Friday, September 29, 2023
Home Blog Page 5751

AUS vs ENG : ‘पिंक टेस्ट’पूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूला झाला कोरोना

0

AUS vs ENG : सिडनी : पिंक टेस्टच्या काही दिवस आधीच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मॅकग्राची पत्नी जेन हिच्या स्मृतीप्रित्यर्थ खेळवली जाते. जेनचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. स्तनाच्या कर्करोगाने पीडित रुग्णांना मदत करण्यासाठी या सामन्याच्या माध्यमातून निधी उभारला जातो.

यावेळी पिंक टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला प्रतिस्पर्धी म्हणून इंग्लंडचा संघ असणार आहे आणि हा सामना अॅशेस मालिकेचा एक भाग असेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांची नवीन वर्षातील पहिली कसोटी ५ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) खेळवली जाणार आहे. एसजीएस कसोटीचा तिसरा दिवस हा जेन मॅकग्रा दिवस म्हणून ओळखला जातो आणि तोपर्यंत ग्लेन मॅकग्राची कोविड चाचणी नकारात्मक येते का, हे पाहावे लागेल.

दरम्यान, दोन्ही संघातील खेळाडूंना त्यांच्या ‘बॅगी पिंक’ कॅप्स दिल्या जातील, तेव्हा मॅकग्रा हा या कार्यक्रमाला व्हर्चुअली हजेरी लावणार आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी मॅकग्रा फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी होली मास्टर्स यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, ‘ग्लेनची पीसीआर चाचणी झाली आणि दुर्दैवाने निकाल सकारात्मक आला. आम्ही ग्लेन आणि त्याच्या कुटुंबाला उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.’

ती पुढे म्हणाली की, ‘आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि एससीजीमधील आमच्या भागीदारांचे आभारी आहोत. पिंक टेस्टला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही इंग्लंड क्रिकेट संघ आणि प्रसारकांचेही आभारी आहोत.’

#ETimesCelebTracker: Alaya F पासून Dua Lipa पर्यंत—हे आहेत आजचे 20 सर्वोत्तम सेलिब्रिटी क्षण! | फोटोगॅलरी

0

०१ / 20

आलया च सुट्टीवर ‘मानसिक’ आहे! अभिनेत्रीने नयनरम्य ठिकाणावरून स्वतःचा एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “मालदीवमध्ये मानसिकदृष्ट्या.”

02 / 20

मानुषी छिल्लर या सुशोभित लेहेंग्यात एथनिक स्वप्नासारखी दिसते. माजी मिस वर्ल्ड, जी आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे, अक्षय कुमारचा सहकलाकार आहे, तिने तिच्या अलीकडील फोटोशूटमधील चित्रांची मालिका पोस्ट केली. तिचे सौंदर्य आणि लालित्य पाहून चाहते घाबरले आहेत.

03 / 20

अमांडा होल्डनने बिकिनीमध्ये पोज देतानाचे फोटो शेअर केल्यानंतर इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडाली आहे. 50 वर्षीय स्टारने तिच्या शर्टचे बटण काढले कारण तिने तिच्या सुट्टीत कॅमेर्‍यासमोर पोज दिली.

04 / 20

#ETimesCelebTracker: Alaya F पासून Dua Lipa पर्यंत—हे आहेत आजचे 20 सर्वोत्तम सेलिब्रिटी क्षण!

लिझोने सर्व ग्लॅमसह नवीन वर्षाचे स्वागत केले! या गायिकेने सोशल मीडियावर स्वत:चे मोहक फोटोंची मालिका पोस्ट करून तिच्या चाहत्यांना एक सुंदर सरप्राईज दिले. कॅप्शनमध्ये तिने फक्त “YEAR” असे लिहिले आहे.

अधिक पहा:
लिझो

लिझो

05 / 20

#ETimesCelebTracker: Alaya F पासून Dua Lipa पर्यंत—हे आहेत आजचे 20 सर्वोत्तम सेलिब्रिटी क्षण!

मायली सायरसने एक आकर्षक पोल्का डॉट टू-पीस हिला केला आणि तिच्या स्नॅप्सना साधे कॅप्शन दिले, “नवीन वर्षाच्या शुभेच्छा! #2022.” तिचे केस ब्लॉन्ड शॅगी बॉबमध्ये बनवले गेले होते आणि तिने लाल रंगाच्या लिपस्टिकची गडद शेड घातली होती.

06 / 20

#ETimesCelebTracker: Alaya F पासून Dua Lipa पर्यंत—हे आहेत आजचे 20 सर्वोत्तम सेलिब्रिटी क्षण!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांची पत्नी आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्यासोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. “२०२२ मध्ये, आम्ही एक उत्तम अमेरिका बनवत राहणार आहोत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!” मथळा वाचतो.

०७ / 20

#ETimesCelebTracker: Alaya F पासून Dua Lipa पर्यंत—हे आहेत आजचे 20 सर्वोत्तम सेलिब्रिटी क्षण!

डेव्हिड बेकहॅमने त्याची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम आणि मुलांसोबतचे त्याचे ‘विशेष क्षण’ कॅप्चर करणारी विविध छायाचित्रे असलेली एक गोड पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये, माजी फुटबॉलपटूने लिहिले, “नवीन वर्षाच्या शुभेच्छा ❤️ लोकांकडून खास क्षण ज्यांसाठी मी सर्वात आभारी आहे ❤️ @victoriabeckham @brooklynbeckham @romeobeckham @cruzbeckham #HarperSeven Love you so much.”

08 / 20

#ETimesCelebTracker: Alaya F पासून Dua Lipa पर्यंत—हे आहेत आजचे 20 सर्वोत्तम सेलिब्रिटी क्षण!

व्हेनेसा हजेन्सने एका जबरदस्त काळ्या बॉडीसूटमध्ये तिचे सौंदर्य दाखवले. चेकरबोर्ड-नमुना असलेली वस्तू स्टडने सजलेली होती आणि समोर गोलाकार कटआउट्सची पंक्ती दर्शविली होती. “नवीन वर्षाच्या शुभेच्छा! ✨या वर्षासाठी मी सर्वात आभारी आहे ती गोष्ट म्हणजे माझा समुदाय. माझ्या आयुष्यात असा अतुलनीय मानवांचा समूह असल्याचा मला अभिमान आणि सन्मान वाटतो. तुम्ही सर्वांनी मला प्रेरणा दिली आणि मला चांगले बनवले,” अभिनेत्रीने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले.

०९ / 20

#ETimesCelebTracker: Alaya F पासून Dua Lipa पर्यंत—हे आहेत आजचे 20 सर्वोत्तम सेलिब्रिटी क्षण!

दुआ लीपाने रफल्ड स्कर्टसह स्ट्रॅपलेस निळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला. तिच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “तुम्हा सर्वांना खूप प्रेम आणि प्रकाश पाठवत आहे.”

10 / 20

#ETimesCelebTracker: Alaya F पासून Dua Lipa पर्यंत—हे आहेत आजचे 20 सर्वोत्तम सेलिब्रिटी क्षण!

चमकदार पिवळ्या पँटसूटमध्ये राय लक्ष्मी चकचकीत झाली आहे, परिपूर्ण बॉस लेडी व्हिब बाहेर काढत आहे! पोस्ट लवकरच तिच्या सर्व चाहत्यांच्या टिप्पण्यांनी भरून गेली, तिला उत्साही दिसण्यासाठी उत्सुक. तिच्या पोस्टमध्ये तिने लिहिले, “महत्त्वाकांक्षा असलेल्या स्त्रिया त्यांचा व्यवसाय चालवतात, त्यांच्या तोंडाने नव्हे. 💛 #HAPPY2022 EVERYONE 💛नवीन सुरुवातीच्या शुभेच्छा ⭐️खूप प्रेमाने चमकतात.”

मुस्लीम महिलांचे फोटो मॉर्फ करून लिलाव; गुन्हेगारांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती! – bulli bai app auction by morphing photos of muslim women: action will be taken against criminals soon says satej patil

0

हायलाइट्स:

  • प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर
  • सायबर सेलला चौकशीचे आदेश दिल्याची सतेज पाटील यांची माहिती
  • बदनामीच्या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

कोल्हापूर : ‘बुली बाई’ नावाने गिटहब नावाच्या ऑनलाईन अ‍ॅपवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. या बदनामीच्या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच या प्रकरणाचा पर्दापाश करू, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. याबाबत सायबर सेलला आपण चौकशीचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ( Bulli Bai App Latest Breaking News )

एका अज्ञात गटाकडून गिटहब अ‍ॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात येत असून त्यांना टार्गेट केलं जात आहे. या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल राज्याच्या गृहखात्याने घेतली असून याबाबत आपण सायबर सेलला चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री पाटील यांनी दिली. शनिवारी एक जानेवारी २०२२ रोजी ‘बुली बाई’ नावाने अ‍ॅपवर फोटो अपलोड करण्यात आले आहेत.

अर्ध्यातूनच सोडली पतीची साथ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

या प्रकरणाची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री पाटील यांनी सायबर सेलला कारवाई करण्यास सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाबाबत धागे दोरे हाती लागले आहेत, मात्र, तपास सुरू असल्याने आपण आताच काही बोलणार नाही. परंतु लवकरच याचा पर्दाफाश करू, असंही सतेज पाटील म्हणाले.

Bulli Bai App Controversy: ‘सुल्लीडील’नंतर आता ‘बुल्लीबाई’मुळे वादळ; शिवसेनेने आवाज उठवताच…

मुंबईत गुन्हा दाखल

महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुध्द मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

दरम्यान, सदर अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत, त्याबरोबर आक्षेपार्ह मजकूरही टाकण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्या फोटोंचा लिलाव केला जात आहे. यात एका महिला पत्रकाराचा फोटो अपलोड करण्यात आला असून आक्षेपार्ह मजकुरासह तो शेअर केला जात आहे. याबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे.

ratnagiri: Ratnagiri : राष्ट्रीयकृत बँकेला ५ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा, कर्जदार, शाखा व्यवस्थापकासह २३ जणांवर गुन्हा – ratnagiri union bank of india branch cheated by officer over rs 5 crore 23 man booked

0

हायलाइट्स:

  • रत्नागिरीत धक्कादायक प्रकार आला समोर
  • राष्ट्रीयकृत बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
  • माजी अधिकाऱ्यासह मध्यस्थी आणि कर्जदार अशा २३ जणांविरोधात गुन्हा
  • रत्नागिरी शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू

रत्नागिरी: ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना घडत असताना, कोकणातील रत्नागिरी येथे बनावट कागदपत्रांद्वारे एका राष्ट्रीयकृत बॅंकेला कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शहरातील शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरून, खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली. तब्बल ५ कोटी १२ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयित कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मध्यस्थांसह २३ जणांविरोधात रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडून करण्यात आलेल्या चौकशीत हे सगळे संशयित दोषी आढळल्याने ही फिर्याद बँकेकडून रत्नागिरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या सगळ्या कर्ज प्रकरणातील कागदपत्रे संशयास्पद व बनावट असल्याचे युनियन बँकेने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. संशयित कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मध्यस्थांसह एकूण २३ जणांवर रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह रत्नागिरी तालुक्यातील दोन मध्यस्थ व एकूण वीस कर्जदारांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, रत्नागिरी शहर पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

Sulli Deals : सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो आणि किंमत; महिला आयोगाने दिले ‘हे’ आदेश
मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, पुलाचा कठडा तोडून ट्रक हवेत लोंबकळला

युनियन बँकेचे विरेश चंद्रशेखर यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. २०१५-२०१६ या कालावधीत एकूण वीस कर्जदारांनी कर्ज घेण्यासाठी सादर केलेली संबधित कागदपत्रे (७/१२ उतारा व अन्य कागदपत्रे तसेच खोटे व बनावट भाडे करारपत्र / बनावट मुखत्यारपत्र ) कर्ज मागणी अर्ज व त्या संबंधित कागदपत्रे तसेच कर्ज मंजूर केलेल्या संदर्भातील सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती संशयास्पद आणि बनावट असल्याचे समोर आले. या कर्जदारांच्या कर्ज मंजुरीकरिता दोन जणांनी मध्यस्थी केली होती. हे दोघे भाटीमिऱ्या, मांडवी झाडगाव रत्नागिरी येथील आहेत. तत्कालीन शाखा व्यवस्थापक, कर्जदार, मध्यस्थी यांनी संगनमत करून युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बँकेकडून आंबा पिकपाणीसाठी कर्ज मंजूर करून घेतले. यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून त्याद्वारे कर्ज मंजूर करुन घेतले. त्या मंजूर रक्कमेचा आंबा पिकपाणीकरीता वापर न करता, वैयक्तिक खर्चासाठी वापर करुन त्या रकमेची परतफेड केलेली नाही.

श्वास रोखून धरायला लावणारा विचित्र अपघात; ट्रक कठडा तोडून लोंबकळत राहिला

Chiplun News : रात्री १० वाजता भरारी पथकानं टाकली धाड, धडक कारवाईनंतर…

संबंधित एकूण वीस कर्जदार हे घेतलेले कर्ज फेड करू शकतात अगर कसे? याबाबत कोणतीही शहानिशा न करता तसेच त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करता तत्कालीन शाखा व्यवस्थापकांनी बँकेकडून कर्ज मंजूर करुन दिले व आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कर्जापोटी बँकेची तब्बल ५ कोटी १२ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात बँकेकडून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये हे सगळे प्रकरण संशयास्पद व गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्याने तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले चौकशी करत आहेत.

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर मध्यरात्री घडला भयंकर अपघात, अवघड वळणावर ट्रक उलटला अन्…

औरंगाबादेत श्रेयवादावरुन राजकारण तापलं, दानवेंचे बॅनर्स लागताच खैरेंनी डिवचलं

0

औरंगाबाद : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचे मालमत्ता कर रद्द केल्यावरून आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. तर आता औरंगाबादमध्येही भाजप-शिवसेनेत श्रेयवादावरून कलगीतुरा पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या आभाराचे होर्डिंग्स लावल्यावरुन भाजप आणि शिवसेनेचे नेते पुन्हा एकदा आमने-सामने पाहायला मिळत आहे.

आगामी निवडणुकीचे वातावरण पाहता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी रावसाहेब दानवे यांच्या आभाराचे आणि करून दाखवलेचे होर्डिंग्ज शहरभरात लावले आहेत. ज्यात नांदेड-मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरणास मिळालेली मान्यता आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जालन्यातून पहिली किसान रेल्वे सुरू केल्याच्या उल्लेख केला गेला आहे. तर या होर्डिंगवरून आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

रेल्वे सुरू झाल्याचं मी अभिनंदन करतो, पण श्रेय कुणी घेऊ नयेत असा टोला खैरे यांनी दानवे यांना यावेळी लगावला. तुम्ही रेल्वे सुरू केली तर काय झालं तुम्ही रेल्वे मंत्री आहेत,त्यामुळे हे करावेच लागेल. पण याचा अर्थ असा होत नाही की होर्डिंग बाजी केली पाहिजे. मुळात भाजपच काहीच काम नसून हे फक्त चमकोगिरी सुरू असून, मी स्वतः अनेकदा मराठवाड्यातील रेल्वेबाबत संसदेत अनेकदा आवाज उठवला असल्याचं खैरे म्हणाले.

त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप-शिवसेना कामाला लागली आहे हे यातून स्पष्ट होत आहे.

ratnagiri: Ratnagiri : राष्ट्रीयकृत बँकेला ५ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा, कर्जदार, शाखा व्यवस्थापकासह २३ जणांवर गुन्हा – ratnagiri union bank of india branch cheated by officer over rs 5 crore 23 man booked

0

हायलाइट्स:

  • रत्नागिरीत धक्कादायक प्रकार आला समोर
  • राष्ट्रीयकृत बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
  • माजी अधिकाऱ्यासह मध्यस्थी आणि कर्जदार अशा २३ जणांविरोधात गुन्हा
  • रत्नागिरी शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू

रत्नागिरी: ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना घडत असताना, कोकणातील रत्नागिरी येथे बनावट कागदपत्रांद्वारे एका राष्ट्रीयकृत बॅंकेला कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शहरातील शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरून, खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली. तब्बल ५ कोटी १२ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयित कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मध्यस्थांसह २३ जणांविरोधात रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडून करण्यात आलेल्या चौकशीत हे सगळे संशयित दोषी आढळल्याने ही फिर्याद बँकेकडून रत्नागिरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या सगळ्या कर्ज प्रकरणातील कागदपत्रे संशयास्पद व बनावट असल्याचे युनियन बँकेने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. संशयित कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मध्यस्थांसह एकूण २३ जणांवर रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह रत्नागिरी तालुक्यातील दोन मध्यस्थ व एकूण वीस कर्जदारांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, रत्नागिरी शहर पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

Sulli Deals : सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो आणि किंमत; महिला आयोगाने दिले ‘हे’ आदेश
मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, पुलाचा कठडा तोडून ट्रक हवेत लोंबकळला

युनियन बँकेचे विरेश चंद्रशेखर यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. २०१५-२०१६ या कालावधीत एकूण वीस कर्जदारांनी कर्ज घेण्यासाठी सादर केलेली संबधित कागदपत्रे (७/१२ उतारा व अन्य कागदपत्रे तसेच खोटे व बनावट भाडे करारपत्र / बनावट मुखत्यारपत्र ) कर्ज मागणी अर्ज व त्या संबंधित कागदपत्रे तसेच कर्ज मंजूर केलेल्या संदर्भातील सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती संशयास्पद आणि बनावट असल्याचे समोर आले. या कर्जदारांच्या कर्ज मंजुरीकरिता दोन जणांनी मध्यस्थी केली होती. हे दोघे भाटीमिऱ्या, मांडवी झाडगाव रत्नागिरी येथील आहेत. तत्कालीन शाखा व्यवस्थापक, कर्जदार, मध्यस्थी यांनी संगनमत करून युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बँकेकडून आंबा पिकपाणीसाठी कर्ज मंजूर करून घेतले. यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून त्याद्वारे कर्ज मंजूर करुन घेतले. त्या मंजूर रक्कमेचा आंबा पिकपाणीकरीता वापर न करता, वैयक्तिक खर्चासाठी वापर करुन त्या रकमेची परतफेड केलेली नाही.

श्वास रोखून धरायला लावणारा विचित्र अपघात; ट्रक कठडा तोडून लोंबकळत राहिला

Chiplun News : रात्री १० वाजता भरारी पथकानं टाकली धाड, धडक कारवाईनंतर…

संबंधित एकूण वीस कर्जदार हे घेतलेले कर्ज फेड करू शकतात अगर कसे? याबाबत कोणतीही शहानिशा न करता तसेच त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करता तत्कालीन शाखा व्यवस्थापकांनी बँकेकडून कर्ज मंजूर करुन दिले व आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कर्जापोटी बँकेची तब्बल ५ कोटी १२ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात बँकेकडून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये हे सगळे प्रकरण संशयास्पद व गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्याने तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले चौकशी करत आहेत.

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर मध्यरात्री घडला भयंकर अपघात, अवघड वळणावर ट्रक उलटला अन्…

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

sulli deals: Sulli Deals : सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो आणि किंमत; महिला आयोगाने दिले ‘हे’ आदेश – sulli deals latest update news chairperson of maharashtra state women commission rupali chakankar demands strict action against app

0

हायलाइट्स:

  • सुल्ली डील अॅपवर महिलांची माहिती आणि किंमत
  • महाराष्ट्र राज्य आयोगाने घेतली गंभीर दखल
  • अॅपद्वारे अशी माहिती उपलब्ध करून देणाऱ्या गिटहबवर कारवाईचे निर्देश
  • महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली माहिती

मुंबई : क्षुल्लक व्यवहार अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारचे अॅप तयार करून त्यावर माहितीचा प्रसार करण्यासाठी अनियंत्रित फ्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या गिटहब विरोधातही कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाने सायबर विभागाला दिले आहेत.

नवाब मलिक यांनी आज, रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची किंमत दिली जात असून, बदनामी केली जात आहे. अशा अॅपवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. याबाबत गृहमंत्र्यांकडे तक्रार देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अशा अॅपद्वारे माहिती प्रसारित करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या सायबर विभागाला दिले आहेत.

Bulli Bai App: ‘सुल्लीडील’नंतर आता ‘बुल्लीबाई’मुळे वादळ; शिवसेनेने आवाज उठवताच…
समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांचे पुन्हा गंभीर आरोप; ‘ती’ ऑडिओ क्लिपच ऐकवली!

राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न

हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले. त्या म्हणाल्या की, ‘सुल्ली डील नावाच्या ॲपवरून मुस्लीम महिलांचे फोटो, प्रोफाइल आणि त्यासमोर किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने असे दिसून येते. या सुल्ली डील ॲपवरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यामुळे सर्व समाज माध्यमांवरून ती माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्ध सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सायबर विभागाला दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

भाजपच्या बड्या नेत्याकडून समीर वानखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी लॉबिंग – मलिक

प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा; इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘हा’ निर्णय

पुण्यात राहणाऱ्या भाच्याकडे निघालेल्या मामाच्या कारला अपघात: दोन ठार, तीन जखमी – two killed and three injured in nevasa phata car accident

0

हायलाइट्स:

  • जळगावहून पुण्याला निघालेल्या मामाच्या कारला अपघात
  • अपघातात दोन जण जागीच ठार, तिघे जखमी
  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

अहमदनगर : पुण्यातील भाच्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा असल्याने जळगावहून पुण्याला निघालेल्या मामाच्या कारला नेवासा फाटा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढे जाणाऱ्या कंटेनरला कारची जोरदार धडक बसली. रविवारी पहाटे हा अपघात झाला. (अहमदनगर अपघात ताजी बातमी)

रावेरमधून कोलते व सांगेले कुटुंबीय पुण्याला निघाले होते. औरंगाबाद-पुणे महामार्गावरून जात असताना रविवारी पहाटे नेवासा फाटा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. नेवासा फाटा येथील चौकात नव्याने गतिरोधक बसवण्यात आला आहे. त्याचा अंदाज न आल्याने जवळ आल्यावर वाहने अचानक थांबवली जातात. अशाच पद्धतीने अचानक थांबलेल्या कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार धडकली. यामध्ये कारचा पुढील भाग चेपला गेला.

अर्ध्यातूनच सोडली पतीची साथ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघातात कारमधील गजेंद्र रुपचंद कोलते (वय ६५ रा. वाघोदे, ता.रावेर जिल्हा जळगाव) व आकाश प्रकाश सांगेले (वय २८ रा. थोरगव्हाण, ता.रावेर, जि.जळगाव) हे जागीच ठार झाले. तर कल्पेश विनोदचंद पाटील (वय ३५), भूमिका कल्पेश पाटील (वय ६, रा वलसाड, गुजरात) व सुलभा गजेंद्र कोलते (वय ५५) हे तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघाताला निमंत्रण ठरणाऱ्या गतिरोधकाजवळ पांढरे पट्टे मारावेत, सूचना फलक लावावेत, अशा सूचना पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसंच कंटेनरचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

अर्ध्यातूनच सोडली पतीची साथ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू – a woman who was injured in an accident died during treatment

0

हायलाइट्स:

  • सांगली फाटा टोलनाक्यावर भीषण अपघात
  • गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू
  • मृत्यूशी झुंज अपयशी

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली मार्गावरील सांगली फाटा टोलनाक्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. रुपाली सुनील नलवडे (वय २४, रा. मौजे वडगाव, ता. हातकणंगले) असं मृत महिलेचं नाव आहे. (कोल्हापूर अपघाताची बातमी)

मौजे वडगाव गावातून चार दिवसापूर्वी रुपाली नलवडे पती सुनील यांच्यासह मोटारसायकलवरुन कोल्हापूरला जात असताना सांगली फाटा टोल नाक्यावरील खड्ड्यात मोटार सायकल आदळली. त्यामुळे रुपाली या मोटारसायकलवरुन उडून रस्त्यावर पडल्या. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या नातवाईकांनी त्यांना ताबडतोब खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

भयंकर! चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर आईचीही उडी घेत आत्महत्या

मृत रुपाली नलवडे या गावातीलच कामधेनू सहकारी दूध संस्थेत संगणक ऑपरेटर होत्या.

दरम्यान, सांगली टोल नाका हा बंद असून त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात आहे.

sindhudurg: Sindhudurg News : पेट्रोल पंपावर चोरी करून ‘ते’ मुंबईकडे जात होते, करूळ चेकनाक्यावर… – sindhudurg five robbers arrested on karul naka after 5 hours in robbery on petrol pump

0

हायलाइट्स:

  • सिंधुदुर्गातील करूळ नाक्यावर पाच चोरट्यांना अटक
  • खर्येवाडी येथील पेट्रोल पंपावर केली होती चोरी
  • मुंबईच्या दिशेने पळून जात असताना पाठलाग करून चोरट्यांना पकडले

सिंधुदुर्ग: खर्येवाडी येथील सिद्धी ऑटोमोबाइल पेट्रोल पंपावर ५७ हजार रुपयांची चोरी करून मुंबईकडे पळून जाणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासांत करुळ तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६१ हजार ५५० रुपये रोख, वेगवेगळ्या कंपनीचे ७ लाख ३९ हजार ५०० रुपये किंमतीचे २९ मोबाइल, ४ लाख किंमतीची कार असा एकूण १२ लाख १ हजार ५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास खर्येवाडी येथील सिद्धी ऑटोमोबाइल पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरण्याच्या निमित्ताने कारमधून आलेल्या पाच जणांनी पंपावरील ५७ हजार रुपये चोरून मुंबईच्या दिशेने पळ काढल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व तपासणी नाक्यांवरील यंत्रणेला सतर्क केले. वैभववाडीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी प्रथम करूळ तपासणी नाक्यावरील अंमलदारांना सतर्क करून बंदोबस्त वाढवला. त्यानंतर ते स्वत: पथकासह रस्त्यावर थांबून तपासणी करत असताना वैभववाडी येथील संभाजी चौक येथे नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कार थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती वेगात कोल्हापूरच्या दिशेने जावू लागल्याने पोलीस निरीक्षक जाधव यांनी क्षणाचा विलंब न करता चालक हरिश्चंद्र जायभाय यांच्या मदतीने पाठलाग केला. त्यानंतर करूळ तपासणी नाक्यावरील अंमलदारांना सतर्क केले.

भयंकर! ४ वर्षांच्या मुलाला तीन भटक्या कुत्र्यांनी ओरबाडले; शरीरावर १८ ठिकाणी घेतला चावा
Thane : मलनिःस्सारण प्रकल्पाच्या टाकीमध्ये पडून तरुणाचा मृत्यू

पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे व समीर तांबे यांनी केलेल्या वाहन अडथळ्याच्या मदतीने कारमधील ५ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत विक्रोळी पार्क साईट व घाटकोपर येथील ५ जणांना ताब्यात घेतले. त्यातील दोघे जण हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात मुंबई व ठाणे येथील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या पाच जणांना ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

हत्येचा सात महिन्यांनी उलगडा

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल जाधव समीर तांबे, वसंत कांबळे, मारुती साखरे, चालक हरिश्चंद्र जायभाय, मोहन राणे, अजय बिल्पे, राहुल तळसकर, नियंत्रण कक्ष अधिकारी अनिल भिसे, अशिष जामदार, श्रेया लाड यांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे करीत आहेत.

तरुणाने वाळू शिल्प साकारत दिल्या नवीन वर्षाच्या अनोख्या शुभेच्छा!

Latest posts