Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5748

राजनाथ सिंहांना शेतकऱ्यांशी चर्चा करू द्या, त्वरित तोडगा निघेल: टिकैत

0

नवी दिल्लीः ‘केंद्र सरकारने संरक्षणमंत्री ( ) यांना पिंजऱ्यातील पोपट बनवून ठेवले आहे. पण सरकारने त्यांना सूट दिली आणि त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा ( ) केली तर शेतकरी आंदोलनावर ( ) त्वरित तोडगा निघेल. पण हे सरकार हट्टी आहे’, असं शेतकरी नेते राकेश टिकैट यांचे बंधू आणि भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत ( ) म्हणाले. नरेश टिकैत यांचं हे मोठं वक्तव्य आहे. नरेश टिकैत हे उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे आयोजित शेतकरी सभेत बोलत होते.

कृषिमंत्री म्हणाले- चर्चेची दारं खुली

कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांशी चर्चेसाठी सरकारचे दरवाजे अद्यापही खुले आहेत. आम्ही शेतकऱ्यांशी बर्‍याचदा चर्चा केली आहे. पण अद्याप त्यांचा काही मुद्दा असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

‘शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत राहणार’

सरकार पूर्ण संवेदनेने शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ १० कोटी शेतकर्‍यांना झाल्याचा दावा त्यांनी केला. शेतकर्‍यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६००० रुपयांनी वाढले आहे. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास कटिबद्ध असून त्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे, असं तोमर म्हणाले.

शेतकरी नेते सतत तीव्र आंदोलनाचा इशारा देत असताना तोमर यांचे हे वक्तव्य आले आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी मंगळवारी सरकारला इशारा दिला. नवीन मागे घेण्यास सरकारवर दबाव आणण्यासाठी ४० लाख ट्रॅक्टर घेऊन संसदेवर मोर्चा काढू, याचे नियोजन करत आहोत. हा मोर्चा काढण्यापूर्वी सरकारला माहिती दिली जाईल. किमान आधारभूत किंमतीच्या (एमएसपी) हमीबाबत नवीन कायदा करावा, या मागणीचा पुनरुच्चारही टिकैत यांनी केला.

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रपतींना पत्र

कृषी कायद्यांविरोधात ९१ दिवसांपासून आंदोलन करणार्‍या ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी दडपशाही विरोधी दिन साजरा केला. संयुक्त किसान मोर्चाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्रही लिहिण्यात आले आहे. आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांच्या समर्थकांवरील दडपशाही थांबवली गेली पाहिजे, असं शेतकऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे.

दिशा रवी हिला जामीन मिळाल्याच्या निर्णयाचे संयुक्त किसान मोर्चाकडून स्वागत करण्यात आले. पोलिसांनी दिशाला बेकायदेशीरपणे अटक केली होती, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला.

यासोबतच एसकेएमने हवामान कार्यकर्ते दिशा रवी यांना जामीन मिळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून दिल्ली पोलिसांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. एसकेएमचे म्हणणे आहे की पोलिसांनी दिशा रवी याला बेकायदेशीररीत्या अटक केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

झोमॅटो बॉयने हॉटेल मालकाच्या डोक्यात घातले लोखंडी स्टँड; ऑर्डर रद्द करताच…

0

पुणे: ऑर्डर का रद्द केली, असे म्हणत बॉयने बाणेर परिसरातील एका हॉटेल मालकाच्या डोक्यात लोखंडी स्टॅन्ड घालून त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( )

वाचा:

याबाबत (वय ४०,रा. अ‍ॅक्सिस स्ट्रीट बाणेर रोड) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार रामेश्वर वाघाजी तडसे (वय ३५, रा. ) व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांना झोमॅटोवरून ऑर्डर आली होती. ती ऑर्डर रामेश्वरला देण्यात आली होती. त्यानुसार अग्रवाल यांनी त्याला फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. याबाबत अग्रवाल यांनी झोमॅटोला कळवले होते. त्यानुसार त्यांनी दुसर्‍या रायडरला ऑर्डर पोहच करण्यासाठी हॉटेलला पाठवले होते.

वाचा:

दरम्यान रामेश्वर हा त्या ठिकाणी आला. माझी ऑर्डर का कॅन्सल केली, असे म्हणत शिवीगाळ करून अग्रवाल यांच्या डोक्यात लोखंडी स्टँड मारून जखमी केले. तर त्याच्यासह इतर साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून हॉटेलच्या दरवाजाची तोडफोड केली. अग्रवाल यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

व्यापारीच पसरवताहेत लॉकडाऊनची अफवा!; धक्कादायक प्रकार उघड

0

कोल्हापूर: लागणार अशी भीती घालून अनेक व्यापारी द्राक्ष व भाजीपाला उत्पादकांच्या मालाचा दर पाडत आहेत, यामुळे आणि जिल्ह्यातील फळ व भाजीपाला उत्पादक हवालदिल झाले आहेत. या सर्वाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ( )

वाचा:

सध्या सांगली जिल्ह्यात जोरात आहे. या भागातील द्राक्षांना देशाच्या विविध भागात मागणी आहे तसेच परदेशातही निर्यातही सुरू आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांनी आंदोलनाची भीती घालून द्राक्षाचा दर कमी केला. आता करोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची भीती घालून आणखी दर कमी करण्याचे प्रयत्न व्यापाऱ्यांकडून सुरू आहेत. दोन वर्षात आलेला महापूर आणि अवकाळी पाऊस यातून सावरत असतानाच आता कमी दराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून असे दर पाडल्यास कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

वाचा:

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परंतु, करोनामुळे लॉकडाऊन करण्याचे सद्यस्थितीत कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे द्राक्ष, भाजीपाला उत्पादकांना लॉकडाऊनची खोटी भीती घालून व्यापाऱ्यांनी शेतमालांचे दर पाडू नयेत. अन्यथा लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. यांनी दिला आहे.

वाचा:

एकीकडे स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष उत्पादनाला मागणी चांगली असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नाही. करोनामुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती घालून व्यापारी दर पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी हा इशारा दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पालघरमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात; इको चालक ठार

0

पालघर: पालघर बोईसर रस्त्यावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उमरोळी पेट्रोल पंपनजीक झाला. या अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव ईको चालक सुनील मोरेश्वर गावड (३२) असे असून तो उमरोळी गावचा रहिवासी आहे. हा विचित्र अपघात इको प्रवासी वाहन, खासगी चारचाकी आणि एका दुचाकी एकमेकांना धडकून झाला.

ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात इको कारचा चालक सुनील गावड याचा मृत्यू झाला. अपघातात दोघांना गंभीर दुखापच झाली. अपघातात हे दोघे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत फेकले गेले. या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले. त्यानंतर अपघातस्थळी लोकांची मोठी गर्दी झाली.

अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असली तरी देखील या अपघातातील जखमींच्या मदतीसाठी कोणीही पुढे येण्यास तयार नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या मितेश प्रभाकर पाटील,अमोल पाटील व आशिष कुडू या तीन मित्रांनी धाडस दाखवले आणि तातडीने जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेले. मात्र या अपघातात इको चालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

क्लिक करा आणि वाचा-
या अपघातातील गंभीर दुखापत झालेल्या दोघांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांचे अपघाती निधन; गाडी खोल दरीत कोसळली

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील सुभेदार लक्ष्मण सतू डोईफोडे (वय ४५) यांचे आसाममध्ये कर्तव्य बजावताना अपघाती निधन झाले. डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

सुभेदार डोईफोडे हे सिग्नल कोअरमध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती आसाम येथे होती. गस्तीवर असताना गाडी दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.

डोईफोडे यांच्या निधनाची माहिती कळताच बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली. शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी डोईफोडे यांचे पार्थिव बोराटवाडी येथे आणण्यात येईल. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा भाजपवर हल्ला, म्हणाले…

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न () मिळालेल्या महापुरुषांचा अवमान भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) यांनी केला आहे. ( criticizes bjp over stadium name changing in ahmedabad)

अहमदाबादमध्ये भारतरत्न () यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नाव बदलून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ()यांचे नाव देण्यात आले आहे. यावर नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

जगातले सर्वात मोठे स्टेडियम मोटेरा अहमदाबाद येथे होते आहे याचा आम्हाला आनंद आहे परंतु भारतरत्न असलेल्या महापुरुषांची नावे बदलण्याची परंपरा सरकारने सुरू केलीय याचे दु:ख वाटते असे नवाब मलिक म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे त्या स्टेडियमचे नाव भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावाने ओळखले जात होते. आता ते नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. हरियाणामध्येही स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे देण्यात आले आहे. नावे बदलण्याच्या धुंदीत भाजप सरकार सर्व मर्यादांचे उल्लघंन करीत आहे.

क्लिक करा आणि वाचा-
आतापर्यंत शहरांची नावे बदलली जात होती आता तर भारतरत्नांची नावे असलेली हॉस्पिटल आणि स्टेडियम बदलली जात आहेत ही दु:खाची बाब असून देशाची जनता कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

हातपाय बांधून मुलीवर अत्याचार; मौद्यातील खळबळजनक घटना

0

नागपूर: एका ३१ वर्षीय युवकाने १६ वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अत्याचारी युवकाला अटक केली. विशाल मेश्राम, असे अटकेतील युवकाचे नाव आहे. विशाल हा सिमेंट कंपनीत काम करतो. ()

पीडित मुलगी शिकत आहे. पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलगी घरी एकटी होती. विशाल हा मुलीच्या घरात घुसला. दोरीने तिचे हातपाय बांधले. तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी मुलीच्या नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी विचारणा केली असता, विशाल याने अत्याचार केल्याचे तिने नातेवाइकांना सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

त्यानंतर मुलीसह नातेवाइकांनी मौदा पोलिस स्टेशन गाठले. विशाल याच्याविरूद्ध तक्रार दिली. मौदा पोलिसांनी विशाल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. मौद्या पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मौदा पोलिसांनी विशाल याला अटक केली.

क्लिक करा आणि वाचा-

पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंबईत चार महिन्यांमधील सर्वाधिक रुग्णवाढ; 'हे' आकडे टेन्शन वाढवणारे

0

मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील संसर्गाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट होऊ लागला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल १ हजार १६७ नवीन करोना बाधितांची भर पडली असून गेल्या चार महिन्यांतील हा उच्चांक ठरला आहे. मुंबईसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, सोबतच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही नवीन बाधितांची संख्या वाढत असून मंडळात येत असलेल्या या संपूर्ण भागात आज २ हजार १८ इतक्या नवीन बाधितांची भर पडली आहे. ( )

वाचा:

मुंबई महापालिका हद्दीतील करोना रुग्णवाढ ही पालिकेच्या आरोग्य विभागासाठी आव्हान देणारी आणि मुंबईकरांची चिंता वाढवणारी ठरली आहे. गेले काही महिने मुंबईत करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले होते. दरम्यान, राज्याच्या अन्य भागात करोनाने डोके वर काढले असताना आता मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्याही वेगाने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईतील नवीन बाधितांचा आकडा वाढत असून आज हा आकडा हजारपार गेल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. चिंतेची बाब म्हणजे गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे.

वाचा:

मुंबईत आज १ हजार १६७ नवीन रुग्णांची भर पडली असून ११९ दिवसांनंतर मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या वर गेली आहे. १८ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबईत १ हजार रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज हा आकडा ओलांडला गेला आहे. मुंबईत करोनामृत्यूंचे प्रमाण मात्र कमी आहे. आज पालिका हद्दीत ४ करोनामृत्यूंची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत करोनाचे एकूण ३ लाख २१ हजार ६९८ रुग्ण आढळले आहेत तर ११ हजार ४५३ जणांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. मुंबईत सध्या करोनाचे प्रत्यक्षात ६ हजार ९०० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचा:

ठाणे जिल्ह्यात ६१४ नवीन रुग्णांची वाढ

ठाणे जिल्ह्यातही आज करोना रुग्णांच्या संख्येने उसळी घेतली. आज एकूण ६१४ नवीन रुग्णांची वाढ झाली. यापैकी ठाणे शहरात सर्वाधिक १७७ रुग्ण आढळले असून १६५, १३०, उल्हासनगर १४, भिवंडी ३, मिरा-भाईंदर ५०, अंबरनाथ १९, बदलापूर ३२, ठाणे ग्रामीणमध्ये २४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार २८० वर पोहचली आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा वाढत ६ हजार २५१ इतका झाला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संजय राठोडांनी दीड तास वाट पाहिली; भेटीत काय झाली चर्चा?

0

मुंबई: पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी () ज्यांचे नाव जोडले गेले आहे, ते राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते (sanjay rathod) यांनी आज मुख्यमंत्री () यांची भेट घेतली. राठोड यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तब्बल दीड तास वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे तत्पूर्वी संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरीही लावली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि राठोड यांची काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री संजय राठोड यांना अभय देणार की, राजीनामा घेणार याबाबत स्पष्टता नाही. (forest minister meets cm uddhav thackeray)

वनमंत्री संजय राठोड यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हवाल्याने दिले आहे. पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी नाव आल्यानंतर तेव्हापासून कथित स्वरुपाच गायब झालेले वनमंत्री राठोड मंगळवारी लोकांसमोर आले. त्यावेळी त्यांनी पोहरादेवी मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व राज्याला सार्वजनिक कार्यक्रम न करण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही राठोड यांच्या समर्थकांनी कोविडचे सर्व नियम पायदळी तुडवत तोबा गर्दी केली होती.

एकूणच सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्याच प्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक मंत्रीही राठोड यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्याबाबतीत निर्णय घ्यावा अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची अपेक्षा असल्याचे सूत्रांी सांगितले. मात्र, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच राठोड यांनी हजेरी लावल्याचे वृत्त आल्याने मुख्यमंत्र्यांची नाराजी दूर झाली का?, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे वनमंत्री राठोड यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तसेच पोहरादेवी गडावर जमा झालेली गर्दी ही आपण बोलावलेली नव्हती तर तिथे लोकच स्वत:हून आले होते, असेही राठोड यांनी स्पष्ट केले आहे. गर्दीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

रिलायन्सला आता 'या' उद्योगाची भुरळ ; नव्या व्यापारी युद्धाची तयारी करत आहेत मुकेश अंबानी

0

नवी दिल्ली : एकीकडे ई-कॉमर्समध्ये अमेरिकन कंपनी अॅमेझॉनशी मागील वर्षभरापासून दोन हात करणाऱ्या अंबानी यांनी आता नव्या व्यापारी युद्धाची तयारी केली आहे. इलेक्ट्रिक मोटारीसाठी लागणाऱ्या बॅटरी उत्पादनात उतरून या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील अग्रगण्य कंपनी टेस्लासमोर आव्हान उभं करणार आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांना आता इलेक्ट्रिक मोबिलिटीची इंडस्ट्री खुणावत आहे.

रिलायन्स रिटेल आणि फ्युचर रिटेल यांच्यातील २४ हजार कोटींचा व्यवहार कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझॉस यांनी मुकेश अंबानी यांना आव्हान दिले आहे. तर आता आणखी एक व्यापारी युद्धाचा आरंभ होण्याची शक्यता आहे.

विजेवर चालणाऱ्या मोटारींसाठी लागणाऱ्या बॅटरी आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राची बाजारपेठ झपाट्याने वाढणार आहे. एका अभ्यासानुसार पुढील १० वर्षात ई-बॅटरी उद्योगाची उलाढाल ५० अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अंबानी यांनी या क्षेत्रातील औद्योगिक संधीवर लक्ष केंद्रित केलं आहे. या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजकडून सुरुवातीला किमान १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

भारतात ई-मोटारींचे पर्व लवकरच सुरू होणार आहे. यात महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे तयारी सुरु केली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार नवीन ऊर्जा आणि नव्या इंधन व्यवसायाला चालना देण्यासाठी तयार असल्याचे रिलायन्सने म्हटलं आहे. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजने तेल आणि रसायन उद्योगाचे विभाजन केले होते. अशा प्रकारचा निर्णय हा रिलायन्सची नव्या उद्योगात एंट्री घेण्याची तयारी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

वाचा :

ई मोटारींच्या बॅटरी निर्मितीमध्ये उतरण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात रिलायन्सने प्रवेश केला तर त्यांची थेट स्पर्धा इलेक्ट्रिक मोटार निर्मितीतील आघाडीची कंपनी टेस्लाशी होईल. गेल्या वर्षी अंबानी यांनी इलेक्ट्रिक मोटार उद्योगासाठी आवश्यक टेक्नाॅलाॅजी उपलब्ध असल्याचे समभागधारकांना सांगितले होते.

इलेक्ट्रिक मोटार उद्योगात टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. बॅटरी आणि सोलर पॅनलमधून एलन मस्क कोट्यवधींची कमाई करत आहेत. इलेक्ट्रिक मोटार निर्मितीतून मस्क यांनी प्रचंड कमाई केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात असलेल्या व्यावसायिक संधींचा अंबानी यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. अंबानी बॅटरी निर्मितीमध्ये उतरतील तसेच वीज साठवणूक (स्टोरेज) उत्पादनांमध्ये उतरतील, असाही अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अद्याप याबाबत कोणताच प्लॅन जाहीर करण्यात आलेला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts