नवी दिल्ली: पतियाळा हाऊस कोर्टात टूलकिट प्रकरणी ( ) दिशा रवीच्या ( ) जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने सध्यातरी दिशा रवीचा जामीन मंजूर केला नाही. आता २३ फेब्रुवारीला पुढच्या आठवड्यात मंगळवारी कोर्ट निकाल देणार आहे.
टूलकिटमध्ये अशी सामग्री टाकून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची तयारी केली गेली होती. टूलकिटच्या माध्यमातून लोकांना सरकारविरोधात या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. भारत सरकारविरूद्ध एक मोठं षडयंत्र रचले जात होतं. या प्रकरणात काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. जी आम्हाला सीलबंद लिफाफ्यात कोर्टाला द्यायची आहेत. दिशा रवीशी संबंधित पुरेसे साहित्य आमच्याकडे आहे. दिशाने टूलकिट संपादीत केलं आहे. तिचा सहकारी शंतनु हा दिल्लीत आला होता. तो २० ते २७ जानेवारीदरम्यान दिल्लीत होता. सर्व गोष्टींची अंमलबजावणी होतेय की नाही? हे तपासण्यासाठी तो आला होता, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांकडून कोर्टात करण्यात आला.
यांनी तयार केलेली योजना २६ जानेवारीला यशस्वी झाली नाही. असं झालं असतं तर भयंकर परिस्थिती राहिली असती. हिंसाचारादरम्यान पोलिसांचा संयम सुटून आणि आंदोलकांवर बळाचा अधिक उपयोग व्हावा. यात अनेक शेतकरी जखमी झाले असते आणि सोशल मीडियातून अफवा पसरवून वादळ निर्माण करून भारताविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होता. कॅनडातील व्हँकुवर शहर हे खलिस्तानांनी फुटीरतावाद्यांचे प्रमुख केंद्र आहे. टूलकिट आणि व्हॉट्सअॅप ग्रुपबद्दल दिशा रवीला विचारण्यात आले. त्यावेळी याबद्दल आपल्याला काहीही माहित नसल्याचं तिने सांगितलं, असं पोलिस कोर्टात म्हणाले.
निकिताचा मोबाइल तपासण्यात आला. त्यात निकिता आणि दिशा हे कट रचणारे स्थानिक होते. ‘Ask India Why’ हे खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या प्रचार भारतात व्हावा, यासाठी बनवले गेले. शेतकरी आंदोलनाच्या आडून भारतात आपला प्रचार करण्याचा खलिस्तानांच्या कट होता, असं पोलिस म्हणाले.
शीख जस्टिस फाउंडेशनने दिशाचा उपयोग आपल्या हालचालींची अंमलबजावणीसाठी केला. हे टूलकिट पीजेएफ (पोएटीक जस्टिस फाउंडेशन) च्या मदतीने विकसित केले गेले. दिशाने ग्रेटाला एक टूलकिट दिली आणि नंतर ते हटवण्यास सांगितलं, म्हणजेच दिशाला सर्व काही माहित होते. दिशाने मोबाइलवरून पीजेएफबरोबरची चॅट डिलीट केली होती. तिने संवेदनशील सामग्री काढून ग्रेटाला एक नवीन टूलकिट दिली. शंतनु आणि दिशा शेतकऱ्यांच्या मुद्यावर ग्रेटावर कसा प्रभाव पाडायचा यावर चॅटमधून चर्चा करायचे, असं पोलिस म्हणाले.
शिख फॉर जस्टीक आणि पीजेएफ यांचा हेतू एकच आहे. दोघांविरूद्ध देशद्रोही साहित्य आहे. यासह पोलिसांनी न्यायाधीशांना फाईलही दिली. दिल्ली पोलिसांच्या २ वकिलांनी युक्तिवाद केला. शंतूनने पीजेएफला टूलकिट शेअर केली. टूलकिटची अंमलबजावणी करण्यासाठी २० ते २७ जानेवारी दरम्यान शंतनू दिल्लीत शेतकऱ्यांमध्ये होता. ग्रेटा यांच्या ट्विटनंतर हे प्रकरण उघडकीस आलं. एमओ धालीवाल, पीजेएफ, शीख फॉर जस्टिस हे मिळालेले आहेत, असं पोलिस म्हणाले.
न्यायाधीश दिल्ली पोलिसांनी केलेल्या युक्तिवादावर न्यायाधीश सहमत दिसून आले नाही. टूलकिट आणि २६ जानेवारी हिंसाचारामध्ये काही संबंध आहे का, याचा पुरावा काय आहे, असे न्यायाधीशांनी विचारले. पोलिस म्हणाले की टूलकिटमध्ये बर्याच गोष्टी आहेत ज्या हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. त्यावर न्यायाधीसांनी पुन्हा विचारले, थेट संबंध काय आहे? की फक्त अंदाज लावावा लागेल, असं न्यायाधीशांनी विचारलं. आपल्याला टूलकिटमध्ये लिहिलेल्या गोष्टी आणि संपूर्ण परिस्थिती समजून घ्यावी लागेल, हे सोपे प्रकरण नाही. टूलकिट हॅशटॅग आणि लिंकसह वाचले पाहिजे. हा एक साधा संदेश नाही. यातील लिंक या चिथावणाऱ्या आहेत आणि त्यांना दिल्लीत मोर्चा काढण्यास सांगितलं जात आहे. काश्मीरमध्ये हत्याकांड झाल्याचं जात आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
दिशाचे वकील काय म्हणाले?
दिशाने त्यांच्याशी बातचीत केली. पण त्याचा काय संबंध आहे हे पोलिस सांगत नाहीए. एखाद्या देशद्रोही व्यक्तीशी बोललो तर आपण देशद्रोही होऊ शकतो का? नुकत्याच बनलेल्या पीजेएफ संस्थेबद्दल आम्हाला कसं माहिती असेल. चहा नापसंत करणं म्हणजे काय देशद्रोह आहे का? आपले मुद्दे कोणत्याही व्यासपीठावर ठेवणं हा गुन्हा नाह. टूलकिटमध्ये असं काय आहे ज्यामुळे देशद्रोह होऊ होतो? दिशाने बातचीत केले, असे आरोप आहेत. ४०-५० लोक होते. चर्चा टूलकिटवर झाली. मग टूलकिट गन्हेगारी स्वरुपाचे आहे का? हा प्रश्न आहे, असं दिशाचे वकील म्हणाले.