Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5750

कथित जमीन गैरव्यवहार; एकनाथ खडसेंना पुन्हा दिलासा

0

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यांना पुण्यातील कथित प्रकरणी ८ मार्चपर्यंत दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खडसे यांच्या याचिकेवरील सुनावणी आज होऊ न शकल्यानं ८ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.

पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने बजावलेल्या समन्सप्रमाणे खडसे ईडीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची अनेक तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांनी या कारवाईला आव्हान देणारी याचिका केली. खडसेंच्या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी आज पूर्ण होऊ न शकल्यानं पुढील सुनावणी ८ मार्चला होणार आहे.

वाचाः

आज काही कारणांमुळं एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ न शकल्यानं न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने सुनावणी ८ मार्चला ठेवली आहे. त्यामुळं पुढील सुनावणीपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याची हमी ईडीने कायम ठेवली आहे.

वाचाः

दरम्यान, पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवरच खडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून सातत्याने सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत खडसे यांनी गेल्या वर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंबई लोकलमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांना जोरदार दणका

0

म. टा. प्रतिनिधी । मुंबई

प्रादूर्भावात ”चे काम करणाऱ्या विनामास्क प्रवाशांवरील कारवाई अत्यंत कडक पद्धतीने सुरू आहे. विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांसाठी नियुक्त केलेल्या मार्शल आणि अन्य कर्मचाऱ्यांनी साडेपाच हजारांहून अधिक जणांवर कारवाई करीत, ११ लाख रु.हून अधिक रकमेची दंडवसुली केली आहे. (Action Against Commuters Not Wearing In Local Trains)

वाचा:

रेल्वे स्थानकांत रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी सोबत असल्याने मार्शलकडून होणारी कारवाई वाढली आहे. गेल्या काही दिवसांत रोज ३००हून अधिक विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. १ ते २१ फेब्रुवारी या काळात मध्य रेल्वेवरील ३४९७ प्रवाशांवर कारवाई केली. या प्रवाशांकडून एकूण ८ लाख ६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर मध्य रेल्वेच्या तुलनेत कमी दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर विनामास्क फिरणाऱ्या २२०० विनामास्क प्रवाशांकडून ३ लाख २१ हजार रु.चा दंड वसूल करण्यात आला.

वाचा:

मध्य-पश्चिम रेल्वे स्थानकात विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांकडून सुरक्षित वावर नियमांचे पालन होत नाही. अशातच मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांमुळे करोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता असते. करोनाबधितांच्या संख्येतील वाढ अशीच कायम राहिल्यास पुन्हा एकदा लॉकडाउनचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे. लॉकडाउन होणे कोणालाही परवडण्यासारखे नाही. यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा धडाका सुरू आहे. प्रवाशांच्या तुलनेत मार्शलची संख्या कमी आहे. यामुळे महापालिकेकडून रेल्वे स्थानकात अतिरिक्त मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

वाचा:

अशी झाली कारवाई (१ ते २१ फेब्रुवारी)
मध्य रेल्वे

विनामास्क प्रवासी

३४९७

दंडवसुली

८ लाख ६ हजार ९०० रु.

पश्चिम रेल्वे

विनामास्क प्रवासी

२२००

दंडवसुली

३ लाख २१ हजार रु.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सरकारमध्ये काँग्रेसकडे दुर्लक्ष?; पक्ष नेतृत्वानं घेतला मोठा निर्णय

0

म. टा. प्रतिनिधी, नगरः महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याचे काँग्रेसचे पालुपद सुरूच आहे. मात्र, यासाठी आता एका जुन्या समितीची आठवण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करून दिली असून तिचे पुनरुज्जीवन केल्यास सरकार आणि नागरिकांमधील समन्वयाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना उर्जित अवस्था येईल, अशी सूचना पुढे आली आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत योजना सनियंत्रण समिती कार्यरत होती, ती पुन्हा सुरू करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत आले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमधील काँग्रेसच्या सहभागाचा पक्षाला फायदा कसा करता येईल, यावर चर्चा झाली. यावेळी सूचना करताना देशमुख यांनी जुन्या समितीची आठवण करून दिली. २००९ ते २०१४ या काळात आघाडीचे सरकार असताना काँग्रेस पक्षाने योजना सनियंत्रण समिती स्थापन केली होती. ही समिती सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवत असे. सरकारच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देणे, त्यातील त्रुटी दूर करणे अशी कामे करीत होती. जी खाती काँग्रेसकडे नव्हती, त्या खात्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांशीही या समितीच्या माध्यमातून समन्वय ठेवला जात होता. त्यामुळे सरकार, प्रशासन आणि जनता यांच्याशी पक्ष कार्यकर्त्यांचा समन्वय राहत होता. २०१४ मध्ये सत्ता गेल्यानंतर ही समिती पुन्हा स्थापन झाली नव्हती. आता ती पुन्हा कार्यरत करावी, अशी सूचना देशमुख यांनी केली.

वाचाः

महाविकास आघाडीचे सरकार काँग्रेसच्या सहभागामुळे सत्तेवर आले आहे. मात्र, या सरकारचा जास्तीत जास्त फायदा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला होत आहे. त्या तुलनेत काँग्रेसला पक्षवाढीसाठी फायदा होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाला स्वत:ची विचारधारा आहे. देशातील गरीब, आदिवासी, दलित, शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक यांच्या विकासाला प्राधान्य देणारी काँग्रेसची विचारधारा आहे. यासंबंधी पक्षाने कोणतीही तडजोड करू नये. सरकारमध्ये सहभाग असला तरी संघटनेला प्रथम प्राधान्य या तत्वानुसार काँग्रेसने आपली विचारधारा पुढे नेण्याचे काम सुरूच ठेवले पाहिजे, अशी सूचनाही केली.


वाचाः

कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून पक्षविस्तारासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारमधील सहभागाचा कसा वापर करता येईल, हे पाहिले जावे. आतापर्यंत अन्य सहकारी पक्षांप्रमाणे आपण सत्तेचा उपयोग पक्षवाढीसाठी करू शकलो नाहीत. यापुढे त्यासाठी लक्ष घालून उपाय केले जावेत, अशा सूचना करण्यात आल्या. त्यातून योजना सनियंत्रण समिती कार्यरत करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री नाराज?; संजय राऊत म्हणतात…

0

मुंबईः वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे यांच्या शक्तीप्रदर्शनामुळं मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची चर्चा आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी येथील गर्दीबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. या सर्व घडामोडींवर शिवसेनेचे नेते यांनी भाष्य केलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले संजय राठोड हे सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. तिथं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आरोपांवर स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, संजय राठोड यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. संजय राठोड यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा होत होत्या. तसंच, काल शरद पवारांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती. तिथंही या विषयावर चर्चा झाल्याचं समजतंय. त्यामुळं मुख्यमंत्री संजय राठोड यांच्यावर काय कारवाई करणार, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. यासर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आज प्रसारमाध्यामांसोबत ते बोलत होते.

वाचाः

‘पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झालं आहे. हजारोंच्या संख्येनं लोक जमा झाले यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची व नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. या प्रकरणात राज्य सरकारपणे कायद्याचे पालन केले जाईल,’ असं स्पष्टीकरण राऊत यांनी केलं आहे.

वाचाः

पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी जमलेल्या गर्दीबाबत विचारल्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असं म्हटलं आहे. तसंच, राठोड यांच्या शक्तीप्रदर्शानावर मुख्यमंत्री नाराज आहेत का? या प्रश्नावर मात्र राऊतांनी बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्याबाबतीत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

संजय राठोड हेच पूजा चव्हाणचे मारेकरी; 'या' महिला नेत्याचा थेट आरोप

0

मुंबई: ‘ हेच पूजा चव्हाणचे मारेकरी आहेत आणि मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत’, अशी मागणी प्रदेश उपाध्यक्षा यांनी आज केली. पोहरादेवी येथे राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावरही वाघ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ( )

वाचा:

बीडच्या परळी वैजनाथ येथील २२ वर्षीय तरुणी हिने पुण्यात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर काही ऑडिओ क्लिप समोर आल्याने संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गेले १४ दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज प्रथमच माध्यमांना सामोरे गेले. बंजारा समाजाची काशी अशी ख्याती असलेल्या पोहरादेवी येथील धर्मपीठावर राठोड यांनी दर्शन घेतले व त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर आपली बाजू मांडली. आपल्यावरील सारे आरोप फेटाळतानाच विरोधक घाणेरडं राजकारण करून मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र, चौकशीत सत्य समोर येईलच, असा पवित्रा राठोड यांनी घेतला. यावेळी राठोड समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. या सर्वाचाच चित्रा वाघ यांनी समाचार घेतला.

वाचा:

‘संजय राठोड हेच पूजा चव्हाणचे मारेकरी आहेत’ असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला. ‘आपण शेण खायचं आणि बचावासाठी समाजाला वेठीला धरायचं असा प्रकार आज पोहरादेवी येथे घडला आहे. खरंतर ही घाण एक क्षणही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असायला नको. ताबडतोब त्याला मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे मात्र, बलात्कारी मंत्र्यांना पाठिशी घालण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ एकजूट झालं आहे. त्यांची बाजू घेण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीत चढाओढ लागली आहे. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही’, अशा तीव्र शब्दांत वाघ यांनी निशाणा साधला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ढळढळीत पुरावे उपलब्ध आहेत. त्यानंतरही पोलीस हाताची घडी घालून गप्प का आहेत?, असा सवालही वाघ यांनी केला.

वाचा:

करोना संसर्ग वाढत असताना व सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असताना पोहरादेवीत इतकी गर्दी का झाली याचा जाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच संजय राठोड यांना विचारायला हवा, अशी मागणीही यावेळी वाघ यांनी केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या भाज्यपालांनी समजून घेतलं पाहिजे'

0

मुंबईः ‘पुदुच्चेरीत सरकार पाडण्यासाठी ज्या खटपटी झाल्या ते सर्व प्रयोग महाराष्ट्रात झाले. पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी सामी सरकारला धड काम करु दिले नाही, दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असे वागणार नाहीत. राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुदुच्चेरीचे त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे. ( vs governor)

पुदुच्चेरीत काँग्रेस सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रातही ठाकरे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. पुदुच्चेरीतील राजकीय घडामोडींवरुन शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून व राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

वाचाः

‘पुदुच्चेरी हे राज्य केंद्रशासित असल्याने तेथील राज्यपालांना जरा जास्तच अधिकार असतात. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला लोकहिताचा प्रत्येक निर्णय किरण बेदी फिरवू लागल्या. अर्थात दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असं वागणार नाहीत. राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुदुच्चेरीचे त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात. राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो. किरण बेदी यांना ही कढीपत्त्याप्रमाणे वापरुन फेकून दिले आहे हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या भाज्यपालांनी समजून घेतलं पाहिजे,’ असं म्हणत शिवसेनेनं राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

‘पद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवले, आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ ला सुरुवात करू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडले तेव्हाही ‘पुढचा घाव महाराष्ट्रावर’ असे जाहीरच केले होते. त्यानंतर ‘बिहारचे निकाल एकदाचे लागू द्या, मग पहा महाराष्ट्रात कसे परिवर्तन घडवून दाखवतो’ वगैरे बतावण्या करून झाल्या. आता बात पुदुच्चेरीची सुरू आहे, पण जशी ‘दिल्ली बहुत दूर है’ त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’ असे चित्र आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.


वाचाः

अग्रलेखातील ठळक मुद्दे

– ‘पुदुच्चेरी झाले, आता महाराष्ट्र’ असे स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच राहावे. महाराष्ट्राने घेतलेला निकाल हेच जनमानस आहे. महाराष्ट्राचे मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत. शेवटी राजकारणातील एक मंत्र महत्त्वाचा , तो सगळ्यांनाच लागू पडतो. ‘जे पेराल तेच उगवेल’ याचे भान प्रत्येक राज्यकर्त्याने ठेवले तर बरे

– मध्य प्रदेशातील महाराजा शिंदे व त्यांच्या समर्थकांना फोडून, आमिषे दाखवून भाजपने बहुमत विकत घेतले. पुद्दुचेरीतही वेगळे काय घडले? पुद्दुचेरीत सध्या जे काय घडतेय हा राजकीय वेश्या व्यवसाय असल्याचा संताप मुख्यमंत्री नारायणसामी यांनी व्यक्त केलाय, पण या वेश्या व्यवसायापासून गेल्या सत्तर वर्षांत कोणी अलिप्त राहिले आहे काय? सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना फोडण्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी यंत्रणांचा वापर केला, असा आरोप काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी केला. महाराष्ट्रात नेमके हेच सुरू असल्याने पुदुच्चेरी जे घडले त्यावर विश्वास ठेवावाच लागेल.

– देशात आता पंजाब, राजस्थान व छत्तीसगढ येथेच काँग्रेसची सरकारे उरली आहेत. महाराष्ट्र व झारखंडमध्ये आघाडी सरकारात काँग्रेस सामील आहे. झारखंडही अस्थिर केले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला गेला आहे. हे वातावरण लोकशाहीला मारक आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

खासदार मोहन डेलकर यांची सुसाइड नोट १४ पानांची; त्यात लिहिलंय की…

0

म. टा. खास प्रतिनिधी,

दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी एक-दोन नाही, तर तब्बल १४ पानी चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, खासदाराच्या लेटरहेडवर गुजराती भाषेत ‘सुसाइड नोट’ असे शीर्षक देऊन त्यांनी मजकूर लिहिला आहे. डेलकर यांच्या कटुंबीयांचे जबाब नोंदविल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले असून यामुळे चिठ्ठीत नावे असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

वाचा:

मरीन ड्राइव्ह येथील हॉटेल ‘सी ग्रीन साऊथ’मध्ये सोमवारी दुपारी मोहन डेलकर हे मृतावस्थेत सापडले. हॉटेलमध्ये त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. यामध्ये संशयास्पद असे काहीच नसून हे आत्महत्याच असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाल्याचे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या लेटरहेडवर १४ पानांची सुसाइड नोट लिहिली असून यामध्ये आपण कशामुळे नैराश्यामध्ये होतो, याबाबत सविस्तर नमूद केले आहे. यामध्ये त्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावेदेखील लिहिली आहेत. या अधिकाऱ्यांकडून वारंवार अपमानित केले जात होते, असे त्यांनी म्हटले आहे. या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होणार का? याबाबत विचारले असता डेलकर यांचे कुटुंबीय, चालक, सुरक्षारक्षक यांचे सविस्तर जबाब नोंदविल्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे हा अधिकारी म्हणाला. चिठ्ठीतील हस्ताक्षर तपासण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

मुंबईच का?

चौदा पानी चिठ्ठीवरून डेलकर यांनी आधीपासूनच जीवन संपविण्याचे ठरविले होते, हे दिसून येते. परंतु त्यांनी यासाठी मुंबईच का निवडली? मुंबईत घर असूनही ते हॉटेलमध्ये का थांबले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही पोलिस करीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील खटल्यासंदर्भात ते मुंबईत आले होते असे सांगण्यात येत आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'राज्यात करोना खरेच वाढलाय की औषध कंपन्यांसाठी…'

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात खरेच वाढल्याची परिस्थिती आहे, की औषधनिर्मिती कंपन्यांसाठी काही विशेष बाब आहे, असा सवाल उपस्थित करीत मनसे नेते यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. एकीकडे भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे लाँग मार्च काढतात. यावेळी करोना पसरत नाही का? त्यामुळे सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे औषध कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.

वाचा:

पत्रकार परिषदेत बोलताना नांदगावकर यांनी हा सवाल केला. ‘राज्यात करोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत अशी परिस्थिती आहे. मागच्या काही दिवसांचा विचार केला तर अचानक मुंबईसह महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. ही बाब महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले आणि भाई जगताप यांना देखील सांगा, अशी माझी विनंती आहे. एकीकडे नाना पटोले भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे भाई जगताप लाँग मार्च काढतात. यावेळी करोना पसरत नाही का’, असा सवाल त्यांनी केला.

वाचा:

सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे औषध कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना? कारण करोना काळात मोठ्या प्रमाणात औषधे निर्माण करण्यात आली आहेत. परंतु या औषधांच्या साइड्स इफेक्ट्समुळे ही औषधे खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या हिताचा तर यामागे विचार नाही ना, अशा शब्दांत नांदगावकर यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नायर हॉस्पिटलमध्ये मोठा घोटाळा; तीन मृत कर्मचाऱ्यांना जिवंत दाखवले!

0

मुंबई: डॉक्टरच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेले सेंट्रल येथील पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. या रुग्णालयाच्या आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याचे उघड झाले आहे. तीन मृत कर्मचाऱ्यांना जिवंत असल्याचे दाखवत त्यांचे पेन्शन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन लाटण्यात आले. विभागीय चौकशीमध्ये सुमारे दहा लाखाची रक्कम हडप केल्याचे उघडकीस येताच रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वाचा:

मुंबई महापालिकेच्या कोषागार कार्यालयातून नायर रुग्णालयातील आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आस्थापना विभागातील चौघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. मृत व्यक्तींच्या नावे आपल्या कार्यालयातून पेन्शनचे दावे मंजूर कसे करण्यात आले? याबाबत या नोटिशीमधून विचारणा करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या या नोटिशीला अधिकाऱ्यांनी उत्तर देतानाच, या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू केली. त्यावेळी आस्थापना विभागातील कारकून प्रसाद गोसावी हा ऑगस्ट महिन्यात कंकू रावलीया हिचा सेवानिवृत्तीचा अर्ज घेऊन आला होता, हे लक्षात आले. मास्क लावलेली एक महिला प्रसादसोबत यावेळी आली होती. प्रसादने तिची ओळख रावलीया यांची सून अशी करून दिली होती. त्यांनी सादर केलेला बँकेचा स्टॅम्प आणि मॅनेजरची सही असलेला हयातीचा दाखला तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी केली असता, ती बोगस असल्याचे लक्षात आले. कंकू हिच्याप्रमाणेच आणखी दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे घडल्याचे निदर्शनास आले.

वाचा:

कारकून प्रसाद गोसावी यानेच दिशाभूल केल्याचे विभागीय चौकशीतून समोर आले. आपण अडकले जाऊ या भीतीने गोसावी याने आपली चूक मान्य केली आणि तीन मृत कर्मचाऱ्यांच्या नावाने लाटलेले ९ लाख ९१ हजार ७०० रुपये महापालिका को ऑपरेटिव्ह बँकेत जमा केले. असे असले, तरी फसवणूक, शासकीय रकमेचा अपहार आणि बोगस कागदपत्र तयार केल्यामुळे नायर रुग्णालयाच्या आस्थापना विभागातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून प्रसाद गोसावी याच्यावर आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तीन कर्मचाऱ्यांना भासविले जिवंत

कंकू रावलीया, निर्मला माघाडे आणि शांताबाई जाधव या तीन महिला कर्मचारी मृत असतानाही त्यांच्या हयातीचा बोगस दाखल तयार करून त्या जिवंत आहेत, असे भासविण्यात आले. बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावाने पेन्शन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करून घेण्यात आले.

करोना, मास्कचा गैरफायदा

प्रसाद गोसावी याने बनावट कागदपत्रांसोबतच बोगस नातेवाईकही उभे केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. नायरमधील आस्थापना कार्यालयात अर्ज तसेच इतर कागदपत्रे जमा करताना मृत व्यक्तीचे वारसदार म्हणून त्याने दुसऱ्याच व्यक्तींना उभे केले. विशेष म्हणजे, या कालावधीत करोनाचा संसर्ग प्रचंड वाढला होता. त्यामुळे या बोगस वारसदारांना मास्क घालून अधिकाऱ्यांसमोर त्याने हजर केल्याने नातेवाईकांना ओळखता आले नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पामेला गोस्वामी अंमली पदार्थ तस्करी प्रकरण; भाजप नेते राकेश सिंह यांना अटक

0

कोलकाता: भाजप युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी ( ) यांनी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी पक्षाचे नेते राकेश सिंह यांचं नाव घेतलं होतं. आता बर्धवान जिल्ह्यात त्यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. रस्तेमार्गाने राज्यातून पळून जाण्याचा प्रयत्नात होते, असं सांगितलं जातंय. कोलकाता पोलिसांनी राकेश सिंह यांच्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. घरात येण्यापासून त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.

अंमली पदार्थ प्रकरणी भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांनी पक्षाच्या ज्या नेत्याचे नाव घेतले होते त्या राकेश सिंह यांच्या निवासस्थानावर पोलिसांना प्रवेश करण्यापासून रोखले गेले होते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. न्यू अलीपूर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यांचे एक पथक भाजप नेते राकेश सिंह यांच्या निवासस्थानी गेले होते. राकेश सिंह हे भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे निकटचे सहकारी असल्याचं बोललं जातात.

सिंह यांचे पुत्र साहेब यांनी घराची तपासणी करण्यासाठी आलेल्या पोलिसांकडे कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली. यावेळी पोलिस आणि त्यांच्या बाचाबाची झाली. आपण कुटुंबाला संबंधित कागदपत्रही दाखवली आणि कायद्यानुसार काम केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे.

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी राकेश सिंह यांना लालबाजार येथील कोलकाताच्या पोलिस मुख्यालय हजर होण्यास सांगण्यात आलं होतं. पण आपण काही कामानिमित्त दिल्लीला जात आहोत आणि २६ फेब्रुवारीला परत येऊ. त्यानंतर पोलिसांसमोर हजर होऊ असं त्यांनी पोलिसांना सांगितलं.

भाजप युवा मोर्चाच्या राज्य सचिव पामेला गोस्वामी आणि त्यांचे मित्र प्रबीर कुमार डे यांना गेल्या आठवड्यात शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. पामेला गोस्वामी यांच्या बॅग आणि कारमध्ये लपवलेले कोकेन पोलिसांनी घेतलेल्या झडतीत सापडले. यानंतर त्या दोघांनाही अटक करण्यात आली पामेला गोस्वामी यांनी अंमली पदार्थ प्रकरणात राकेश सिंह यांचं नाव घेतलं. त्यांची हा कट रचल्याचा आरोप केला. पण राकेश सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts