Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5765

सुशांतसिंह प्रकरण: मुंबई पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांना घाईघाईत का भेटले?

5

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपासासाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहे. सीबीआयच्या पथकात ४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे पथक मुंबईत आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत आले आहे. पण हे पथक मुंबई येण्याच्या जवळपास तासभर आधी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयकडून तपास करण्यात येत असल्याने मुंबई पोलिसांना या तपासात सीबीआयला सहकार्य करावं लागणार आहे. दुसरीकडे सीबीआयने या प्रकरणी मुंबई पोलीस आणि सीबीआयमध्ये समन्वय राखण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. सीबीआयचे डीआयजी सुवेझ हक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांमध्ये काय झाली चर्चा?

सीबीआयचे पथक मुंबई दाखल होण्याच्या जवळपास पाऊणतास आधी मुंबईचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. संध्याकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास परमबीर सिंह हे घाईघाईत मंत्रालयात दाखल झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी त्यांची चर्चा झाली. काही मिनिटांत चर्चा आटोपल्यानंतर परमबीर सिंह तिथून निघाले. पण गृहमंत्री आणि आयुक्तांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे कळू शकले नाही. आधीच सुशांतसिंह प्रकरणी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांच्या भूमिकेबाबात शंका उपस्थित केली जातेय. त्यातच मुंबई पोलीस आयुक्तांच्या या धावत्या भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतल्यानंतर परमबीर सिंह हे मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस सीबीआयला सहकार्य करणार का? असा प्रश्न परमबीर सिंह यांना केला गेला. ‘सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलीस सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार’, असं परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'स्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम'

5

मुंबईः नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत राज्यानं यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाश शिंदे यांनी आज केले.
नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन सोहळ्यास महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री श्री. शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते.

नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. याबद्दल सर्व महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या टीमचे विशेष कौतुक नगरविकासमंत्र्यांनी केले. देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे. पश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला आहे.

२५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून तर स्वच्छते कामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या वरोरा शहराला देखील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ५० हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव करण्यात आला असून नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आले आहे. देहू रोड कॅन्टोमेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

महाराष्ट्र अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४३ पैकी ३१ शहरांचा समावेश आहे. राज्यातील ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये आली आहेत. २५ नॉन अमृत शहरांपैकी २० महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील २१६ शहरे ओडीएफ प्लस तर ११६ शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात (नागरी) महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षापासून दर्जेदार काम करत देशातील अव्वल कामगिरीचे सातत्य राखले आहे. या अभियानात राज्यातील शहरांनी केलेल्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक पुरस्कार देऊन घेण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

आयपीएलसाठी तीन संघ पोहोचले युएईला, आता पहिल्यांदा करावं लागणार 'हे' काम

5

आयपीएलसाठी आज तीन युएईमध्ये दाखल झाले आहेत. पण आता युएईमध्ये पोहोचल्यावर त्यांना कडक नियम पाळावे लागणार आहे. युएईमध्ये पोहचल्यावर या तिन्ही संघांतील खेळाडूंना आता एक काम सर्वप्रथम करावे लागणार आहे, त्यानंतरच त्यांना सराव करायला दिला जाणार आहे.

आयपीएलसाठी युएईमध्ये पहिल्यांदा पोहोचण्याचा मान मिळाला तो किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाला. आज दुपारी पंजाबचा संघ दुबईसाठी रवाना झाला होता. पंजाबच्या खेळाडूंनी आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पंजाबनंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ युएईमध्ये दाखल झालेले आहेत.

करोनामुळे काही नियम आता युएईमध्ये पोहोचलेल्या खेळाडूंना पाळावेच लागणार आहे. खेळाडूंना पहिल्यांदा सहा दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. क्वारंटाइनच्या या काळात तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येणार आहे. करोनाच्या चाचणीमध्ये हे खेळाडू निगेटीव्ह आढळले तर त्याना ‘बायो-बबल’मध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतरच त्यांच्या सरावाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर सराव करतानाही खेळाडूंना काही नियम पाळावे लागणार आहेत.

आयपीएल ही बायो सिक्युएर बबलमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी बरेच कडक नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन आता खेळाडूंना करावे लागणार आहे. बायो सिक्युएर बबलमुळे खेळाडू व्हायरसपासून लांब राहतील. मैदान ते हॉटेल हा प्रवास त्यांचा यामुळे सुखकर होणार आहे. पण जर खेळाडूंनी याबाबतचे नियम मोडले तर त्यांना चांगलीच शिक्षा मिळू शकते.

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंना कडक वॉर्निंग दिल्याचे समजते आहे. आयपीएल सुरु झाल्यावर नेमकी जर खेळाडूंकडून चूक झाली किंवा नियम मोडला गेला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही ताकिद दिल्याचे पाहायला मिळत आहे. ही ताकिद फक्त खेळाडूंना देण्यात आलेली नाही, तर खेळाडूंबरोबर कोचिंग स्टाफ, संघ मालक आणि संघाबरोबर असलेल्या सर्व अन्य सदस्यांनाही देण्यात आली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Breaking राज्यात रुग्णबरे होण्याचं प्रमाण ७१ टक्के; उच्चांकी रुग्णवाढ मात्र कायम

5

मुंबईः राज्यात करोना रुग्णांची सख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. आज राज्यात उच्चांकी १४ हजार ४९२ रुग्णवाढ झाल्यानं चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात करोना मृतांचा आकडाही काळजी वाढवणारा आहे. आज दिवसभरात ३२६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ()

राज्यातील करोनाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. आज राज्यात तब्बल १४ हजार ४९२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ इतका झाला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांत सध्या १ लाख ६२ हजार ४९१ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

एकीकडे राज्यातील रुग्णांचा आलेख वाढत असताना एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज तब्बल १२ हजार २४३ रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. तर, राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३७ टक्के इतका झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट वाढत असल्यानं किंचित दिलासा मिळत आहे. राज्यात सध्या ११ लाख ७६ हजार २६१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३६ हजार ६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या २४ तासांत ३२६ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या २१ हजार ३५९ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर ३.३२ टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात आतपर्यंत ३४ लाख १४ हजार ८०९ चाचण्यांपैकी ६ लाख ४३ हजार २८९ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

एकेकाळचा रिक्षावाला आता झाला देशाचा क्रिकेट प्रशिक्षक…

5

घरीच परिस्थिती बेताचीच होती. वडिल रेल्वेमध्ये साफसफाई करायचे. त्यांना पगार काही जास्त नव्हता. त्यांच्या पगारात घर चालायचं नाही. त्यामुळे घर चालवण्यासाठी लहानपणीच तो वडिलांबरोबर रेल्वेमध्ये जाऊन काम करायचा. कारण त्याशिवाय त्यांच्या कुटुंबियांना दोन वेळचं जेवण मिळालं नसतं. त्यानंतर घर चालवण्यासाठी त्याने रिक्षाही चालवली. काही वेळा टेलरिंगचे कामही केले. जे पडेल ते काम तो करत होता. पण दुसरीकडे क्रिकेट मात्र त्याने सोडले नाही. गुणवत्ता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तो क्रिकेट खेळायला लागला आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. आता तर त्याला देशाचे प्रशिक्षकपदही देण्यात आले आहे. ही प्रेरणादायी कहाणी आहे तरी कोणाची हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल…

वाचा-

गरीब कुटुंबात या क्रिकेपटूचा जन्म झाला. त्यामुळे घरात खेळायला साधी बॅटही त्याच्याकडे नव्हती. त्यावेळी एखादं लाकूड घेऊन त्याच्याबरोबर हा टेनिस बॉलने खेळायचा. घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे वडिलांबरोबर कामाला जायचे. त्यानंतर मिळालेल्या मोकळ्या वेळेत क्रिकेटचे प्रेम जपायचे, असं त्याचं सुरु होतं.

वाचा-

वय वर्षे १२ असताना त्याला गोल्डन जिमखान्याची मदत मिळाली. त्यामुळे त्याच्या क्रिकेटला एक आयाम मिळाला. त्यानंतर महाविद्यालयात गेल्यावर त्याची गुणवत्ता बहरू लागली आणि त्याची ओळख व्हायला लागली. पण हे सारं सुरु असताना त्याने कुटुंबाची जबाबदारी झटकली नाही. कारण कुटुंब चालवण्यासाठी त्या काळात हा क्रिकेटपटू रिक्षा चालवायचे काम करायचा. त्याचबरोबर काही वेळा टेलरिंगचेही काम करायचा. ज्यामधून पैसा मिळेल ते करून कुटुंब चालवायचे काम त्याचे सुरु होते.

वाचा-

ही त्याची मेहनत फळाला आली आणि १९९८ साली त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. या संधीनंतर या क्रिकेटपटूने कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या देशाचा भरवश्याचा फलंदाज तो झाला होता. आता त्याच्यावर अजून एक जबाबदारी सोपवण्यात आली असून तो आता राष्ट्रीय हाय परफॉर्मन्स सेंटरचा फलंदाजी प्रशिक्षकही बनला आहे. हा खेळाडू आहे पाकिस्तानचा …

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

रेल्वे 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; १३ लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

5

नवी दिल्ली: आपल्या तब्बल १३ लाख कर्मचाऱ्यांना देण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत असून त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास रेल्वेच्या १३ लाख कर्मचाऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे कर्मचारी आरोग्य योजना आणि केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजनेअंतर्गत पूर्वीपासूनच आरोग्याच्या सुविधा मिळत आहेत. मात्र हा नवा प्रस्ताव मंजूर झाल्या कर्मचाऱ्यांना अधिक उपचार मिळू शकणार आहेत.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधा वाढवण्याचा रेल्वेचा विचार असून त्यासाठी संपूर्ण आरोग्य विमा योजनेचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, असे रेल्वेने म्हटले आहे. या अंतर्गत उपचार, तसेच आपत्कालिन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी सोडवता याव्यात या उद्देशानेच हा नवा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे रेल्वेने म्हटले आहे.

आपल्या नव्या प्रस्तावावर रेल्वेने आपले देशभरातील सर्व विभाग आणि उत्पादन यूनिट्सच्या महाव्यवस्थापकांकडून सूचना आणि शिफारशी मागवल्या आहेत. या सर्व सूचना आणि शिफारशी प्राप्त झाल्यानंतर या प्रस्तावावर रेल्वे अंतिम निर्णय घेणार आहे.

देशभरात करोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून या मध्ये रेल्वेच्या आरोग्य सेवेचा मोठा उपयोग झाला आहे. रेल्वेने आपल्या एकूण १२५ रुग्णालये करोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली.

क्लिक करा आणि वाचा-
देशभरात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी एकूण ५८६ आरोग्य केंद्रे, ४५ उपविभागीय रुग्णालये, तसेच ५६ विभागीय रुग्णालये, ८ उत्पादन यूनिट रुग्णालये आणि एकूण १६ झोनल रुग्णालये कार्यरत आहेत. या आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये एकूण
अडीच हजारांपेक्षा अधिक डॉक्टर्स आणि ३५ हजारांहून अधिक वैद्यकीय कर्मचारी काम करतात.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि ही देखील बातमी वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयने दिली खेळाडूंना कडक वॉर्निंग

5

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंना कडक वॉर्निंग दिल्याचे समजते आहे. आयपीएल सुरु झाल्यावर नेमकी जर खेळाडूंकडून चूक झाली किंवा नियम मोडला गेला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बीसीसीआयने नेमकी खेळाडूंना काय ताकिद दिली आहे, पाहा…

वाचा-

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही ताकिद दिल्याचे पाहायला मिळत आहे. ही ताकिद फक्त खेळाडूंना देण्यात आलेली नाही, तर खेळाडूंबरोबर कोचिंग स्टाफ, संघ मालक आणि संघाबरोबर असलेल्या सर्व अन्य सदस्यांनाही देण्यात आली आहे

वाचा-

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” यंदाची आयपीएल ही युएईमध्ये होणार आहे, त्याचबरोबर करोनाचेही वातावरण आहे. त्यामुळे आयपीएलशी निगडीत सर्व खेळाडूंसहीत अन्य व्यक्तींनाही नियमांचे कडक पालन करावे लागणार आहे. आपण एखादी चूक करावी किंवा नियम मोडावा आणि त्याचा वाईट परिणाम अन्य कोणावरही व्हावा, हे आम्ही खपवून घेणार नाही.”

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ” आयपीएलसाठी युएई सरकारने सुरक्षिततेसाठी सर्व गोष्टी आपल्याला पुरवलेल्या आहेत. खेळाडू, संघातील प्रशिक्षक आणि संघ मालकांना कुठेही स्वतंत्रपणे फिरता येणार नाही. कारण करोनाच्या केसेस युएईमध्येही आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे कुठे फिरायला गेल्यास करोनाचा धोका संभवतो. फार कमी वेळात युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या गोष्टीचा आदर ठेवायला हवा आणि सर्वांनीच जबाबदारीने वागायला हवे.”

आयपीएल ही बायो सिक्युएर बबलमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी बरेच कडक नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन आता खेळाडूंना करावे लागणार आहे. बायो सिक्युएर बबलमुळे खेळाडू व्हायरसपासून लांब राहतील. मैदान ते हॉटेल हा प्रवास त्यांचा यामुळे सुखकर होणार आहे. पण जर खेळाडूंनी याबाबतचे नियम मोडले तर त्यांना चांगलीच शिक्षा मिळू शकते.

आयपीएलसाठी युएईमध्ये पोहोचण्याचा पहिला मान प्रीती झिंटाची मालकी असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब या संघाला मिळाला आहे. आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाबचे खेळाडू हे आयपीएलसाठी आज, गुरुवारी दुबईसाठी रवाना झाले आहेत. संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीसह काही खेळाडूंनी आपल्या विमान यात्रेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयपीएलसाठी पहिल्यांदा युएईमध्ये पोहोचण्याचा मान किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाला मिळाला आहे. यानंतर आता बाकीचे संघ युएईसाठी रवाना होणार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

'या' कंपनी समोर मुकेश अंबानींच्या रिलायन्सची किमत १० पैसे देखील नाही

5

नवी दिल्ली: करोना व्हायरसचा प्रभाव सुरू झाल्यापासून सर्व कंपन्यांचा तोटा वाढत असताना भारतातील उद्योग समहू मात्र प्रचंड वेगाने वाढत होता. गेल्या चार महिन्यात जिओमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक आणली आणि त्यामुळे रिलायन्स कर्ज मुक्त देखील झाली. या काळात कंपनीचे शेअर देखील वाढेल त्याचा फायदा यांना झाला आणि ते अवघ्या काही दिवसात जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले. पण पुन्हा कंपनीचे शेअर घसरल्यामुळे ते ज्या वेगाने श्रीमंतांच्या यादीत वर गेले होते त्याच वेगाने खाली देखील आले. असे असेल तरी आज देखील ते भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर रिलायन्स देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.

वाचा-
दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलने बुधवारी ऐतिहासिक असा २ ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला. अ‍ॅपलचे जवळपास १५० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. अशी कामगिरी करणारी ही अमेरिकेतील पहिली कंपनी आहे. अ‍ॅपलच्या या कामगिरीकडे पाहिले तर असा प्रश्न पडतो की भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला हा टप्पा गाठण्यासाठी किती काळ लागले.

वाचा-
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंटस्ट्रीज लिमिटेडला सारखी कामगिरी करायची असेल तर ते अद्याप फार दूर आहेत. त्यासाठी अंबानी यांना प्रचंड मेहनत करावी लागेल. अ‍ॅपलचे मार्केट कॅप १५० लाख कोटी झाले आहे. तर अंबानी यांच्या रिलायन्सचे मार्केट कॅप १३ ते १४ लाख कोटींच्या आसपास घुटमळत आहे.

वाचा-
आजच्या घडीला रिलायन्सचे बाजार भांडवल १३.५ लाख कोटी इतके आहे. याचा अर्थ रिलायन्सचे बाजार भांडवल हे अ‍ॅपलच्या बाजार भांडवलाच्या फक्त १० भाग आहे. जर अ‍ॅपलची किमत १ रुपया असेल तर त्याच्या समोर रिलायन्स १० पैसे देखील नाही. यामुळेच अ‍ॅपलला टक्कर देण्यासाठी अंबानी यांना आणखी भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे.

वाचा-

नॅसडॅकमध्ये बुधवारी सकाळी बाजार सुरू होताच अ‍ॅपलचे शेअर ४६७.७७ डॉलरवर पोहोचले त्याचबरोबर कंपनचे मार्केट कॅप २ ट्रिलियनवर गेले. आयफोन, आयपॅड निर्मिती करणाऱ्या ही कंपनी १२ डिसेंबर १९८० रोजी पब्लिक लिस्टेड झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर ७६ हजार टक्क्यांनी वाढलेत. दोन वर्षापूर्वी अ‍ॅपलने १ ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपचा टप्पा गाठला होता. अ‍ॅपलची स्थापना स्टीव जॉब्स यांनी १९७६ साली पर्सनल कम्प्युटर्स विक्रीसाठी केली होती. आता या कंपनीने २ ट्रिलियन डॉलरचे मार्केट कॅप गाठले आहे. ही रक्कम अमेरिकेत गेल्या वर्षी जमा झालेल्या एकूण कर उत्पन्नापेक्षा थोडी अधिक आहे.

वाचा-
ऑगस्ट २०१९ पर्यंत रिलायन्सचे मार्केट कॅप ८.६ लाख कोटी इतके होते. आता ऑगस्ट २०२० मध्ये ते १३.५ कोटी इतके झाले आहे. याचा अर्थ त्यांचे मार्केट कॅप ६० टक्क्यांच्या दराने वाढले. जर कंपनी याच वेगाने वाढली तर १५० लाख कोटीवर पोहोचण्यासाठी १० वर्ष लागतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सुशांतसिंह प्रकरण: सीबीआय सर्वात आधी 'या' प्रश्नाचे उत्तर शोधणार

5

नवी दिल्ली: सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या एसआयटीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरे सीबीआयच्या टीमला शोधावी लागणार आहेत. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुशांतसिंग राजपूतचा खून झाला का?, हा आहे. याच प्रश्नाचे उत्तर प्रथम देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयला द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे आज मुख्यालयात झालेल्या बैठकीत या प्रश्नाकडे लक्ष देण्यात आले.

या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयला प्रथम याचा खून झाला का हे शोधावे लागेल. हत्येशी संबंधित काही तथ्ये आढळतात का याचा तपास करताना सीबीआय घटनास्थळाची कसून तपासणी करणार आहे. त्याच प्रमाणे गुन्ह्याचा तपास, शवविच्छेदनाचा अहवाल आणि फॉरेन्सिक तपास केला जाईल. या सोबतच सीबीआयला मुंबई पोलिसांकडूनही काही तपशील मिळवावा लागणार आहे. त्याच प्रमाणे सीबीआय टीमला तांत्रिक, फॉरेन्सिक आणि टीएफसीची मदत घ्यावी लागेल. तसेच सुशांतसिंह याच्या घरी पुन्हा तो क्राइम सीन क्रिएट करावा लागणार आहे. या बैठकीत सहभागी झालेले सीबीआयच्या एसआयटीचे अधिकारी आजच रात्री मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे सीबीआय या प्रकरणाचा तपास करताना बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे करण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन कार्यवाही सीबीआय प्रकरणातील विशेष न्यायालयात होईल. याचाच अर्थ सीबीआयने एखाद्याला अटक केल्यास प्रथम त्या व्यक्तीला ट्रान्झिट रिमांडसाठी मुंबईतील न्यायालयात हजर व्हावे लागेल.

बिहार पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आत्महत्येसाठी उद्युक्त करणे, फसवणूक करणे आणि कट रचणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. बिहार पोलिसांच्या एफआयआरमध्ये कलम ३४१, ३४८, ३८०, ४०६, ४२०, ३०६ आणि १२० ब या कलमांचा समावेश आहे.

वाचा-
सीबीआयची टीम सुशांतसिंहच्या मुंबईतील घराला भेट देण्याची शक्यता आहे. याच घरात सुशांतसिंहचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या भेटीत या प्रकरणातील काही धागेदोरे सापडतात का यासाठी सीबीआय कसून तपासणी करेल यात शंका नाही.

वाचा-
सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबाने सुशांतचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सीबीआयची एसआयटी हाच संशय गृहित धरून सुशांतच्या फ्लॅटमधील खोलीत क्राइम सीन क्रिएट करेल. या सोबतच डमी टेस्ट देखील होण्याची शक्यता आहे.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

आश्चर्यच! सोनेरी रंगाचा कासव; विष्णू देवाचा अवतार म्हणून दर्शनासाठी रांग

6

काठमांडू: नेपाळमध्ये सध्या एका कासवाच्या दर्शनासाठी रांग लागली आहे. हे इतर कासवांपेक्षा वेगळंच आहे. या कासवाचा रंग सोनेरी आहे. हे कासव विष्णू देवाचा अवतार असल्याच्या श्रद्धेतून लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. तर, मिथिला वाइल्डलाइफ ट्रस्टने हे कासव भारतीय फ्लॅप कासव वर्गातील असल्याचे म्हटले आहे.

आढळल्यानंतर वन्यजीव तज्ञ कमल देवकोटा यांनी सांगितले की या कासवाला नेपाळमध्ये विशेष सांस्कृतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यांनी सांगितले की, हे कासव विष्णू देवाचा अवतार आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी त्यांनी कासवरुपात अवतार घेतला आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, कासवाच्या कवचाच्या वरील भागाला आकाश आणि खालील भागास पृथ्वी समजले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. हे कासव धनुष जिल्ह्यातील धनुषधाम नगरपालिका भागात आढळले आहे. या कासवाच्या दर्शनासाठी लोकांची रांग लागली आहे. नेपाळमध्ये सोनेरी रंगाचा हा पहिलाच कासव आहे. सगळ्या जगात अशाप्रकारचे फक्त पाच कासव आहेत. आमच्यासाठी हा महत्वाचा शोध असल्याचे देवकोटा यांनी सांगितले.

तर, दुसरीकडे तज्ञांच्या माहितीनुसार, कासवांच्या जनुकीय बदलामुळे कासवाचा रंग सोनेरी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला क्रॉमेटिक ल्यूसिझम म्हणतात. त्यामुळे कासवाच्या कवचाचा भाग हा सोनेरी होतो. त्यामुळे त्वचेचा रंग हा सफेद अथवा मध्यम सफेद रंगाचा होऊ शकतो. कासवात जनुकीय बदल झाल्याने त्याचा रंग सोनेरी झाला आहे. सध्या नेपाळ या कासवाची चर्चा असून वन्यजीव अभ्यासकांकडून या कासवाचे निरीक्षण, अभ्यास सुरू आहे.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts