राज्य सरकारच्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत कोणत्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल काँग्रेसच्या काही नेत्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. तसंच, या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरु झालं होतं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी भाष्य केलं आहे. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीचा फोटो ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे असं ऐकलं आहे? मग युवकांना रोजगार देणाऱ्या सरकारी जाहिरातीत काँग्रेस कुठे आहे? ज्या काँग्रेस नेत्यांचे शिवसेनेवर अथांग प्रेम आहे. त्यांना माझा प्रश्न आहे. शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्याच्यांशी लढा अन्यथा पक्ष संपून जाईल, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
वाचाः
दरम्यान, काही वेळापूर्वीचं संजय निरुपम यांनी आणखी एक ट्विट करून त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य कारवाईवर परखड मत व्यक्त केलं आहे. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी हायकमांडकडे केल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांशी संबंधित भूखंड घोटाळ्याच्या चौकशीची मी मागणी केली आहे. त्यामुळे माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेविरोधात बोलणं ही पक्षविरोधी कारवाई होऊ शकते का? शिवसेनेत विलीन झाली आहे का?, असा प्रश्नांचा भडिमार निरुपम यांनी ट्विटद्वारे केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times