्रिटनमध्ये हुवावे 5G नेटवर्क डेव्हलप करणार होती. ब्रिटनने काही दिवसाआधी वर बंदी घातली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवासांपासून टेक्नोलॉजी आणि सिक्योरिटीवरून तणाव आहे.

वाचाः

ब्रिटनच्या 5G नेटवर्क वरून हटवणार हुवावेचे उपकरण
ब्रिटनने चीनच्या हुवावेपासून वेगळे होताना २०१७ पर्यंत आपले ५जी नेटवर्क वरून हुवावेचे उपकरण हटवण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनने काही दिवसांपूर्वीच युरोपियन युनियन मधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचाः

अमेरिकेत हुवावेला बंदी
चीनच्या हुवावेवर अमेरिकेत बंदी घातली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. हुवावेवर बंदी घातल्यानंतर कंपनी गुगल सर्विसचा वापर करू शकत नाही.

वाचाः

भारतात सुद्धा चीनी अॅप्सवर बंदी
याआधी भारतात ५९ चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. या अॅपमध्ये प्रसिद्ध टिकटॉकचा समावेश आहे. टिकटॉक शिवाय यूसी ब्राऊजर, हेलो, विगो, शेयर इट यासारख्या अॅपचा समावेश आहे.

म्हणून 5G नेटवर्क खास आहे
5G युजर्संना ४ जी नेटवर्कपासून २० पट जास्त स्पीड मिळणार आहे. या स्पीडचा अंदाज यावरून बांधता येवू शकतो. की, एक पूर्ण एचडी फिल्म केवळ एका सेकंदात डाऊनलोड करता येवू शकते. ५ जी युजर्सला गर्दीतही आपल्या मोबाइल प्रोव्हाईडर पासून कनेक्ट होण्यास ३ जी आणि ४ जीबी नेटवर्क्सच्या तुलनेत कोणतीही अडचण नाही. एक पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटपर्यंत डेटाचा एक पॅकेट पोहोचण्यासाठी जितका वेळ लागतो त्याला लेटेंसी म्हणतात. ५जी प्रकरणात लेटेंसी रेट १ मिलिसेकंद असेल तर ४ जी नेटवर्कमध्ये हा रेट १० मिलिसेकंद असते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

सोने स्वस्त ; सलग चौथ्या दिवशी सोने दरात घसरण

0

मुंबई : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सलग चौथ्या सत्रात कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. सोन्याचा भाव ०.१२ टक्क्यांनी कमी झाला असून तो ४८९१० रुपयांवर आहे. चांदीच्या किमती देखील ०.२५ टक्के घसरण झाली आहे. चांदीचा भाव किलोला ५२७६५ रुपये आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सोने ४९३४८ रूपयांच्या विक्रमी स्तरावर गेले होते.

goodreturns.in या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७९७० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१३४० रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव किलोला ५२९२० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७९२० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९१२० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४८३६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९९४० रुपये आहे. चेन्नईपाठोपाठ कोलकात्यात २४ कॅरेटचा भाव ५० हजारांवर गेला होता. आज चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७०५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१३४० रुपये झाला आहे. त्यात ३२० रुपयांची घसरण झाली आहे.

ऑनलाइन गोल्ड मार्केट इन इंडिया या अहवालात वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने कोव्हिड-१९ संसर्गाच्या काळातील दागिनेविक्रीचा अभ्यास केला. सराफांच्या दालनांत ग्राहकांचे येणे बंद झाल्यानंतर छोट्या सराफांपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काही सराफांनी ऑनलाइन विक्रीचा मार्ग स्वीकारला आहे. याचे प्रमाण सध्या अगदीच नगण्य, एक ते दोन टक्के असले तरी भावी काळात अशा प्रकारे दागिने आणि सोने-चांदी विक्रीवर अधिकाधिक भर दिला जाईल, असे कौन्सिलचे म्हणणे आहे.

देशात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. आता देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ११ लाखांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३८,९०२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात कोरोना रूग्णांच्या संख्येतील ही सर्वात मोठी वाढ आहे. त्याच वेळी २४ तासांत कोरोनाने ५४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत ६ लाख ७७ हजार ४२३ जण करोनामुक्त झाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Redmi Note 9 स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार

0

नवी दिल्लीः रेडमीचा नवीन स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनी या फोनला आज दुपारी १२ वाजता लाँच करणार आहे. आज लाँचिंग कार्यक्रमात फोनची किंमत आणि भारतात याची उपलब्धेतेविषयी माहिती देण्यात येणार आहे. रेडमी नोट ९ चा ग्लोबल व्हेरियंट ३ जीबी आणि ४ जीबी रॅम ऑप्शन येतो. भारतात कोणत्या व्हेरियंट्समध्ये फोन लाँच करणार आहे, हे अवघ्या का तासांत समजणार आहे.

वाचाः

अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पाहा लाइव्ह स्ट्रीमिंग
रेडमी नोट ९ ला एक व्हर्च्यूअल इव्हेंट मध्ये लाँच करण्यात येणार आहे. या इव्हेंटचा लाईव्ह स्ट्रीमिंग आज दुपारी १२ वाजता यूट्यूब आणि Mi इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर होणार आहे फोनची किंमत भारतात ग्लोबल व्हेरियंटच्या जवळपास असू शकते. रेडमी नोट ९ ला ग्लोबला व्हेरियंट जवळपास १५ हजार १०० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते.

वाचाः

रेडमी नोट ९ ची खास वैशिष्ट्ये

रेडमी नोट ९ मध्ये ६.५३ इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ आणि स्पलॅश नॅनो कोटिंग देण्यात आली आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी यात डिस्प्लेच्या टॉप लेफ्ट कॉर्नरवर पंच होल देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

वाचाः

रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा सेन्सर शिवाय ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलजा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फेस अनलॉक सुद्धा सपोर्ट करणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी दिली आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, NFC, IR ब्लास्टर आणि रियर मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहेत. फोनला रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

कोर्टात लढाई जिंकले तरी सचिय पायलट यांचा पराभव निश्चित

0

जयपूर : राजस्थानात अशोक गहलोत विरुद्ध राजकीय युद्ध जाहीरपणे सुरू आहे. यातील पहिला राऊंड जिंकलाय तो मुख्यमंत्री यांनी… तसंच दुसऱ्या टप्प्यात न्यायालयात निकाल कुणाच्याही पारड्यात पडला तरी गेहलोत यांची टीम आता निश्चित झालीय. काँग्रेस अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी असा प्लान तयार केलाय की न्यायालयात सचिन पायलट यांचा विजय झाला तरी त्यांचा ‘राजकीय पराभव’ मात्र निश्चित आहे.

सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून अयोग्यतेची नोटीस देण्यात आलीय. या नोटीशीला पायलट कॅम्पकडून न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. न्यायालयात लढाई जिंकली तरी पायलट गटाला पक्षासोबत परत यावं लागणार आहे अन्यथा आपलं विधानसभा सदस्यत्व गमावण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली. यावेळी सदनात बहुमत सिद्ध करण्यासाठी आपण तयार असल्याचं त्यांनी राज्यपालांना सांगितलंय. आपण विधानसभेचं सत्र बोलावून पार पाडणार असल्याचं अशोक गेहलोत यांनी यावेळी राज्यपालांना सांगितलंय. विधानसभा सत्र बोलावण्यासाठी कायदेशीर लढाईमुळे उशीर होत आहे. आज न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार आहे.

काँग्रेसचा प्लान

काँग्रेसच्या योजनेनुसार, न्यायालयाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बाजुनं लागला तर विधानसभेचं सत्र बोलावून बहुमत सिद्ध केलं जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सत्र बोलावण्याचा निर्णय मुख्यमंत्री गहलोत आणि काँग्रेसच्या रणनीतीकारांवर अवलंबून आहे. याबद्दल बोलताना काँग्रेस श्रेष्ठींकडून जयपूरमध्ये पाठवण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अजय माकन यांनी, काँग्रेस नेते सदनात बहुमत चाचणी केव्हा आणि कसं करणार याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला करायचा आहे, असं मीडियाशी बोलताना म्हटलंय.

विधानसभेत बहुमत चाचणी करताना काँग्रेसकडून सदस्यांसाठी व्हिप जारी केला जाऊ शकतो. व्हिपनंतर पायलट गटानं त्याचं उल्लंघन केलं किंवा अनुपस्थिती दर्शवली तर संविधानाच्या दहाव्या अनुच्छेदाच्या कलम २(१) (बी) नुसार ते अयोग्य ठरवले जाऊ शकतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts